तुला कळणार नाही.......
तुला कळणार नाही.......
तो आज खूप दिवसानी खरतर वर्षानी पार्क मध्ये आला होता.... सगळ तसच होत बेंचेस, झाड, गवत ....
(चला, मला सोडून इथे काहीही बदललेल नाही...)
त्याने वायरलेस हेड फोन कानावर लावला...आणि जॉगिंग करायला सुरुवात केली...
Energetic songs ऐकत ऐकत त्याचा वेग पण वाढत होता... आणि त्याची पावलं अचानक मंद झाली....
(इथे आम्ही नेहमी यायचो... तिला आवडायच इथे सावलीत बसुन आकाशाकडे बघत पानांतून येणार लकलकणार ऊन पाहायला....)
आणि त्याची नजर वरुन खाली फिरली .....
(तिचा विचार आला आणि क्षणासाठी वाटल की ती बसली आहे तिथे....किती वर्ष अजून ती अशीच स्पष्ट आठवत राहील?..)
त्याने पुन्हा धावायला सुरुवात केली... आता त्याच लक्ष पुन्हा गाण्याकडे आल....
( And I feel so lonely,
yeahThere's a better place than thisEmptiness
And I am so lonely, yeahThere's a better place than thisEmptiness,
yeah, yeah, yeah, yeah
तुने मेरे जानाकभी नहीं जाना
इश्क़ मेरा, दर्द मेरा, हाय
तुने मेरे जानाकभी नहीं जाना
इश्क़ मेरा, दर्द मेरा
आशिक़ तेरा भीड़ में खोया रहता हैजाने जहां
पूछो तो इतना कहता है.......
(अरे, ही गाणी अजून आहेत? डिलीट केली पाहिजेत.... काय हे रडक गाण ..... )
ते गाण कितीही त्याच्या विचारांशी जुळत असल तरी त्याने ते बदलायच ठरवल....कुठल गाण लावू विचार करत शेवटी त्याने बंदच करून टाकल म्युझिक..... आणि असाच चालत राहिला...त्याला स्वतःला समजत होत आपली पावलं पुढे सरकत नाही आहेत...तरी तो पाय खेचत होता... शेवटी मन विरुद्ध शरीर यात मन जिंकल.... तो परत मागे फिरला... त्या जागेकडे....
ती खरच तिथे होती....
(मी यासाठीच परत आलो का?काय करू...परत आलो तरी तिच्या समोर जायची हिम्मत होत नाही.... ती काय बोलेल?कस वागेल .... राहू दे...इथेच थांबतो... ती जोपर्यंत आहे तोपर्यंत बघत राहतो.... त्याचा तिला ही त्रास नाही होणार....)
तो विचारात गुंग होऊन बघत होताच की तिची नजर त्याच्या वर पडली... तिने कानातून एअर फोन काढले...आणि हात वर करून हलवला....
(अरे यार, काय आता... )
तो आताच त्याच लक्ष तिच्याकडे गेलय अस दाखवत तिच्याकडे गेला...
तो- अरे तू इथे?मी बघितलच नाही.... बरं झाल तू हात दाखवला..
ती- हो मी इथे येते अधेमध्ये... बरं वाटत इथे बसुन शांत गाणी ऐकायला...
तो- तुला पण सवय लागली वाटत...गाणी ऐकत रहायची
(आठवत तुला? माझ्या मोबाईल वर एकाच एअरफोनने गाणी ऐकत चालत रहायचो आपण... तू खूप बोलायची पण मला कळायच नाही काय बोलू... मग मी तुला जबरदस्ती एअर फोन द्यायचो....)
ती- अरे सवय नाही, बस आता शांततेची गरज वाटते....
तो - हो बरोब्बर...
(तुझ लग्न झाल का? विचारू का... नको अस कस विचारणार..)
मागे आपल्या ग्रुप मधल्या जाड्या ...त्याच लग्न झाल ना...
ती - मी गेले होते.... छान आहे त्याची बायको... सगळे तुझी आठवण काढत होते..म्हणाले तू बदललाय. .. तू म्हणायचा ना नेहमी ... आपली जेव्हा लग्न होतील दंगा करू आपण...आणि तूच नव्हता
तो - बिझनेस मीटिंग होती...नाही जमल तेव्हा..
(आधी बेफिकीर होतो मी खूप... पण त्यामुळे तू लांब जाशील वाटल नव्हत ....म्हणून आता कामात झोकून दिल मी स्वतःला...)
ती- पण खूप दिवस झाले ना ... आपण भेटलो त्याला...
तो - दिवस? वर्ष म्हण...
(मी कसे काढले दिवस, माझ मला माहिती.... )
ती- मग कुठे गायब होतास इतकी वर्ष?
तो- आपण भेटलो... मग थोड्याच दिवसात मी बाबांच्या बिझनेस मध्ये मदत करायला लागलो... मग काय बिझनेस ट्रीप मध्येच बिझी असायचो...
(तुला आठवतं..मला काय घरी काही म्हणाले तरी फरक पडला नसता ...माझ्यासाठी तूच होतीस....पण तू म्हणाली होतीस तुझ्यासाठी तुझे आईबाबा जास्त महत्वाचे आहेत....ते नाही म्हणाले तर मग मी पण विरोधात जाणार नाही... म्हणून तर मी पण घरी सांगायच ठरवल... पण दुसर्या दिवशी तू काही अनपेक्षित वागलीस...)
ती- अरे लक्ष कुठे आहे? मी म्हटल बरं आहेस बाबांच्या बिझनेस मध्ये लक्ष द्यायला लागलास..
तो - हो आता त्यांना तेवढी दगदग झेपत नाही... मीच बघतो हल्ली सगळ..
ती - तू हुशार होतासच तसा.....एक मिनिट हा मला फोन आलाय.....
तो - (आणि तू रोखठोक... जे वाटेल ते बोलणारी... मग त्या दिवशी तू अस का म्हणालीस.... एकतर तुझ्या घरून नाही म्हणाले असावेत किंवा तू खरच बोलली असशील...)
त्याला तो दिवस आठवला....
ती खूप शांत होती... पण तिच्या डोळ्यात दुःख, निराशा अजिबात नव्हती... तो घरी भांडून आला होता बाबांशी पण ठरवून आला होता की आता बस मी हिच्याशी लग्न करणार... आणि तिला मिठी मारून हे सांगणार त्या आधीच ती म्हणाली...
सॉरी आपण थांबूया....
त्याने न समजून विचारलं होत....
तुझेही आईबाबा नाही म्हणाले का?
तिने त्याच्याकडे बघितल तेव्हा तिच्या डोळ्यात विश्वास होता की खरेपणा... त्याला कळल नाही पण काही तरी अस कारण होत ज्यामुळे ती ठाम होती....
माझे आईबाबा... मी त्यांना सांगितल नाही...कारण मी खूप विचार केला....तू माझ्यासाठी भांडण करशील घरी ..येशील ...मग पुढे काय? आपण काय तडजोड करत आयुष्य काढायच......
त्याला माहीत होत... पैशांसाठी प्रेम करणारी मुलगी ही नाही..म्हणूनच इतक्या मुली मागे असतानाही तो तिच्या प्रेमात पडला होता....
त्याने पुढे काही विचारलं नाही... तो तिथून निघून आला होता ... तिथून लगेच निघाला तरी मन अजुन तिथेच थांबल होत... तिला विचारायला की.. का???
ती- हा आले मी .... मग काय बोलत होतो आपण...
तो- काही नाही.... तू बोल आईबाबा कसे आहेत तुझे...
ती- मस्त.....
तो - ( बरं आहे... अशी मुलगी आहे तर ते आनंदातच असतील... पण तरी तू त्यांच्यासाठी मला सोडून गेलीस हे तुझ्या तोंडून ऐकल असत ना... तरी मी स्वतःला समजावल असत....) मग बाकी काय करतेस सध्या ...
ती -नोकरी .... ऑफिस वर्क आणि त्यात आता आईबाबा लग्नासाठी मागे लागलेत...
तो- अच्छा...मग कधी करणार लग्न ....
ती- हा काय त्यासाठीच कॉल होता.... बाबांनी एका मुलाला माझा नंबर दिला होता... कालच म्हणाले फोन येईल म्हणून ....
तो- तेच ना हे आईबाबा म्हणजे ना.... माझ्या पण बाबांनी .. एक फॅमिली फ्रेंडची मुलगी बघितली... मग जबरदस्ती डेट फिक्स केली... आता तशी मैत्री झाली आमची... हुशार आहे ती.... मला मदत पण करते बिझनेस प्रॉब्लेम्स मध्ये...
ती- अशीच जोडी पाहिजे... मग तुझ लग्न तर ठरल्यात जमा आहे...
तो - तस नाही...(मी काय केल हे? उगाच हा विषय काढला... ती पण का बोलली लग्नाच ....जाऊ दे)
ती- मग आता काय बिझनेस ,लग्न यात आम्हाला विसरणार मग....
तो-( शक्य होईल?तुला विसरण ....)काही पण हा...मी कस विसरेन..
तो खोट हसला.. शक्य तेवढ खर वाटेल अस ...
ती - चालेल मग ... भेटू सगळे एकदा....
तो- हो... मला सांगा कधी प्लॅन कराल तेव्हा...bye....
(मला तुला सांगायच आहे... मला कस वाटत... मी अजून नव्हतो विसरलो तुला....पण तुला नाही कळणार मला कस वाटत...बर झाल तू भेटली... आता मी विसरेन.... आताचा तुझा हसरा चेहरा बघून स्वतःला समजावुन सांगेन की... तू ठीक आहेस माझ्याशिवाय पण..)
तो मागे फिरला...कानावर हेडफोन्स लावले....
(आँखों में आँसू लेके होठों से मुस्कुराए
आँखों में आँसू लेके होठों से मुस्कुराए
हम जैसे जी रहे है कोई जीके तो बताए
हम जैसे जी रहे है कोई जीके तो बताए....)
तिचा फोन वाजला...
ती- hello, आई हा बोल.....हो मी नाही म्हटल त्या मुलाला.... का म्हणजे...मला वेळ हवाय अजून...त्याच काय मध्येच ...त्याच्या मुळे नाही......
आई...आता तो भेटला होता....नाही मी काही नाही सांगितल.... हो, मी ठीक आहे ... घरी येतेय...
तिने इतका वेळ थोपवलेले अश्रू बाहेर पडले.....ती मागे फिरली.... त्याला जाताना बघत राहिली....
( तू त्या दिवशी पण असाच गेला होतास... बरं झाल..नाहीतर माझ्या तोंडून सगळ बाहेर पडल असत... तुझ्या खांद्यावर डोक ठेवून रडताना.... माझ्या आईबाबाना आधीच माहित होत आपल्याबद्दल..मी कधीच लपवल नव्हत... तेव्हाच सांगायच होत मला... पण तू घरी सांगशील म्हणालास तेव्हा वाटल, एक दिवस तर आहे...थांबू...पण तुझ्या आईने मला त्या आधीच कॉल केला आणि भेटायला बोलावल...म्हणाल्या.. तू आणि तुझे बाबा दोघेही सारखे आहात... हुशार आणि स्वतःच्या विचारावर ठाम... तुझ्या घरच्यांनी ही मुलगी खूप आधीच बघून ठेवली होती... जर तू घरी भांडून आला असतास तर आपण खूप छान आयुष्य जगलो असतो... तेवढा विश्वास होता मला... पण तुझी आई रडत होती... तिला तुम्ही दोघे महत्वाचे होतात... आणि तू एकुलता एक मुलगा आहेस त्यांचा.. त्यांनी कोणाकडे बघितल असत..ना तू हट्ट सोडला असतास ना तुझ्या बाबांनी... बघ आता सगळ छान आहे..तू बरा आहेस... तुला सामान्य आयुष्य जगाव लागल नाही... तुझ्या घरचे खुश आहेत... ती मुलगी... ती तुला बिझनेस मध्ये मदत पण करते मी नसते करू शकले... आणि मुळात तू आईबाबांचा विचार पण करायला लागलास..... माझ काय... मी थोडा अजून वेळ घेईन... बस रोज तुला बघायला यायचे शेवटी आज तू दिसला...बर वाटल तुला अस बघून.... सगळ्या मित्रांनी ठरवलेल्या प्लॅन्स मध्ये मी जायचे..तुला बघायला पण तू कधी आला नाहीस.... आणि तुझी काय चूक म्हणा... मी अस वागले तर..आणि तुला काम पण होती ..... मला प्रत्येक वेळा स्थळ येत... मी ठरवते पुढे जायच ... पण जमत नाही... हे तुला सांगायच होत पण जाऊ दे .... आता जे चालू आहे ते ठीक आहे ....तुला सांगु शकले नसते मी हे... पण तू नजरेच्या टप्प्यात आहेस तोपर्यंत मनात का होईना बोलते.... नाहीतर कोणी उरणार नाही मला हे सांगायला...)
तिने चेहरा पुसला... आणि गळ्यातले एअर फोन तिच्या बोटात अडकले...
(ही पण तुझीच आठवण...मी किती वेडी आहे.... या आठवणी तुझ्याच आणि तुलाच विसरायला या वापरतेय मी ...)
तिने एअर फोन लावले...
(तुमने तो केह दिया हाँ बयान भी कर ना पाये
तुमने तो केह दिया हम बयान भी कर ना पाये
हम जैसे जी रहे है कोई जीके तो बताए
हम जैसे जी रहे है कोई जीके तो बताए
आँखों में आँसू लेके होठों से मुस्कुराए
आँखों में आँसू लेके होठों से मुस्कुराए
हम जैसे जी रहे है कोई जीके तो बताए
हम जैसे जी रहे है कोई जीके तो बताए....)
आणि ते दोघे वेगळया दिशांना निघाले .....कायम साठी...

