Manasi w

Drama Romance

3  

Manasi w

Drama Romance

वेगळे वळण

वेगळे वळण

5 mins
199


"बर झाल बाबा तू आधीच अलेलास गावी नाहीतर पुण्यात अडकला असतास तर लई घोर लागला असता बघ जीवाला...आता रहा रे इथेच मला तर लई काळजी वाटतिया बघ" आजी

"अग आजी एवढा वेळ राहणार नाही ग कोरोना...बघ थोड्या दिवसात छुमंतर होईल..एवढी कशाला काळजी करते तू...अन् मी इथ राहून काय करणारे... माझ mechanical engineering झालंय तेही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये...आणि आत्ता Assistant Manager आहे तेही MNC मध्ये...एवढा चांगला अनुभव आहे मला...जपान ला पाठवलेलं माझ्या कंपनीने मला...6 महिने राहिलो ना तिथे... आता तर मला promotion ही मिळालं...चांगले कमवतो मी महिन्याला....बघ तुझा नातू आज कुठ पोहचला या लहान गावातून आणि तू त्या कोरोनाला घाबरून मला परत इथेच रहा म्हणतेस...this is not fair my सोनपापडी 😘😘 chill ग... चल जेवू या आज गरमागरम पुरणपोळी केलीय आईने...चल लवकर my sweetheart ❤️❤️"


विराज सगळे खाली जेवायला वाट पाहत होते... विराज आजीला घेऊन तिथे आला...आई बाबा,छोटी बहिण, विराज आणि आजी असा पंचकोनी परिवार होता,तसा यांचा परिवार बघायला गेलं तर खूपच मोठा होता...आजोबांना ३ मुले आणि एक मुलगी, कोल्हापूर जिल्ह्यातील लहान गाव, आजोबा गावचे सरपंच होते... विराजचा छोटा काका मुंबई मध्ये मंत्रालय मध्ये class 2 officer म्हणून जॉईन झाला होता, मोठा काका शेती बघत होता..अन् विराजचे बाबा शाळेत शिक्षक होते...गाव लहान असल्याने शाळांची संख्या आणि वर्ग ही कमीच होते..जेमतेम ७ वी पर्यंत...मुलांना तालुक्याला जायला लागत माध्यमिक शिक्षणासाठी...त्याच्या घरचे ही सगळे तालुक्यालाच शिकलेत...नंतर त्याचे बाबा ही तालुक्यालाच होते शिकवायला...पण आजोबांनी पुढाकार घेऊन गावामध्ये १० वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय केली आणि मुलांना होणारा ताप खरोखर वाचला...पुढे जाऊन त्याच्या बाबानी ही याच शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला आणि ते याच गावात रुजू झाले...आजोबांना कायम वाटायचे की त्यांच्या तिन्ही मुलांपैकी कुणीतरी त्यांचा राजकीय वारसदार व्हावा...त्यांनी समाजकार्य करावे...पण त्यांचा मोठा मुलगा अपघातात गेला लग्नाच्या दोन वर्षांनंतरच...त्यांना मूलबाळ नव्हते त्यामुळे त्यांची सून एकटी पडली...पण आजोबा अन् विराजच्या बाबांनी मिळून त्यांचा पुनर्विवाह लावून दिला....तसा बघायला गेलं तर बाकीच्या दोघांनाही राजकारणात रस नव्हता...पण हा ते दोघे मात्र आपल्या मातीशी फार प्रामाणिक होते...रमेशराव(विराजचे बाबा) यांनी तालुक्याचा जॉब सोडला फक्त आणि फक्त या गावासाठी...अन् विराजचा लहान काका तर १५ दिवसात गावाकडे एक फेरी नक्की मारत...त्याच्या आत्याला ही याच गावात दिल्याने आजोबांनी तिलाच या पदासाठी पुढे तयार केले....नंतर आजोबांनी राजकारणातून विश्रांती घेतली..अन् आत्या मात्र पुढे बरीच सरसावली...तिने अनेक समाजकार्य केलीत अन् त्यामुळेच तिला गावातल्या लोकांनी भरभरून प्रेम दिले आणि त्यांच्या घराण्याने ही पदवी पुढे नेली...आज विराजच्या आत्याचा मुलगा राकेश सरपंच आहे आणि या दोन्ही घरातील लोकांची नावे फार आदराने घेतली जातात...


जेवण आटोपून सगळे आपापल्या कामाला परतले... कोरोनामुळे ही एक चांगली गोष्ट झालेली की सगळे नाश्ता आणि जेवण एकत्र करत असत... रमेशरावांची तब्येत अचानक खराब होऊन त्यांना चक्कर आलेली त्यामुळे त्यांना दवाखान्यात under observation ठेवलेले दोन दिवस म्हणून विराज तातडीने निघून आला कोल्हापूरला...आणि त्यानंतर lockdown चालू झाले लगेच... तसंही विराजच्या कंपनीमध्ये आधीच कल्पना दिलेली work from home ची...त्यामुळे त्याला काही problem आला नाही... तो जपान वरून आल्यानंतर घरी फक्त एकदाच येऊन गेलेला, परत यायला मिळालाच नाही...काम ही वाढलेले आणि तशी त्याला गावाकडे यायची तशी फार इच्छा नसायची, कारण त्याला शहराचे फार आकर्षण होते आणि सवय ही लागलेली...


पण तो कधीकधी मनातल्या मनात बोलायचा "काय यार हा कोरोना....किती जीवितहानी हानी केली याने....अख्या जगाला pause केलं...बघता बघता अनेक परिवार बरबाद झाले याच्या पायी...पण याच कोरोणामुळे मला या १५ दिवसात आपल्या माणसांची किंमत कळली...." पुण्यात आपल्या मित्रांचे हाल पाहून त्याला खरोखर वाईट वाटत होते पण काय करणार इलाज नव्हता काहीच...

त्याच्या बाबांची तब्येत आत्ता बरीच सुधारली होती...आपली कामे ते स्वतः करून घेत होते.

विराज आणि बाबा जेवून झाल्यावर हॉल मध्ये बसले होते तेव्हा बाबा म्हणाले,

"काय रे फोन केला का तू चेतन ला, कसा आहे तो अन् काय म्हणते पुण्याची परिस्थिती??" बाबा

"हो केलेला मी बाबा पण खूपच पेशंट सापडायला लागलेत तिथे...चेतन तर रूम मधून बाहेरच पडत नाहीये...काही हवं असेल तर मागवून घेतो रूमवर अन् त्याला sanitized केल्याशिवाय वापरत नाही" विराज

"अवघड परिस्थिती झालीय बघ...चेतन चे आई बाबा खूपच टेन्शन मध्ये आहेत..कधी एकदा त्याला बघतो अस झालंय त्यांना..सकाळी morning walk ला आल्यावर पण शशी उदास असतो. सारखा चेतन चा विषय असतो त्याच्या तोंडात...त्याच्या जॉब च पण काही नक्की नाहीये, त्याच्या कंपनीतून बऱ्याच जणांना कमी करण्याचा विचार चालू आहे म्हणे...काय बोलायचं आता..बाप इथ पोराचं तोंड बघायला आसुसलाय..अन् पोराला जॉब च पडलय...तूच सांग त्याला आत्ता समजावून...जर गाड्या चालू झाल्या तर ये म्हणावं गावी...जॉब काय एक गेला तर दुसरा आहेच की...अन् आता तू पण अजिबात जॉब चा विचार करू नकोस आणि परत जायची तर गडबड अजिबात करायचीच नाही" बाबा

"मी जॉब चा विचार करतच नाही बाबा, मला काय एक नाही तर १०० संधी मिळतील तशी क्वालिटीच आहे माझ्याकडे, उगाच काही एवढं यश मिळालंय का बाबा" विराज


विराजच्या या बोलण्यावर बाबा किंचितसे हसले...कदाचित त्यांच्या शिक्षकी पेशाने विराजचा अहंकारी चेहरा वाचला असेल..पण होताच त्याला स्वतः वर विश्वास आता लोक त्याला अहंकार बोलायचे, कमी वयात एवढं घवघवीत यश मिळवलेले की त्याला स्वतः चा फार अभिमान वाटायचा...

"अरे विराज, आत्ता तसही lockdown सुरू आहे...तर जरा घरात फर्निचर च काम करून घेऊया म्हणल, आधीच फर्निचर आहेच पण त्यात आणि जरा भर टाकून नवीन कपाट वगेरे तयार करून घेऊत, मी त्या प्रकाशला advance दिलीये हॉल मधले फर्निचर करायला तुला काही हवे आहे का तुझ्या रूम मध्ये तर सांग आपण करून घेऊ या" बाबा

"त्याची काय गरज बाबा, मी कुठे असतो आता इथे जास्त दिवस, उगाच कशाला खर्च त्यापेक्षा राहू दे" विराज

"अरे असू दे रे उद्या लग्न झाल आणि बायको पोर आलीत तर त्यांना अस वाटायला नको की एवढ्या मोठ्या बंगल्यात आमच्या बाबाची रूम एवढी साधी का" बाबा हसत म्हणाले

"काही काय बाबा...लग्न आणि एवढ्यात, मला तर अजून वेळ हवाय, अजून कित्येक लक्ष्य पार करायची आहेत मला" विराज

"प्रगती काय होत राहते रे विराज पण लग्न ही ज्या त्या वेळी झाल की चांगल असत, तुला ही तुझे विचार सांगण्यासाठी हक्काचे माणूस मिळेल, जे तुझ्या प्रत्येक सुख दुःखात तुझ्या सोबत असेल, विचार कर, लग्नचाही आणि रूमच्या फर्निचरचाही, प्रकाश येईल बघ ४ वाजेपर्यंत...सांग त्याला तुला काय काय हवं ते" बाबा

"हो बाबा नक्की विचार करेन" विराज


बाबांचं ही बरोबर होत..लग्न ही वेळेत व्हायला हवे... ह्ममम बघू आता कोण आहे ती माझ्या स्वप्नातली सुंदरी, beauty with brain जी माझ्या status ला proper फिट होईल...तो मनातच बोलला. ४ वाजता प्रकाश आला, त्याला विराजने थोडे फार suggest केले फर्निचर...पठ्ठ्याने दुसऱ्या दिवसापासूनच कामाला सुरुवात केली, काय करणार तो तरी बिचारा कोरोनामुळे कामच कुठ होतीत.


विराजला ऑफिसच काम असायचं, work from home असल्यामुळे मला शांतता हवी असायची, पण त्याच्या रूममध्ये सगळे आवाज घुमत होते drilling मशीनचे वगैरे...आईला सांगून त्याने दुसऱ्या एका रूम मध्ये त्याचे सामान तात्पुरते हलवले, अन् तिथच त्याची कामे सुरू केली...दिवस गेला कामात सगळा, रात्री लवकर झोप लागली...सकाळी सूर्याची किरणे डोळ्यावर पडत होती, रागच आला त्याला जरा, यार किती लवकर सकाळ होते ही🙄 तो रागाने उठला खिडकी बंद करण्यासाठी, पण समोरच दृश्य पाहून त्याच्या चेहऱ्यावर मिश्र भावना आल्या...चेहरा अगदी रागाने अन् त्याच्यातल्या अहंकाराने भरून गेला...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama