Manasi w

Inspirational

3  

Manasi w

Inspirational

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार🏆

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार🏆

3 mins
337


     सुशांत....नावाप्रमाणेच शांत, समंजस, साधा, निरागस..... घरात सगळ्यांचा लाडका...पण त्याच्यातील खरी कमतरता शाळेत पाठवल्यापासून कळायला लागली...शाळेतील काहीच कळत नव्हते त्याला, सगळ डोक्यावरून जायचं... गणित तर बापरे बाप...शाळेत शिक्षकांनी शिकवले...बाहेर शिकवणी लावली... तरीही मार्कांची पातळी कायम खालीच...शिक्षकांनी सुध्दा नंतर लक्ष देणे सोडून दिले....आता त्याचा लहान भाऊही त्याच शाळेत आला होता...हो त्याचा लहान भाऊ, सुजय...अगदी त्याच्याविरुद्ध... प्रत्येक गोष्टीत हुशार, अगदी गणितातही, चलाख... दोघे प्रवाहाची दोन टोके अस म्हणायला हरकत नाही...पण सुजयच्या हुशारीमुळे सुशांतवरून सगळ्यांचीच नजर हटत गेली....घरचे पण बोल लावू लागले...लहान भावाकडून काहीतरी शिक अशी वाक्ये कानावर पडू लागली.....नक्की काय प्रोब्लेम आहे सुशांतला काही कळेनासे झाले होते....एकदा त्याच्या आईने त्याला विश्वासात घेऊन विचारले...पण त्याचे उत्तर त्यालाच माहीत नव्हते...बहुतेक त्याला जन्मजातच पुस्तकांशी मेळ जमायचा नाही...खूप प्रयत्न करून बघितले....पण काठावर पास होण्या इतपतच त्याला कळत होते...कसेबसे शाळेचे शिक्षण पूर्ण झाले... आता कॉलेज वेध लागले होते...बाबांनी त्याला जबरदस्ती सायन्स घ्यायला लावले... तरी बिचाऱ्याने १२ वी पूर्ण केली कशीबशी... बाबा परत हट्ट करू लागले की इंजिनिअरच व्हायचं कारण त्यांच्या मित्रांच्या मुलांनी इंजिनिअरिंग निवडले होते...त्याची इच्छा फारशी नव्हती...पण बाबांसाठी तो तयार झाला... पण पाहिजे त्या कॉलेजला प्रवेश मिळेना कारण मार्क कमी...तरीपण त्याच्या बाबांनी प्रयत्न करून त्याला त्यांच्या आवडीच्या कॉलेजला प्रवेश घेऊन दिला अगदी management quota मधून...

त्याची आवड नसताना ते स्वतःचा पैसा आणि त्याचा वेळ वाया घालवत होते....त्याचा परिणाम असा झाला की ४ वर्षाची डिग्री पूर्ण करायला त्याला ६ वर्ष लागली...आणि जॉबही लवकर मिळेना कारण मार्कांचे रेकॉर्ड चांगले नव्हते....त्याच्या पाठोपाठ त्याचा भाऊही इंजिनिअर झाला आणि त्याला कॅम्पसमधून जॉबही लागला... घरात एकच जल्लोष होत होता....पण प्रत्येक जण सूजयच्या यशाबरोबर सुशांतचे अपयशही बोलून दाखवू लागला... सुजय नोकरीसाठी बंगलोरला रवाना झाला...भावासाठी चांगले वाटत होते पण स्वतःला सुशांत फारच कोसत होता...एकवेळ घरच्यांच्या आणि बाहेरच्यांच्या टोमण्याना कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुध्दा केला...पण देव तारी त्याला कोण मारी...त्यानंतर घरच्यांनी जरा त्याच्या कलेने घ्यायचे ठरवले... घरच्यांनी आणि मित्रांनी त्याला एखादा कोर्स करायला सांगितले, पण त्याने स्पष्ट नकार दिला...कारण आत्ता त्याला आर्थिक प्रतिष्ठेबरोबरच सामजिक प्रतिष्ठाही हवी होती...जी त्याला कोणताही कोर्स करून मिळणार नव्हती...लोकांच्या अपमानाचे त्याला उत्तर द्यायचे होते पण बोलून नाही, तर काहीतरी करून...त्याने त्याच्या काही मित्रांना कॉल करून UPSC बाबत चौकशी केली....पहिला सगळ्यांनी त्याला खुळ्यात काढलं..नको वेळ वाया घालवू तुझा असे मोलाचे सल्ले दिले...पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले...घरी त्याने त्याच्यासाठी दोन वर्षे मागून घेतली...त्याने घरी राहण्याच्या एवजी हॉस्टेल वर राहून अभ्यास करायचा निर्णय घेतला...मार्ग खूप कठीण होता त्याच्यासाठी कारण तो शाळेपासूनच त्याचा मार्कांचा आलेख पाहता कुणालाही शंका येऊच शकत होती... शाळेपासूनच त्याने सगळ्या गोष्टी तोंडपाठ केलेल्या, त्या समजून घ्यायचा त्याने कधी प्रयत्न केला नाही...म्हणून तो कायम मागे राहिला..आता त्याची चूक त्याला कळली होती...ज्ञान तोंडपाठ केल्याने मिळत नाही तर समजून घेतल्याने मिळते...आणि आता तो अशा क्षेत्रात उतरला होता जिथे प्रत्येक गोष्ट समजून घेऊन ती हाताळणे गरजेजे होते...म्हणून सुरुवात त्याने शाळेच्या पुस्तकांपासूनच केली... सगळी पाठ्यपुस्तके समजून घेतली...मग तो main पुस्तकांकडे वळला...पहिले वर्ष त्याने मेहनत घेऊन पहिली परीक्षा दिली पण तो नापास झाला...त्याने हार न मानता परत जोमाने अभ्यास सुरू केला...आणि दुसऱ्या वर्षी त्याने परत परीक्षा दिली...त्यात पास होऊन त्याने दुसरीही परीक्षा दिली...आणि त्याला मुलाखतीसाठी दिल्लीला बोलवलं गेलं...त्याने त्याचा ही सराव करून घेतला... मुलाखत ही उत्तमरीत्या पार पडली...पण त्याला उगाच आताच कोणतीही आशा ठेवायची नव्हती...हॉस्टेल वर येऊन त्याने परत अभ्यास सुरू केला....आणि तो दिवस उजाडलाच...निकाल लागला...देशात ५ वा आला होता तो...त्याला हवी असणारी प्रतिष्ठा त्याला मिळाली होती आणि लोकांना त्यांची उत्तरे...दोन अडीच वर्षांनी तो घरी परतला...जंगी स्वागत करण्यात आले त्याचे... गुलाल,सत्कार, शाल, गुच्छ बघून घरचे अक्षरशः भारावून गेले होते...सोनेरी दिवस आणले होते त्याने सगळ्यांसाठीच.... कधीकाळी त्याचा भाऊ बंगलोरला जॉब लागला आणि तुझ कशात काही नाही म्हणून ज्या लोकांनी त्याला टोमणे मारलेले त्यांना आज उत्तर मिळाले होते....जे हात त्याला बोल लावण्यासाठी उठत होते तेच हात आज त्याला आशीर्वाद देत होते...कारण तो आज पूर्ण बंगलोर जिल्ह्याचा IAS होता...

अपयशच्या पचवूनी घटना

यशातील अडथळ्यांना दे तू नकार...

सांभाळूनी समजावूनी घे तू स्वतःला कारण

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational