DURGA BHISE

Drama Romance

3  

DURGA BHISE

Drama Romance

विरहातले प्रेम

विरहातले प्रेम

12 mins
742


दादु गुड मॉर्निंग. हॉस्पिटलला येत आहेस ना... " प्रांजल त्याच्या रूममध्ये येत बोलते.

" गुड मॉर्निंग बच्चू... नाही. आज मी येत नाही ये. तु डॅडबरोबर जा आज... " कार्तिक.

" का रे दादु... प्लीज चल ना. आता आताच तर तू पुन्हा कामाकडे वळलास. मग आज का नाही येत आहेस. " प्रांजल.

" नाही प्राजु प्लीज आज नको फोर्स करूस. मी उद्या येईल ना... आज मला काही नको बोलूस आणि डॅडला पण सांग मला बाहेर जायचं होतं म्हणून मी आलो नाही. " कार्तिक.

" ओके. मी निघते मग माझे पेशंट्स माझी वाट पाहत असतील. बाय... " प्रांजल.

" हा बाय " कार्तिक.

कार्तिक एकटाच विचार करत रूममध्ये बसला असतो. विचार करता करता त्याचे एक्सप्रेशन बदलत असतात. कधी हसतो कधी शांत राहतो तर कधी खूप रागावतो. थोड्या वेळाने गाडीची चावी घेऊन तो घराबाहेर पडतो.

कार स्टार्ट करून ज्या दिशेला गाडी जाईल त्या दिशेने तो गाडी चालवत असतो. मधेच त्याचा फोन वाजतो तो पहिल्यांदा फोन उचलत नाही पण नंतर मात्र फोन उचलतो.

" हा बोल काय काम होतं " कार्तिक

" कार्तिक कुठे आहेस तू... प्लीज आताच्या आता तुझ्या हॉस्पिटलला निघून ये मी सुद्धा तिथेच येत आहे. " यश

" यश मला आता तिथे नाही यायचं... मला त्या आठवणी ते दिवस सारखे आठवतात ती तिथे असल्याचा भास होतो आणि आज.... आज तिचा बर्थडे आहे " कार्तिक

" कार्तिक ऐक.... आज मला ती भेटली " यश

" क्काय.... तुला ती कुठे भेटली... आणि यश कशी आहे ती ठिक आहे ना " कार्तिक

" तू हॉस्पिटलला येतोस का??? मी तिला घेऊन तिथेच आलो आहे तिची कंडिशन खूप खराब आहे तू प्लीज लवकर ये " यश

" का.... काय झालं तिला.... मी आलोच... " करत कार्तिक फोन ठेवतो आणि फास्ट ड्राईव करत हॉस्पिटलला पोहचतो.

" यश....यश प्राजू यश कुठे आहे " कार्तिक खूप घाबरला असतो.

" दादू यश दादा..." प्रांजल

" कार्तिक..." यश

" यश कुठे आहे ती " कार्तिक

" कार्तिक तिचं मोठं अॅकसिडंट झालेलं. मी माझ्या कामासाठी निघालेलो तर मला ती रस्त्यात पडलेली दिसली बेशुद्ध झालेली ती पूर्ण मग तसंच तिला इथे आणलं आणि तुला कॉल केला " यश

" मग आता कशी आहे ती आणि कुठे आहे " कार्तिक

" आता ती आय. सी. यू. मध्ये आहे " यश

" दादू वहिनीला खूप लागलय... डोक्याला पण मार लागलाय... थोडक्यात वाचली असेच काहीसे घडले आहे " प्रांजल

" प्राजू ती ठिक आहे ना... ती शुद्धीवर आली का??? " कार्तिक

" हो आता ओके आहे पण वहिनी अजून तरी शुद्धीवर आली नाही " प्रांजल

" ती वहिनी नाही. तुझी एक पेशंट आहे कळाल... मुळात तिला इथेच का आणलस यश... तुला दुसरे हॉस्पिटल भेटले नाही का?? " कार्तिक चे बाबा

" बाबा प्लीज आता नको " कार्तिक

कार्तिकचे डोळे पाणावले होते. तो आय. सी. यू. रूमच्या बाहेरूनच तिला पाहत असतो.

तिला इतकं लागलेलं असतं की त्याला तिच्याकडे पाहवत नाही. पण त्याला तिच्यासोबत बोलायचं असतं. तिच्याजवळ जायचं असतं. पण तरीही तो तसाच तिथे उभा राहतो.

यश पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे हे अॅकसिडन्ट कोणी केलं कसं झालं ते इन्वेस्टीेगेशनकरायला निघून जातो. त्यातच तो तिच्या घरच्यांना पण सगळं सांगून ती हॉस्पिटल मध्ये असल्याचे कळवतो.

" डॉ प्रांजल... " केतन

" हो प्रांजल आपण कोण?? " प्रांजल फाईल मध्ये पाहत बोलते.

" मी केतन माझी दी कशी आहे " केतन

" ओहह... बसा ना. वही... म्हणजे तुमची दी तशी ठीक आहे पण अजून शुद्धीवर नाही आली " प्रांजल

" कधी पर्यंत शुद्धीवर येईल आणि आम्ही तिला भेटू शकतो का? " केतन

" ती सकाळपर्यंत शुद्धीवर येईल पण तुम्ही तिला आता नाही भेटू शकत तिला दुसऱ्या वॉर्ड मध्ये शिफ्ट केल्यावर भेटू शकता आता फक्त बाहेरून पाहू शकता " प्रांजल

" ठीक आहे " केतन

केतन आणि केतनचे वडील हॉस्पिटलमध्ये थांबतात तिथेच कार्तिकही असतो.तिथे पुर्णपणे शांतता असते तिथे बसलेल्या तिघांच्या ही मनात खूप काही चालू असत पण कसं बोलावं आणि काय विचारावं हे कळत नाही. थोड्या वेळाने तिथे प्रांजल येते मृण्मयी ला दुसऱ्या वॉर्ड मध्ये शिफ्ट करायचे असते. ती शिफ्ट करून मृण्मयीला भेटण्याची परवानगी देऊन केबिन मध्ये निघून जाते.

केतन आणि बाबा तिला भेटून बाजूला येऊन बसतात. कार्तिकचे बाबा रागावल्यामुळे रागातच घरी निघून जातात.

" काका मला तिला भेटायचे आहे. प्लीज मी तिला भेटू शकतो का??? " कार्तिक

बाबा फक्त मान हलवून हो बोलतात.

" थँक्यू काका " कार्तिक

बाबा आणि केतन बाहेर येतात.

कार्तिक आत येतो आणि तिच्या शेजारी उभा राहतो. तिच्या निरागस चेहऱ्याकडे तो पाहत राहतो डोक्यावर पट्टी, गालावर व्रण, हाताला पायालाही लागलं होतं. तो खूप भावूक झालेला.

" मनू.... ये मनू बघ ना कोण आलय प्लीज उठ ना गं...मी तुझी आतापर्यंत वाट पाहत आहे. तू जेव्हा सोडून गेलेलीस तेव्हा मला इतकी भीती नाही वाटली तितकी आज मला वाटली. मला तुला गमवायचं नाही. भले तू माझ्यापासून दूर राहा पण अस सोडून जाण मला विचारही करवत नाही. पण तू अशी अचानक इकडे कशी तू तर हे शहर सोडून गेलेलीस ना... मी तुला कुठे कुठे नाही शोधलं पण तू सापडलीच नाहीस. मग नंतर प्रयत्न सोडले कारण मला वाटले की तुलाच मला भेटायचे नाही म्हणून तर तू मला सोडून गेलीस ना...पण का गेलीस आपलं ठरलं होतं ना सगळं एकत्र मिळून हँडल करायचं मग तू एकटीनेच कसा काय निर्णय घेतलास. सांग ना...उठ आज तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं पण द्यायची आहेत " कार्तिक तिच्या बाजूला खुर्चीवर बसून तिचा हात हातात घेऊन बोलत होता त्याच्या डोळ्यातले पाणी अश्रूंच्या रूपाने वाट मोकळी करत होते. संध्याकाळ झाली होती तरी मृण्मयी अजून शुद्धीवर आली नव्हती. केतन आणि बाबा खूप काळजीत होते. कार्तिक तिच्याबरोबर आतच होता. केतन शेवटी प्रांजलकडे जातो. पण प्रांजल केबिन मध्ये नसते. तो मागे वळणार तोपर्यंत त्याच्या खांद्यावर एक हात येतो.

" काळजी करू नका सगळं ठिक होईल " प्रांजल त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलते.

" पण दि अजून शुद्धीवर का नाही आली. ती खरंच ठीक आहे ना " केतनच्या डोळ्यात पाणी तरळत.

" तुम्ही प्लीज शांत व्हा आणि बसा. हे घ्या पाणी " प्रांजल त्याच्या हातात पाणी देत त्याला बसायला सांगते.

" ती सकाळ पर्यंत शुद्धीवर येईल मी आधीच बोलले होते आणि ती आता ओके आहे. डोक्याला मार लागला होता पण तो पण जास्त खोल नाही लागला आणि थोडं हातापायलाही लागलंय ते महिनाभरात ठीक होईल आता तिला तेव्हडा टाईम तर लागेलच ना " प्रांजल

" थॅक्यु डॉ. थॅक्यु सो मच तिला वाचवल्याबद्दल " केतन

" ही तर माझी जबाबदारी आहे " प्रांजल

" दी माझ्यासाठी खूप काही आहे. आई गेल्यावरचं आईचं प्रेम तिची माया मला तिने दिली. मला काही कमी पडू दिले नाही. माझ्यासाठी तिने खूप काही केले आहे " केतन

प्रांजल त्याच्या हातावर हात ठेवते.

" मी एक विचारू का ...म्हणजे तुम्हाची काही हरकत नसेल तर... " प्रांजल

" मलाही माहीत आहे तुम्हांला काय विचारायचं आहे.

तरीही ठीक आहे विचारा " केतन

" ते म्हणजे वहिनी दादूला सोडून का गेली " प्रांजल

तेवढ्यात सिस्टर प्रांजलला बोलवायला येते. मृण्मयी शुद्धीवर आल्याचं सांगते. तसे दोघेही तिच्या वार्ड मध्ये येतात. कार्तिक तिला चेक करत असतो. ती हळू हळू शुद्धीवर येत असते . प्रांजल यशलाही मृण्मयी शुद्धीवर आल्याचं कळवते.

" मृण्मयी शुद्धीवर आल्यावर कार्तिककडे आश्चयाने पाहते " हे इथे कसे काय आणि आता मी त्यांना कसे फेस करू.....

असे विचार तिच्या मनात चालू होतात . कार्तिक तिच्याकडे पाहतो आणि तिथून बाहेर निघून जातो . समोरून यश येतो .

" कार्तिक काय झालं भेटलास तिला काही बोलली का ती " यश .

" नाही.. मी पण काही नाही बोललो आणि ती सुद्धा काही नाही बोलली " कार्तिक.

" बरं ठीक आहे. मी भेटतो तिला हे सगळं कसं झालं काय घडलं इन्वेस्तीगेशन करायची आहे." यश

" ठीक आहे तु जा आत.... मी आहे माझ्या कॅबिन मध्ये नंतर भेटून जा " कार्तिक

कार्तिक कॅबिन मध्ये जाऊन खुर्चीवर डोळे मिटून शांत पडून बसतो. तो विचारात गुंग होऊन जातो . विचार करता करता त्याच्या ही नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रु ओघळतात हे सगळं प्रांजल पाहते . प्रांजलला तिच्या दादूला असं पाहून खूप वाईट वाटतं . ती तिथून डायरेक्ट केतनकडे येते.

" केतन मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तर तुम्ही माझ्या कॅबिनमध्ये येता का " प्रांजल

" ठीक आहे चला "केतन

" एक मिनिट आधी इथे या....ते पहा दादूला किती त्रास होत आहे. तो आताच थोडा बरा झालेला . वहिनी गेल्यावर तो पुर्णपणे डिप्रेशनमध्ये होता. ना कोणाशी बोलायचा ना कधी पोटभर जेवायचा ... जगायचं म्हणून नुसतं जगत होता आणि महत्त्वाच म्हणजे सोडून जायचंच होतं तर वहिनीने आधीच तसं सगळा विचार करायचा होता. वहिनीने दादूचा विचार नाही केला का... ??? तिने त्याला सोडन्याचा असा कसा डिसीजन घेतला. आणि आता पुन्हा त्याच्या समोर ....तो कसं फेस करेल सगळं. दोन वर्षे पूर्ण झाली होती वहिनी सोडून गेली. त्यानंतर मी यश दादा दोघांनी मिळून त्याला ह्यातुन बाहेर काढल. पण आता पुन्हा तेच तुम्ही तर हे शहर ही सोडून गेलेलात मग आज पुन्हा इथे कसे काय? " प्रांजल

प्रांजल इतकं बोलून शांत बसते. ति आजूबाजूला पाहते. तिथली माणसे त्यांना पाहत असतात. केतन प्रांजल ला जरा पुढे घेऊन जातो.

" डॉ प्रांजल मला मान्य आहे. माझ्या दि ने त्यांना सोडलं. पण ती अशी नाही आहे जसा तुम्ही सगळे विचार करत आहेत. तिला सुध्दा तितकाच त्रास होत होता जितका तुमच्या दादूला होत होता. तिच्यासाठी सुद्धा हे कठीणच होत. आणि तुम्ही अजूनही तिला वहिनी बोलता... म्हणजे तिने तुमच्या दादूला सोडून दुसऱ्या बरोबर लग्न केलं तरीही...." केतन

" काय वहिनीने म्हणजे मृण्मयी ने लग्न केलं " प्रांजल

" हो पण.." केतन

" अजून पण आहे का...?" प्रांजल

कार्तिक ही हे सगळं ऐकतो. त्याला त्याच्या कानावर विश्वास बसत नाही की जे आपण ऐकलं ते खरं आहे.

" दादू तू....तू इथे तू ऐकलं ना तिने तर लग्न सुध्दा केलं. ती तुला सोडून पुढे गेली तिच्या आयुष्यात आणि तू तिच्या आठवणी मध्ये रोज झुरत असतोस. तू काय कमी केलं तिच्या साठी आपल्या डॅडला पण मान्य नव्हतं. तरी तु त्याना समजावलं खूप प्रयत्न करून ते सुद्धा राजी झाले आणि ही मात्र ..." प्रांजल

" एक मिनिट ती माझी बहिण आहे सो तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला " केतन

" काय वाईट बोलली ती.... तिने माझी अवस्था पाहिली म्हणून ती अशी रिअॅकट होत आहे. पण खरंच तिने लग्न.. म्हणजे तिने लग्न केलं का ??? " कार्तिक

" हो... तिने लग्न केलं पण ती खुश नाही राहिली " केतन

" दादू आपण आत जाऊ या का तुझ्या केबीनमध्ये इथे सगळे आहेत " प्रांजल

तिघेही कार्तिक च्या केबिन मध्ये येऊन खुर्चीवर बसतात.

" बाबांना हे लग्न मान्य नव्हतं. म्हणजे तुम्ही खूप मोठी माणसं आम्हाला इतकं झेपलं नसतं. पुन्हा लोक काय म्हणतील हा सगळा विचार बाबा करत होते. म्हणून त्यांनी दिदीला तुम्हाला विसरण्यासाठी भाग पडलं. आधी दि सुद्धा त्यांच्या विरोधात होती पण नंतर ती तयार झाली बाबांनी इमोशनल करून तिला तयार केलं. म्हणून ती तुम्हाला काही न सांगता कुणाला काही न बोलता निघून गेली. आम्ही सगळे इथून गावी निघून गेलो. तिथेच राहिलो कारण मृण्मयी दि बोलली होती की मी लग्न करायला तयार आहे पण बाबा आणि मी दोघेही गावीच राहणार. बाबा पण राजी झाले. तिचं लग्न झालं. पण ती अजिबात खुश नव्हती. तिच्या चेहऱ्यावरून ते साफ दिसायचं

ती कोणाला काहीच सांगत नव्हती. पण एक दिवस तिने माझ्याकडे आणि बाबाकडे तिचं मन मोकळं केलं. ती खूप रडली त्या दिवशी तिला पुन्हा तिच्या घरी जायचं नव्हतं. तिला सहन होत नव्हतं. " केतन

" कार्तिक... तुम्ही सगळे एकत्र म्हणजे मी गलत टायमिंग ला आलो का ?? ठीक आहे मी उद्या येतो माझं काम झालंय तसंही " यश

" तू थांबु शकतो. तुलाही माहीत आहे. केतन पण ती खुश का नव्हती असं काय घडलं तिच्या लाईफ मध्ये की तिला इतका त्रास होत होता आणि ती माझ्या कडे का नाही आली " कार्तिक

" तिचा नवरा आणि तिची सासू या दोघांनी मिळून तिला खूप त्रास दिला तिलाच काय बाबांकडून ते पैसेही मागायचे बाबा मुलीची बाजु म्हणून गप्प बसायचे. दोन तीन वेळा तर तिच्या नवऱ्याने तिला मारलही होतं . म्हणून ती घरी यायची पण तिचा नवरा गोड बोलून पुन्हा तिला घेऊन जायचा. पण तिने हे कधी सांगितले नव्हते आम्हाला. इतकच नाही बायको असतानाही बाहेर त्याचं अफेअर चालू होतं. जेव्हा आम्हाला सगळं तिने सांगितले. तेव्हा बाबांनी तिला घरीच थांबवून घेतलं आणि डिवाॅर्स पेपर्स तयार केले. बाबांना तर खूप वाईट वाटत होतं. कारण जर त्यानी तुमच्या सोबत लग्न लावलं असतं दी चं तर ती सुखी असती. आई गेल्या पासून तिला आणि मला बाबांनीच सांभाळलं आईचंही प्रेम दिलं. काही कमी पडू दिल नव्हतं. पण लग्नानंतर तिनं खूप काही सहन केलं. तिच्यासोबत मात्र कोणीही नव्हतं. तुम्हांला सुध्दा तिने एकदा कॉल केला होता. पण ती तुम्हांला काही सांगू शकली नाही. तिने तसाच फोन ठेवून दिला. " केतन

" मला वाटलेलंच की तो तिचाच फोन होता. पण तिकडून तीने काही न बोलताच फोन ठेवला. मी खूप वेळा प्रयत्न केला त्या नंबरवर कॉल करायचा. पण काहीच झालं नाही.

मग तिचा डिवाॅर्स झाला का ? " कार्तिक

" हो डिवाॅर्स तर आम्हला हवा होताच, त्यानंतरही ती खूप एकटी आणि शांत राहायची. म्हणून बाबा बोलले की आपण पुन्हा पुण्याला जाऊ म्हणून आम्ही इकडे आलो की निदान हसेल तरी आणि तसंच झालं तिला हळू हळू बरं वाटायला लागलं. आम्ही तिच्या त्या कडू आठवणी कधी बाहेर काढल्या नाहीत. आज तिचा एक इंटरव्ह्यू होता ती तिकडेच चाललेली तर तिचं अॅकसिडन्ट झालं " केतन 

कार्तिक तर पूर्ण गप्प बसतो. त्याला तिला भेटायचं असतं. कारण तिची यात काही चूक नव्हती. पाहायला गेलं तर चुक तशी कुणाचीच नव्हती. एक बाप म्हणून ते बरोबर होते. तो तसाच विचार करत जागेवरून उठतो.

" दादू..." प्रांजल

" कार्तिक काय झालं. कुठे निघालास " यश

" मला तिला भेटायचं आहे " कार्तिक

कार्तिक तसाच तिथून पळतच बाहेर येतो आणि थेट मृण्मयी च्या रुममध्ये येतो. बाबा कार्तिक ला पाहून हसतात आणि बाहेर निघून येतात.

" जागी आहेस अजून... झोपली नाहीस " कार्तिक

" नाही ...म्हणजे झोपही लागत नव्हती म्हणून बाबा बरोबर बोलत बसलेले. " मृण्मयी उठत बोलते तस तिचा तोल जातो. कार्तिक पटकन तिला आधार देत तिला पाठीमागे टेकून बसवतो.

" आता कसं वाटतंय... म्हणजे काही त्रास नाही होत आहे ना " कार्तिक

" जरा बरं वाटतंय . डोकं आणि हात पायाला लागलंय त्यामुळे थोडं दुखतंय " मृण्मयी

" हा थोडा त्रास होईल थोडे दिवस फक्त मग सगळं ठीक होईल " कार्तिक

" हो थँक्स " मृण्मयी

" सर पेशंटची ड्रेसिंग करायची आहे " तिथली सिस्टर

" ओके दया इथे... तुम्ही जाऊ शकता.. मी करतो. " कार्तिक

कार्तिक तिच्या हाताच्या पट्टी काढतो आणि पुन्हा दुसरी पट्टी बदलत असतो.

" थँक्स का बोललीस " कार्तिक

" ते तुम्ही माझा जीव वाचवलात म्हणून.... " मृण्मयी

" शु.... तुझा जीव माझ्या साठी किती महत्त्वाचा आहे हे तुला खूप चांगल माहीत आहे. मी खूप वेडा होतो तुझ्यासाठी आणि आताही आहे. कार्तिक

" पण माझं... " मृण्मयी

कार्तिक तिच्या ओठावर एक बोट ठेवून तिला शांत करतो.

" मला माहित आहे तुझं लग्न झालेलं. मग कसा डिवाॅर्स झाला हे ही कळलंय. पण तू चुकीचं केलंस मला एकदा तरी कळवलं असतस तर आपण काहीतरी केलं तरी असतं . पण तू कशाला मला काही सांगशील . एकटीलाच करायचं होतं ना सगळं. माझा विचारच नाही केलास. मी कसा राहीन तुझ्याशिवाय..... मी पागल झालेलो जेव्हा मला कळलं तुम्ही हे शहर सोडून गेलात. मला काहीच सुचतं नव्हतं.. पण आता नाही. मला पुन्हा एकदा सगळं नीट करायचा एक चान्स दे . मी सगळं काही नीट करीन " कार्तिक

" कार्तिक पण पुन्हा एकदा विचार करा ना. कारण आता तर मी डिवाॅसी पण आहे. तुमच्या बाबांना नाही पटणार " मृण्मयी

" प्लीज तू हया सगळ्या चा विचार नको करू बाबांना मी मनवीन आधी सुद्धा मनवलं होतं आताही मनवीन. फक्त तुझा होकार हवाय आणि तुझी साथ... देशील ना तुझी साथ जन्मभर " कार्तिकतिच्यासमोर स्वतःचा हात पुढे करत बोलतो.

" रिअली व्हेरी व्हेरी सॉरी मी जे काही तुमच्यासोबत वागले त्या साठी खरंच मनापासून..." मृण्मयी

" प्लीज जान सॉरी नको बोलूस मला कळतंय जे काही घडलं किंवा काय झालं ते सगळं विसरून जा मलाही त्याच्याशी काही संबंध नाही. आपण आपली लाईफ पुढे एकत्र मिळून जगुयात आणि मनापासूनच बोलायचं तर ते तीन words बोल ना मला खुप छान वाटेल " कार्तिक

मृण्मयी छान लाजत " I love you कार्तिक i love you very much "

" ओहह काय लाजतेस.... खूप क्युट दिसतेस तू मनु ..... . खूप मिस केलं तुला खूप म्हणजे खूप अँड i love you too .... my wify आणि wish you many many Happy returns of the day.... Happy birthday dear " कार्तिक

" तुम्हाला माहीत होत ...." मृण्मयी

" तुझा बर्थडे मी कसा विसरेन राणी " कार्तिक

" बरं मग माझं गिफ्ट ..." मृण्मयी

" ते तुला घरी गेल्यावर भेटलंच आता फक्त " असं म्हणत तो तिच्या गालावर किस करतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama