उठ तरुणा
उठ तरुणा
उठ तरुणा , उठ रे घे खड्ग हाती आता
हाक मारते तुजला भारतमाता
आक्रोश तिचा तुला का रे ऐकू येईना
मातेसाठी लढायला तू सिद्ध का होईना
नको बसूच शांत बघ काय घडत आहे
तुझ्या भारतमातेवर अन्याय किती होत आहे
नको राहूस निद्रिस्त ढाल कर तुझ्या छातीची
तुझ्याच हाती आहे अब्रू भारतमातेची
भिनू दे राष्ट्रभक्ती रक्ताच्या प्रत्येक थेंबात
कर गर्जना घुमू दे आवाज तुझा गगनात
