Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win
Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win

Anuja Dhariya-Sheth

Drama Others

4.5  

Anuja Dhariya-Sheth

Drama Others

तूच माझी सावीत्री...१

तूच माझी सावीत्री...१

2 mins
316


आरती आणि आनंद यांचे आत्ताच लग्न झाले, सगळे मस्त सुरू होते. आरती फारच प्रेमळ आणि लाघवी होती...घरातील सगळ्यांना तिने लवकरच आपलेसे करून घेतले.


तीला सतत काहीतरी करण्याची आवड...सतत कशात तरी स्वतःला गुंतवून ठेवायची..तिला स्वस्थ बसायला आवडत नसे..

ते जिथे रहात होते त्या सोसायटी मध्ये सुद्धा सर्व कार्यक्रमांमध्ये ती आवडीने भाग घेत असे..हळू हळू त्यांच्या सोसायटी मध्ये सुद्धा सगळ्यांची लाडकी झाली ती..लहान मुलांची आवडती काकू, सासूबाईंच्या

मैत्रिणींमध्ये आवडती सून,तिच्या नणंदेच्या मित्र परिवार मध्ये सगळ्यांची लाडकी वहिनी...


प्रत्येक नवीन कार्यक्रम करताना लहान मोठे सर्वच जण तिच्याकडे नवीन कल्पना घ्यायला येतं असत आणि ती सुद्धा हसत हसत सगळ्यांना मदत करायची...


सगळे कसे छान सुरू होते..पण म्हणतात ना चांगले कोणाला बघवत नाही असेच काहीस झाले...


सुरवातीला सगळं छान होते पण नंतर आनंद सतत बिज़ी असायचा त्याच्या ऑफिस वर्क मध्ये खूप सुट्ट्या झाल्या होत्या लग्न आणि त्यानंतर लगेच गुड न्युज त्यात जुळे त्यामुळे आधी खूप दिवस तें सोबत होते...पण आता त्या दोघांना अजिबात वेळ मिळत नव्हता...आरती ने कधीच तक्रार केली नाही उलट तिने स्वताला ह्या सगळ्यात गुंतवून घेतले...दोन्ही मुले,घर आणि सोसायटी मध्ये सर्वांच मन अगदी छान सांभाळत होती.

मनात तिला खूप वाटे, आनंद सोबत एकांतात काही क्षण घालवावे, पण आनंदने तिला आधीच सांगितले होते आता २-३ वर्ष काही बोलू नको..त्यामुळे ती आहे त्यात आनंदी कसे राहता येईल तें बघत होती...

असाच एक रविवार आला, आनंद ने सरप्राईज म्हणून मूवी चे तिकीट आणले होते आणि त्याने तिला अगदी ऐन वेळी सांगितलं त्याला वाटले की तिला खूप आनंद होईल...पण ती फ़क्त एवढंच बोलली, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं?? अहो आज वट पोर्णिमा पूजा करायची आहे, मुहूर्त पण नेमका दुपार नंतर आहे, कसे जाणार आपण मूवी ला?? सोसायटी मध्ये जाऊन पूजेची तयारी करायची आहे...आणि आपले दोन पिल्लू आहेत आता त्याचं पण आवरायला हवे, अहो आता लगेच जमत नाही बाहेर पडायला पहिल्या सारखे, जबाबदारी वाढलीये...


आनंद ला खूप राग आला, तो वाटेल तें बोलला तिला सगळ्यांसाठी तुला वेळ आहे माझ्या साठी नाही फ़क्त...आता मोठी तिथे जाऊन सावीत्री चा दिखावा करशील..त्या सावीत्री सारखी वागून दाखव म्हणजे झाले...

सण होता म्हणून आरती काहीच बोलली नाही, खूप रडली आणि पूजेला गेली...


आनंदचं वागणे मात्र दिवसेंदिवस विचित्र होत चालले होते..सारखं काही तरी कारण काढून तिच्याशी वाद घालत असे...


पण तिने कधीही त्या बाबतीत कोणाला बोलुन दाखवले नाही..पण एक दिवस सोसायटी मधली सर्व युवा म्हणजे त्याच्या बहिणीचे मित्र मैत्रिणी घरी आले होते, आरती चा वाढदिवस होता म्हणून तिला सरप्राईज द्यायला...आणि आनंद सुद्धा....बघतो तर काय घरी हा गोंधळ...


बघूया पुढच्या भागात...

आनंद कसा रिऍक्ट होतो सगळ्याना बघून??


पुढचे भाग वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका...


शुद्धलेखनाच्या चुकांसाठी माफी...

लाइक आणि कंमेंट करत रहा...

साहीत्य चोरी हा गुन्हा आहे.लेख शेअर करायचा असेल तर नावासहीत करण्यास माझी हरकत नाही...


Rate this content
Log in