sanjana Durgude

Romance

2.6  

sanjana Durgude

Romance

*तो पहिलाच क्षण आणि शेवटचा सुध्दा...💝

*तो पहिलाच क्षण आणि शेवटचा सुध्दा...💝

3 mins
118


    त्या दिवशी कॉलेजच्या कॉलीडोर मध्ये मी त्याला बोलायला गेले. त्या क्षणी मी त्याला पाहीलेना तेव्हा मला अस वाटल की, मी पहिल्यांदा कोणाला तरी पाहतीये. तेव्हा पासुन तो माझ्या आयुष्यातला आवडता दिवस...

     त्याला पाहुन मला जे जाणवले ते काहीतरी वेगळेच होते. आमच्यात ६ ते ७ फुटाचे अंतर ठेवून आम्ही बोलत उभा होतो. माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरून सरकत नव्हती, मी त्याच्याकडे एकटक पाहत होते, माझ्या पापण्या झुकवणे ही मला मान्य नव्हते, माझे पुर्ण लक्ष त्याच्याकडेच. आजुबाजूचे वातावरण तर मी विसरूनच गेले होते. हे काय होतय हे विचार करण्याची ती वेळ नव्हती. मी तर स्वतःला त्याच्या सोबत बघत होते.

    आमचे बोलून झाले आणि मग आम्ही वर्गात पेपर द्यायला गेलो. हे आमचे १२ वीचे वर्ष त्यामुळे कॉलेजच्या छोट्या-मोठा परिक्षा चालु होत्या. पेपर चालु असताना सुध्दा माझ्या डोक्यात त्याचेच विचार होते. तेवढ्यात पेपर सुटला. पण एवढ्या गर्दीत सुध्दा माझी नजर त्यालाच शोधत होती मात्र तो दिसला नाही.घरी जाताना, आज नेमक काय झाल? मी याचाच विचार करत होते.एखादया मुलाबाबतीत अस काही घडल्याचा माझा तो पहिलाच क्षण आणि शेवटचा सुध्दा...

        त्याला जेव्हा पहिल्यांदा बोलले होते ना तेव्हा फक्त ओळख होती, पण नकळत मैत्री झाली आणि आता कालच्या अनुभवानंतर तर काय होणार याचा विचार करून सुध्दा मनाला भिती वाटत होती.

         आता ऐकमेकाची सवय लागली होती. एकमेकां सोबत बोलताना वेळ कसा निघुन जायचा कळत नव्हते.त्याचा विचार करणे देखील माझ्या मनाला खुश करून जायचे.

         त्याचे लाजणे, प्रत्येक गोष्टी चुपचाप ऐकुन घेणे, राग आलातरी समजुन घेणे हे मला खुप आवडायचे. आम्ही कधी एकमेंकाना स्पष्ट बोलत नव्हतो. तसा तो शांत असायचा. आज कालतर त्याच्यासाठी काहीही करायची तयारी होती. एक दिवस तर घरी जायला ७ वाजले. त्याच्या सोबत गप्पा मारत घालवलेली ती पहिली संध्याकाळ...

          सगळे व्यवस्थित चालू होते. पण अचानक बुध्दीचे आणि मनाचे भांडण होऊ लागले. जे मनाला पटायचे ते बुध्दीला अमान्य होते आणि जे बुध्दीला पटायचे ते मनाला मान्य नव्हते. अशात मी कोणाचे ऐकावे हे मला कळत नव्हते. माझ्या मनात त्याच्या बद्दल प्रेमळ भावना होती मात्र बुध्दीला एवढ्या लवकर त्याच्या आधीन जाणे पटत नव्हते. या सगळ्यात अनेक दिवस निघून गेले. १२ वीच्या बोर्डाच्या परिक्षाही झाल्या.आता मात्र आमच्यात अंतर वाढले होते.का कॉल करावा? कशासाठी बोलावे? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण होऊ लागले आणि मग मी कॉल, मेसेज करणे टाळले.अशा परिस्थिती मध्ये त्याचा सुध्दा कॉल न येणे माझ्या मनात अनेक भ्रम निर्माण करू लागले. माझा एक एक दिवस त्याच्या आठवणित जाऊ लागला. झालेतर काहीच नव्हते मात्र बुध्दीला पडनाऱ्या प्रश्नामुळे आमच्यात दुरावा आला होता.

         मनाची अस्वस्थता आता वाढत चाली होती. शेवटी या वाढत जानाऱ्या अस्वस्थतेला कंटाळून मी त्याला कॉल केलाच.

      "फार लवकर आठवण आली" हा त्याचा टोमणा ऐकुन गालावर आलेल्या हसुची मज्जाच वेगळी होती.आता माझ्या मनाला कुठे तरी चागंले वाटत होते.त्याच्या सोबत बोलून माझ्यासाठी सोपे झाले होते ते त्याच्यावर नेहमी प्रेम करणे. मला त्याच्याकडुन कुठलीच अपेक्षा नव्हती. आता माझ्या बुध्दीचे आणि मनाचे भांडण संपले होते. मला कळाले होते की मला त्याच्यावर निस्वार्थ प्रेम झाले आहे.

       शांता शेळके म्हणतात ना,

    "संबंधाचे अर्थ

     कधीच लावू नयेत,

     त्यांचा फक्त 

     स्वीकार करावा

     संबंध तुटताना ही एक

     पर्याय आपल्या पुरता

     जपून ठेवावा हदयात.

     एखादे रखरखीत 

     वाळवंट तुडवताना,

     माथ्यावर आपल्या 

     पुरती खाजगी बरसात"

अगदी असेच होते माझे. मी त्याला माझ्या मनातले भाव अजुनही सांगितले नाही. मला आजही त्याला पाहण्याची,बोलण्याची,भेटण्याची पहिल्या सारखीच ओढ व आतुरता असते. म्हणतात ना "माणसाला मिळालेल्या गोष्टी पेक्षा न मिळालेल्या गोष्टीची किंमत जास्त असते असो...

        आता मात्र माझ्या बुद्धीला प्रश्न पडत नाही.तो माझ्या सोबत आहे हे पाहुन मनाला समाधान मिळते. मला ठाम विश्वास आहे की, जेव्हा केव्हा मी त्याला ही सगळी हकीकत सांगेल तेव्हा तो मला आनंदाने नक्कीच एक मिठी मारेल!!!


मारेल ना?Rate this content
Log in

Similar marathi story from Romance