Hritik Mahesh Mhatre

Inspirational

3.0  

Hritik Mahesh Mhatre

Inspirational

विकासातून स्त्री शक्तीचा जागर

विकासातून स्त्री शक्तीचा जागर

1 min
121


आई, ताई, काकू, नणंद, मुलगी, सून, सासू, आजी, आत्या, मावशी अशा अनेक भूमिका पार पाडणारी नारी. तिच्या हाती काय लागतं... "चूल व मूल..." मला तर हे मुळीच पटत नाही. 


"मुलगी शिकली प्रगती झाली" हा वाक्य तर तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेवर तर नक्कीच पाहिलं असणार. मुलगी शिकून प्रगती होणार हे माहीत असूनही तुम्ही तिला शिक्षणाच्या अधिकारापासून का डावलता?


जर तुम्ही मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता दोहोंना एकाच प्रतीचे शिक्षण दिलेत; मुलीचे भविष्य 'चूल व मूल' असे नसून शिक्षण हेच सामर्थ्य असे पटवून दिलेत तर प्रत्येक घरातून सावित्रीबाई फुले जन्माला यायला कालावधी कमी लागणार नाही.


'शिक्षणातून आत्मविकास' हा मूलमंत्र जर प्रत्येक स्त्रीने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर, देशोन्नती तर होणारच...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational