साथ देते ती फक्त एक .....
साथ देते ती फक्त एक .....
जीवन म्हणजे काय असतं
सुख दुःखने भरलेलं गांव असतं
मिळून सर्वांनी मांडावयाचा खेळ असतो
मनाने मनांशी घालवयाचा मेळ असतो
यात विकासाला मायेची ममतेची आणि प्रेमाची साथ असते
यात स्त्रीचा मोठा वाटा असतो
संस्काराच्या स्मृतीला मातृत्वाची साथ असते
संकटांशी धैर्याने लढायला प्रेमाची साथ असते
वेळेच्या मर्यादेशी जणू तिच्या कार्याची पैज असते
स्वभावाने घडविणारी व्यक्तिमत्त्वाची सेज असते
जीवनाच्या या रहाटगाडग्यात मिळतात सवंगडी अनेक
संकटाची चाहूल येताच साथ देते ती फक्त एक ,साथ देते ती फक्त एक ||