ती रात्र..! न विसरण्यासारखी
ती रात्र..! न विसरण्यासारखी
ती रात्र मुकुलच्या जीवनातील भयानक रात्र होती.
त्या दिवशी मुकुलाचा बर्थडे होता त्यामुळे मुकुलला विशालने पार्टी मागितली होती.
अरे भाऊ आज तुझा बर्थडे आहे, आज तरी पार्टी दे, तीन महिने झाले यार आपण एकत्र पार्टी करून आणि घेल्या वेळेस तुझ्या स्वातीने बर्थडे पार्टी दिला होता पण त्या पार्टीमध्ये ना वाईन ना व्हिस्की अन ना नॉनव्हेज बोर गेला होता यार त्या पार्टीमध्ये. या वेळेस तू, मी, स्वाती आणि वाणी चौघानीच हॉटेल मध्ये जाऊन पार्टी करू.
मुकुल ने ही होकार दिला होता.
त्या दिवशी चौघे हॉटेल मध्ये मस्त पार्टी केली. सगळ्यांना चांगलीच चढली होती आणि त्यातल्या त्यात हॉटेल हा सिटी पासून जरा जास्तच दूर होता. त्यांच्यात विशाल एकटाच जरा लिमिट मध्ये ड्रिंक केला होता त्यामुळे तो कार चालवणार असं त्यांनी ठरवलं. वाणीला हि उलट्या आल्यासारखं हि होत होता.
हे सर्व परिस्थिती पाहून विशाल म्हणाला कि आपण सर्व जण माझ्या घरी जाऊयात, घरी हि कोण नाहीत आणि सकाळी उठून तुम्ही आपलया अपल्या घरी जाऊ शकता. कारण या परिस्थितीत ते घरी गेले असता त्यांना घरच्यांचे लेक्चर ऐकावे लागले असते. त्यामुळे सर्वांनी विशालच्या निर्णयाला होकार दिला. सगळे कारने हॉटेल वरून निघालो.
रस्त्यात वाणीला भरपूरच त्रास होत होता. स्वातीने कार थांबवला आणि म्हणाली कि मी हिला बाहेर घेऊन जाते कारण हिला उलट्या होत आहेत. लगेच विशालने कार बाजूला थांबवून तिला बोलला कि तू काय उठू नकोस कारण तुला हि चालता येईना, मीच तिला उतरवून रस्त्याच्या कोपऱ्याला घेऊन जातो. त्यांचे कार हायवेवर होते त्यामुळे विशालने स्वातीला उतरायला दिले नाही.
विशालने वाणीला कार मधून उतरवून हायवेच्या कोपऱ्याला घेऊन जातो.
दहा मिनिट झाले होते विशाल आणि वाणी अजून आले नव्हते. स्वातीने मुकुलला बोलले कि खाली उतरून बघ ते अजून नाही आले. मुकुल पूर्णपणे नशेत बुडलेला होता.
तो फुटफूटत उठला. हि एक घेती अर्धा पावशेर आणि ओकती एक किलो भर
अचानक कारच्या मागे कोणाच्यातरी कारचा ऍक्सिडंट झाल्यासारखं आवाज आला त्याच क्षणी विशाल आणि वाणी पळत कार कडे आले.
चलरे विशाल लवकर, वाणी ने गडबडीत कारमध्ये येऊन बसली.
विशालने लगेच कार चालू करून तेथून निघाला.
काय रे काय झाले मागे तुम्ही असे का पळत आला, त्या दोघांची स्थिती पाहून मुकुलने विचारले
काय नाही रे मागे ऍक्सिडंट झाला अन त्यातल्या त्यात पोलीस व्हॅन हि तेथून जात होती आणि आपण एकतर आधिच नशेमध्ये आहोत.
हे चौघे आधिच नशेमध्ये होते आणि त्यात पोलिसांनी यांना ड्रक अँड ड्राईव्ह केस केला तर यांना महागात पडले असते त्यामुळे विशालने तेथून कार लगेच हलवली.
मुकुल खूप घाबरलेला होता. मुकुलच्या रिलेटिव्ह मधल्या मित्राचा गेस्ट हाऊस जवळच होता त्यामुळे त्याने विशालला कार तिकडे वळवण्यासाठी सांगितले होते
त्या ऍक्सिडंटमुळे सगळ्यांची नशाच उतरली होती
आज पहाटे मला असाच एक ऍक्सिडंटचा स्वप्न पडला होता, काय तो स्वप्न तर पूर्ण होत नाही ना? स्वाती बोलली
अरे स्वाती तसं काही खर होत नसत नाहीतर सगळेच स्वप्न बघत बसले असते. विशालने बोलला
तस नाही रे पहाटेच स्वप्न खर होत असतात असं ऐकलं मी!
जरा शांत बसा यार, उगाच पालतू बडबड करू नका. मुकुल ने जोरात ओरडला.
थोड्याच वेळात ते त्या गेस्ट हाऊसच्या ठिकाणी आले
गेस्ट हाऊस हा भयानक दिसत होता, लाईट्स नव्हते, एक प्रकारे तो गेस्ट हाऊस भुताड दिसत होता.
सगळे कारमधून उतरले. विशालला वर कोणी असल्यासारखं भास झालं
अरे यार मला इथे काही बर वाटेना आपण इथेच बाहेर थांबू आत जायचं नाही, तसेच आपल्याकडे चावी सुद्धा नाही. विशालच्या पाठोपाठ स्वाती आणि वाणीने हि आत जाण्यास नकार दिले.
मुकुल ने हसत हसत बोलला, काय यार तुम्ही अजून लहान मुलांसारखं घाबरता, चला आत मुकलने कार मधून शिल्लक बिअर बॉटल घेऊन आत निघाला
मुकुल दरवाजा पर्यंत गेला, अरे विशाल याला चावी नाही, दरवाजा उघडेच आहे असे बोलत तो पूर्ण बिअरची बाटली तिथेच तोंडाला लावून संपवला आणि तिथेच नशमध्ये उंबरटयावरच झोपला
थोड्या वेळाने त्याला जाग आली
समोर मेणबत्ती लावली होती आणि बाजूला विशाल, स्वाती आणि वाणी बसले होते
वाणीच्या हातात मुकुलने पिलेला तो बिअरचा रिकामा बॉटल होता
वाणीने बोलली कि आता आपण ट्रुथ अँड डेअर गेम खेळू
त्यांनी गेम सुरु केला. विशालने बाटली फिरवली, बाटली मुकुलच्या दिशेने थांबली
वाणीने म्हणाली कि मी मुकुलला डेअर देते कि तो वरच्या कोपऱ्या खोलीत जाऊन खोलीच्या कोपऱ्यात त्याचा रुमाल ठेवून यायच. मुकुलने हि डेअर स्वीकारली आणि तो वरती निघाला.
वर जाईपर्यंत त्याला काहीच वाटल नाही पण जस जस वर जाता त्याला थोडीशी भीती वाटत होती कारण वर पूर्णपणे अंधार होता
तो वाणीने सांगितल्या प्रमाणे त्या कोपऱ्या खोली जवळ गेला आणि त्या खोलीचा दरवाजा उघडला
कर्रर्रर्रर्रर्र......
दरवाजाचा उघडण्याचा आवाज हा हॉरर मुव्ही सारखा येत होता
तो हळू आत गेला
अचानक दरवाजा बंद झाला
तो एकदम घाबरला होता
त्याने लगेच त्या खोलीच्या कोपऱ्यात जाऊन रूमाल ठेवून वळणारच होता त्याच्या समोर विचित्र म्हणजे भुताच्या वेशात स्वाती उभारली होती
तो एकदम दचकला आणि खाली पडला
ती हळूहळू त्याच्या जवळ येत होती
तो इतका घाबरला होता कि तो तिला जोरात ढकलून पळत पळत खाली गेला
बघतो तर काय तिघेही खालीच बसले होते
मुकुलने स्वातीवर ओरडला
अरे यार मजकाचा पण हद असतो
मी काय केले स्वातीने बोलला
वर येऊन भूता सारखा घाबरवायचं अन मी काय केले म्हणायचं
मी तर वर आलेच नाही
विशालने हि पाठोपाठ बोलला कि आम्ही तिघेही इथेच बसलेलो आहोत
मुकुल तू घाबरलास का वाणीने विचारले
जाऊद्या आता पुन्हा बाटली फिरवा
विशालने बाटली पुन्हा फिरवली
आता बाटली स्वातीच्या दिशेने थांबला
यावेळेस मुकुलने स्वातीला डेअर दिला कि वर छतावर जाऊन सेल्फी काढून यायचं
कारण स्वातीला सेल्फीची सवय होती
स्वातीने हि हा डेअर स्वीकारला
स्वाती बिनधास्त पणे वर छतावर गेली आणि सेल्फी काढली. तिला अचानक मागून कोणी गेल्यासारखं वाटलं तिने मागे फिरून बघितले तर कोणच नव्हते मग तिने तिचा सेल्फी बघण्यासाठी मोबाईल चालू केला आणि तिला समोर अंधारात कोणी असल्यासारखा वाटत होत तिने मोबाईलचा तो अंधुक लाइट त्या दिशेने फिरवला तर तिला विचित्र आकृती दिसली
अचानक मोबाईलचा लाईट बंद झाला ती घाबरली आणि बैचैन झाली तिने लगेच मोबाइलचा टॉर्च चालू केला तर समोर मुकुल रक्ताने माखलेला उभा होता
ती जोरात किंचाळली
अरे मुकुल मजाक करू नको
मुकुल तिचा न ऐकता तिचा गळा पकडून दाबू लागला
तिने कसातरी सुटका करून खाली पळत आली तर पुन्हा तिघे तिथेच बसले होते
तिने एकही शब्द न बोलता गप बसली
काय झालं स्वाती असं का गप बसली सेल्फी नाही काढली का दाखव बघू सेल्फी विशाल बोलला
स्वातीने शांतपणे सेल्फी दाखवून पुढचा गेम सुरु करायला सांगितले
या वेळेस मुकुलने बाटली फिरवली आणि बाटली हि विशाल आणि वाणीच्या मध्य दिशेने थांबला
मुकुल आणि स्वातीने ठरवले कि आता यांना डेअर नाही तर ट्रुथ द्यायचं तेही दोघांना
त्या दोघांनी त्या दोघांना विचारला कि तुमच्या आयुष्यातील आम्हाला माहित नसलेलं खरी गोष्ट सांगायचे
विशाल आणि वाणी एकमेकांकडे बघून हसले
आपण रस्त्यात कार थांबवले होते तेव्हा ऍक्सिडंट झालं होत माहित आहे का?
हो माहित आहे, दोघांनी मान हलविला
तो ऍक्सिडंट आमचाच झाला होता
हे सांगताच स्वातीने घाबरून बाहेर पळत गेली पण मुकुल हसतच बोलला बस झाला मजाक, काहीही सांगू नका इथे कोण घाबरत नाही
अरे खरंच मी आणि वाणी रस्ता क्रॉस करताना कारने आम्हाला उडवले होते.
तरी मुकुल हसतच होता. अचानक मुकुलचा लक्ष विशालच्या डोक्यावर गेला विशालच्या डोक्यातून रक्त येत होत
आत्ता तर मुकुलची नशा पूर्ण उतरली त्याने वाणी कडे पाहिलं तर वाणी हि रक्ताने माखलेली होती
मुकुलला भयानक घाम सुटला त्याला हलता सुद्धा येईना, तोंडातून आवाज पण येईना
वाणीने त्या गेम मधला बॉटल उचलून फरशीवर आदळला आणि ते दोघे जोर जोरात हसत मुकुल जवळ येत होते
वाणी ने त्या तुटलेल्या बाटलीने मुकुलच्या छातीवर वार केला....
अचानक मुकुलला जाग आली बघतो तर काय तो त्या घरात मधोमध एकटाच पडलेला होता तो लगेच उठून बाहेर पळत आला तर कार जवळ ते तिघेही बोलत उभारले होते
मुकुलने ओरडला, मला एकट्याला आत सोडून तुम्ही बाहेर काय करताय
विशाल म्हणाला आत, तू आत कुठे होता बाहेर उंबरठ्यावरच नशेत पडलेला होता त्यामुळे तुला तिथेच सोडून आम्ही बाहेर उभारलो, झालं तरी काय तुला आणि दरवाजाची चावी सुद्धा नाही तर तू आत कसाकाय गेला
तेव्हा मुकुलचा फोन वाजला
ज्याचा गेस्ट हाऊस होता त्याच मित्राच फोन होता
मुकुलने फोन उचलला तिकडून त्या मित्राने बोलला कि
काय रे मुकुल कॉल का केला होता
अरे, तुझ्या गेस्ट हाऊस वर आलो होतो त्याची चावी पाहिजे होती
अरे तुम्ही तिकडे कशाला गेलात तो गेस्ट हाऊस भुताड आहे तिथे तीन महिन्या पूर्वी एकाने आत्महत्या केली होती तुम्ही तेथून निघा पहिले असे बोलून त्याने फोन कट केला
त्याच्या बोलण्याने मुकुल पूर्णपणे घाबरला होता त्याने छातीवर हात ठेवले असता त्याला त्या बाटलीचा वार जाणवला त्याने शर्टच्या वरचे गुंडी काढून बघितले तर त्याला तिथे गंभीर जखम झाली होती.
लगेच विशालने त्याला विचारले कि हे काय झाले तुला
मुकुल काहीही न सांगता त्याला कार काढायला सांगितले कारण तो भयानक घाबरलेला होता.....
ते चौघे सुखरूप घरी पोहचले नशीब म्हणा
हि गोष्ट होऊन एक वर्ष झाले तरी आजपर्यंत मुकुल, विशाल, वाणी आणि स्वाती व्यतिरिक्त कोणाला माहित नाही आणि ते कोणाला सांगितले सुद्धा नाही. आजपर्यंत ते अजून एकही पार्टी केले नाहीत कारण त्यांना मुकुलच्या बर्थडेची रात्र महागात पडलेली होती अन ती रात्र हि मुकुलला हि विसरण्यासारखी नव्हती
तसेच आज मुकुलचा बर्थडे आहे आणि तो घरातच बसलेला आहे.
क्रमश..

