Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Hitesh Patil

Drama Romance


5.0  

Hitesh Patil

Drama Romance


व्हेन वी मीट फर्स्ट टाईम

व्हेन वी मीट फर्स्ट टाईम

3 mins 608 3 mins 608

ग्रॅज्यूएशनचे शेवटचे वर्ष… फेअरवेलची ती संध्याकाळ. सगळे परत कधी भेटणार नव्हते. म्हणून काही आपल्या कॉलेजमधील काही रंगलेले किस्से सांगत होते. तर काही आपल्या भविष्यातील प्लॅनिंगबद्दल सांगत होते... सगळे मुलं-मुली स्टेजवर जाऊन भाषण देत होते. पण माझं लक्ष फक्त तिच्याकडे होतं. कारण ती आजच दिसणार होती. नंतर कधी आमची भेट होईल की नाही काहीच सांगू शकत नव्हतो. म्हणून माझी फेअरवेल म्हणजे फक्त तीच होती. स्टेजवर कुणाचा काय परफॉर्मन्स चालू आहे त्याच्याशी मला काही घेणं-देणं नव्हतं. मला फक्त तिला बघायचं होतं. मला वाटलं की ती पण काही भाषण द्यायला वगैरे स्टेजवर येईल. परंतु, ती पण माझ्यासारखी घाबरट. स्टेजचे नाव काढलं की माझे हात पाय भीतीने थरथर कापत. म्हणून आपला आणि स्टेजचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता.

      

भाषण आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम संपला. पावले कॉलेजच्या कॅन्टीनकडे वळली. मी अजयसोबत काही ड्रिंक्स आणि स्नॅक्स घेतले. थोड्या वेळाने तीसुद्धा तिच्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये आली. अजय मला हळूच म्हणाला की, भावा आज काही प्लॅन आहे का विचारायचा. की आज पण बघूनच त्यात समाधानी होणार आहे.


अरे अजून नको तिच्या मैत्रिणी आहेत सोबत, असं म्हणून अजयला प्रत्युत्तर दिले.


अरे चमन्या आता नाही तर कधी मग, असं बोलता बोलता 3 वर्ष काढले या कॉलेजमध्ये तू. आज जर तू तिच्याशी काही बोलला नाही तर बघ तू फक्त...


अरे हो यार बोलतो ना…


कधी बोलतो तू… बघ ती चालली. थांब मीच बोलावून आणतो तिला...


अरे अजय नको, असं संभाषण चालूच होतं आमचं. तितक्यात अजयची मैत्रीण समीक्षा तिथे आली.


हे हाय अरे काय भांडताय तुम्ही, आज कॉलेजचा शेवटचा दिवस. इकडे या आपण एक सेल्फी काढू. तिने सेल्फी काढण्यासाठी सेल फोन बाहेर काढला अन बघितलं तर, अरे यार बॅटरी लो आहे. लगेच मी माझा सेल फोन समीक्षा कडे दिला अन तिला त्याचे सेल्फी घ्यायला सांगितलं. अजयने मला खुणावून इशारा केला बोलावू का आता.. मी नको.. असं म्हणताच तितक्यात तिकडून चक्क ती न तिच्या मैत्रिणी समीक्षाला भेटायला आमच्या टेबलजवळ आल्या. अजय माझ्याकडे बघून इशारा करत राहीला.


माझ्या मनात फुल एकदम काय करू न काय. काहीच सुचेनासे झाले होते. ती स्वतःहून जवळ आली होती. यानंतर परत भेटणार नव्हती. तरी पण मनातून बोलायची इच्छा होत नव्हती. तोच समीक्षाने आमचा एक ग्रुप सेल्फी घेतला. अन त्या वेळेस मी फर्स्ट टाईम तिच्याशी बोललो ते ऑल दि बेस्ट फॉर एक्झाम. तिने पण सेम टू यु म्हणून रिप्लाय दिला. तो क्षण म्हणजे असं वाटत होतं की काय करू न काय, इतका आनंदा चा क्षण होता. कारण कॉलेजचे 3 वर्ष फक्त तिला पाहण्यातच गेले बोलणं मात्र एक शब्दही नाही. हा क्षण तर प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला असतो की आपल्या क्रशसोबत जेव्हा आपण बोलतो तेव्हा काय बोलावं काही कळत नाही. पूर्णपणे गोंधळून जातो आपण. पण ज्यावेळेस फर्स्ट टाईम आपण तिच्याशी बोलतो तो आनंद गगनात मावेनासा असतो.

     

अन एक्झाम सुरु झाली. एक्झाम पण अगदी छान गेली. अन अजून आनंदची गोष्ट म्हणजे तर आमचा दोघांचा सीट नंबर एकाच ब्लॉकमध्ये होता. म्हणून रोज स्माईलने गोष्ट चालायची. नंतर प्रत्येक पेपरला तिला ऑल द बेस्ट म्हणत गेलो, असं म्हणता म्हणता एक ते दीड महिना एक्झाम चालली. पण आपल्या करिअरवर काही इफेक्ट नको पडायला म्हणून एक्झामच्या दरम्यान फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करून लास्ट पेपरला मी शेवटी तिला कॉफी साठी ऑफर केलं. तिनेही ऑफर मान्य केली अन माझ्यासोबत कॉफी घ्यायला कॅफेत आली. त्या वेळेस आम्ही एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलेत. व्हॉट्सअॅपला बोलू लागलो. बोलता बोलता मैत्री फुलत गेली. नंतर आम्ही MBA ला एकाच कॉलेजला ऍडमिशन घेतलं. MBA च्या दरम्यान आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 


Rate this content
Log in

More marathi story from Hitesh Patil

Similar marathi story from Drama