lajwanti kute

Drama Romance

4.0  

lajwanti kute

Drama Romance

तो डॉक्टर

तो डॉक्टर

7 mins
189


मीरा अरविंद जगताप . वयवर्ष साधारण १२-१३ .एका मोठ्या बिझनेसमनची मुलगी.मीरा चे आई वडील दोघेही नेहमीच आपापल्या कामात busy असायचे.तिच्याकडे पाहायला ही त्यांच्याकडे वेळ नव्हता . लहानपणापासून ती फक्त नोकरांच्या सानिध्यातच वाढली होती.त्यांच्या घरात सगळे पुरुष नोकर होते त्यामुळे जवळच्या माणसांच प्रेम तिला कधी मिळालच नव्हत.


          मीराची final exam येणार होती.तिला खुप साऱ्या assignment पुर्ण करायच्या होत्या ति त्याच्याच तयारीत होती त्यामुळे सहाजिकच तिचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत होते.तिची आई तिला साध विचारत सुद्धा नव्हत सानिकासाठी(मीराची आई) मीराचा जन्म म्हणजे निव्वळ एक अपघात होता.मीरा म्हणजे सानिकाच्या career मधला एक अडथळा होता. घरातले नोकर मीराला जेवणासाठी विचारून जायचे पण ती assignment completion च्या मागे असल्याने आता नको ,नंतर जेवेन अस म्हणून टाळाटाळ करायची. ती मालकाची मुलगी असल्याने नोकरही जास्त आग्रह तिला करत नव्हते.


        याच कारणामुळे मुळे मीराला weaknesses आला आणि ती त्यांच्या घरातच चक्कर येऊन पडली.नेहमी प्रमाणे तिचे आई बाबा घरात नव्हते. तिच्या घरातल्या नोकरांनीच तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांच्या मालकाला म्हणजेच अरविंद सरांना कळवले तो पर्यंत डॉक्टरांनी तिला तपासल होत.


       "अशक्तपणा आहे admit करून घ्याव लागेल आणि सलाईन मधून गुल्कोज द्याव लागेल"अस डॉक्टरांनी रामुला म्हणजेच त्यांच्या घरातल्या नोकरांना सांगितले.तेव्हा त्याने "मोठे साहेब येऊन काय तो निर्णय घेतील" अस सांगितल.अरविंद रावांची वाट पाहत डॉक्टर २ तास थांबले.२ तासानंतर अरविंद आणि सानिका हॉस्पिटलमध्ये आले.अर्थातच त्यांची महत्वाची कामे आणि मिटिंग संपवूनच.


         त्यांनी मीराकडे एक नजर पाहिल आणि डॉक्टरांच्या केबिनकडे वळाले.डॉक्टरांशी बोलून त्यांनी hospital च्या formalities पुर्ण केल्या .अगदी पैश्याच्या सुद्धा .आणि रामूला मीरा पाशी थांबायला सांगून दोघेही निघून गेले.सख्खी आई आणि वडील असूनही मीरा एकटीच होती.डॉक्टरांनी तिला स्पेशल रुम मध्ये सलाईन लावायला सांगितले तेव्हा साधारण संध्याकाळचे चार वाजले असतील .


          मीरा त्या सलाईन च्या सुईला बघुनच घाबरून गेली .ती रडून गोंधळच घालु लागली.तिथल्या नर्सला हात सुद्धा लावून देत नव्हती.दोघींनी तिला पकडले आणि इंजेक्शन द्यायला तिचा हात पकडला तसे तिने डोळे घट्ट मिटून घेतले .तेवढ्यात तिच्या कपाळावर तिला मायेचा स्पर्श जाणवला.तिने हळूच डोळे उघडून पाहिले तर तिला समोर एक उंच,तरुण गोऱ्या वर्णाचा आणि घाऱ्या डोळ्यांचा डॉक्टर दिसला. तो त्या हॉस्पिटलमध्ये नवीनच वाटत होता ."Are you ok ?"खुपच अदबीच्या आणि गोड स्वरात त्याने मीराला विचारले.


        मीराने नकारार्थी मान हलवली."मला घरी जायचय मला इंजेक्शन ची भिती वाटते मला नाही थाबांयच इथे" मीरा रडतच बोलू लागली."ठिक आहे"त्याने उत्तर दिले.तसे मीरा सकट तिथे असणारे सगळे त्याच्याकडे आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले."मी तुला घरी जाऊदेतो तुला सलाईन सुद्धा लावणार नाही फक्त दोन मिनिटे माझ्याबरोबर येतेस?"त्याच्या आवाजाने भांबावलेली मीरा शांत झाली.आणि तिने त्याच्याकडे पाहून होकारार्थी मान डोलावली.


       त्याने डोळ्यानेच तिला खुणावले डॉक्टरांनी बेसिक ट्रिटमेंट दिल्यामुळे मीराला बर वाटत होत.ती त्याच्या मागे गेली.त्याने मीराला एका section मध्ये नेले तिथे सगळ्या कुपोषित मुलांना ठेवण्यात आले होते .त्यांच्या तोंडात आणि नाकात pipes होते ज्याच्या मार्फत त्या मुलांना अन्नाचा आणि oxygen चा पुरवठा होत होता.


     "मीरा तुला माहितीये या मुलांना इथे अस का ठेवलय ?"त्याने समोर बघत मीराला विचारले.मीराने त्याच्याकडे बघून नकारार्थी मान हलवली."या मुलांना लहानपणापासूनच आवश्यक ते पोषक घटक मिळालेच नाहीत.अग हॉस्पिटल म्हणजे कोणतही 5 star हॉटेल नाही की इथे राहायला आवडेल इन फॅक्ट इथे राहायला कोणालाच आवडत नाही.पण तुला इथे का थांबवत आहे याच कारण म्हणजे तुझ्या शरीरात गुल्कोज ची कमी आहे.आणि ती भरून काढण्यासाठी तुला इथे थाबंवत आहे .अग ही मुल तर महिनाभर इथे असतात.पण त्यांना बर व्हायचे आहे म्हणुनच तर ते इथे थांबले".त्याला काय बोलायचं हे मीराला कळालं ती शांतपणे तिच्या रुममध्ये निघून गेली.

 

      तोही तिच्या मागोमाग गेला .ती बेडवर जाऊन बसली.त्याने salineची arrangement केली.आणि तिचा हात पकडला तिने डोळे घट्ट मिटून घेतले तिचा हात थरथर कापत होता."मीरा" त्याच्या त्या गोड आवाजानेच भारावून गेली.तितक्यात त्याने तिच्या हाताला सलाईन ची सुईलावली सुध्दा. मीराला किंचितही वेदना जाणवली नाही किंवा दुखलं नाही इतक्या हळूवारपणे त्याने मीराला सलाईनची सुई टोचली होती.तिला व्यवस्थित बेडवर झोपवून तो तिथून निघून गेला.ती मात्र पुन्हा त्याच्याच विचारात हरवून गेली.


      मीरासोबत त्यांच्या घरातला नोकर रघु थांबला होता .रघु त्या हॉस्पिटलच्या रुममध्ये आला मीरा शांतपणे झोपली होती . रघुला मीराचे फार कौतुक वाटायचे तिच्या नशीबात आईवडील असुनही नसल्यासारखे होते तरीही तिचा कधी कोणत्या गोष्टीसाठी हट्ट नाही किंवा आक्रोश नसायचा.तिच्या एकटीच्याजगात ती नेहमीच रमायची.तेवढ्यात रघुचा फोन वाजला तसा तो विचारातून बाहेर आला त्याने पाहिलतर तर त्याच्या लहान भावाचा फोन होता.रघुच्या वडिलांना paralysis चा attack आला होता.त्याला लगेच त्याच्या गावी निघाव लागणार होत.त्याला मीराजवळ थांबण शक्य नव्हत म्हणून त्यांनी सानिकाला फोनकरून कळवल आणि जाता जाता रघूने मीराला सलाईन लावणाऱ्या डॉक्टरांना पाहिलं तो त्यांच्याजवळ गेला ."साहेब मला अर्जंट गावी जाव लागतय ,म्या बाईसाहेबांना फोन करून कळवलय तोवर आमच्या मीराताईकडे ध्यान असु द्या".अस बोलून तो तिथून तातडीने निघाला.


          इकडे सानिकाला फोन आला तेव्हा ती अर्धवट झोपेतच होती.तीला सकाळच्या फ्लाईटने दुबई ला जायचे होते .तिने विचार केला आता तशीही मीरा झोपली असेल आणि माझी फ्लाईट मिस व्हायला नको .जाऊ दे सकाळी कोणालातरी पाठवते.म्हणून तिने परत झोपून घेतल.इकडे तो डॉक्टर मीराच्या घरून अजून कोणीच कस आल नाही म्हणून विचार करत होता.


            तो त्याच्या नेहमीच्या राऊंडला आला नेहमीप्रमाणे त्याचे पेशंट चेक करत चालला होता.एकदा मीरालाही बघाव म्हणून तो तिच्या रुमकडे वळाला तर त्याचे पाय दरवाज्यातच थांबले .मीरा खुप घाबरलेली वाटत होती तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते.तिच्या बेडवरही रक्ताचे डाग पडले होते. हो, तिच्या शरिरात निसर्गाचा प्रवाह चालू झाला होता आणि तिला या गोष्टींची तसूभर सुद्धा कल्पना नव्हती.सानिकाने कधी मीरा ला जवळ घेऊन या गोष्टी सांगितल्याच नव्हत्या.घरातही पुरुष नोकरा व्यतिरिक्त दुसर कोणीही नसायच त्यामुळे मीरा या गोष्टीशी पुर्णपणे अज्ञात होती.


     त्याने दरवाजातून सगळ पाहिलं तो डॉक्टर असल्याने काय झालय त्याच्या लक्षात आल.पण मीराला कस समजावयाच हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न होता.रात्र असल्याने हॉस्पिटलमध्ये लेडिज स्टाफ नव्हता.मीराच्या घरुनही कोणी आल नव्हत.त्याला ही कमालीच टेंशन आल पण पेश्यानेच डॉक्टर असल्याने तीला मदत करण हा त्याचा धर्म होता.तो धावत खाली गेला त्याच्या bag मधून त्याचा tab घेऊन मीराच्या रुममध्ये आला मीरा त्याला पाहून आणखी णच घाबरून गेली.त्याने मीराजवळ जात तीला आवाज दिला "मीरा, please घाबरु नको.हे बघ काहीही झालेल नाहिये.एकदा ही क्लिप बघशील अस म्हणून त्याने तो tab तिच्या हातात ठेवला आणि तिथून निघून गेला.मीरानेतो video प्ले केला तर त्यात mensuration cycle बद्दलची सगळी माहिती होती.त्याची कारणे,परिणाम,त्या दिवसात घ्यायची काळजी,diet सगळ नीट सांगितलं होत .हळूहळू मीराला आपल्याला काय झालय हे लक्षात आल.तितक्यात दरवाजा वाजला तो आत आलात्याने समोरच्या wardrobe मधून मीराचे दुसरे कपडे काढले आणि तिच्या हातात त्या कपड्यांबरोबर एक sanitary pad चा box ठेवला.


     आताच video पाहिल्याने मीराला त्याच काय करायच हे कळल होत ती पटकन उठून बाथरूम मध्ये गेली .तोपर्यंत त्याने बेडवरची चादर बदलली आणि मीरासाठी कँटीन मधून ज्युस देखील मागवला.तोपर्यंत मीरा change करून बाहेर आली तिच्या चेहऱ्यावरची भिती थोडी कमी झाली होती.त्याने तिला नजरेनेच बेडवर बसायला सांगितले त्याप्रमाणे ती बसली सुद्धा .त्याने तिच्या हातात ज्युसचा ग्लास दिला आणि तिच्या पायापाशी बसला "हे बघ मीरा,घाबरण्यासारख काही कारण नाही.हे सगळ नैसर्गिक आहे ,अग प्रत्येक मुलगी या गोष्टी face करते,तु strong girl आहेस ना." मीराने होकारार्थी मान हलवली.तो गालात हसून तिथून निघाला.आणि जाता काही हव असेल तर सांग.अस सांगून गेला.


           दुसऱ्या दिवशी मीराला बर वाटत होत तिला discharge देण्यात आला.पण घरी जाताना राहूनराहून तिची नजर त्या डॉक्टर लाशोधत होती .काल त्याने तिला एवढी मदत केली होती पण तिने त्याला साध thank you सुद्धा बोलल नव्हत.पण तिच्या पदरी निराशा आली.तो मीराला कुठेच दिसला नाही. वर्षे अशीच पुढे केली त्याच्या वागण्याचा परिणाम म्हणून की काय?मीराने सुद्धा MBBS केल.तिने त्या हॉस्पिटलमध्ये त्याच्याबद्दल बऱ्याचदा चौकशी सुद्धा केली पण तिला त्याच नाव सुद्धा माहित नव्हत आणि हॉस्पिटलमधे तिला कळाल की MBBS च्या last year ट्रेनिंग साठी जे student येतात त्यापैकीच तो एक होता.म्हणजे आता तो कुठे आहे ,कसा आहे हे तीला काहीच माहिती नव्हत.मीराच्या आईवडिलांनी मीराचा विरोध असतानाही तिच लग्न ठरवल.तेही एका खुप मोठ्या नामांकित हॉस्पिटल च्या owner शी .अंकुश रमाकांत पाटिल त्याच नाव .तो एक खुप मोठा सर्जन होता.मीराला मात्र त्या डॉक्टर ला भेटल्याशिवाय कुठेच जायच नव्हते.मीराचा लग्नाला विरोध होता म्हणून सानिकाने लग्नाआधी तिची आणि अकुंश ची भेट होऊ दिली नाही.

        

  मीराला आता जगतापाच्या घरातून सुटका झाल्याशिवाय त्याचा शोध घेता येणार नाही.हे माहित होत लग्नातल्या कोणत्याही विधित आणि लग्नात देखील मीराने अंकुश कडे एकदाही पाहिलं नव्हत किंवा त्याचा फोटोसुद्धा पाहिला नव्हता. लग्नसोहळा अगदी उत्तम झाला . Reception नंतर मीरा अकुंशच्या रुममध्ये थांबून खिडकीतून बाहेर बघत होती.तितक्यात दरवाजा उघडून बंद करण्याचा आवाज आला अकुंशच असेल याचा अंदाज मीराला आला ति मागे वळून न पाहताच मला तुम्हाला काहीतरी सांगायचय अस म्हणाली .बोल तो म्हणाला. तिला तो आवाज थोडा ओळखीचा वाटला पण तिने दुर्लक्ष करून तिच म्हणण आणि खरी परिस्थिती त्याला सांगितली.तो ओरडेल चिडेल अस मिराला वाटत होत.पण अकुंश मात्र शांतपणे it's ok take your time म्हणून स्टडीमध्ये झोपायला निघून गेला.जाताना मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक गोड smile होती.


        मीरा सुद्धा खर बोलल्याने मनावरच ओझ कमी झाल म्हणून झोपी गेली.दुसऱ्या दिवशी मीरा उठून आवरुन खाली आली तर लताताईंनी(अंकुशच्या आईने) तीला आवाज देऊन बोलवून घेतल.अग अंकुश आज पहाटेच्याच फ्लाईटने दुबई ला गेला.त्याचीएक अर्जंट सर्जरी होती तु झोपली होतीस म्हणुन त्याने तुला उठवल नाही.अच्छा म्हणत मीराने मान डोलावली.तुला घर बघायच आहे का? सीमा (अंकुशची लहान बहिण)दाखवेल मी जरा मंदिरात जाऊन येते.


         मीरा सीमा सोबत घर बघू लागली .सीमाने तिला स्टडीमध्ये नेले.सीमा तिला एक एक करून अकुंशच्या सगळ्या ट्राफिज आणि awards दाखवत होती.त्यात सीमाने अंकुशच्या certificate ची फाईल तिला दाखवायला काढली.ती एक एक करून सगळे मीराला दाखवत होती तेवढ्यात मीराची नजर एका certificate वर पडली city hospital मीराने त्या certificate वरच नाव वाचल."हो अग दादा तिथे ट्रेनिंग साठी होता"सीमा सहजपणे बोलून गेली.तिचा फोन रिंग झाला वहिनी मी आलेच अस म्हणून ती तिथून निघून गेली पण इकडे मीराच्या ह्रदयाची धडधड वाढली कारण हे तेच हॉस्पिटल होते जिथे तिला चक्कर आल्यावर रामु काकांनी नेले होते.


              ती घाईतच तिथून रुममधे आली आणि तिला सलाईन लावताना त्याने रघुला एक prescription दिल होत त्यावर त्याची सही होती पण त्या सहीवरुन काहीच कळत नव्हत तिने तिच्या bag मधून तो कागद काढला आणि धावतच स्टडीमध्ये गेली एकएक करून तिथे असलेल्या सगळ्या फाईल्स चेक करू लागली अंकुशची सही शोधू लागली आणि शेवटी तिच्या चेहऱ्यावर विजयी झाल्याचा आनंद आला. कारण त्या फाईलमधील अंकुशची सही आणि तिच्या हातात असणाऱ्या कागदावरची सही एकच होती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama