*हे स्त्री ही तुझी कथा*....
*हे स्त्री ही तुझी कथा*....


हे *स्त्री*आजच्या परिस्थितीला मी कांहीच करू शकत नाही. केवळ मी एक सवांदिनी आहे. मी आज ही असुरक्षित आहे, असहाय आहे. आजच्या आधुनिक काळात देखील मी एक भोगवस्तू आहे. नैतिकतेची पायमल्ली करणाऱ्यांसाठी आज देखील माझ्याकडे भोगवस्तू म्हणुन पाहिले जाते.
मी वैज्ञानिक, संशोधक, डॉक्टर, वैमानिक, गिर्यारोहक, अंतराळवीर, शास्त्रज्ञ.... असून देखील........!!! एक भोगवस्तु म्हणून माझ्याकडे पाहिले जाते. मी कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. पाऊलावर पाऊल, उज्वल भविष्याची चाहूल आसून देखील, आजही माझ्या शरीराचे लचके तोडले जातात. माझ्यावर अत्याचार होतात. मला भर रस्त्यात, विनाकारण, माझा कांहीही दोष नसताना जाळले जाते......!!! मी कांहीच करू शकत नाही. केवळ आज मी एक संवादिनी आहे. माझ्या मनातील तडफड, उलघाल मांडत आहे. असे वारंवार का घडते.. का.. का. का.....????.
आरुषी तलवार हत्याकांड....... झाला की, निर्भया हत्याकांड..... अश्या अनेक कृतीघटना... आणि नंतर प्रियंका रेड्डी,... आज अंकिता कृतीघटणा, पेट्रोल टाकून भर रस्त्यात जाळले.........!!! माणुसकीला काळीमा फासणारी,.... माथेफिरू लिंगपिसाट....., हैवानाच्या मानसिकतेला ......आणखी एक स्त्री बळी पडली. काळीज पिळवटून टाकणारी घटना....!!!.
मार्शल आर्ट प्रशिक्षण घेतले असते तरी चार चार गिधाडा पुढे किती वेळ तग धरून बसली असती प्रियंका....???? कितीही प्रयत्न केला असता तरी काय करू शकली असती अंकिता.....??? माणुसकीची क्रुर चेष्टा करणाऱ्या समोर हतबल व्हावेच लागले. किती भेदरून गेली असेल. असहाय असुरक्षित होऊन शेवटी प्राणास मुकावे लागले. काय म्हंटला असेल जीव. किती वेदना झाल्या असतील, किती धावा केला असेल. ऐकूणच जीव घाबरा होतो. भयंकर चीड येते. आई वडिलांना किती दुःख झाले असेल. पेट्रोलने जळालेले शरीर पुन्हा जळताना, आई वडिलांना किती वेदना झाल्या असतील.....!!!
महाभारत काळा पासून, म्हणजे द्रौपदी पासून..... ते आज प्रियंका रेड्डी , अंकिता पर्यंत काळाची पुनरावृत्तीच होय. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत बदल झाले पण स्त्रीच्या कथेत फारसे बदल झाले नाहीत. वारंवार स्त्रीवर अत्याचार होत आले आहेत. कांही घटना माहीत होतात, कांही घटना दडपून टाकल्या जातात,. तर कांही घटना अजिबात माहीत होत नाहीत.
आज सोशल मीडिया मुळे स्त्रीवर होणारे अत्याचार माहीत होतात. किळसवाणी प्रवृती समोर येते. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व निर्घृण हत्याकांडाच्या घटना माहीत होतात आणि मन सुन्न होऊन जाते.
हैदराबाद कृतिघटना असो की हिंगणघाट कृतीघटना, मानवतेला काळीमा फासणाऱ्या.........!!!
असे कांहीं घडले की समाजातील कांहीं लोक स्त्रीला नावे ठेवतात...., तिच्या राहणीमानाला....., तिच्या ड्रेसेसला,..... तिच्या फॅशनला,.... कुठली तरी एक उणीव शोधून काढतात आणि स्त्रीला जबाबदार ठरवतात.
कधी कधी तिच्या संस्कारा वर पण ताशेरे ओढले जातात. या पूढे जाऊन आई वडिलांना देखील नावे ठेवतात.
सर्वत्र बदल झाले पण समाजातील मानसिकतेत बदल झाले नाहीत.
आज ही स्त्री असुरक्षित आहे. त्याला समाजचं करणीभुत आहे. मनुष्याची विकृति कारणीभुत आहे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कारणीभुत आहे. नाहीतर एका सुशिक्षित डॉक्टर महिलेवर असा प्रसंग ओढवणे म्हणजे माणुसकीला काळीमाच आहे.
तसे पाहता वेळ पण खुप झालेली नव्हती., कोणी पाहिले नसेल का.....!!!, भर रस्त्यात घटना घडली, रस्त्याने कोणीच दुसरे लोक नसतील का.......!!!, मदतीचा हात देण्याची देखील लोकांची मानसिकता राहिली नाही का........!!!. कोण भानगडीत पडेल.... !!!, कोण जीव धोक्यात घालील.....!!!, जाऊ द्या आपल्याला काय करायचे......!!!, असी समाजाची मानसिकता असल्यामुळे आशा घटना वारंवार घडतात. सगळीकडे स्वार्थ भरलेला आहे. कोणी कोणाला मदत करायला तयार नाही. कोणाकडे वेळच नाही.
निर्भया हत्याकांड लाखो लोकांनी मनावर घेतले. रस्त्यावर उतरले, मोर्चे काढले, तेव्हा कोठे न्याय मिळाला, हजारो निर्भयाना न्याय मिळालेला नाही. न्यायदान झोपलेले असते. म्हणून समाजात विकृती वाढली आहे. नैतिक मूल्यांची पायमल्ली होत आहे.या सर्वांना, या माथेफिरूला....., आशा मानसिक विकृतीला...... अशा लिंगपिसाट गुन्हेगारांना...... जीवंत जाळा. नंतर पाहा नक्कीच असे कृत्य कोणी करणार नाही, असे कृत्य करताना, त्या अगोदर हजारदा विचार करतील.......????.
अंकिताला भावपूर्ण श्रद्धांजली.
परमेश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.
तिला न्याय मिळालाच पाहिजे............
स्त्री सुरक्षा.......
स्त्री सुरक्षे साठी आपण काय करू शकतो...
आता स्त्री सुरक्षितते साठी शासनाने अभ्यासक्रमात, कम्पल्सरी स्वरक्षण, या साठी एक विषय ठेवायलाच पाहिजे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावन्या पेक्षा हे महत्वाचे आहे. भले एखादा विषय कमी करा परंतु स्वसंरक्षण महत्वाचे आहे.प्रतेक शाळा कॉलेजेस मधून कराटे प्रशिक्षण द्यायलाच पाहिजे. मार्शल आर्ट प्रशिक्षण गरजेचे आहे.
आज स्वातंत्र मिळून एवढे वर्षे झाले तरी स्त्रीच्या मनातील भीती दूर झाली नाही. स्त्रीला रात्री उशिरा बाहेर जाण्यासाठी भीती वाटते.
मुलगी सून लवकर घरी आली नाही की भीती वाटते. हे कोठेतरी थांबायला पाहिजे.
मला वाटतं पालकांनी डॉक्टर इंजिनिअर , बनवण्या अगोदर एक कराटे पट्टु बनवणे गरजेचे आहे. आज मुलींना डॉक्टर,इंजिनिअर, वकील ...... बनऊन, लहानाची मोठी करून, तिची कांहीही चूक नसताना तिला गमवावे लागले. केवढे हे दुःख. तिने घरी फोन ही केला पण कोणी कांहींच करू शकले नाही. तिला वेळेवर कोणीही मदत केली नाही.
पोलीस खाते आपले कर्तव्ये टाळून ही केस आमच्या एरियात येत नाही म्हणून सबब सांगतात आणि त्यांचे कर्तव्ये टाळतात. शासनाने याची पण दखल घ्यायला पाहिजे. न्यायदेवता देखील ठराविक लोकांच्या खिशात आहे. समाजातील ठराविक लोकांनाच न्याय मिळतो. सर्वसामान्य जनतेला पोलीस प्रोटेक्शन देखील लवकर मिळत नाही. प्रियंकाला वेळेवर मदत झाली असती तर कमीत कमी जीवंत सापडली असती. अशा वेळेस पोलीसांनी आपला एरिया न पहाता ताबडतोब मदत करायला पाहिजे. शासनाने तसे आदेश द्यायला पाहिजेत.
स्त्रीला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे. अशी वेळ आली आहे की स्त्री सुरक्षितता या साठी, पालक, समाज, शाळा, कॉलेज, पोलिस स्टेशन, आणि महत्वाचा घटक शासन या सर्वांनीच जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. आणि यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे.
पालकांनी आपाल्या मुलांना नैतिकतेचे धडे द्यायला पाहिजेत जेणे करून कोणीही दुसऱ्याच्या बहिणीला हात लावणार नाही. स्त्रीचा सन्मान, आदर करायला शिकवले पाहिजे. शिवाजी महाराजांन सारखे आदर्श बिंबवायला पाहिजेत.
जातीयता, धर्म बाजूला ठेऊन सर्वांनी स्त्री सुरक्षितते साठी प्रयत्न करायला पाहिजेत.
स्त्री आज, आधुनिक काळात देखील असहाय असुरक्षित आहे. निर्भया, प्रियंका....... अशा कितीतरी विकृत लोकांच्या मानसिकतेला बळी पडल्या, बळी पडलेल्या कितीतरी घटना माहीत झाल्या, आणि कितीतरी घटना दडपून टाकल्या. येथून पुढे तरी असे व्हायला नको.......
पुन्हा शिवशाहीतील शिक्षेचा विचार होणे गरजेचे आहे. अशा नराधमांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. शिक्षा एकूण थरकाप उडाला पाहिजे. म्हणजे असा गुन्हा करणाऱ्या वर वचक बसेल.
शासनाने या गुन्ह्या बद्ल गंभीर विचार करून खंबीर पाऊल उचलायलाच हवे........
नाही तर..*स्त्री*.. तुझी हीच कथा म्हणावे लागेल. आणि मी केवळ *सवांदिनी*....!!!.