Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Ashvini Duragkar

Tragedy


5.0  

Ashvini Duragkar

Tragedy


ठेवा अनमोल नत्यांचा....

ठेवा अनमोल नत्यांचा....

4 mins 838 4 mins 838

चौदावीचा कार्यक्रम आटोपला सगळी मंडळी स्वगावी परतली. घर रिकाम झाल होत. पुष्पाबाई आपल्या खोलीत गेल्या. तब्बल १५ दिवसांन पासन त्यांच्या डोळयाला डोळा नव्हता. अश्रुचा ओघही अजुन कमी झाला नव्हता. झोप काही येईना म्हनूण त्यांनी कपाट उघडल त्यात रमेशरावांचे कपडे ठेवले होते. बघुन पुष्पाबाई ढसाढसा रडु लागल्या. त्यांच नेहमीच आवडीच शर्ट त्यांनी हाती घेतल. हाती घेताच त्यातन एक कागद पडला... ते होत रमेशरावांच पत्र त्यांच्या पुष्पुला.


माझी पुष्पु...

मला माहिती होत मी गेल्यानंतर तु हे तुझ आवडत शर्ट नक्की हाती घेशील म्हनूण मी हे पत्र यातच ठेवायच ठरवल. उगाच रडुन रडुन त्रागा करू नकोस जेव्हा होतो तेव्हा तर नुसतीच भांड भांड भांडायची माझ्याशी आणि मी ही माझ्या चिडचिडया स्वभावामुळे क़धीच तुझ्याशी नीट वागलो नाही शिवाय तुलाही मी माझ्या सारखच करुन घेतल. ते दोन क्षण प्रेमाचे आपले जगायचेच राहुन गेलेत. आता तू विचार करत असशील जीवंतपणी तर या माणसाने कधी नाही लिहील पत्र आणि आता मरणोपरांत कशाला लिहीलय. पण आता लिहावस वाटल आणि त्याची नितांत गरजही होती. असो... मेन मुद्दयावर येतो.... आपण केलेल्या वाईट कृत्यांचा माझा भरणा तर झालाय पण तुझी गत माझ्यासारखी व्हायला नकोच. म्हणून हा खटाटोप रचलाय. 

जरा विचार कर, आपण किती वाईट वागलो ग आपल्या सुनेशी आणि तिने त्याच्या मोबदल्यात काय दिलय आपल्या. तिने दिवसरात माझी सेवा केली. शेवटच्या क्षणी अतोनात काळजी घेतली. आपण तिला किती वाईट समजत होतो ग? नको सको ते सगळच बोलुन चुकलो तिला. तिच्या माहेरच्यांचा ही पदोपदी अपमान केला. अगदीच सगळया मर्यादा पार करुन तिला कित्येकदा वेशीवर टांगल आणि त्याची कारण ही अगदी शुल्लक होती. तुला आठवत तिने एकदा सलवार सूट घातला होता बाहेर जाताना तेव्हा आपण किती भांडलो होतो. तिच्याविषयी सोमुच्या मनात वाईट साईट भरवुन तिला मार सुद्धा पडला होता. अशी कित्येक प्रसंग घडलेत. बापरे हे सगळ आठवल की स्वतःच्याच मुसकाडात दयावीशी वाटते. जे सगळ तुझ्यासोबत घडल त्याची पुनरावृत्ति आपण तिच्यावर केली. बर हे सगळ आपण का केल असाव? कारण तिने आपल्याला आवडत तस जगाव म्हणून ? आपण बनविलेले क़ायदे क़ानून तिने मुकाट्याने पाळावे म्हणून? हो ना?... फक्त आणि फक्त आपल्या हुद्याचा जोर दाखविण्यासाठी बाक़ी काही नाही. किती लाजिरवाण्या गोष्टी होत्या त्या. मला स्वतःचीच लाज वाटायची जेव्हा ती दबक्या पायाने खोलीत यायची अन माझे पाय चेपायची. तिच्या उफानलेल्या भावना अश्रु बनुन झळकायच्या माझ्या पायांवर बरेचदा आणि नकळत माझ्या ही पापण्या अश्रुने भरायच्या. मी तर नाही तिथे आता तिची माफ़ी मागायला पण तू मात्र सावर आता स्वतःला. दोघांच्याही चुकांच प्रायश्चित कर.

कळतय ना...... तु प्लीज़ आता शाहाण्या सारखी वाग आणि हो पुन्हा एकदा बजावुन सांगतो.... सुनबाईंच्या मागे लागत जावु नकोस. मध्ये मध्ये मी तुला हे समजावुन सागण्याचा खूप प्रयत्न केला पण तुला पटल नाही. तू तुझ्या एटीतच होती. 

पण आता तिला जरा तिच्या मनाने जगु दे. आपले अट्टहास सोड. आपल मन राखण्यासाठी तिने कित्येकदा स्वतःच मन मारलय. तुझे नियम विसर आता. फालतुच्या विसंगत पद्धतींना राम राम ठोक आणि पैसे पैसे नको करूस मोकळया मनाने नातवंडांचे हट्ट पुरव. चार पैसे ख़र्च कर जे आयुष्यभर नाही केल ते सगळच कर. 

सोपवुन दे तिला सगळ आणि मोकळी हो. देव धर्म कर. घरा बाहेर निघ जरा. राहिल्य साहिल्या सगळया हौसी नौसी पुर्ण कर आणि हे बघ ते मी बांधल अन तु सजवलस ते म्हणजे आपल घर पण आता ते तिला सोपवायच आहे जीने त्या घराला घरपण दिल. मोठे स्वप्न घेवुन आली होती ती बिना माय बापाची लेक आणि आपण अलगद तुडवले तिचे स्वप्न पायाखाली. वेळ आली आहे तिच्या नवनवीन बदलांचा खुल्या मनाने स्वीकार करायची. सगळे दाग़दागिने सुपुर्द कर .तिला ही कळु दे आपण तिच्याशी जसे वागलो त्यात तिची खर तर काहीच चुकी नव्हती. आपले अट्टहास आपले विचार आपण लादले तिच्यावर आणि तिने बिचारीने ते स्वीकारले ही. आता आपली पाळी आहे. भरल्या तोंडाने कौतुक कर तिच. डोक्यावरन हात फिरवुन ऊब दे तिला मायेची. ती जशी आपले कर्त्तव्य पार पाडते एक सून म्हनूण तसच तू ही बन तिची आई सगळया कटु आठवणी विसरुन. मी आहेच तुमच्या पाठीशी सदैव सावली बनुन.... 

अग राणी...

आता आवर बाई स्वतःला....

अश्रु ठेव लपवुन... 

हृदयात सगळी नाती जपून... 

मनाच्या तळयात अविरत साठवुन... 

तूटु नको देवुस ही नात्याची गुंफन... 

मायेच्या ऊबेने टिप मोत्यांची शिंपन... 

हा अनमोल ठेवा नात्यांचा घे मनभर जगुन....


पुष्पु पत्र फाड़ून टाक फक्त माझे शब्द मनात ठेव... आणि आता रडु नकोस बयोबाई... क्यूँकि “Pushpa I Hate Tears”...


सदैव तुझाच...

रमेश


पत्र काळजाला लावुन पुष्पाबाई खळखळ रडु लागल्या. रडण्याचा आवाज ऐकुन सोमु आणि अनघा धावत खोलीत आले. पुष्पाकाकुने लगेच पत्र मागे लपविल. काकुंना रडतांनी बघुन अनघाचा ही तोल ढासळला. तिने काकुंना घट्ट मिठीत घेतल... अन काकु तिच्या मिठीत येताच आणखिण रडु लागल्या. त्यांनी तिच्या डोक्यावरन हात फिरवला अन् परत काळजाला लावला.....


——————————

लेख कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास like आणि share नक्कीच करा... आणि हो प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी मौल्यवान आहे.Rate this content
Log in

More marathi story from Ashvini Duragkar

Similar marathi story from Tragedy