*वैलेंटाइन डे*......
*वैलेंटाइन डे*......


सुमन, नावा सारखीच चांगले मन असलेली, सावळ्या रंगाची सर्वसाधारण पण खुप गुणी. दोन मुले सासू सासरे, आणि दोघं नवरा बायको, अस्या एकत्र कुटुंबात राहून सर्व व्यवस्थित, मनापासून करणारी.आपण पण पुढे शिकावे नौकरी करावी आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा अशी प्रबळ इच्छा होती, पण कामाच्या व्यापात तिला पुढे कांहीं करता आले नाही, मग एक आदर्श गृहिणी बणून आपण संसाराचा गाडा सुरळीत चालवायचा, आता तिच्यापुढे एवढेच ध्येय होते.
आज तिचा वाढदिवस होता, जतिन ने, तिच्या पतीने, तिला सकाळीच विश केले, काय हवे ते विचारले, सासू सासरे, मुलांनी विश केले. सर्वांची ती आवडती होती. घरात खुप आनंदाचे वातावरण होते. मुलांनी शाळेत जाताना आईला विश करून आम्ही शाळेतून आल्यावर आई तुझा वाढदिवस साजरा करू असे आश्वासन दिले होते. पतीने पण तिला प्रॉमिस केले, आपण सर्व कुटुंब, संध्याकाळी बाहेर जेवणासाठी जाऊ. तू स्वयंपाक करू नकोस.
आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे, सुमनला नेहेमी च खंत वाटायची की, आपण कांहीं आपल्या संसारात आर्थिक मदत करू शकलो नाही.
सुमन , जतिनला म्हणाली, आज माझा वाढदिवस आहे, त्यासाठी मला तुमच्या कडून एक अनोखे गिफ्ट हवे आहे. पुढे ती म्हणाली, तुमच्या दृष्टीने, माझ्यातील कमीत कमी तीन कमतरता काय आहेत , ते मला निसंकोच सांगा, मला राग येणार नाही, आणि आज पासून त्या कमतरता पूर्णपणे सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल, या पेक्षा जास्त असतील तर त्या पण सांगा. मी आपल्या संसारात कोठेही कमी पडायला नको आणि तुमची अधिक चांगली पत्नी बनण्याचा प्रयत्न करील. आज वाढदिवस निमित्ते मी हा संकल्प केला आहे. तुम्ही दिवसभर विचार करून मी कोठे कमी पडते हे ऑफिस मधून आल्यानंतर मला सांगितले तरी चालते. पण नक्की सांगा ,हा माझा आग्रह आहे.
जतिन ऑफिसमध्ये दिवसभर विचार करीत होता, त्यानंतर त्याने टिफीन टाईम मध्ये जवळच असलेल्या फुलांच्या दुकानात गेला, एक सुंदर निशिगंधाच्या फुलांचा बुके सिलेक्ट केला, आणि त्यात एक चीठी ठेवली. त्या चीठीत त्याने लिहिले......
**"वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, मला तुझ्यात काय कमी आहे ते मला माहीत नाही, आणि जाणून ही घ्यायचे नाही, पण तू जशी आहेस, तशीच मला खुप खुप आवडतेस"**
.
सात वाजता जतिन जेव्हा ऑफिस मधून घरी आला तेंव्हा त्याने पाहिले सुमन दारात त्याचीच वाट पाहत उभी आहे. जतीनला पाहिल्या बरोबर तिच्या डोळ्यातून प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आश्रु वाहू लागले. त्यांच्या दोघांच्या प्रेमाची गोडी जीवनाची गोडी आणखीनच वाढली होती.
सर्वांनी शक्य तो दुसऱ्यातील दुर्गुण शोधण्या पेक्षा सद्गुणांची स्तुती करावी, त्यातूनच दुर्गुनाचा लोप होऊन प्रेम वाढते. आपल्या प्रिय व्यक्ती सोबत भांडण करण्या पेक्षा हार मानल्याने प्रेम भावना नक्कीच वाढते.
अश्याच छोट्या मोठ्या प्रसंगातून प्रेम व्यक्त करायला पाहिजे. यालाच तर व्हॅलेंटाईन डे म्हणतात.