Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

ऊन सावली

ऊन सावली

4 mins
245


'शेखर'....!

'एस'...;

'अरे 'एस' काय म्हणतोस ओळखलं नाही का मला मी'.....!

'अरै ...वसुधा'...?

'थँक्स ओळखल तरी'...

'का नाही ओळखणार आपण एकाच कॉलेजातले वर्गमित्र आहोत,बापरे पण किती दिवसांनी भेटतोय आपण'.

'दिवसांनीं नाही,वर्षांनी म्हण'.

'हो,खरं आहे पण किती बदल झालाय गं तुझ्यात!'.

'अरे जगं बदलले,माणस् बदललीत मग माझ्यात नाही का बदल होणार.... शरीराने मी बदलले पण मनानाने मात्र अजुनही तशीच आहे बरं जशी पुर्वी होती'...

'हो ते दिसतय'

'हो म्हणजे कॉलेज पुर्ण झाल्यानंतर हि आपली पहीलीच भेट म्हणावी,दिवस कसे निघुन गेलेत काही कळालेच नाही'

'हो खरं आहे,कॉलेज पुर्ण झाल्यानंतर,कोण कुठे गेलेत काहीच कुणाला माहित नाही,कुणाशी संपर्कही नाही,तू मात्र योगायोगाने भेटलीस'.

'हो अगदी खरं आहे आणि माणूस संसाराला लागलाना की मग सार काही विसरून जातो',

'खरतर ही आपली ग्रेट भेट म्हणावी'

'हो खरचं नाहीतरी तुझ्यासारखी ग्रेट माणस भेटतात तरी कुठे'

'ए चलं काहीतरीच हं तस काहीच नाही'

'गंमत केली रे,बरं तु ईथे काय करतोस मुबंईत'

'मी सायन कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे'

'अरे वा...ग्रेट'...

'आणि तू'!....

'मी पण ईथेचं असते दादरला,बरं कसं चाललय तुझं'

'अं...चाललय मस्त'...

'मस्त म्हणजे,लग्न बिग्न केल की नाही?'

'केलयं गं पण....'

'आता आणखी पण कसला आला मधेच, प्राध्यापक म्हटल्यावर सगळकाही सुखासीनच असेलना!,'

'आहे गं वसुधा,दिवस सुखाचेच आहेत पण सुख नाही'

'मला काही कळालं नाही'....

'अं....कसं आहे वसुधा की दुःख पद, प्रतिष्ठा,पैसा,गरीब श्रीमंती अस काहीच बघतं नाही.दुःख एखाद्यावर एव्हढ प्रेम करतं की त्याचा पिच्छाच सोडत नाही.म्हणून तेव्हापासून ते आजतागायत दुःखाचा पाठलाग माझ्या मागे सुरूच आहे',

 'तो कसा काय',

'आता घरची परिस्थिती बेताची होती हे तुला चांगलचं माहीतं होतं पण बाबा मला कुठलही काम करू देत नव्हते कारण मी खुप शिकाव मोठ्यापदाची नोकरी मिळावी असं त्यांच स्वप्न होतं म्हणून त्यांनी केलेल्या कष्टाच्या मेहनतीच्या जोरावर मी शिकलो पदव्युत्तर झालो पण जेव्हा मला त्यांची गरज होती तेव्हा ते मला सोडून गेलेत,आणि घरची जबाबदारी माझ्यावर आली.मग मी ट्युशन घेवून पोटापाण्याची समस्या सोडवली पण सर्व पैसे आईच्या आजारपणातचं खर्च व्हायचे.हा असा वेदना यातना संघर्षाचा जीवघेणा प्रवास तिन वर्ष चालला त्यांनतर मग मला सायन कॉलेजला नोकरी मिळाली.आणि सुख,समाधान,आनंदाने घरात प्रवेश केला.सुखाचे दिवस सुरु झाले, आई आजारपणातून मुक्त झाली,स्वःताचं घरही बांधले सर्वगोष्टी मनासारख घडतं असताना घराला घरपण देण्यासाठी सुन हवी म्हणून नात्यातल्याच मुलीशी लग्न करून ती लक्ष्मी पावलानी घरात आली आणि माझ्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू झाला.सुख काय असतं हे बायको आल्यावर कळालं तिच्यामुळे सुखाचा आनंद घेता येत होता, अशातच निशाने आई होण्याची गोडं बातमी दिली मग काय घरात तर आनंदाचा सडाच पडतं होता ना,आई आजी होण्याचे तर निशा आई होण्याच्या स्वप्नात रंगुन गेल्यात,घरात नविन पाहूना येतोय म्हटल्यावर दुःखाला कुठेच जागा नव्हती.पण देवाला आमचं सुख बघवलं गेल नाही.निशाला सातवा महिना होता.आई आणि निशा दोघही रूटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जात असताना एका रिक्षावाल्याने निशाला मागून धडक दिली आणि......बाळ....'

'अरै...य देवा'.....

'सारकाही संपल वसुधा सर्वकाही हरवून बसलो मी,सुखाच्या झाडावरचा आनंद जळून खाक झाला'

'त्या.....नंतर पुन्हा....'

'नाही.कारण पोटाला गंभीर दुखापत झाल्यामुळे निशा पुन्हा कधीच आई होणार नव्हती.हा आघात घेवून महिन्याभरात आईनेही या जगाचा निरोप घेतला

आणि आम्ही कायमचे पोरके झालो.कसतरी या अपघातातून बाहेर पडून स्थिरस्थावर झालो बऱ्याच दिवसांनी दोघांच्याही गालावर हसु फुलले.अशात सकाळी आंघोळीला जाताना बाथरूममध्ये निशाचा पाय घसरला ती डोक्यावरचं पडली,खुपं खुपं ईलाज केलेत गं,पण नाही बरा करू शकलो' तिचा वेडेपणा'

'वेडेपणा'?

'हो........वेडेपणाच मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला'

'मग तिची देखभाल घरातली काम'

'मीचं करतो'

'आणि कॉलेजला गेल्यावर तिचं'....

'अं....तिला घरात बंद करून जावं लागतं.तशी ती वेडी जरी असली तरी शहाणी आहे ती एकटीच घरात बाहुली सोबत खेळते,गाणे म्हणते घरातली किरकोळ आवरसावरही करुन घेते, आणि माझी वाट बघते'

'तरिही तिच्या देखभालीसाठी एखादी मावशी हवीचं'

'वेड्यासोबत कोणी राहील का बरं वसुधा'

'खरचं शेखर तुझ्या सहनशीलतेला साष्टांग नमस्कार करते मी खुप सहन करतोय रे तू'

'तरीही मी खुश आहे,आणि निशासाठी जगतोयं,खुप प्रेम करतो तिच्यावर,आम्हाला एकमेकांशिवाय आहे तरी कोण,अगं दिवस कसेही असले ना तरी संसार आमचा सुखात चाललाय आणि हो दुःखानेही त्याची तीव्रता आता कमी केली...चलं जावू दे तुझं काय!काय करतेस'तू सुध्दा लग्न केल की नाही...'

'हं...लग्न झालं मोडलही आणि आता काहीचं राहील नाही...कितीतरी अपघात पचवून मी जगतेय'

'म्हणजे...'

'माझ्या मनातल सांगुका तुला खरतर मला तुझ्याशीच लग्न करायच होत'

'चल काहीही सांगु नकोस'

'नाही खर बोलतेय मी कारण मला तुझ्यातला आत्मविश्वास आणि काहीतरी करण्याची जिद्द पाहून मी तुझ्या प्रेमात पडले आणि आईबाबांना बोलुनही दाखवले,परंतू तुझ्याबद्दल व तुझी परिस्थिती कळल्यावर बाबांनी माझ्या मनाविरुद्ध लग्न केले,काही नाही दोनवर्षातच नरकयातना भोगुन मी विभक्ती झाले'

'का'

'कारण त्याला माझ्या वडिलांची ईस्टेट त्याच्या नावावर करून हवी होती आणि या असल्या मनस्तापामुळे आई जास्त दिवस राहीली नाही'

'दुसरं....'

'केल होतं तो तर चांगला सरकारी नौकरीला होता पण दारूमुळे वाया गेला हातात जे सापडेल त्याने मारायचा शेवटी काय दारूनेच त्याला मारला आणि त्याच्या नावाचा कुंकू पुसुन जगतेय,एक नकार किती महागात पडला शेखर तुला माहीत आहे.त्यावेळेस तुला मागणी घातली असती तर आज अशी ही वेळ आली नसती,आणि बाबाही मरताना असचं म्हणालेत,माझही सगळच गेल रे आता एकटीच जगतेय. नातेवाईकांनीही साथ सोडली आता पाळणा घर,वृद्धाश्रम चालवतेय.जगायच तरी कोणासाठी.आयुष्य म्हणजे ऊन सावलीच ना'

'डोन्ट माईंड, काळजी करू नकोस तुझी हरकत नसेल तर मी शोधेन तुझ्यासाठी एखादी चांगल स्थळ'

'तू का नाही....!'

'नाही,तुझ्या मनातल सांगायला तू खुप उशीर केलाय तू आधी मला सांगितलं असतं तर काहीतरी मार्ग काढला असता पण'....

'सगळा नशिबाचा खेळ समजायचा'

'काही गोष्टी आपल्याही हातात असतात'

'मगं आता का नाही'

'नाही वसुधा नाही,तू चुकीचा विचार करू नकोस,मी माझ्या आयुष्यात सुखात आहे. आणि माझ निशावर खुप प्रेम आहे.माझ आयुष्य फक्त तिचं आहे ती कशीही असली तरी माझा आधार आहे आणि शेवटपर्यंत राहील'

'मग काय तू असचं आयुष्य काढणार आहेस का'?

'हो,शेवटपर्यंत मी तिच्याचसाठी जगणार आहे. कारण माझ्या सुख दुःखात तिचा खुप मोठा सहभाग आहे. माझ्या प्रेत्येक वेदना,यातना, संघर्षाची ती साक्षीदार आहे माझ्या सोबत तिनेही दुःख भोगलेत पण कधीच तक्रार कली नाही. तिच दुःखही तिने मला कधी सांगीतले नाही.अश्रुंची फुले केलीत तिने तेव्हा तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीही नाही.म्हणून मला तिच्यासाठीच जगायचं आहे आणि तिच्यासोबत राहुन जगणार आहे.निघायचं आपणं'

'पुन्हा कधी भेटशील'

'कधीच नाही, कसं आहे वसुधा एकदाची जर भेटण्याची सवय लागली ना की मनं बदलायला वेळ लागत नाही.आणि मनं बदलली की मग आपला माणूस दूर होतो आणि अस काही होईल अस तू करू नकोस,तू तुझं आयुष्य जगं मला माझं आयुष्य जगू दे.जातो मी'

'येतो म्हण'...

'नाही'...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational