उद्या
उद्या
"अरे सोहम उठ किती झोपतोस सकाळचे १० वाजले "
"उठतो ग "
"काय उठतोस तुच्या सारख्या मुलाने नोकरी करायची सोडून लोळत पडलास काहीस तुला कसं वाटत नाही उद्याची काहीच कशी चिंता नाही
"आई मी सांगितले तुला मला कमी पगारात नोकरी नाही करायची आणि तू माझी चिंता करू नकोस उद्या उद्या करत राहू नकोस मला मोठ्या पगाराची नोकरी मिळेल मग पहा "
"हो हो त्या दिवसाची वाट पाहते बाबा पहा तुझे केवढे मेहनत करतात त्याच्या वयाचा तरी विचार कर "
हे नेहमी चित्र देसाई च्या घरी दिसे. सोहम हा मीना देसाई आणि मोहन चा मोठा मुलगा दोन वर्ष कॉलेज संपून झाली पण भरघोस पगाराच्या नोकरीच्या प्रतीक्षेत तो होता. त्याची मुलगी कॉलेज मध्ये शिकत असे
असेच दिवस निघत होते सोहम घरात फक्त लोळत पडत असे आणि पैसे आई कडे मागीत त्यावरून मग घरात बराच कलह सुरु होई पण सोहम कसले हि काम करण्यास तयार नव्हता आई वडील म्हूणन आपले कर्तव्य पार पाडण्या साठी त्यांनी सोहम समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण अट होती कसले हि काम करून आपला संसार सांभाळ्याच्या पण सोहम घरात राहून राहून एव्हडा आळशी झाला त्याने तो प्रस्ताव फेटाळला आणि सगळीकडे सोहम च्या आळशी पणाची बातमी पसरल्याने स्थळ सुद्धा त्याला येत नसे घ्यात देसाई कटुंब असमर्थ ठरले. त्यांनी आपल्या मुलीचे बऱ्यापैकी स्थळ पाहून लग्न करून दिले तरीही सोहम उद्याच्या प्रतीक्षेत होता त्याचे वडील रिटायर्ड झाले आता तर त्याचे घर त्याच्या पेन्शन वर चालू लागले पण सोहम ला मात्र ह्या गोष्टी ची खंत कधी वाटलीच नाही मस्त पैकी लोळत पडणे हे च त्याचे जीवन झाले आई बाबा त्याला खूप समजावीत.. पण सोहम आपला कित्ता सोडण्यास तयार नव्हता त्याच्या अश्या विचित्र वागण्यापुढे देसाई दाम्पत्य हतबल झाले
काही झाले तरी आई बाबा चे मन त्याच्या उद्याच्या भविष्य च्या चिंतेत गडून जात असे तर सोहम घरात राहून राहून एव्हडा आळशी झाला होता कि त्याची विचार करण्याची क्षमता सुद्धा मंदावली होती एका घर कोंबड्या प्रमाणे त्याचे जीवन झाले होते तरी हि उद्या मला चांगली भरघोस पगाराची नोकरी मिळेल हि आशा होती उद्या उद्याच्या आशेनेच सोहम च्या आयुष्याची राख रांगोळी केली
