STORYMIRROR

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Others

4  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Others

वठलेलं खोड

वठलेलं खोड

1 min
190

वठलेलं खोड

आजही,

ते दोघे तिथेच बसले होते रस्त्याच्या कडेला, 

एका झाडाखाली जीर्ण फाटके गोणपाट अंथरुण

असतील समवयस्क वयाने साठीच्या आसपासचे

होते डोक्यावर त्यांच्या आभाळाचं पांघरून

चिंध्या झाल्या होत्या अंगावरील वसनांच्या अन

डोक्यावर विस्कटलेल्या झिपऱ्याचं टोपलं 

पण डोळ्यात होती एक आस

बदलतील दिवस अन बदलेल नशीब आपलं

त्यातला एकजण बोट करून दाखवत होता दुसऱ्याला

बाजूलाच असलेलं झाडाचं वठलेलं खोड अन

सांगत होता हातवारे करीत, 

" अरे... हा झाडाचा बुंधा पार वठला होता अन 

आता बघ... 

फुटू लागली नवी पालवी ह्या वठल्या खोडाला

बहरून येईल पुन्हा नव्याने, किलबिलतील पाखरे...

आणि एक दिवस उंच भरारी घेतील त्या निळ्या आभाळी..."

पाहून त्या फुटलेल्या धुमाऱ्यानां कोण आनंद झाला त्याला

फिदीफिदी तो गाली हसू लागला.

पाहून त्यांना मनात आला एक विचार,

आहे त्या वठल्या खोडासम ह्यांच पण जीवन

ऐन उमेदीच्या काळात असतील बहरलेली ह्यांची पण आयुष्य...

बागडली असतील अंगणात चिमणी पावलं...

येताच पंखात बळ पाखरांच्या

घेतली भरारी उंच आभाळी...

बिचारी झाडं बसली असतील लावून डोळे वाटेकडे

येतील परतूनी पाखरे घरट्याकडे पण...

वाट पाहून डोळे शिणले

हळुहळु बहर मग ओसरू लागला...

आजही हे डोळे वाट पाहत आहेत

सोसत ग्रीष्माचा तडाखा... पाखरांच्या परतीची

जाणवेल ओल भावनांची

फुटतील धुमारे... होतील पल्लवित 

येईल परत बहर परतून पुन्हा नव्याने

आहे आस मनी, प्रतीक्षेत ही

वठलेली खोडं...

 


या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy