DURGA BHISE

Others

3  

DURGA BHISE

Others

सहवास मैत्रीचा ( एक ट्रिप )

सहवास मैत्रीचा ( एक ट्रिप )

22 mins
207


आरव सकाळी नेहमीप्रमाणे पाच ला उठला होता आणि नेहमीप्रमाणेच फ्रेश होऊन बाल्कनीत उभा होता. त्याच्या घरासमोर एक बंगला होता. त्याला लागूनच बंगला मालकाची छान सुंदर अशी बाग होती. आरव तेच चित्र पाहायला रोज सकाळी बाहेर यायचा. त्याला निसर्ग खूप आवडतो. त्यातुनच हे हिवाळ्याचे दिवस या धुक्याने आणि या गुलाबी थंडीने निसर्गाचे पण वेगळेच रूप दिसते. 


आरव कॉफी पित " काय प्रसन्न वातावरण आहे. ही बाग किती सुंदर दिसतेय. या बागेतल्या निरनिराळ्या रंगांच्या फुलांनी आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी ही बाग किती खुलून दिसत आहे. त्यात ही धुक्याची थंडी या बागेचे वेगळीच शान वाढवते आहे. " इतक्यात थंड वाऱ्याची झुळूक आरवला स्पर्श करून गेली. आणि आरव अचानक म्हणाला....


थंडीची ही चाहुल लागता, 

मन बहरून आले.... 

वाऱ्याच्या मग या झोताने,

अगं अगं शहारले.... 


इतक्यात निकेतन आला आणि त्याला हाक मारली. त्यातच त्याने त्या ओळी ही ऐकल्या. 


निकेतन " ओ हो....क्या बात है... सकाळी सकाळी शायरी वगैरे. "


आरव " हो सहजच... तसही आज खूप दिवसांनी सुचल जरा... आज काही वेगळेच दिसतंय या वातावरणात....आणि तो पुन्हा त्या थंडीत आणि धुक्यात गुंतला. 


निकेतन " अरे भावा चल... आपण आज बाहेर जाणार आहोत ना... लक्षात आहे ना... तेव्हा निसर्ग पहा उशीर होईल सगळे येतील आणि तू इथेच असा बसशील. 


त्याने त्याला हाताने हलवलं तसा तो तंद्रीतून जागा झाला. 


आरव " हो हो चल. " आणि दोघे आवरायला जातात. 


आरव आणि निकेतन दोघे जुळे भाऊ. त्यामुळे एकाच वर्गात, एकत्रच असायचे. आई बाबांचे लाडके होते दोघे. दोघांचं एकमेकांबरोबर पटायचं आणि मस्ती तर खूप करायचे. भाऊ कमी मित्र जास्त होते. त्यांचा कॉलेजचा एक मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता. आरव निकेतन अथर्व सोनल आणि उर्वी असे मिळून पाच जण होते. कॉलेजचे टॉपर तर होतेच. सगळ्यात पुढे असायचे. पुर्ण कॉलेज त्यांना ओळखायचे. 


आरव " निक... तू अथर्वला फोन केला का???? "


निकेतन " नाही मी अजून कुणालाच फोन केला नाही. "


इतक्यात आरव चा फोन वाजतो 


आरव " हे बघ सोनलचाच फोन आला "

     " हॅलो... सोनल कुठे आहेस "


सोनल " मी आता तुमच्या घराच्या बाहेर पोहचेल. तुम्ही बाहेर या... "


आरव " ओके पण उर्वी आणि अथर्व कुठे आहेत "


सोनल " मी फोन केला होता त्यांना... ते येतील सोबतच आहेत. तुम्ही या बाहेर मी आलेय... "


आरव " हा आम्ही आलो. " आरवने फोन ठेवला.


आरव " निक चल पटकन झालं का तुझं... सोनल बाहेर आली आहे. "


निकेतन " सोनल एकटी... पण ते तिघे एकत्र येणार होते ना... "


आरव " माहीत नाही पण ती एकटीच आहे. उर्वी आणि अथर्व येत आहेत म्हणाली. "


निकेतन " ....च्यायला ही एकटी इथे काय करतेय. "


आरव " चल पाहू... आई... आम्ही निघतो गं बाय.. "


निकेतन " बाय आई "


दोघांनी त्यांच्या मम्माला गालावर किस केलं आणि आप-आपल्या बाईक्स ची चावी घेऊन बाहेर आले. प्रत्येक जण आप-आपली बाईक, स्कूटी आणणार होते.


सोनल तिथे येऊन स्कूटीवर बसूनच वाट पहात होती.


निकेतन " हाय सोना डार्लिंग... " निक गळे मिळत.


सोनल " हाय निक...हाय आरव... "


आरव " हाय... "आरवही गळे मिळतो.


निकेतन " तू एकटी का आलीस... का माझ्याशिवाय करमत नव्हतं म्हणुन तू पुढे निघून आलीस...हो ना


सोनल " गप हा आता... नाही तर सकाळी सकाळी माझा मार खाशील. "


आरव " अरे गप्प बसा... भांडताय काय??? त्या दोघांचा पत्या नाही काही आणि तुम्ही... "


सोनल " आरव अरे येतील ते... उर्वी ला उशीर झाला जरा आणि तिला बाहेरचं एक कामही होतं. मग अथर्व तिच्या बरोबर गेला आणि मला इथे पाठवलं मग मी आले. 


आरव " ही उर्वी पण ना... बरं मग आपण आता काय करायचं.... "


निकेतन " चिल भावा. आपण आपल्या रोजच्या जागी जाऊन बसूया. त्यांना पण फोन करून तिथेच बोलवू. बरोबर ना सोना.... निक तिला डोळा मारतो.

सोनल त्याच्या पाठीत जोरात गुच्चा घालते. "


सोनल " बावळट झालं का तुझं सुरू... जिथे पोरगी दिसली तिथे तुझी नाटकी सुरू असतात. आम्हांला तरी सोड. "


निकेतन " मग मी तुझा मित्र कसला... आरवला टाळी देत निक म्हणाला "


सोनल " आरव तू सुद्धा... दोघांना पण मी नंतर पाहते. "


आरव " अगं मस्ती करतोय... चिडतेस कशाला???? नाकावर किती हा राग... तिचे गाल ओढत बोलतो. "


सोनल " ए जा रे शान्या... तुम्ही येत आहात का मी निघू."


निकेतन " अगं सोना डार्लिंग... काय आहे ना तू रागावलीस की पूर्ण लाल होतेस टोमॅटो सारखी... "


तसे सोनलने पुन्हा त्याच्या पाठीत धपाटे घातले..."


सोनल " झालं आता निघायचं. "


आरव " हो तुमची मारामारी झाली असेल तर निघुयात...."


सोनल " आता तु ही मार खाशील "


आरव " नाही हा... पण सोनल तू काय तरी आणणार होतीस ना.....


" सोनल काही तरी आणणार होती. " निकेतन तिच्यावर खूप हसतो.


सोनल " का?? तुला इतकं हसायला काय झालं... त्याने काही जोक केला का?? ? "


निकेतन " हो जोकच तर आहे. तुला एखादी गोष्ट सांगितली आणि तू दुसऱ्या दिवशी लगेचच आणलीस असं कधी झालय... "


सोनल " ए जास्त नको बोलूस हा... आता मी काय करू मी विसरते तर.... "


आरव " म्हणजे तू नाही आणलेस... "


सोनल " हो नाही आणले साॅरी मी खरंच विसरले. "

( सोनल मुद्दाम नाही म्हणाली तिलाही सतवायचं होतं आता त्यांना... समोरून आरव आणि निकेतनची आई आली. )


आई " अरे... तुम्ही अजून इथेच... आणि सोनल तू इथे कशी??? घरात नाही आलीस... "


सोनल " हो काकू... आम्ही सगळे फिरायला जाणार आहोत. आता निघतचं होतो... पण हे आहेत ना टाइमपास कुठले.... "


" हो आम्ही टाइमपासच आहोत... " आरव ला टाळी देत निक बोलतो. 


आरव " अरे आपण अथर्वला अजून फोन नाही केला....थांब मी फोन करतो. "


आई " बरं सोनल तु कशी आहेस... "


सोनल " मी ठिक आहे काकू... तुम्ही कश्या आहात.... "


आई " मी सुद्धा एकदम ठिक... तू घरी चल ना... "


सोनल " नाही काकू.... पुन्हा कधीतरी येईन... आता निघतो आम्ही. "


आई " बरं ये पुन्हा मग.. "


सोनल " हो काकू नक्की... बाय... "


आरव " ए चला आता निघुया.. त्यांना सांगितले तिकडे यायला... त्याचं कामही झालय अलमोस्ट सो आपणही निघू... "


आई " हा जा... नीट सांभाळून गाडी चालवा रे पोरांनो.. "


" हो आई....येतो. " निक आणि आरव. 


" येते काकू " सोनल


तिघेही तिथून निघाले आणि थेट त्यांच्या रोजच्या जागी म्हणजे थोडंच लांब एक जागा होती ते खूप सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण होतं.... तिथे दोन बाक होते. त्यांची रोजचीच जागा... तिघांनी पण गाड्या तिथे बाजुला लावल्या आणि येऊन त्या बाकावर बसले. शांत असं मस्त वाटत होतं...निकेतन ने कॅमेरा आणला होता त्याने तो काढला...आणि फोटोज क्लिक करत बसला. त्यालाही निसर्गाचं वेड होतं म्हणजे या पाचही जणांना पाऊस निसर्ग या गुलाबी थंडीची चाहुल हे असे मनमोकळे फिरणे खूप आवडायचं.... 


सकाळचे नऊ वाजले होते. वातावरण एकदम थंड झालेले... आरव आणि निकेतन एकत्र बोलत होते तर सोनल मात्र एकट्यातच हरवली होती. तिथे पूर्ण गारवा पसरला होता. त्या थंड वाऱ्याच्या झुळुकाने ती गारठून गेली होती. अशातच तिला तिच्या आठवणींचा पाझर फुटला. तिच्या हलकेच डोळ्यात पाणी आले होते..... जे तिच्या जवळ बसलेल्या आरवने पाहीले होते.


" सोनल... काय झालं... तुझे डोळे असे... " तिला 

हाक मारत आरव तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. "


सोनल " हा... हा बोल ना... काय झालं... उर्वी अथर्व आले का??? "


आरव " अगं नाही अजून नाही आलेत "


सोनल " बरं चला ना तोपर्यंत आपण त्या टपरीवरचा चहा घेऊ. "


आरव तिच्याकडेच पाहत होता पण सोनलने विषय बदललेला...त्यामुळे तो काही बोलला नाही. 


निकेतन " हो चालेल... या थंड मौसमात गरम चहाचा आस्वाद घेऊ चला मस्त... "


तेवढ्यातच अथर्व त्याच्या बाईक वरून आणि उर्वी तिच्या स्कूटी वरून येतात. 


अथर्व आणि उर्वी " हाय फ्रेंडस " करत सगळ्यांना गळे मिळतात. 


आरव " उर्वी यार.... काय तुला आजच काम होतं "


उर्वी " अरे हो ना... अर्जंट होते म्हणून... सोड ना आले ना आता... "


निकेतन " हो हो... आले ना... येऊन काय उपकार करताय. 

"


उर्वी " हो तुझ्यावर तर उपकारच करते कळालं... आणि माझ्या शिवाय तुम्ही जाणार तरी कसे ना... "


निकेतन " आम्ही पण आता निघालोच होतो कळालं... "


अथर्व " अरे काय भांडताय... बस आता शांत बसा. भांडल्या शिवाय तुमचा दिवस जात नाही. "


तसे उर्वी आणि निक गप्प बसले. 


आरव " ए चला ना मस्त एक कडक चहा होऊन जाऊ देत "


तसे सगळे समोर असलेल्या टपरीवरचा चहा पिण्यासाठी जातात. 


सोनलने चहा पितच विचारले " आता आपण जायचं कुठे... काही प्लॅन तर नाहीच असेच निघालोय फक्त... "


आरव " अरे असं अचानक निघण्यातच मजा येते... आता बघ... जर विचार करून निघालो तर इतक्या लवकर तर आलोच नसतो आणि त्यात हा मस्त मसाला चहा एन्जॉय केलाच नसता.... राइट... "


सोनल " हा... ते पण आहेच "


निकेतन " अरे इथे पाहा ना " आणि त्याने त्याच्या कॅमेरातून सगळ्यांचा फोटो काढला


अथर्व " आपला तसाही काही प्लॅन झाला नाही आहे. मग आपण माझ्या फार्म हाऊस वर जाऊयात का... काका काकी कालच परत गेले आणि तुम्हांला सुद्धा आवडेल ती जागा.. "


उर्वी " नक्की का... नाही तर नेशील बोरींग ठिकाणी... आम्हांला बोर झालं तर आम्ही निघणार... "

निकेतन " हो पण फार्म हाऊस वगैरे काही बोलला नाहीस कधी... "


अथर्व " म्हणून तर नेतोय... जाम भारी वाटतं तिकडे... हल्ली मी पण गेलो नाही खूप दिवस झाले आणि आवडेल तुम्हांला बोलतोय ना मी... "


उर्वी " बघु तिकडे गेल्यावरच... "


अथर्व " आवडलं तर काय देणार मग... सांग. "


उर्वी " तू बोलशील ते "


अथर्व " बघ हा... शाने तू गेल्या वेळेस पण दिलं नव्हतं कंजूस कुठली.....आता बघ सोडणार नाही. "


उर्वी " हा हा... रडू नकोस... बघु चल "


" तू ना..... आआऽऽऽ.....बसले फटके..."


सोनल " आता बास ना... आम्हांला सांग कुठे आहे तो फार्म हाऊस म्हणजे किती वेळ लागेल पोहचायला. आताच बघ सव्वा नऊ झाले. "


अथर्व " अरे चिल... टिटवाळयालाच आहे. दिड तास लागेल पोहोचायला. "


" अकराला पोहचू ना मग... " निकेतन म्हणाला. 


अथर्व " हो आरामात. "


सोनल " चला मग निघायचं... "


अथर्व " हा जाता जाता हॉटेलमधून काही तरी खायला घेऊन जाऊ सोबत... "


आरव " ओके चला मग तर... "


आणि पाचही जण आप-आपल्या गाडीवरून निघाले. पाचही जणांकडे गाडी असण्याचं कारण एकच की ह्यांना फिरायला खूप आवडतं आणि ह्यांना स्वतःची बाईक किंवा स्कूटी चालवायला खूप आवडते. मनमोकळेपणाने गाडी चालवतात. रस्ता मोकळा असेल.... तर मस्त ऐटीत गाडी चालवायची हेच त्यांच कारण... आता एक तास झाला होता गाडी चालवून उर्वीने मध्येच गाड्या थांबवायला लावल्या. 


निकेतन " ए बाई काय झालं आता... "


उर्वी " मला भुक लागली आहे. "


सोनल " हो यार मला पण... काही तरी खाऊया ना आपण... "


अथर्व " हा बाबा चला... तुम्हांला खायला काही भेटलं नाही तर आमचं डोकं खाल... "


उर्वी " शी... तुमचं डोकं खाण्यात काही इंटरेस्ट नाही हा... "


आरव " ए ते पुढे हॉटेल आहे. "


अथर्व " हा चला मग तिथूनच पार्सल पण घेऊ... कारण आता थोडंच अंतर बाकी आहे. "


निकेतन " ए चला गं बायांनो.... "


उर्वी ने त्याच्या हातावर एक चापट दिली आणि पुढे निघाली. सगळे हॉटेलमध्ये गेले.... 


आरव " कोण कोण... काय काय खाणार सांगा."


निकेतन " ए लाडाऊ नकोस त्यांना.... शान्या आहेत त्या... "


सोनल " ए जास्त बोलू नको हा निक... तु तुझ बघ.... Ok ...."


आरव " गप रे निक.... अथर्व नाश्त्यासाठी बघ काहीतरी आपल्याला...... "



अथर्व " हा.... तुम्ही आत बसा मी सांगून येतो......."



उर्वी " चल मी पण येते...."


निकेतन " नको तू नको जाऊस.....तू आत चल आमच्या बरोबर... नाही तर त्याचं पण डोकं खाशील... मग तुझ्यामुळे आम्हांला काही खायला मिळणार नाही "


उर्वी " तु ना निक.. ." ती त्याला मारू लागते. 


आरव " अरे यार... अथर्व तू जा मी ह्यांना घेऊन जातो. 


अथर्व ऑर्डर करायला जातो. 


सोनल " तुम्हांला नक्की खायचं आहे का तरी....मला वाटत नाही तुम्हांला काही खायचं असेल... हे काय लढूनच तुमचं पोट भरेल.... मग तुम्ही इथेच बसा... आम्ही जातो. चल आरव... "


" सॉरी आम्ही पण येतो. " उर्वी आणि निक


आरव " हा... चला आता... "


चौघे जण जाऊन टेबलावर बसतात.....आणि निक बाजुच्या टेबलावर बसलेल्या पोरीसोबत बोलत बसतो...तर अथर्व त्याच्या कॉलरला पकडून आपल्या टेबलावर आणतो "


अथर्व " काय हा कसा आहे... इथे पण चालू... "


आरव " अरे त्याला सोड. तो काही सुधारणार नाही. तू काय आॅर्डर केलस. "


अथर्व " मसाला डोसा सांगितला... आपल्या उर्वी मॅडमचा फेवरेट "


" थॅक्यु..." अथर्वला मिठी मारत. 


तिथला वेटर आॅर्डर घेऊन आला. मस्त पैकी पाचही जण मसाला डोसा खात होते. 


अथर्व " अरे हो... मी पार्सलला व्हेज बिर्याणी सांगितली आहे चालेल ना... चालत नसली तरी खायची... "


उर्वी " हा... सगळे तर खातोच आपण... "


अथर्व " हा पण ही सोनल... हिचा कधी सोमवार तर कधी गुरूवार.. "


सोनल " ए गप हा... मी खाईन... आणि तसही आज ना सोमवार आहे ना गुरूवार... "


सगळ्याचं खाऊन झालं... आरव आणि अथर्वने बिल पेड केले. मग सगळे पार्सल घेऊन परत निघाले फार्म हाऊसला....


वीस मिनिटाने ते फार्म हाऊसला पोहचले. गाडीवरून उतरतच फार्म हाऊसला पाहुन त्यांचे डोळे फिरलेले. 


सोनल " वाह! काय सुंदर आहे यार फार्म हाऊस... "


आरव आणि निकेतन " हो ना... "


आरव " खुपच सुंदर आहे. इथली छोटी छोटी झाडे वगैरे मस्त मेन्टेन ठेवलय "


सोनल " हो ना.. "


उर्वी " हो ठिक आहे... पण पाहु आत जाऊन... "


अथर्व " मला वाटलेलं ही असच बोलणार... शाने बोल ना... आवडलं करून... नाटकी का करतेस. "


उर्वी " ए मी नाटकी नाही करत आहे ओके... "


अथर्व " हो का... "


सोनल " बरं बरं... आपण आत जायचं का... "


अथर्व " हा चला आत... " आणि सगळे आत गेले. 


त्या तिथल्या नोकर काकांकडु अथर्वने चावी घेतली आणि आत आले. सगळ्यांना त्याचा फार्म हाऊस खुप आवडला होता. उर्वी ला सुद्धा आवडला होता पण मॅडम नखरे करत होत्या. सगळे फ्रेश झाले आणि येऊन हॉलमध्ये पसरले... निकेतन आणि अथर्व सोफ्यावर पडलेले... उर्वी तिथल्या चेअरवर मस्त पैकी बसलेली. आरव आणि सोनल मात्र त्या खिडकी बाहेर काहीतरी पाहत बसलेले. 

.

.

.

.

आरव आणि सोनल खिडकी बाहेर काहीतरी पाहत बसलेले..... सोनल उठून तशीच खिडकीपाशी गेली........ 

त्या खिडकीतून दिसत असलेला हिरवागार डोंगर ती पाहात

होती..... तेवढ्यातच आरवने तिला तिथं उभ राहिलेल पाहिलं तोही पुढे आला.... 


" काय गं काय पाहतेस......" आरव 


सोनल " यार तो डोंगर बघ ना....किती सुंदर आणि हिरवागार आहे....." 


आरव " वाह! किती मस्त आणि सुंदर दृश्य आहे. डोळ्यांमध्ये साठवण्यासारख......." दोघेही खिडकीपाशी उभे राहून एकटक त्या हिरवळीने नटलेल्या विशाल अश्या त्या डोंगराकडे पाहत होते. 


तेवढ्यात उर्वी तिथे पळतच येते आणि सोनलला धडकते.


सोनल : " आअ..... "


उर्वी " साॅरी साॅरी... लागलं का... "


सोनल " बघून चाल ना... माझे बाय "


उर्वी " अगं तो निक बघ ना..... ते सोड तुम्ही काय करताय इथे......"


सोनल " काही नाही रोजचचं निसर्ग न्याहाळणं......" ती बाहेर पाहत बोलते. 


उर्वी " ते नंतर बघ चल बाहेर गार्डन मध्ये जाऊ. "


आरव " मी पण येतो चला. " 



आरव ,उर्वी आणि सोनल तिघं पण थोडं गार्डनमध्ये येऊन फिरतात. तेवढ्यात निक आणि अथर्व पण येतात. गार्डनमधल्या सावलीत त्या मऊशार गवतात सगळे मस्त बसतात. उर्वीला समोर झोपाळा दिसतो. तर ती झोपाळ्यात बसते. 


सोनल " ए पार्सल आणलय आपण माहित आहे ना...भुका नाही लागल्यात का कुणाला...... " 


अथर्व " हो चला खाऊन घेऊ मग बसू आरामात. "


आरव " चालेल "


सगळे आत येऊन जेवून घेतात. जेवण वगैरे करुन सगळे हाॅलमध्येच बसून टाईमपास करत होते. कोणी फोनवर तर कोणी एकमेकांशी बोलत भांडत होते. 


उर्वी " हेय... निक मला कॅमेरा दाखव ना... "


निकेतन " नाही हा... तुझ्यामुळे आधी पण माझा कॅमेरा बिघडलेला....तुला तर परत देणार नाही हा... "


उर्वी " मी काय मुद्दाम केल होत का...... देना का भाव खातोस...."


निकेतन " नाही म्हणलं ना... मी नाही देणार...."


उर्वी " जा नको तुझा कॅमेरा.... ठेव तुलाच... "


सोनल " ए थांबा मी आलेच... " ती रुममध्ये गेली. तिच्या बॅगमधून तिने एक डबा काढला आणि घेऊन आली. 


सोनल " हे पाहा... मी तुमच्यासाठी काय आणलय... "

ती तो डबा पुढे करुन दाखवत म्हणाली.


आरव " ओह...... म्हणजे तू विसरली नव्हतीस. "


सोनल "नाही.....ते थोड नाटक करत होते "


आरव " हा ना... आता आण इकडे ते लाडू मी स्पेशली फोन करुन सांगितलेलं तेव्हा तू घेऊन आलीयेस. " तो तिच्या हातून डबा काढून घेतो. 


निक,उर्वी " आणि आम्हांला..... "


अथर्व " बघा ना कसा एकटाच घेऊन बसला लगेच. " 


उर्वी " ते काही नाही आम्हांला पण दे चल. " ते चौघेही वाटून घेतात. 


सोनल " अरे मला एक तर द्या यार...... "


अथर्व " का तू घरी खाल्ले नाहीस का.... " 


सोनल " हा मग पुन्हा खाऊ नये का.... " 


निकेतन " हेय ब्युटीफुल.... चिल.. हे घे.... " तो त्याचाच अर्धा लाडु तिच्या तोंडासमोर नेतो. ती सुद्धा खाते.


निकेतन " ये बात.... असेच उष्ट खाल्याने प्रेम वाढते. " 


सोनल " हो तर आपल्या मैत्रीतले प्रेम खूप वाढेल अजून नाही का....." ती आरवला टाळी देत बोलते. 


तसे सगळे हसतात. असेच थोड्या वेळ गप्पा मारतात. साडेतीनची वेळ झालेली. बाहेर कोवळं ऊन होत. सोबत गारवाही होता. अथर्वला काहीसं आठवलं तसं तो रुममध्ये गेला. 


अथर्व " गाइज..... हे पाहा....." 


उर्वी,सोनल " ओह....क्या बात है... " 


अथर्व " चला बाहेर बागेत बसुयात...... "


सगळे बागेत येऊन बसतात. अथर्व उभा असतो आणि तो गिटार वाजवायला सुरुवात करतो. 




Holiday Holiday 

झिडकारून चिंता साऱ्या

जाऊ स्वप्नांच्या हि पुढे

Fly Away......२

वारे नव्या दिशांचे

देती इशारे हे नवे

बंध जुने हे झुगारून

चौकट तोडून

आभाळ भेदु हे नवे

मस्तीच्या रंगात रंगून

दंगून जिंगुन

गाऊ तराणे नवे…


Holiday Holiday


झिडकारून चिंता सार्या

जाऊ स्वप्नांच्या हि पुढे

Fly Away......२

वारे नव्या दिशांचे

देती इशारे हे नवे



लाटा नव्या किनारे नवे नवे

वाटे मिठीत आभाळ सारे हवे

हमसे न पंगा लेना

ठणकाऊ या दुनियेला

हा जोश आहे नवा

बेधुन्द होऊन

बेभान होऊन

जल्लोष छेडू नवा


Holiday Holiday


झिडकारून चिंता सार्या

जाऊ स्वप्नांच्या हि पुढे

Fly Away......२

वारे नव्या दिशांचे

देती इशारे हे नवे

बंध जुने हे झुगारून

चौकट तोडून

आभाळ भेदु हे नवे

मस्तीच्या रंगात रंगून

दंगून जिंगुन

गाऊ तराणे नवे…

Holiday Holiday




सगळे मस्त नाचतात..... 

( हे गाणं क्षणभर विश्रांती या चित्रपटातलं आहे. खूप छान आहे. )


उर्वी "ओह..... वाह यार खूप मजा आली.... "


अथर्व " हो... म्हणजे मॅडमना आवडली ना जागा.... "


उर्वी " ए मी तर गाण्याच आणि आपल्या नाचण्याचं बोलत होती..... बरं पण खरं सांगू खूप मस्त आहे जागा खूप छान वाटलं इथे येऊन..... " ती थोडं पुढे जाऊन मोकळ्या आकाशात एकटक पाहत असते... तिचे केस मस्त हवेत नाचत होते.....निक कॅमेरा घेऊन तिच्या बाजुला येतो. तो तिच्याकडे पाहतो आणि हळूच तिचा फोटो काढतो. 


उर्वी " हेय..... काय आहे."


निकेतन " ओह.... काय दिसतेयस हे बघ कसला भारी फोटो आलाय..... "


उर्वी " थँक्यू..... "


अथर्व " ओके..... थांबा मी आपल्यासाठी इकडच्या टपरीवरुन चहा मागवतो काकांकडून...."


तो चहाचं काकांना सांगायला जातो. निक तिथे असलेल्या गुलाबाच्या झाडावरचे एक गुलाब काढून घेतो. 


निकेतन " हेय ब्युटीफूल दिस इज फाॅर यु..... " निक सोनलला गुलाब देत बोलतो. 


सोनल " ओह..... थॅक्यू.... वाव किती सुंदर फुल आहे....."

ती त्या फुलाचा सुगंध घेते. तेवढ्यात निक तिचा फोटो क्लिक करतो. सोनल हसते. 


सोनल " वाव यार वेगवेगळ्या रंगांची फुले किती भारी दिसतायत आणि त्यातच हा मोगऱ्यांचा सुगंध धुंद करतोय.... आरव, उर्वी इथे या.... "


आरव, उर्वी " काय गं..... काय झालं..... "


सोनल " हे बघा इथली फुलांची बाग किती सुंदर दिसतेय.... एक मिनिट... ओ फोटोग्राफर आमचे फोटोज काढा प्लिज.... आम्ही उभे राहतो."


निकेतन " ओके बॉस..... पटापट पोझेज द्या चला..... " 


आता जरा फोटो शुटचा प्रोग्राम चाललाय सगळ्यांचा


सोनल " ए इथे पण झोपाळा आहे... मला बसायचय... मी आलेच.... "


अथर्व " ए नाही नंतर बस..... आता काकांनी चहा बिस्किटस आणलेत तर खाऊन घेऊ आधी या सगळे चला..... "


तसे सगळे चहा प्यायला जातात. 


सोनल " अरे मी उरलेले लाडु पण आणते थांबा. " ती आत जाऊन लाडुचा डबा घेऊन येते. 


उर्वी " बरं आपण काही तरी खेळुया ना... आता फक्त साडेचार झालेत... आणि मला नाही वाटत की आपल्यातलं कोणीच आता निघणार आहे. "


निकेतन " हा निघणार तर नाही इतक्यात... मग सांग काय खेळायचं "


उर्वी " अमममम.... दमशेराज खेळायचं का??? "


अथर्व "नाही नको.... दुसरं सुचव.... "


चहा बिस्किटस् लाडु खात गेम कोणता खेळायचा ठरवत असतात... 


उर्वी " मग गाण्याच्या भेंड्या...." 


अथर्व " ते पण नको.... "


उर्वी " मग आता तुच सुचव हा... सगळ्याला नाही नाही करतोय... तूच सुचव... "


अथर्व " हा सुचवतो थांब जरा आठवू देत "


आरव " हेय.... ट्रूथ अॅण्ड डेअर खेळायचं का??? "


अथर्व आणि उर्वी एकसाथ " हो "


सोनल " अरे हळु किती जोरात किंचाळताय... आणि आपल्याकडे बाटली कुठे आहे... "


निकेतन " ये क्या का बाटली... इससे भी काम चल सकता है.. क्यों उर्वी... 


उर्वी " येस....बरं चला खेळुया... बसा राउंडने सगळे... अरे निक तो कप तिकडे ठेव ना. "


सगळ्यांचा चहा नाश्ता तर झाला आता पुन्हा थोडा गेम खेळुयात सगळे गोल करून बसतात. 


आरव " हा आता गेमचे रूल तर सगळ्यांना माहीती आहेतच.. सो लेट्स स्टार्ट द गेम..." तो बाटली फिरवतो. पहिलाच टर्न उर्वी मॅडमकडे येतो. 


उर्वी " ए नाही हा... पहिली मी नाही... "


अथर्व " ए गप... आणि ट्रूथ की डेअर ते सांग. "


उर्वी तोंड वाकडं करतच " डेअर " बोलते. 


सोनल " अथर्व तिला डान्स करायला लाव ना... "


अथर्व " ए नाही हा ते नको... उर्वी तू ना... एखादा डायलॉग बोलून दाखव सोबत अॅक्टींग पण हवी हा...."


उर्वी " ओके..... पण कुठला डायलॉग घेऊ. अममम...... हा.... करते....  

" लोक रुप पाहतात.आम्ही ह्रदय पाहतो, लोक स्वप्न पाहतात.आम्ही सत्य पाहतो…फरक एवढाच आहे की,लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!! (दुनियादारी) "


निकेतन " ओहहहह क्या बात है....."


अथर्व " जाम भारी "


सगळे टाळ्या वाजवतात. 


उर्वी " ओके आता मी फिरवते बॉटल... " आणि ती बाॅटल फिरवते.


आता टर्न असते ती आपल्या निकेतन साहेबांची आता ह्यांना काय सांगणार आहेत आणि हे काय करणार आहेत पाहुयात. 


अथर्व " निक तू ना ह्या दोघींपैकी एकीला प्रपोज कर पण जिला प्रपोज करशील ती पोट धरून हसली पाहिजे हा...."


निकेतन " ओके....चलता है अपून को.... तो किसको करु प्रपोज " तो एकदा उर्वीकडे पाहतो. 


उर्वी " माझ्याकडे येऊ पण नकोस मार खाशील...."


निकेतन " तुझ्याकडे कोण येतय..... मी तर सोनूकडे जातोय...." तो आत जातो आतून टेबल आणतो. टेबल तिच्या थोडं पुढ्यात ठेवून त्यावर जाऊन उभं राहतो.


सोनल " ए हे काय..... "


निकेतन " ए मेरी जानेमन, जानेजिगर क्या खूब लगती हो तुम..... " तो तिच्याकडे पाहत बोलत असतो. हात वारे करत सगळं चालू असतं त्याचं.... ती त्याच्या बोलण्यावर हसत असते. 


निकेतन " तेरेको देखा मेंने जबसे, तभी से मैं पागल हो गया हूँ...जब भी तुम्हें देखता हूँ मेरा दिल धक धक धक धक करता है.. ए मेरी हसीना तुम्हारे प्यार में ही मुझे जीना है, तुम्हारे प्यार में ही मुझे मरना है... ओ मेरी दिलरुबा काय तुझको भी माझ्यावर प्रेम हाय.... हा बोल गं सोना... क्योंकि में तुझ्याशिवाय जीना नहीं चाहता.... ये मेरा हात पकड ले आणि माझ्या तेडीमेडी जिंदगी मध्ये माझ्या सोबत ये....." आणि तो उडी मारायला जातो आणि धाडकन खाली पडतो.


सोनल काय सगळेच खूप हसतात.


सोनल " यार भारीच एकदम.... कुठून शिकलास अशी भाषा..." ती हसतच त्याला हात देत उठवते आणि एक साइड हग करते. 


निकेतन " अरे पगली ये तो तुम्हारे लिए सिखा... "


अथर्व " ए बस हा आता..... पण भारी केलस हा निक.... "


निकेतन " ओके चला आता मी बाटली फिरवतो. "

आता बारी असते सोनलची.


निकेतन " तु सांग ट्रूथ और डेअर. " 


सोनल " ट्रूथ.... "


निकेतन " हम्म... तू सांग... तुमचा पहिला किस कधी झालेला "


सोनल थोडं शांत होते. बाकीचे पण तिला पाहून शांत होतात. 


निकेतन " अरे यार मी काय विचारलं " तो हळू आवाजात पुटपुटला. 


सोनल " मी बारावीत असताना जेव्हा मला बरं नव्हतं तेव्हा त्याने मला पहिल्यांदा गालावर किस केलेलं... तो आमचा पहिला किस होता. "


निकेतन " सोना.. सॉरी.. "


सोनल " इट्स ओके यार... ओके आता मी फिरवते... " ती बाटली फिरवते. 


सोनल " चला आरव साहेब आता तुमची बारी... तू ना... हा... तुझी शायरी.. "


आरव " ओके.. "


" आयुष्य मोठं आहे की छोटं

  माहिती नाही... 

  पण आयुष्यातला मोठा 

  भाग आहे तो मैत्री

  एक आपुलकीची जाणीव आहे मैत्री

  एक श्वास आहे मैत्री

  न बोलताच काही गोष्टी कळणारी आहे 

  ही आपली मैत्री... "


सगळे मस्त बसूनच ग्रुप करून मिठी मारतात. 


अथर्व " ए मी आलोच हा... " तो ऊठतो. 


उर्वी " तू कुठे निघालास... "


अथर्व " आलो ना.. "


उर्वी " नाही हा..गेम पुर्ण नाही झाला अजून...चल बस. "


अथर्व " अरे यार... वॉशरूमला जातोय तिथे तर जाऊ देत. "


उर्वी " हा मग आधी सांगायचं ना...जा आता... "


बाकीचे तोपर्यंत गप्पा मारत बसतात. सोनल मात्र शांत बसलेली असते. 


उर्वी " ए मला तहान लागलीये... मी पाणी पिऊन येते. "


आरव " हा जा जा... परत बडबड करायला मोकळी मग.... " तो निकला टाळी देत बोलतो. 


उर्वी त्यांना तोंड वाकडं करून दाखवते आणि आत जाते तर अथर्व पण पाणी पित असतो. दोघेही पाणी पितात. 


उर्वी " अरे कॉफी आहे.... चल ना काॅफी बनवूया..."


अथर्व " ओके चल "


दोघेही कॉफी बनवतात. इथे सोनल उठून समोर असलेल्या झोपाळ्यावर जाऊन झोके घेत असते. निकेतनला फोन येतो तर तो फोनवर बोलत असतो. आरव सोनलला एकटं पाहुन तिच्या जवळ जातो. ती शांत बसून झोके घेत असते. ती त्याला पाहुन झोका थांबवते. 

सोनल " काय झालं... असा का पाहतोयस... "


आरव " हा आता तूच मला विचार... तूच अशी बाजूला येऊन एकट्यात बसलीस. "


सोनल " अरे ते अशीच... "


आरव " का खोटं बोलतेस...खरं सांग निहालची आठवण आली म्हणून तू... "


सोनल " हो... आता दोन अडीच वर्षे झाली त्याला जाऊन... मला वाचवताना तो मधे आला आणि तो... " तिला हुंदका आला. आरवने तिला जवळ घेऊन तिला मिठी मारली. 


आरव " हेय... इट्स ओके सोना... शांत हो... आपल्याही हातात जितके होते ते सगळे आपण केले. देवाला काय वाटले असेल तस तो वागला... "


सोनल " पण आज त्याची खुप आठवण येतेय. आम्ही दोघे जेव्हा मरीनला फिरायला गेलेलो ते दिवस आठवले. तेव्हा मी त्याला अजून जवळुन ओळखायला लागलेले... मला तर फक्त त्याची सोबत हवी होती आरव..... मी काय अजून अपेक्षा केलेली.. का होतं असं आणि माझ्याचं बरोबर का???? आधी बाबा आणि मग निहाल... "

ती खूप रडायला लागते... तिचे सकाळपासूनचे आवरलेले अश्रू आता वाहत चालले होते. आरवने तिला मिठित घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला....तिला समजावत होता. 


उर्वी " हेय... तुम्ही तिथे काय करताय... मी काॅफी केलीये या लवकर... एक मिनिट... " ती लांबूनच आरव आणि सोनलला आवाज देत असते... पण नंतर तिला सोनल शांत आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसतं आणि ती अथर्व निकेतन सगळे तिच्याकडे जातात.


उर्वी तिच्यासमोर गुडघ्यावर बसते निकही तिच्या जवळ येऊन उभा राहतो. 


उर्वी " सोना काय झालं... तू रडतीयेस... "


निकेतन " निहालची आठवण झाली. "


तिने मानेनेच होकार दिला आणि पुन्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले... 


अथर्व " हम्म्म... तो ये पंगा है... फिर हम किस लिए है.... क्यों निक भाई हो जाए... "


निकेतन " हो चल "


तसे दोघे उठतात... अथर्व गिटार घेतो... गाणं गायला सुरुवात करतो. 


मस्ती - वस्ती, राडा - वाडा

Senti-वेंटी थोडा-थोडा ...............अथर्व 

कधी-कधी पागल दिवानी होते जराशी

कधी-कधी confuse, crazy, हटेली जराशी...........निक



दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी......अथर्व 

दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी......निक 

दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी......आरव 

दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी......उर्वी 


कशाला tension घेऊ, आता मारू chill जरा

बघूया ये ना life में है क्या कुछ तो thrill जरा........अथर्व 


भाई सव्वाल, तुला तर माहितच आहे आपल......निक 


कशाला tension घेऊ, आता मारू chill जरा

बघूया ये ना life में है क्या कुछ तो thrill जरा......आरव 


मस्ती-वस्ती, राडा-वाडा

Senti-वेंटी थोडा-थोडा

कधी-कधी पागल दिवानी होते जराशी

कधी-कधी confuse, crazy, हटेली जराशी (अरे बाबा क्या?)...............अथर्व 


दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी......निक 

दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी......आरव


जग सारे विसरून आता जि ले तू जरा

लढू-वढू, देऊ टस्सल फुल टू जगाला.........अथर्व 

जग सारे विसरून आता जि ले तू जरा

लढू-वढू, देऊ टस्सल फुल टू जगाला.........निक 


मस्ती-वस्ती, राडा-वाडा

Senti-वेंटी थोडा-थोडा

कधी-कधी पागल दिवानी होते जराशी

कधी-कधी confuse, crazy, हटेली जराशी..........अथर्व 


दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी

दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी

दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी

दिल दोस्ती यारी वारी, दिल दोस्ती यारी वारी.........सगळेच एकत्र... 


( हे गाणं फ्रेंड्स या चित्रपटातलं आहे ) 


हिरवा गार निसर्ग आणि थंड गार वारा सगळीकडे पसरला होता...त्यातच सगळे पुन्हा एकदा मस्त नाचतात... आणि मग दमून खाली बसतात. 


सोनलही आता हसत असते. सगळे तिच्याकडे पाहतात... तिला असं हसताना पाहून त्यांना पण खूप आनंद होतो. 


सोनल " थॅक्यु गाईज...थॅक्यु व्हेरी मच माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.... तुमच्यामुळे मी पुढे येऊ शकले... मला तुम्ही खूप सपोर्ट केलाय.... खरंच बिग वाला थॅक्यु.. लव्ह यू अ लॉट गाईज.. "


सगळे एकत्रच ओरडतात " लव्ह यू टू सोना... " आणि पुन्हा सगळे एकत्र हसतात. 


निकेतन " ओ काका एक मिनिट हा... इकडे या ना जरा... "


काका " बोला साहेब काय काम आहे. " निक त्यावर हसतो.


निकेतन " अहो काका... हे साहेब काय मी इतका मोठा नाही.... तुम्ही मला निकेतन म्हणा आणि माझं काम कराल का??? "


काका " हो साहेब.... म्हणजे निकेतन... बोला ना.. "


निकेतन " हा आता ठिक आहे... तर तुम्ही आमचे ग्रुप फोटोज काढाल का??? "


काका " हो काढतो दया... " तसे सगळे वेडेवाकडे पोज देतात तर काकाही हसतच फोटो काढतात. 


निकेतन " काका आता तुम्ही पण जा... मी काढतो फोटो... तुम्ही पण त्यांच्याबरोबर उभे राहा. "


काका " अरे बाळा मी कशाला... मी काढतो फोटो तुम्ही उभे राहा. "


निकेतन " नाही तुम्ही जा आणि उभे राहा आणि मस्त पोज द्या हा."


अथर्व " अहो काका या ना... मस्त फोटो काढू आपण... लवकर या... " तसे अजून थोडे फोटो काढून खाली बसतात. 


उर्वी " अरे यार आपली कॉफी... अशीच थंड झाली यार... मला हवी होती. "


अथर्व " हो गं... शीट पूर्ण थंड झाली आता काय... "


काका " मी दुसरी बनवून आणतो तुमच्यासाठी...."


उर्वी " थॅक्यु काका.... " खूश होत बोलते. 


सोनल " ए थॅक्यु काय.... चला काका मी सुद्धा येते. "


सोनल आणि काका कॉफी बनवायला आत जातात. 


उर्वी " हेय सात वाजायला आले यार... मस्त टाईम गेला ना आज... " 


आरव " हो ना... खूप छान वाटलं... अथर्व यार थॅक्स आम्हाला इकडे घेऊन आल्याबद्दल..."


अथर्व " हा भाई बस का आता... हीच का तुझी दोस्ती... हीच का तुझी यारी.... "


उर्वी " हा हा आला मोठा दोस्ती यारी करणारा.....माझ्याकडून तर सॉरी आणि थॅक्यु जबरदस्तीच बोलून घेतोस. "


अथर्व " ते काय आहे ना... तुला जरा सूट दिली तर तु लगेच हवेत जाशील म्हणून जरा.... " तो आरव आणि निकेतनला टाळी देत बोलतो आणि तिघेही तिच्यावर हसतात. 


उर्वी " तुम्ही ना......." उर्वी त्या तिघांना मारायला त्यांच्या मागे धावत असते आणि ते तिघेही इकडे तिकडे पळत असतात. 


सोनल " आता हे काय.... का पळताय.... मी कॉफी आणली आहे तर लवकर या...परत थंड झाली की मी पुन्हा बनवणार नाही... " सोनल कॉफी चा ट्रे घेऊन येते. 


तसे सगळे येऊन बसतात आणि काॅफी प्यायला घेतात. 


अथर्व " काय मग निघणार कितीला... उद्या कॉलेजही आहे भान असूद्या.... आपल्याला पोहोचायलाच दीड तास लागेल. "


आरव " हो रे... आता कॉफी पिऊन झाली की निघुयात... निघुया ना उर्वी मॅडम "


उर्वी " हो रे बाबा.... आपण मुक्कामाला नाही आलोत माहीत आहे मला... "


सोनल " पण थॅक्स हा अथर्व... आम्हांला इथे आणल्या बद्दल.... खूप सुंदर फार्म हाऊस आहे हा... "


अथर्व " हम्म आता तु पण थॅक्यु, साॅरीची भाषा कर... गप्प ती काॅफी पी.... "


सोनल " अरे नाही रे... खूप छान वाटलं इथे येऊन म्हणून... "


निकेतन " हा वाटणारच ना... ओ क्या है ना जानेमन आप के साथ हम जो थे.... "


सोनल " हाहा..... तरी म्हणते तू शांत कसा.... शान्या गप्प ती कॉफी पी हा.... "


सगळे जण बोलत बोलत कॉफी पितात. 


आरव " चला जरा आपला हुलिया वगैरे नीटनेटका करू.. मग निघु. "


उर्वी " ओके चला... "


निकेतन " एक मिनिट गाईज लास्ट सेल्फी...."


तसा तो कॅमेर्‍याला टायमर लावतो आणि त्यांच्या जवळ जाऊन उभा राहतो. ते वेडेवाकडे पोज देतात आणि सेल्फी क्लिक होतो. मग सगळे आवरतात.


उर्वी सोनल एका रूममध्ये आवरायला जातात आणि हे तिघे एका रूममध्ये असतात. दहा मिनिटांनी सगळेच आवरून खाली येतात. 


अथर्व " अरे व्वा! लवकर आटपून झालं तुमचं.....आम्हांला वाटलं आता तुमची वाट पाहत राहायला लागेल की काय...."


उर्वी " तु ना कमी बोल हा....."


सोनल " जाऊ दे गं... तु त्याच्या कुठे नादी लागतिये.. ."


अथर्व " बघ सोनाकडुन शिक जरा....नाही तर नुसता नाकावर राग...."


आरव " अरे यार तुमचं ना काही एक होऊ शकत नाही. आम्ही जातो तुम्ही या मागून...चल निक "


तसे ते पण गप आरव च्या मागे बाहेर पडतात.... अथर्व पुन्हा काकांकडे चाव्या देतो. 


निकेतन " चला काढा आप-आपल्या गाड्या...."


तसे सगळे आप आपल्या बाईक्स आणि स्कूटीवर बसतात आणि पुन्हा आपली वाट धरतात. ह्या एका दिवसात त्यांनी खूप मजा मस्ती केली होती.... तसा रोजच त्यांच्यासाठी मजा मस्तीचा दिवस असतो. आता मस्त घरी जाऊन जेवायचं आणि झोपायचं इतकचं....


Rate this content
Log in