Mugdha Burte

Drama Others

2  

Mugdha Burte

Drama Others

फक्त 20!!

फक्त 20!!

7 mins
196


२०- ३० अस वय ज्यात तुम्ही खूप temporary लोकांना भेटता ."


हम्म,खर आहे हल्ली इंस्टाग्रामला पण कळायला लागलं माझं मन.

काय झालं ग सकाळी सकाळी ,स्वतः शीच बडबडत बसलीय .

आई, काय सांगू तुला ? तुला कळेल का माझं बोलणं?

मला काय माठ समजली आहे का? आई आहे मी तुझी मला जेवढं तुझ कळत कोणाला कळत नसेल ,समजल.

आई ,तुझा जमाना वेगळा होता आता ना अशी माणसं आहेत की त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही आपण.आमचं थोड वेगळं आहे ,सगळ कठीण होत जातं मोठं होता होता....

आम्ही पण मोठे झालो आमच्या काळात पण काही सगळी देवमाणसं नव्हती.

अग पण तेव्हा तुझे कोणी मित्र मैत्रिणी तुला फसवून गेले का??

तुझे कुठले मित्र की मैत्रीण तुला फसवून गेलेत! मला तर तूच काय ती चापटर आहेस असं वाटायचं. तुला पण कोणी गुंडाळल वाटत.

आई , तू ना जाऊ दे .म्हणून तुला सांगत नव्हते .उगाच जखमेवर मीठ चोळ तू माझ्या ...

अग तू सांग तरी काय ....तुमचं काय ते ...लफड काय आहे ते!!

हा, very funny ..पण माझा ना हसायचा मूड नाही आज..मी काय म्हणते ...मूड ठीक करायला पिझ्झा मागवू का?

हे लाटणं बघितल का ? एवढा वेळ पोळ्या बनवतेय आणि पिझ्झा कसला मागवतेस.

अरे प्लीज ना .तुझा आवडता मागवू डबल चीज ....आ प्लीज ना..

मग दुपारी तुझ्या नावच्या दोन पोळ्या खाव्या लागतील.

चालेल ,चालेल.मागवू ना मग....लव यू आई. तू ना खरंच सॉलिड आहेस.

बस, मस्का मारण बास . माझ्या अकाउंटवरूनच पे करणार असशील ना .कर .

अरे ,कस समजत तुला एवढं बरोबर!!

बरं ते सोड मला सांग ,तुझी सॅड स्टोरी आता सांगणार की पिझ्झा पोटात घालता घालता?

हमम मी अजून विचार करतेय तुला सांगू की नको.

बरं मग राहू दे .मला पण वेळ नाही ,ऑफिसची पण काम आहेत मला.

अरे यार, तु तर चिडली ,मी तर मज्जा करत होते ग.आता मी पूर्ण दिवस घरीच बसणार आणि तुलाच तर सांगणार ना ...पिझ्झा येऊ दे मग सांगते.

बरं.मी आवरते इथे ,थोड झाडून घे हॉल मध्ये सकाळपासून तंगड्या वर करून बसली आहेस तिथे.तू आणि तुझा बाबा मला एवढा त्रास होतो ना, तुमच्या आळशीपणाचा.

हो हो. आता लेक्चर नको मी चकाचक झाडून काढते हॉल.

( थोड्या वेळाने)

आई ऽऽऽ आपला पिझ्झा आलाऽऽऽ

अगं हो कळल मला , उगाच आरडाओरड कशाला?आता २० वर्षांची घोडी झाली पण वेडेपणा काही जात नाही.

मी घोडी असेन तर माझी फॅमिलीपण घोड्यांचीच ना!!!

झाल ? काही वाटत नाही उलट बोलताना !लग्न झाल की काय करशील काय माहित!!

तरी मी विचार करतच होते , घोड्यावरून तू माझ्या लग्नाला कशी काय पोचली नाही अजून.. ते सोड ना ,चल पिझ्झा कधीपासून वाट बघतोय.

हा!!! किती दिवसांनी खातोय ना आपण! पण आता बाहेरच खाण थोड कमीच केलं पाहिजे. बरं अजून सांगितल नाही तू काय झालं ते?

आई , पिझ्झा कसा मनापासून चवीने खाल्ला पाहिजे

अरे हा, पिझ्झा वरुन आठवलं तुझी बेस्टी, बरेच दिवसात आली नाही घरी. नाहीतर नेहमी पिझ्झा आणि ती आले घरी की दिवसभर काही तुमचं बघायला नको. काय ते दिवसभर बोलतच राहायचं आणि खातच राहायचं .पण गोड आहे हो ईशा .

झालं तुझ आता खा तरी.

काय झालय नेहमी ईशाच नावं घेतल की लगेच फोन करून बोलवायची घाई करतेस तिला.आज चिडण्यासारख काय झालंय?

जाऊ दे ना ,तुला सांगितल तरी नाही समजणार .

ह्म्म ,बर मग मी ईशाला विचारते .

ए नाही हा ,तू माझी आई आहेस ना मग तू माझ्या दुश्मनशी नाही बोलायचं .

दुष्मन? आता एवढ्या वर्षांपासूनची बेस्टी दुश्मन कधी झाली?

हे बघ आई तूच सांग आम्ही लहानपणी पासून भांडलो तरी रात्री पर्यंत बिना सॉरी बोलता पण एकत्र व्हायचो .कधी बोलायची गरजच पडली नाही . आता कॉलेजमध्ये पण एकत्र असायचो मग ग्रुप बनले तरीही आम्ही दोघी अजून घट्ट मैत्रिणी झालो. हो की नाही?

हो मग माशी शिंकली कुठे?

तू जर माझी मैत्रीण असतीस एकदम जिवाभावाची आणि तुला आणि मला एकच गोष्ट आवडली असती पण ती गोष्ट एकच आहे तर तू काय केलं असतंस ?

सोप आहे ,मी विचार केला असता की ती गोष्ट कोणाला जास्त गरजेची आहे किंवा कोणाला ती गोष्ट अगदी मनापासून हवी आहे मला की माझ्या मैत्रिणीला ?

आणि जर मला त्या गोष्टींपेक्षा माझी मैत्री जास्त महत्वाची आहे तर मात्र मी ती गोष्ट सोडून दिली असती.

हा तेच . आणि जर दोघींना ही मैत्री महत्वाची आहे तर दोघीही ती वस्तू सोडून देतील आणि आधी खुश राहतील . बरोबर ना?

हो बरोबर .

पण माझी मैत्रीण तशी नाही वागली याचा अर्थ काय की ती माझ्यावर आधी सारखं प्रेम नाही करत .

चूक !

काय चूक आता ?

हे बघ, तू वस्तूबद्दल बोलते आहेस आणि विचार मात्र माणसाचा करते आहेस .वस्तू कोण घेणार हे आपण दोघात ठरवू शकतो पण जर त्या वस्तूच्या जागी माणूस आहे तर त्यालाही स्वतःच्या भावना असतात आणि त्यालाही मत असतात.

एक मिनिट, आई तुला आधीपासून माहीत होत ?

तू निहारला लाईक करायला लागली होतीस हे मला तुझ्या बोलण्यातून कळल होत. पण तू हे ईशाला स्पष्ट नाही सांगितल होतं हो ना ?

आई, मी आणि ईशा दोघी निहारच्या फ्रेंडस एकत्रच झालो आणि मी खूप वेळा बोललेही होते की निहार खूप चांगला आहे .

हो बाळा ,आणि त्यामुळेच जेव्हा निहारने ईशाला विचारलं तेव्हा तिला कळल नाही की तुला कस सांगायचं? तिला त्यावेळी निहार आणि तू दोघंही महत्वाचे होतात पण तुझा विचार करून ती निहारला काही दिवस थांबायला बोलली .आणि हे तिने मला सांगितल होत .

मग तू मला का नाही सांगितल?

कारण तुमची मैत्री आतापर्यंत विश्वासावर टिकली होती , मला ईशाने सांगितल की तिला तुला दुखवायचं नाही आहे त्यामुळे वेळ आली की ती तुला सांगेल आणि मी ही विचार केला की तू मैत्रीला महत्व देशील. आणि समजून घेशील.निहार आणि ईशा एकमेकांना साजेसे आहेत असं तुला वाटतं नाही का?

मला बस माझ्या मैत्रिणीने मला का नाही सांगितली एवढी मोठी गोष्ट याचा राग आहे!!

खरंच ? तू स्वतः एकदा विचार कर राग येणं साहजिक आहे पण तुला ही पण भीती आहे की ईशा आधीसारखी नाही राहणार आणि तुला एम्बॅरस पण वाटतय कारण तू निहारबद्दल खूप वेळा ईशाला नकळत पणे बोललीस आता तुला जेव्हा कळल की ते दोघं एकत्र आहेत तेव्हा तुला अवघडल्यासारखं वाटत हो ना?

आई !! मी काय करू मला काही समजत नाही . मी जेवढं हे समजून घ्यायला बघतेय तेवढं मलाच कसतरी वाटतं . तुला माहिती आहे मी ईशाशी भांडले आणि तिला म्हटलं की हा निहार जेव्हापासून आलाय तेव्हापासून तू लपवायला लागलीस ना माझ्यापासून गोष्टी . एकतर मी किंवा तो एकच काहीतरी ठरव.दुसरा कुठला पण मुलगा चालेल पण हा नाही. मी खूप बोलले तिला आणि मला ही कळल नाही . मग मला तिच्याशी बोलायलाही लाज वाटायला लागली ग ......त्या भांडणात राग तर संपला पण हे गिल्ट राहील मनात. तिला कस वाटेल मी तिच्याबद्दल कसा विचार करते.. आणि तिच्या लाईफ चे डिसिजन ठरवण्याचा तसा मला अधिकार नाही आहे ....

हे बघ बाळा , तू आधी रडू नको... ईशा, तुला समजून घेईल. यालाच तर मैत्री म्हणतात ,एकाने रागवल की दुसऱ्याने समजूत काढायची असते. पण आपली चूक आहे तर आपण ती मान्य करणं आणि सॉरी म्हणणं पण गरजेचं आहे.आणि या गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत पण तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे . तू मगाशी म्हटलं तसच यात तुला भरपूर माणसं भेटतील पण तुला विश्वास कोणावर ठेवायचा हे विचार करून ठरवल पाहिजे.

आई, तू कसं ग माझ्याशी एवढ्या मोकळेपणी बोलतेस .काही घरात असा नाही होत .मी ऐकलं काही मैत्रिणींकडून. हे विषय सहज बोलले जात नाहीत.

काय असतं ना , की लोक म्हणतात जनरेशन गॅप असते पालक आणि मुलांत. म्हणून मुल कॉलेजच्या काळात मित्रमैत्रिणींमध्ये जास्त रमतात, त्यांचं ऐकतात. पण आपण एखाद्याशी बोलताना तो फक्त आपल्याला समजून घेतोय की आपण सांगितलेलं, अजून काही लोकांपर्यंत पोचवतो हे पाहिलं पाहिजे. म्हणून मी ठरवल की प्रॉब्लेम्स, काही गोष्टी माझ्याशी शेअर करायच्या की नाही ह्याच तुला चॉइस असेलच पण जर तुला काही सांगावस वाटल तर तुला कधी माझ्यासमोर मन मोकळं करायला विचार करावा लागला नाही पाहिजे.

कूल आहेस यार आई तू !!

मग सॉरीच काय ?

हा, मी करते तिला कॉल पण कस सुरुवात करू तेच समजत नाही .

ती तुला कॉल करून करून थकली . काल रडत होती गीता मावशीचा कॉल आलेला काल . काही झालय का म्हणून.

अरे बापरे ! ती तर ना एकदम वेडी आहे . थांब घरी जाते आणि भेटते तिला.

हो आरामात ये . छान गप्पा मारा आणि पुन्हा पाहिल्यासारखं गळ्यात गळे घालून घरी घेऊन ये तिला . रात्री जेवण इथेच करू दे तसं गीताला सांगते फोन करून.

आई, खरंच लव यू यार .किती गोड आहेस तू!!कसली भारी प्लॅनिंग करून मला फसवलस ना पण !!

बस चल हा नाटकीपणा , सांभाळून जा.

         या वयात ,सगळ्या घरात अशा गोष्टी घडतच राहतील पण मजा तेव्हाच येईल जेव्हा अशी मैत्री कुटुंबातल्या सदस्यांमध्येही होईल. जग बदलतंय आणि नातीही !!!मोठ्यांनी लहानांना आपल्या अनुभवातून शिकवण्याची आणि लहानांनी मोठ्यांना समजून घेण्याची आणि विश्वासाने त्यांना आपली मतं , विचार सांगण्याची गरज आहे. शिस्त महत्वाची आहेच पण आजच्या जगात खूप वेळा या शिस्तीमुळे काही जण आपली मतं व्यक्त करू शकत नाहीत तर काही वेळा मुलांना इतकं स्वातंत्र्य मिळत की चुकीच्या गोष्टी करतानाही अपराधी वाटत नाही. याचा समतोल राखण आपली जबाबदारी आहे. मग तुम्ही लहान असाल किंवा मोठे!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama