STORYMIRROR

Raj Mohite

Comedy Romance Fantasy

3  

Raj Mohite

Comedy Romance Fantasy

तिने तोंड गोड केले

तिने तोंड गोड केले

3 mins
289

वाढदिवस सकाळपासून मेसेज कॉल बरेच काही येत होते. सहसा मला वाढदिवस साजरे करणे आवडत नाही. पण काही केले तरी तिला हे कधीच मान्य न्हवते मला नकळत तिने माझे घर गाठले. एका हातात गिफ्ट एका हातात Birthday केक. कशीतरी तिने बेल वाजवली. प्रीती मोरे

दरवाजा उघडताच बघतोस काय ???

हे पकड... तिने तिच्या हातातील सर्व सामान घेण्यास सांगितले. जसे मी उजव्या हातात केक आणि डाव्या हातात गिफ्ट घेतले. तिने दरवाजातच मला आलिंगन दिले. आणि म्हणाली happy birthday uummaahhhh ती जास्त लकट करू लागली. तिला थांबवत "आरे आधी आत तर ये कुणी पाहिलं तर???? आणि सांगत असताना विधीने चोरून काण्या डोळ्याने पाहिले ही. जळफळाट करत तिने तिच्या दाराचा दरवाजा धाडकन आपटला.

ती - पाहिले तर पाहिले तशीही होणारी तुझी बायको आहे

मी - तू ना कठीण आहे समजविने

ती - मला काही समजवू नको सांगू ही नको आज तुझा पूर्ण दिवस हवा मला birthday तुझा मेमोरिबल करायचा आहे pls आज काही बहाणा नको.

मी - pls समज मी एकटा राहतो हि चाळ आहे बंगला नाही लोकांना कळत आणि बाजूचे काका सतत माझ्या वडिलांशी बोलत असतात फोन वर कधी त्यांनी त्यांना माझ्या ह्या प्रकराबाबत सांगितले तर???

ती - त्यात काय घाबरायचे सांगून टाक आम्ही लग्न करणार आहोत.

मी - करणार आहोत आणि केले आहे हयात फरक आहे तुला कळते मला काय म्हणायचे आहे ????

ती - मला कळते तुला काय म्हणायचे आहे ???

तुला नेहमी प्रमाणे मला आज ही टाइम द्यायचा नाही. आणि आजुन किती दिवस टाळणार आहेस मला??

मी - तू ना ??? समजविनेच कठीण नेहमी वेगळा अर्थ काढत असतेस ???

तीच्या जवळ जाऊन तिची समजुत काढण्याचा प्रयत्न केला

हात गळ्यात घातला तसा झिडकारले.

ती - सोड यार तुझं नेहमीच आहे आज तुझ्या birthday celebration चा प्लान दर वेळेला तू मूड ऑफ करतोस.

मी - मला माहित आहे तुझा ऑफ मूड कसा on करायचा ते??

लाजली आणि बिलगळी मला

मी - आता केक कापून घेवुया???

ती -  थांब थोडा वेळ मला आसेच तुझ्याशी बिलगून राहूदे माझा राग शांत होई पर्यंत

मी - तुझा राग शांत होईल पण मी?????

ती - आगाऊ

म्हणत माझ्या पासून लांब झाली birthday celebration नंतर मला आणलेले gift दिले. तशी तयार न्हवती पण समजुत काढून तिला जाण्यास सांगितले.

आणि जाताना परत एकदा hug करून एक kiss करू लागली. आता हातात समान न्हवते तरीही तिला थांबवू शकत न्हवतो. bye करून ती निघाली आणि ती जाताच एक वादळ जे घुमघवत होते ते येवून माझ्या दारावर आदळले. विधी पाटील माझे प्रीती नंतर चे दुसरे अफेयर

विधी - काय सांगायचे असेल काही बहाणा शोधून ठेवला असलास तर आधी सांग

मी - त्यात शोधायची काय गरज तुला माहीत आहे आमचं ब्रेक अप झाले आहे. birthday म्हणून आली ती.

विधी - अच्छा तुझी एक्स birthday ला आली तिने तुला गिफ्ट दिला तुझ्या गळ्यात गळा घालून wish केले मग दरवाजा बंद करून birthday celebrate केला. नक्की birthday celebrate केलात की ?????

मी - तोंड आहे म्हणून काही बोलू नको

विधी - मला बोलायची काही गरज नाही सर्व प्रकार मी नसमजण्याईतकी तरी मूर्ख नाही.

मी - तू चुकीचा अर्थ काढतेस

विधी - मी चुकीचा अर्थ काढतेय??? कौन मी???

तुझ्या बंद दारातील भेटीला अर्थ आहे.

मी - तू काही समज. इतका भरवसा नाही तर कशाला लग्नाचे स्वप्न पाहतेस???

नुसता संशय काय करत होतो???

काय झाले??

आरे just friend आहोत आणि होते आमचे पण आता तिचा मार्ग मोकळा माझा मार्ग मोकळा

ती आली कारण तिला आठवण होती माझ्या birthday ची निदान wish तरी केले.

तुझ्या आहे लक्षात??? आहे तुला आठवण ???

खोटं पण रेटून बोललो आणि तिला निरुत्तर केले.

एक अखेरच तिने उत्तर मागितले

खरेच जर तुझे आणि तिचे आता ही काही नाही तर खा माझी शप्पथ

सारे प्रकरण जर एका शपथ मधी जर समाप्त होणार असेल तर माझी काही हरकत न्हवती

ही घे तुझी शपथ

तशी तिही बिलगली ही तिला मिठीत घट्ट धरले स्वतः तिला किस केले

नंतर

थांब आली म्हणून घरी गेली आणि प्लेटमधे माझ्या आवडीचा मुगडाळीचा हलवा आणला.

खाल्ला पण तोंड तितके गोड झाले नाही जितके प्रीतीने केले होते


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy