वाडा (एक रहस्य)
वाडा (एक रहस्य)


- भाग १
बराच वेळ वैतागलेल्या समीरने फोन हातात घेतला. what's app वर जाऊन इतरांचे status पाहू लागला. समीर नुकताच corporate office मध्ये लागला होता. तिथल्या सवयी अंगी आणायला त्याला वेळ होता. त्यामुळे थोडा मानसिक ताण असलेला समीर त्या status मधे जणू काहीतरी शोधत होता.आणि त्याला सापडल. त्याने लगेच दिपेशला फोन लावला. २-३ रिंग नंतर दिपेशने फोन उचलला.समीर बोलत होता.
दिपेश पुढे म्हणाला,"साल्या कॉलेज संपल्यावर आता आठवलो तुला?"
दोघांचे संभाषण जरा लांबतच गेलं.
तेव्हा समीर म्हणाला" तुझ status बघितलं, कुठे डोंगरात फिरायला जातोस रे?"
"अरे आपली ट्रेकिंग चालू असते, मी जातोच महिन्यातून एकदा ट्रेकला" दिपेश बोलला.
समीर उत्साहात म्हणाला," मलापण यायचं आहे अस एन्जॉय करायला, पण डोंगर वगैरे नको."
दिपेश सुध्दा आता दुजोरा देत म्हणाला "हो रे आता एक ट्रेकिंग नाही तर आउटिंगचा प्लॅन आहे, येणार का बोल बाकी सगळं नंतर सांगेन."
"किती दिवसाचा प्लॅन आहे तश्या सुट्ट्या टाकायला?" समीरने विचारलं.
दिपेश आता संभाषण संपवत "ते मी सगळं तुला नंतर सांगेन, एक आठवड्या आधी. समीरने "बर ठीक" बोलून फोन ठेवला. आणि आपल्या कामात बुडाला. काही वेळात त्याच्या फोनचं notification वाजताच त्याने परत फोन हातात घेतला. दिपेशने एक what's app group बनवला होता.
'outing' नावाचा ग्रुप ज्यात ह्याच्या ओळखितले फक्त दिपेश आणि मोना होते. मोना ही दीपेश आणि समीरची कॉलेजची मैत्रीण. तशी तिची आणखी ओळख म्हणजे दिपेश आणि मोना हे एकमेकांचे प्रेमाचे साथीदार. दिपेशने ग्रूप वर messege सुरु करत प्रत्येकाचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. ग्रुपवर हळूहळू chatting सुरू झालं. बऱ्या पैकी आता दहाजण तयार झाले होते. दिपेशने ग्रुप मध्ये messege टाकला, 'स्पॉट तर फिक्स करा'. मोनाने त्यावर रिप्लाय केला "आपले परम मित्र राजू त्यांना विचारा स्पॉटच."
राजू हा दीपेशच्या ट्रेकर ग्रुप मधला मेंबर. सगळ्या जागा, त्यांचे अनुभव हाच शोधून काढायचा. राजूने लगेच त्यावर रिप्लाय केला,"थोड्यावेळात सगळी माहिती देतो."
थोड्या वेळाने राजूने ग्रुप वर २-३ स्पॉट्स सुचवले. आता प्रत्येकाच्या त्यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या.जागेवरची प्रत्येकाची मते बघून दिपेश पुढे म्हणाला, 'एक काहीतरी ठरवा रे'. बऱ्याच वेळाने का होईना राजू म्हणाला, 'अरे ती कोकणातली जागा मस्त वाटते.' कोकणातली रत्नागिरी मधली जागा राजूने सुचवली होती. स्पॉटचे काही फोटो सुद्धा त्याने टाकले. एका समुद्रा समोर ती जागा होती आणि त्या जवळच जंगल सुध्दा. सगळ्यांनी जागा पसंत केली. राजू आणि दीपेशने आता पुढची सूत्र हाती घेतली. राजूने ऑनलाइन नंबर शोधून काढला आणि दिपेशला दिला.
दिपेशने लगेच त्या नंबरवर फोन केला. कॉल लागताच समोरून "हॅलो कोण बोलतंय?"
त्यावर इथुन "नमस्कार मी दिपेश... दिपेश जोशी!
समोरील व्यक्ती," बर बोला काय काम?"
"ते ऑनलाइन सर्च करून या जागेबाबत कळलं. छान आहे जागा! आम्हाला यायचं होत फिरायला तिथे." दिपेश बोलला.
पुन्हा समोरील व्यक्ती "आम्ही म्हणजे कोण?"
त्यावर दिपेश बोलला "आम्ही मित्रच आहोत सगळे."
समोरून पुन्हा "ठीक आहे."
दिपेश पुन्हा " ते १० लोकांच राहणं आणि खाण्यापिण्याची सोय होईल ना?"
ती व्यक्ती "हो होईल. इथे आलात की इथे एक वाडा आहे तिथे सगळी सोय होईल."
दिपेश पुन्हा फोनवर,"अहो तुमचं नाव तर सांगा?"
समोरील व्यक्ती "मोहन लेले"
दिपेशने ग्रूपवर message केला 'भाई लोग अपना स्पॉट डन! आताच तिथल्या एका माणसाशी बोलणं झालं, जरा विचित्र वाटला तो मोहन लेले.' ग्रुप memebers सगळे खुशीत होते. आता planning ठरवू सगळं. दोन गाड्या घेऊन जायच अस ठरल. एक गाडी दिपेश तर एक गाडी राजू चालवणार होते. प्रत्येकाच आपलं आपलं विश्व रंगवणं सुरू झालं. कोणी डान्सिंग, कोणी nature surfing, कोणी फोटोग्राफी.
पुढल्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्लॅन करायचा अस ठरलं. त्या आधी दिपेशने प्लॅनिंग साठी एक दिवस सगळ्यांनी भेटायचं अस सांगितल. येणाऱ्या रविवारी सगळ्यांनी 'उपहार' हॉटेलमध्ये भेटायचं ठरवल. ठरल्या प्रमाणे उपहार हॉटेलमध्ये सगळे आले. दिपेश आणि मोना एकत्र बाईकने आले. समीर सुद्धा तिथे पोहचला. राजू आपल्या गाडीतून एकेकाला pick करत आला. राजुच्या गाडीतून सुनील, जूली, अनय, चिन्मय येणार होते. पोहचल्यावर सगळ्यांनी एकमेकांना विचारपूस करण्यात सुरुवात केली. तरी अक्षय आणि राखी उरले होते. थोड्या वेळाने ते सुद्धा आले. आल्यावर राजू म्हणाला,"या सालाबादप्रमाणे आपण आत्ताही उशिरा आहात, या बसा." आता ह्या सर्वांना समीर फक्त नवा होता. दिपेश सगळ्यांना समीरची ओळख करून देत होता. दिपेश पुढे म्हणाला, "हे बघ सम्या मला आणि मोनाला तू ओळखतोस. हा राजू माझा ट्रेक पार्टनर आणि ह्या ग्रुपचा स्पॉट फिक्सर." स्पॉट फिक्सर म्हणताच सर्व हसायला लागले. दिपेश पुढे,"अरे स्पॉट फिक्सर म्हणजे कुठलाही स्पॉट फिक्स करणारा. हा अक्षय आपल्या ग्रुपचा फोटोग्राफर. ही राखी अक्षयची बहिण. आणि हे सुनील, जुली,अनय, चिन्मय. आता तिथून निघताना सगळं पक्क ठरलं होत आणि प्रत्येकाला आपली कामपण दिली होती. सगळेजण आपापल्या घरी जाऊन तयारीला लागले. समीर ने सुद्धा सुट्ट्या टाकल्या.
ठरलेला दिवस आला. सगळे हायवेला येऊन उभे राहिले. थोड्याच वेळात दिपेश आणि राजू सुद्धा गाडी घेऊन आले. आता सर्वांचा प्रवास सुरू झाला. गाडीमध्ये मज्जा करत, थोडा आराम करत ते पुढे चालले होते. थोड्याच वेळात ते आता पोहचणार होते. पण गाडी चालक सोडले तर बाकी सगळे गाढ झोपी गेले होते.
दोन्ही गाड्या आता गावात शिरल्या. गावात पोहोचताना दिपेशने मोहन लेलेना फोन केला. पुढील सूचना घेत आता दोन्ही गाड्या स्पॉटवर येऊन थांबल्या. तिथे समोर १ माणूस त्यांना दिसला. दिपेश पुढे जाऊन म्हणाला" मोहन लेले?" समोरून फक्त हो मान हलवली गेली. फोनवर आवाज ऐकलेला मोहन वास्तवदर्शी सुद्धा दिपेशला चक्रमच वाटला. उंचीने आखूड, काळा कुट्ट, चेहऱ्यावर कसलेच हावभाव नाही. आणि अगदी विलक्षण म्हणजे इतक्या गर्मित हा स्वेटर आणि शाल घेउन होता. गाडी चालवून दोन्ही चालक थकले होते म्हणून न राहून दिपेश ने राहायची सोय विचारली. लेले नी दीपेशच्या विरूद्ध दिशेला बोटं करून इशाऱ्यातच चला म्हणाला.
-भाग २
तिथे बराच काळ पडीक असा वाडा होता. वाड्याची बांधणी ही जुन्या काळाची होती. ऐसपैस अशी मोकळी जागा, अंगण, लहानशी बाग आणि कुंपणाच्या बाहेरअसणारा तो अथांग समुद्र, वाड्याच्या माडीवरून तो अथांग समुद्र अजूनच छान असा दिसायचा, मागच्या बाजूला परसावन आणि त्याला लागून घनदाट जंगल.आजूबाजूचा शांत परिसर. वाडा तसा गावापेक्षा लांबच होता जरा.
असा परिसर बघून अक्षय म्हणाला, "काय भारी जागा आहे ही, फोटोमध्ये बघितल्या पेक्षा जास्तच सुंदर दिसते. पण इथे कोणी राहतं की बंदच असते ही जागा"
त्यावर लेले म्हणाला, "इथे कोणी नाही राहत, सगळ्यांना यायला परवानगी नाही इथे"
पुढे अक्षय म्हणाला,"जागेचा मालक कोण इथला? मला भेटायला मिळेल का? नाही म्हटलं जागा बंद आहे तर काहीतरी चांगला वापर करता येईल, इथे रिसॉर्ट केलं तर खूप छान चालेल आजकाल अशी शांतता शहरात कुठे मिळते, चांगला धंदा होईल " हे बोलून होताच लेलेनी एक वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि सरळ आत निघून गेला. अक्षयचं काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. सर्वजण आपापल्या सामानासकट त्या वाड्यात शिरले. वाडा तसा बऱ्यापैकी मोठा होता. आत गेल्यावर कसला विचार न करता राजू आणि दिपेश एका कोपऱ्यात झोपी गेले. बाकीच्यांची गाडीमध्येच झोप झाली असल्याने त्यांनी भटकंती सुरू केली. अक्षय देखील आपला कॅमेरा घेऊन बाहेर पडला. बाहेर पडून आवडतील असे एकएक क्षण कॅमेरामध्ये टिपू लागला. बराच वेळाने तो पुन्हा वाड्यात आला आणि काढलेले फोटो सगळ्यांना दाखवू लागला. ते फोटो बघताना राखी अचानक भीतीने ओरडली. तसे सगळेच दचकले. तिला काय झालं विचारताच ती फक्त गप्प राहिली. तेवढ्यात अक्षय तिच्यावर बरसला," अग फट्टू कशाला आलीस मग, घरीच थांबायचं ना" ह्यावर देखील ती गप्पच होती. इतक्यात केअर टेकर सर्वांना नाश्ता घेऊन आला. ह्या सगळ्या मध्ये अजून एक विचित्र गोष्ट म्हणजे त्याला काही न सांगता तो बरोबर हव्या त्या गोष्टी घेऊन आला होता. सर्वांनी नाश्ता करायला घेतला. पण राखीच काही मन लागेना. कॅमेरामध्ये अस नक्की काय बघितलं होत की तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता हे काय कोणाला कळेना. फ्रेश होऊन आता सगळे फिरायला बाहेर पडले. वेगवेगळे ग्रुप करून सगळे फिरत होते. राजू , दिपेश स्मोक करायाचा म्हणून सरळ जंगलात गेले. मोना आणि जुली अक्षयला त्यांचे फोटो काढायला म्हणून समुद्रावर घेऊन गेल्या. सुनील, अनय आणि चिन्मय रात्रीसाठी काही सोय होईल का याचा प्रयत्न करत होते. राखीचं अजूनही कशात मन लागत नव्हत. समीरला तिची बेचैनी बघवत नव्हती. न राहवून तो तिच्याशी बोलायला गेला. समीर तिच्या शेजारी बसला आणि बोलू लागला," काय गं काय झालं? अशी एकटी का बसली आहेस?" त्यावर काय बोलावं हे राखीला सूचत नव्हत. राखीला जरा बरं वाटावं म्हणून समीर पुढे म्हणाला, " एक छान बाग आहे इथे, चल तिथे बसू"
समीरच्या आग्रहापोटी ते दोघं बागेत गेले आणि एका झाडाच्या सावलीत बसले. हळूहळू दोघांच्या गप्पा रंगत गेल्या. दुपार होत आली, तस ऊनपण कडक होत चाललं होत. त्यामुळे वैतागून जुली,मोना आणि अक्षय पुन्हा वाड्याकडे निघाले. वाड्यावर येताच अक्षयने सगळ्यांना फोन लावायचा प्रयत्न केला पण सगळेजण not reachable होते. थोड्या वेळाने सुनील ड्रिंक्स चा बॉक्स घेऊन आला आणि त्याने तो फ्रिज मध्ये ठेवला. मागून अनय आणि चिन्मय सुद्धा स्नॅक्स घेऊन परतले. सर्वांचा आवाज ऐकून समीर आणि राखी देखील बागेतून आत वाड्यात आले. सगळ्यांना भूक लागली म्हणून जेवणाची वाट बघत होते. पण ना जेवणाचा पत्ता, ना केअर टेकरचा , ना दिपेश-राजुचा. वैतागून आता मोना त्या दोघांना फोन करत होती पण अजूनपण त्यांचा फोन not reachable होता. वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. थोड्या वेळात राजू दिपेश सुध्दा आले. मागे केअर टेकर सुद्धा जेवण घेऊन येत होता. जेवण पाहताच सगळे खुश झाले. पटापट सगळ्यांनी जेवण उरकली.
जेवण झाल्यावर राजूने दिपेशला एकांतामध्ये प्रश्न विचारला, "अरे दिप्या आपण एवढं फिरलो, पण आपल्याला कोणीच कस नाही दिसलं? आणि हा अचानक कसा जेवण घेऊन आला?" राजुच्या बोलण्यावर दिपेश गप्प होता. कदाचित त्याला पण हाच प्रश्न पडला होता.
आता दुपारच्या वेळात काय करावे तर पत्त्यांचा डाव बसला आणि रंगत देखील गेला. समीरला पत्ते खेळता नाही येत म्हणून तो बाजूला बसून बघत होता. हळूहळू वैतागून तो परत बागेत गेला. समीरला बागेत जाताना पाहून पुन्हा राखी सुद्धा त्याच्या मागे गेली. तिला समीरची सोबत आवडू लागली होती. समीरला पण राखी आवडू लागली होती. मनोमनी दोघांनी एकमेकांना आपला जोडीदार मानला होता. नजरेत ते बोलू शकत होते. बागेत जाऊन पुन्हा त्यांच्या गप्पा चालू झाल्या. समीर आणि राखीच्या गप्पा चांगल्या रंगल्या. राखी तिथे आल्यापासून काहीशी घाबरलेली दिसत होती. आणि ती अशी अचानक का ओरडली याच कोड समीरला होतच. शेवटी समीरने न राहून फोटोमध्ये काय बघितलं होत असं विचारल. राखीला पण समीरचा आधार वाटत होता म्हणून तिने देखील समीरला सगळ्या गोष्टी सांगायचं ठरवलं.
राखी आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी समीरला सांगू लागली "इथे घडणाऱ्या घटनांकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. हया मी आधी सुद्धा पाहिल्यात" राखीने समीरला सगळ सांगायचं ठरवलं. राखीने सुरुवात तिच्यापासून केली. राखीने सांगायला सुरुवात केली,"माझा जन्म मुंबईचा. मी लहानाची तिथेच मोठी झाली. माझं शिक्षण माझे मित्र मैत्रिणी सर्व मुंबईचे. आमचे आई वडील बिल्डर होते. खूप मोठे मोठे प्रोजेक्ट होते त्यांचे शहरामध्ये." समीरला काही तर्क लागत नव्हता. तिच्या ओरडण्याचा आणि या सगळ्याचा काय संबंध होता ते, तरी तो तीचं ऐकत पुढे बोलला 'बर पुढे!'
राखी पुढे म्हणाली, "मी लहान असताना आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथून परत येताना माझ्या आई वडिलांचं अपघात झाला. आणि त्यामध्येच त्यांचं निधन झाल. त्यावेळी एक वेगळी गोष्ट घडली मला नीटशी अशी नाही आठवत पण तो अपघात होताना मी कोणाला तरी पाहिलं होत. तेव्हा मी सुद्धा तिथे होते पण सुदैवाने मला काहीच झालं नाही." समीर आता अजूनच गोंधळला. या सगळ्याचा आणि तुझ्या ओरडण्याचा काय संबंध विचारू लागला. राखी शांतपणे पुढे बोलत होती, "त्या अपघाता नंतर मला आणि दादाला काका-काकीने सांभाळलं. पुढे मी मोठी होत गेली. मला हळूहळू सगळ समजू लागलं. मी दहावीत असल्यापासून मला विचित्र स्वप्नं पडू लागली. मला खूप घाबरवतात ती स्वप्न." समीर त्यावर "स्वप्न!"
राखी पुढे म्हणाली," स्वप्न! अशी स्वप्न जी माझी रात्रीची झोप उडवून टाकत होते. इतकी वर्ष मी त्या स्वप्नाने ग्रस्तली होती. किती डॉक्टर झाले तरी काही उपयोग नाही झाला. येवढं बोलून ती थांबली." समीर आता गोंधळून विचारू लागला "पुढे?"
राखी थांबून म्हणाली," मी जे स्वप्न बघायचे ते इथे येऊन थांबेल अस वाटलं नाही मला"
समीर "म्हणजे?"
राखी,"मला पडायचं स्वप्न ज्यात मला वाडा दिसायचा तो हाच वाडा."
समीर हे सगळ ऐकून अवाक होऊन बघतच बसला.
राखी," मी इथे आल्यावर असच मला वाटलं, हा सगळं भ्रम आहे माझा ,पण मी इथे आल्यापासून सतत माझावर कोणी नजर ठेवली आहे असे जाणवत आहे . या सगळ्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करतच होते की दादाच्या कॅमेरमधला तो फोटो बघितला आणि मी घाबरून गेले."
समीरने पुन्हा विचारले "अग अस काय बघितलं तू?"
राखी "मी माझा आई वडिलांना बघितले त्या फोटोमध्ये"
हे ऐकुन समीर अजूनच बिथरला. ही हे सगळ खर सांगते आहे की माझी खेचते आहे हे त्याला कळतच नव्हतं. तरी का जाणे कोण त्याला राखीवर विश्वास ठेवावा वाटत होता. आल्यापासून सगळ्या गोष्टी आठवू लागला तो केअर टेकर, त्याच बोलणं वागणं, न मागता सगळ्या गोष्टी बरोबर आणून देणे, आजूबाजूचा निर्मनुष्य परिसर. त्याला काही वेळ सुचतच नव्हते. नक्की अस काही आहे की फक्त आपल्या मनाला तस वाटतंय.
इथे दिपेश आणि राजूपण याच गोष्टीचा विचार करत होते. विचार करून दिपेश आणि राजूने ठरवलं आपण गावात जाऊन जरा या वाड्याबद्दल आणि केअर टेकर - लेलेबद्दल काही माहिती मिळते का बघुया. तसे ते दोघे निघून गेले. समीर आणि राखीने सध्या कोणाला काही न सांगायचा निर्णय घेतला. तिथे दिपेश आणि राजू बराच वेळ पायी अंतर कापत होते पण त्यांना लांब पर्यंत कोणीच दिसत नव्हते. शेवटी कंटाळून ते पुन्हा वाड्याकडे निघाले.
वाड्यात पोचल्यावर ते दोघेही नॉर्मल वागू लागले. थोड्या वेळाने सगळे ड्रिंक्स करायला बसले. ड्रिंक्सचा कार्यक्रम रंगात आलेला असताना किचन मधून काहीतरी पडल्याचा आवाज आला. मोनाने आत जाऊन बघितलं तर आत मध्ये सगळ्या ड्रिंक्सच्या बाटल्या पडून फुटल्या होत्या. अनय फुटलेल्या बाटल्या पाहून चिन्मय वर बरसला, "तुला नीट ठेवता नाही येत का एकतर किती लांब जाऊन घेऊन आलो होतो." चिन्मय त्याला समजावत बोलत होता,"अरे मी नीटच ठेवला होता फ्रिज मध्ये. अचानक कसा पडला बाहेर? मला काय माहित" पण अनय काही ऐकून घेत नव्हता शेवटी मोना मध्ये पडली आणि त्यांच होणार भांडण थांबवलं. अचानक मोनाच्या मागून लेले आला आणि रागातच बोलायला लागला "तुम्हाला सांगितल ना इथे असल काही करायचं नाही म्हणून, मर्जी विरूद्ध गेलात तर असच होईल पोरांनो" आणि आला तसाच कुठे तरी परत गायब झाला. अनयला चढलेली म्हणून तो परत त्या लेलेशी भांडायला जाणार होता पण मोना आणि चिन्मय ने त्याला आवरलं. बाहेर आल्यावर चिन्मय मात्र हाच विचार करत होता की व्यवस्थित फ्रिज मध्ये ठेवलेल्या बाटल्या कशा फुटतील. शेवटी नशेच्या नादात आपणच कदाचित त्या बाटल्या बाहेर ठेवल्या असतील असा विचार केला आणि विसरून गेला.
सगळं नॉर्मल जरी वाटत असल तरी काही तरी वेगळं आहे अस राहून राहून सगळ्यांनाच जाणवत होत. हे चालू असताना पुन्हा केअर टेकर जेवण घेऊन आला. आता मात्र राजू आणि दिपेशच बारकाईने लक्ष होत. जेवणाची सोय करून तो लगेच निघून गेला. आणि जाताना वाड्यातल्या कोणत्याच गोष्टींना हात लावू नका अशी सूचनाही दिली. लगेच दिपेश त्याचा पाठलाग करू लागला. पण तो दूरदूर पर्यंत कुठेच दिसत नव्हता. दिपेशने राजुला बाहेर बोलवून सगळा प्रकार सांगितला. त्यावर आपण जास्त घेतली आहे, अस बोलून राजूने तो विषय तिथेच थांबवला. दोघेही आत गेल्यावर जेवणाची सुरुवात झाली. जेवण झाल्यावर आपण एक गेम खेळूया असं सुनीलने सुचवलं. त्यात सुद्धा खूप चर्चा झाल्यावर चिठ्ठ्यांचा गेम खेळूया अस ठरलं. प्रत्येकाच नाव त्या चिठ्ठीत लिहिल असेल, ज्याच नाव त्या चिठ्ठीत येईल त्याने काहीतरी करून दाखवायचं. सगळ आटपून झाल्यावर गेम चालू झाला. गेम चांगलाच रंगला होता. आता राखीची पाळी होती चिठ्ठी उचलायची. तिने चिठ्ठी काढली आणि नाव वाचताच पुन्हा ओरडली. आणि चिठ्ठी मोनाच्या दिशेने फेकली. मोनाने चिठ्ठी उचलून दिपेशला दिली. दिपेशने चिठ्ठी मधील नाव वाचल ते होत - नार्वेकर.
- भाग ३
हे नाव कस आल असावं कोणालाच काही कळेना आणि नार्वेकर कोण हे देखील कोणाला माहीत नव्हते. त्यावर खूप चर्चा झाल्यावर सगळ्यांनी झोपायच अस ठरवलं. मुली आतमध्ये तर मुल बाहेर असे झोपणार होते. सगळे झोपायला गेले खरे पण घडलेल्या प्रकारामुळे कोणालाच झोप येत नव्हती. सगळ्यांच्या डोक्यात हा एकच विचार चालू होता नार्वेकर कोण आणि त्यांच नाव चिठ्ठीत आल कस? विचारांच्या धुंदीत रात्र कशी गेली ते कळलच नाही. कालच्या चिठ्ठीच्या प्रकरणानंतर सगळ्यांना विचार करून ताण आला होता. म्हणून सर्वांनी एकत्र बाहेर फिरायला जायचे असे ठरवले. सगळे एकत्र जंगलात गेले. सगळेजण एकत्र असताना मोना मात्र मागे घुटमळत होती. तिला हाका मारल्यावर ती पुन्हा सगळ्यांमध्ये मिसळली. बराच वेळ जंगलात फेर फटका मारल्यावर पुन्हा सगळे वाड्याच्या दिशेने निघाले. चालताना अचानक छातीत दुखू लागल्याने मोना खाली कोसळली. सगळे तिला सावरत वाड्यामध्ये घेऊन गेले.मोनाला एका ठिकाणी विश्रांती साठी झोपू दिले. बाकी सगळे एकत्र बाहेर बसून राहिले. एकत्रित सर्व गोष्टींचा गोंधळ उडाल्याने तिला थकवा आला असावा असा अंदाज व्यक्त केला गेला.राखीचे हावभाव सतत बदलत होते. कधी ती चांगली तर कधी विचारात बुडालेली. राखी जितकी समीरशी बोलत होती तितकी ती बाकी कोणाशी बोलत नव्हती. राखी आणि समीर आता एकत्र वेळ घालवू लागले होते. सतत त्यांच्या गप्पा चालू होत्या. समीर आणि राखीची ही जवळीक अक्षयला मात्र मान्य नव्हती .संध्याकाळ झाल्यानंतर राखी आणि समीर कंटाळून समुद्रावर जाऊ पाहत होते.अक्षयने तशी समीर ला ताकीद सुद्धा दिली की राखी पासून दूर राहा.पण आपली बहीणच ह्यात सामील आहे हे जाणून अक्षय आता समीरशी भांडू लागला होता . अक्षयच आणि समीरच भांडण झाल्यावर चिन्मय आणि अनय अक्षयला समजवायच म्हणून बाहेर गेले. चिन्मय म्हणाला, "अरे अक्षय तू का एवढा चिडतो? आपण समीरला फारसं ओळखत नाही, पण गेले दोन दिवस मी समीरला बघतो आहे, तो खूप चांगला मुलगा आहे राखीची काळजी घेईल तो".
अक्षय शांतपणे ऐकून घेत होता. राखी आणि समीर सोबत बाकीच्यांनीही समुद्रावर जायचे ठरवले.पण मोनाला बर वाटत नसल्याने तिला एकटीला ठेवून कोणी जायला तयार नव्हते. शेवटी राखी आणि समीर दोघंच समुद्रावर गेले.दोघेही अक्षय बद्दल बोलत होते .बहुधा घरात मोठा असल्याने त्याच वागणं साहजिकच होत अस दोघांनाही वाटल. किनार्यावर फिरता फिरता अचानक समीरला मागून कोणीतरी धक्का दिला. तो थेट पाण्यात जाऊन पडला. त्याला कोणी मागून धरल्यासारखं वाटलं. त्याला बाहेर निघायला जमत नव्हते . तो पाण्यात आता गुदमरू लागला. हे दृश्य पाहून तर राखी पार घाबरून गेली. कसतरी तिने समीर ला त्यातून बाहेर काढले आणि थेट ते वाड्यात निघून आले.घडलेल्या प्रसंगाने दोघेही पार घाबरून गेले होते.हे सर्व सांगत बसलो तर अक्षयचा राग अजून वाढेल म्हणून समीर आणि राखी गप्पच राहिले. आता मात्र रात्र होऊ लागली होती.सर्व लवकरच झोपून जाऊ अस जुली म्हणाली.थोडसं खाऊन झाल्यावर सगळे अंथरुणात पडून राहिले.झोप कोणालाही येत नव्हती. प्रत्येक जण विचारात मग्न होता. मध्यरात्री अचानक काहीसा आवाज आल्याने पुन्हा सर्वत्र एक भीती निर्माण झाली.उठून पाहिलं तर मोना तिच्या जागेवर नव्हती.सगळीकडे शोधा शोध सुरू झाली. आतल्या खोलीत कोणीतरी आहे असं दिसल्यावर सर्व आत गेले.मोना वर दोरखंड लावत होती.आधी ती काय करणार आहे हे कोणालाच समजले नाही.पण जश्या तिच्या कृती पुढे गेल्या तसे सर्व आत धावत गेले.मोना स्वतःला गळफास लावून घेऊ पाहत होती.तिला राजू आणि दिपेश ने खाली उतरवून ठेवत, अस काय करतेस म्हणून विचारले.त्यावर तिने हे स्वतः केल नाही अस म्हणाली.सर्व आकस्मित असून कोणीतरी घडवून आणलंय अस ती सांगत होती.झालेल्या गोष्टींची धास्ती घेऊन पुन्हा सगळे झोपायला गेले.सकाळ होताच सगळेजण एकत्र बाहेर जमा झाले. कालचा प्रकार अजूनही समजण्या पलीकडे होता. आणि त्या विचारांच ओझ सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत.
दिपेश सगळ्यांना समजवत होता,"कालचा प्रकार झाला तो विसरून जा, त्याचा जास्त विचार नका करू." सगळ्या मुलींना फ्रेश होऊन या सांगत दिपेशने त्यांना आत पाठवलं. कारण दिपेशला मुलांबरोबर बोलायचं होतं. दिपेश म्हणाला, "हे कालच प्रकरण नक्की काय आहे ते काही समजत नाही आहे पण ते आपल्याला शोधायचं आहे. मुलींना उगाच ह्या सगळ्यात नको घेऊया. आपणच ग्रुप करूया." सगळे फक्त हो म्हणाले. कोणी काही बोलत नाही बघून दिपेश पुढे म्हणाला,"मुलींना आपण एकट ठेऊ शकत नाही. पण त्यांना याबद्दल काही कळता कामा नये. राजू तू आणि अक्षय एकत्र रहा, मी आणि मोना एकत्र असू, समीर, राखी आणि चिन्मय एक ग्रुप करा, जूलि अनय सुनील तुमचा एक ग्रुप. इथून पुढे काय होणार ह्याचा कोणालाच अंदाज लागत नव्हता. ठरल्या प्रमाणे सर्वजण तयार होऊन केअर टेकरची वाट बघत होते. केअर टेकर नाश्ता घेऊन येईल, अंदाजे नाश्ता करायची वेळ उलटून चालली होती तरी केअर टेकर अजून नाष्टा घेऊन आला नव्हता. तेवढ्यात आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला, सगळे धावत आत गेले. जूली २-३ बॅग सोबत पडली होती. तिला कोणीतरी धक्का देऊन खाली पाडलं अस ती म्हणत होती. या गोंधळात केअर टेकर नाश्ता घेऊन कधी आला हे काही समजलंच नाही. दिपेश आणि अक्षय त्याच्या मागे धावले पण बाहेर येताच पुन्हा तो अदृश्य झाला. नक्की काय चाललंय हे समजण्या पलीकडे होत सगळं. आत जाऊन जूलीला तू नक्की काय केलंस अस विचारल. त्यावर ती म्हणाली आपल्या बॅग या कपाटात टाकत होती.तर कोणी तरी मागून मला धक्का दिला आणि मी पडले अस ती म्हणाली. नक्कीच ह्या केअर टेकरच काहीतरी गूढ आहे हे इतक्यात सारे समजून गेले होते. न राहून दिपेशने आता मुलींना सुद्धा यामध्ये सामील करून घ्यायचं ठरवलं. मुलांबरोबर केलेला प्लॅन त्याने मुलींना सांगितला. पुढे काय करायचं याचा विचार सगळे करत होते. दिपेशने सगळ्यात आधी या वाड्याची आणि केअर टेकरची माहिती काढूया अस सांगितलं. तसे राजू आणि अक्षय गावात जाऊन परत कोणी भेटेल का बघायला निघाले. दिपेश आणि मोना जंगलात जाऊन काही सापडत का बघणार होते. जूली, अनय, सुनील वाड्याच्या आजूबाजूला काही सापडत का बघणार होते. समीर, राखी, चिन्मय पूर्ण वाडा पिंजून काढणार होते. तातडीने सगळे कामाला लागले. आपल्या समोर नेमके काय आहे याची कोणाला कल्पना देखील नव्हती. राजू आणि अक्षय बराच अंतर गेले तरी त्यांना कोणी भेटलच नाही. तरी त्यांचे प्रयत्न चालू होते. इथे वाड्यात मात्र समीरच्या हाती एक पुरावा लागला. त्याला वाड्यातून एक फोटो सापडला. फोटो मध्ये एक व्यक्ती ओळखीची होती ती म्हणजे केअर टेकर-लेले.
त्याने तो फोटो राखीला दाखवला. फोटो बघताच तिच्या पाया खालची जमीनच सरकली. त्या फोटो मध्ये तिचे वडील सुद्धा होते. समीरने तिला धीर दिला आणि अजून काही सापडत का बघू असं म्हणाला. बराच वेळाची पायपीट केल्यावर राजू आणि अक्षयला एक माणूस दिसला. तो ह्या दोघांना पाहून म्हणाला," कोण तुम्ही? कोणाला शोधताय?"
राजूने लगेचच त्या माणसाला तो वाडा आणि केअर टेकर बद्दल विचारून टाकल. वाड्याचे नाव ऐकताच त्या माणसाने विचारलं," तिथे तुम्ही काय करताय? तो वाडा तर बरीच वर्ष बंद आहे. तो वाडा ह्या गावचे उद्योगपती आणि माजी सरपंच अण्णा साहेब नार्वेकर यांचा आहे. एका अपघातामध्ये त्यांचं आणि कुटुंबाचं निधन झालं. मोहन लेले त्या घरचा नोकर होता. पण साहेब गेल्यावर तो एकटाच राहू लागला. गावात अस म्हणतात की तो जादूटोणा देखील करतो, त्या भीतीने तिथल्या सर्व लोकांनी ती जागा खाली केली. आता तिथे गावातल कोणी फिरकत सुद्धा नाही. हे सर्व ऐकून राजू आणि अक्षय पूर्ण घाबरले. वाड्यातून लवकर निघायला हवं असं ठरवून ते तिथून निघाले. जूली, अनय आणि सुनील वाड्याच्या मागे असलेल्या वस्तू पाहतच बसले. तिथे काही छोट्या बाहुल्या आणि तीन मडकी होती. त्यात कोण तीन लोकांच्या अस्थी असाव्यात. वाड्यात चिन्मयला काही पत्रे मिळाली. त्याने ती राखीला आणि समीरला दाखवली.सगळी पत्रे राखी आणि अक्षयच्या घरूनच आली होती.आता हे नव्याने समोर आलेलं आणखीन एक कोड होत. तिथे मोना आणि दिपेश फिरून फिरून थकले होते. अचानक त्यांच लक्ष थोड दूरवरच्या एका झाडाकडे गेलं . तिथे त्यांना केअर टेकर दिसला. तो कोणाशी तरी बोलत होता पण त्याच्या समोर कोणीच नव्हतं. सगळे पुन्हा वाड्याकडे जायला निघाले. वाड्यावर पोहचताच प्रत्येकाने मिळाली माहिती सांगितली. मिळालेल्या माहितीवरून सगळ्या गोष्टींचा आराखडा काढला असता घडणाऱ्या घटनामागे कोणी दुसरं नसून केअर टेकर आहे याची खात्री पटली होती. आता पुढे काय करायचं हा प्रश्न होताच. अक्षयने काही करून हा नक्की काय प्रकार आहे हे शोधून काढायचा अस सांगितलं. पण राखी, दिपेश, राजू यांचा मात्र तिथून निघण्यातच शहाणपणा आहे अस मत ठेवलं. मोनानेपण यांच्या नकारात सुर मिळवून आपण लवकरच ही जागा सोडून निघून जाऊया आणि ती पत्रे बघता राखी आणि अक्षयने तर इथे थांबुच नये असं सांगितलं. अक्षयचा नाईलाज होता. सगळ्यांबरोबर त्याला जाणं भाग होतं. सगळेजण आवरून तयार होते. वाड्यातून बाहेर पडणार तोच वाड्याचा दरवाजा बाहेरून बंद झाला. घडलेल्या प्रकाराने सगळे अजूनच घाबरून गेले. कदाचित नियतीने ते तिथून जाऊ नये असच ठरवलं होत. सर्व हॉलमध्येच शांत बसून होते. एक वेगळ्या प्रकारची दहशत जणू पसरली होती. तेवढ्यात केअर टेकर आतल्या खोलीतून बाहेर येऊन त्यांच्या समोर उभा राहिला. जर दरवाजा बाहेरून बंद आहे तर हा आत आलाच कसा. त्याला पाहताच अक्षय रागात त्याच्या अंगावर धाऊन गेला. पण तोच लांब भिरकावला गेला. ह्या म्हाताऱ्या मध्ये एवढी ताकद कशी काय आहे. तो दिसत जरी म्हातारा असला तरी त्याचे हावभाव काही वेगळेच होते. अक्षयने रागातच त्याला तू नक्की कोण आहेस विचारलं? आमच्या मागे का लागला आहे? आणि आमच्या आई वडिलांचा काय संबंध आहे या सगळ्यांशी? ही पत्र आमच्या घरून आली ती का?" सगळेजण आपले आपले प्रश्न विचारू लागले. त्यावर तो केअर टेकर काही बोलतच नव्हता, इथे अक्षयचा पारा वाढत चालला होता.सगळं ऐकून झाल्यावर तो केअर टेकर परत खोलीत निघून गेला. सगळे परत गप्प झाले. आता पुढे काय करायचा हा प्रश्न होताच. न राहून परत काही मार्ग मिळतो आहे का ते शोधू लागले. केअर टेकर ज्या खोलीत गेला तिथे अक्षयपण गेला पण तिथे केअर टेकर नव्हता. अक्षयने ती खोली नीट पाहिली आणि काही मिळतं का बघितल, त्यामध्ये एक डायरी त्याच्या हाती लागली. त्या डायरी मध्ये त्या घर मालकाचा इतिहास लिहिला होता. त्यामध्ये अक्षयच्या आई वडिलांच्या नावाचा उल्लेख देखील होता. अक्षयने डायरी वाचायला सुरू केली, तोच त्याच्या मागे कोणी आहे असा भास झाला, मागे कोणीच नव्हतं पण. त्याने परत डायरी वाचायला सुरुवात केली. मागून आवाज आला," तुला ज्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत ती माझ्याकडे आहेत. त्या डायरी मध्ये काही नाही मिळणार तुला. "
अक्षय थोडा बिथरला घाबरतच त्याने मागे पाहिलं. त्याच्या लगतच एक उंच, बांधाने मजबूत, डोळ्यामध्ये राग आणि चेहऱ्यावर क्रूर असे हास्य. त्याला बघताच अक्षयला घाम फुटला. आता हा काय नवीन प्रकार त्याला काहीच कळत नव्हतं. तिथे सगळेजण बाहेर पडायचा मार्ग शोधत होते. राखीला पण कोणी तरी आपला पाठलाग करते आहे, आपल्यावर नजर ठेवली आहे याचा भास झाला. अक्षय समोर असलेल्या माणसाने त्याला रोखत बघत जणू धमकीच दिली तुला इथून वाचता येत असेल तर बघ. पण तुझा आणि तुझ्या बहिणीचा जीव घेतल्या शिवाय तुझी आणि माझी यातून सुटका नाही असे म्हणतच ती व्यक्ती अदृश्य झाली. आजच्या जगात भूत वगैरे असतात यावर बुध्दी विश्वास ठेवायला तयार न्हवती. पण जे समोर घडतंय त्याला अमान्य पण करू शकत नव्हते . हळुहळु रात्र होत होती आणि वाड्यातली भीती अजून वाढत जात होती. घडलेला प्रकार बाहेर सांगितला तर अजून त्यांची भीती वाढली असती म्हणून अक्षयने बाहेर काही न सांगायचा विचार केला. तो बाहेर जाऊन सगळ्यांमध्ये बसला. जेवायच्या वेळेवर केअर टेकर बरोबर जेवण घेऊन आला. त्याच्याकडचं जेवायची कोणाचीच इच्छा नव्हती, पण भुकेला काही इलाज नव्हता. अक्षयने मात्र आता ती डायरी वाचायचं ठरवलं. कदाचित त्यामधूनच काही बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. त्यात लिहल्या संदर्भानुसार त्या वाड्याच्या मालकाला अक्षयच्या वडिलांनी मारलं होतं. अक्षयचे वडील शहरातले मोठे बिल्डर होते. त्यांनी हा वाडा पाहिल्यापासून त्यांना तो घेऊन डेव्हलप कराचा होता. अस केल्यास त्यांचा शहराबरोबरच गावाकडे पण बिझनेस वाढणार होता. तो वाडा मिळावा म्हणून ते काहीही करायला तयार होते. पण हे त्या वाड्याच्या मालकांना पसंत नव्हते. त्यांनी या गोष्टीसाठी खूप विरोध केला. पण ते अक्षयच्या वडिलांसमोर टिकले नाही. अक्षयच्या वडिलांनी वाड्याच्या मालकाचा अपघात घडवून आणला आणि त्यातच त्या वाड्याचे मालक आणि त्यांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला. अक्षयला मात्र विश्वास बसत नव्हता. नक्की समोर जे काही चालल आहे ते खर आहे का? त्याने राखीला बोलवून तिला सुद्धा ते वाचायला सांगितलं. राखी आणि अक्षय हे वाड्याच्या आतील एका खोलीत त्या डायरी चे रहस्य थांबवू पाहत होते. इतक्यात त्या खोलीचा दरवाजा बंद झाला. आता ना हे बाहेर जाऊ शकत होते ना बाहेरचे कोणी आत येऊ शकत होते. राखी आणि अक्षय सोडून बाहेर सुद्धा भीती होती की नक्की आत काय चालल असेल. ह्या दोघांना बाहेर कस काढू शकू ह्याचा विचार ते करत होते. आत अंधाऱ्या खोलीत मात्र वीज चमकावी तस काही झाल मगाशी पाहिलेलं व्यक्तिमत्व समोर पुन्हा उभ ठाकलं. सुडाच्या भावनेने ते पुढे म्हणाले," तुमच्या आई वडिलांना तर आम्ही कधीच संपवलय, तुम्हाला सुद्धा तेव्हाच संपवलं असतं. पण तुम्हाला मुद्दाम तेव्हा नाही मारलं. माझ्या सोबत तेव्हा माझ्या मुलीला सुद्धा जीव गमवावा लागला होता. तिच लग्न ठरलं होत. बिन लग्नाच्या माझ्या मुलीचा पण जीव घेतलाय म्हणून तुम्हाला सुद्धा मोठं होऊ दिलं. आता तुमचा जीव घेऊनच संपेल सगळं."
इतकं बोलून त्या शक्तीने अक्षयचा गळा धरला. संपूर्ण ताकदीने अक्षय स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्या असामान्य शक्ती समोर त्याच काही चालत नव्हतं. राखी आपल्या भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडली. तर तिचा सुद्धा गळा धरला गेला. ती शक्ती इतकी होती की ती सहज दोघांना एकत्र मारू पाहत होती. अक्षय आणि राखी जीव वाचवण्यासाठी तडफड करू लागले क्षणात आपण हे जग सोडू हे आता त्यांना पटल होत. मृत्यू त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता. बाहेर ह्या दोघांचे आवाज ऐकून सगळे अस्वस्थ होत होते. आत काय चालल असेल ह्याचा बाहेरच्यांना काहीच अंदाज नव्हता. अक्षय आणि राखी जीवाची भीक मागत होते, पण त्याने काहीच होणार नव्हत. जगण्याची फक्त धडपड सुरू होती. इतक्यात आणखी एक आवाज त्यांच्या कानी पडला. एक त्यांच्याच वयाची सुंदर मुलगी उभी होती. ती सुंदर मुलगी म्हणजे नार्वेकर यांची एकुलती एक मुलगी- मंजिरी. एकाच वास्तव्य इतकं भयानक होत त्यात आणखी एक पाहून अक्षय आणि राखी चे भीतीने आता शरीर थंड पडू लागले. आता मंजिरी काही बोलू पाहत होती,"बाबा जाऊ देत सोडा त्यांना. ह्यांना नका मारू." पण अतिशय रागात असलेले नार्वेकर काही ऐकायला तयार नव्हते. त्यांना ह्यांचा जीव घ्यायचा होता.
वडिलांचा एवढा रागावलेला चेहरा तिला पाहवत नव्हता. वडिलांना उद्देशून मंजिरी पुन्हा म्हणाली," अहो बाबा काय करताय? सोडा त्यांना. ते आपले गुन्हेगार नाहीत. आपले गुन्हेगार ह्यांचे आई वडील होते. ज्यांना त्यांची शिक्षा मिळाली. आता ह्या निरपराध दोघांना मारून आपल्याला काय मिळणार?" मुलीचे शब्द अण्णा साहेबांना स्पर्शून गेले. त्यांनी अक्षय आणि राखीला सोडले. घाबरत एकेमेकांचा हात पकडून आत ते दोघे उभे राहिले. ते दोघं सावरत होते तेवढ्यात अजून एक आवाजाने त्यांच लक्ष वेधलं गेलं,"ऐका ह्यातून मुक्त व्हायचं आता आम्हाला. आमच अस्तित्व संपवून टाका ह्या वाड्यातून."
हा तिसरा आवाज वाड्याच्या मालकीण बाई अण्णा साहेबांच्या पत्नी उषा देवी होत्या. अचानक त्या रूमचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडला बघताच बाहेरचे सगळे घाबरतच आत त्या खोलीत गेले. त्या दोघांची अवस्था बघवेनाशी होती. सगळ्यांनी त्यांना बाहेर आणलं. ते दोघे जरा सावरले. अक्षयला लगेच बाईंनी सांगितलेली सूचना लक्षात आली. तसाच तो सगळ्यांना घेऊन अस्थी विसर्जन करायला समुद्रावर गेला. पुन्हा वाड्यात येऊन सर्व पत्र आणि संबंधित गोष्टी जाळून टाकल्या. पुन्हा वाडा पाहण्याची आता कोणाची हिम्मत होत नव्हती. सगळे आपल सामान घेऊन गाडीकडे निघाले. तोच केअर टेकर सुद्धा वाडा बंद करून कुठे तरी निघाला होता. त्याला थांबवून राखीने तो कुठे चालला आहे विचारलं?
तेव्हा तो म्हणाला,"हा वाडा आणि ह्याच्या रहस्याने मला आजवर रोखल होत. माझं काम झालंय आता पुन्हा मला हा अनुभव नको." इतकं बोलून तो दूर जंगलात एकटाच चालत गेला. पुन्हा सगळे त्या वाड्याकडे न पाहताच परतीच्या प्रवासाला निघाले.
****समाप्त****