नाती आहेत का जिवंत?
नाती आहेत का जिवंत?
नाती आहेत का जिवंत..
काळाप्रमाणे तीही कुठे गेली निवांत
सांगायला दुःख वाटते अत्यंत
कारण माणुसकी राहिली नाही
तर राहिलाय फक्त एकांत
पैशाच्या मागे धावताना
कोणाकडेच नाही उसंत
माणूस झालाय स्वार्थी नितांत
प्रायव्हसी नावाचं पाहिजे ह्यांना स्वातंत्र्य
मोबाईल मुळे लोक जवळ झालेत अत्यंत
तरीपण सर्वांचे मन का बरे अशांत
व्हिडीओमधून शोधत आहेत सुखशांत
नातेवाईकांशी बोलायला सगळेच राहतात शांत
कुणीच कुणाचं नसतं
हे सांगून गेले सगळे संत
पण देवा नाती नसती तर
निर्माण झाले असते का रे ग्रंथ?
देवा आता तूच दे दृष्टांत
पण लोक होतील कारे कृतांत
नात्याचा अर्थ कळणार कारे लोकांत
खरच माणुसकीचा झालाय का अंत
मनात माझ्या हीच आहे खंत
नाती आहेत का जिवंत
का काळाप्रमाणे तीही कुठे गेली निवांत
