माझा व्हॅलेंटाइन डे
माझा व्हॅलेंटाइन डे
आपल्या भारतीय संस्कृतीत व्हॅलेन्टाईन डे ला अजिबात महत्व नाही. मी पण कधीच अशा गोष्टींना प्राधान्य दिले नाही.
परंतु साधारण 10 वर्षांपुर्वी माझे मिस्टर लातुरला गेले होते आणि स्टेशनरी दुकानात पेन घेण्यासाठी गेले तेथे गिफ्ट खरेदी करण्यासाठी आलेल्याची गर्दी पाहून, त्यांनी दुकानदाराला विचारले, त्यांनी व्हॅलेंटाईन डे बद्दल सांगितले, त्यांना पण वाटले की चला आपण पण बायकोसाठी काहीतरी गिफ्ट घेऊयात. त्यांनी माझ्यासाठी एक पर्स आणली. आणि पैठणला आल्या नंतर मला गिफ्ट दिली. मला खुपच आनंद झाला.
त्या व्हॅलेन्टाइन डे निमित्त दिलेल्या त्या पर्सची, गिफ्टची आठवण येते. असे प्रेमाचे हलकेफुलके क्षणच आयुष्यात गोड आठवणी बनून रहातात......!!!
व्हॅलेन्टाइन डे चे विरोधक, "प्रेम व्यक्त करण्यासाठी स्पेसिफिक दिवसच कशाला हवा ???" असा प्रश्न सर्रासपणे विचारतात. खरंच नसते गरज अशा स्पेसिफिक दिवसाची. गरज असते ती प्रेमाला व्यक्त होण्याची.
पण एखादा दिवस फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून असेल तर बिघडलं कुठे? नवीन नवीन असताना सगळेच प्रेम व्यक्त करतात पण मुरलेल्या नात्यालाही प्रेमाच्या भावना व्यक्त होण्याची गरज असते.
अशा "स्पेसिफिक डे"च्या रुपाने एक संधी मिळते प्रेम व्यक्त करायला. महत्व दिवसाला नाही. महत्व आहे ते व्यक्त होण्याला. फक्त महागडी गिफ्ट्स, हॉलिडे पॅकेजेस म्हणजे प्रेम नव्हे हे १००% मान्य. पण कधीकधी यामुळेच नात्यांमध्ये नव्याने रंग भरले जातात हे सुद्धा तितकंच खरं.
