ती आणी लोकल ट्रेन
ती आणी लोकल ट्रेन
🚆🚂👧👩💼" कृपया लक्ष द्या , "छत्रपती शिवाजी महाराज" टर्मिनस, इथून सुटणारी, नऊ वाजून, तिस मिनिटांची बदलापूरला जाणारी, जलद लोकल , आज काही कारणाने, अर्धा तास उशिरा येणार आहे, याची नोंद घ्यावी, होणा-या त्रासाबद्दल क्षमस्व ". 🙏🕤🚂....
रेल्वे स्टेशनवर अशी घोषणा सुरू होती, ही घोषणा ऐकतच धावत धावत ती प्लॅटफॉर्मवर पोहोचली. आज तिला थोडा उशीरच झाला होता. तिकीट पर्समध्ये सांभाळून ठेवत तिने तिच्या इच्छित ट्रेन मध्ये जागा मिळवली. (पास आजच संपला होता ना.....😅😅)
खिडकीजवळची जागा तिची ठरलेली असायची. तीच लक्ष अचानक बाहेर गेलं, सकाळचं कोवळ ऊन पडलेलं होतं, खूप आवडायचं तिला ते ऊन बघायला, अनुभवायला.
नंतर तिने सवयी प्रमाणे हेडफोन काढून कानाला लावले आणि रोजच्या सारखं तिच्या मनपसंत गाण्यांचा आस्वाद घेऊ लागली. पण आज मात्र तिच लक्षच लागत नव्हतं त्या गाण्यांमध्ये, कारणही तसंच होतं.....
आज समोरच्या जाळी पलीकडे असणाऱ्या जेन्ट्स डब्यात दिसणारा तो दिसला नव्हता तिला.
तोच तो रोज दिसणारा त्याच डब्यात (जेन्ट्स च्या)
रंगाने गोरा, कुरळे केस, सुंदर डोळे आणि लाघवी हास्य असणारा आणि तिच्याकडे प्रेमाने बघणारा......
तसे ओळखत नव्हते ते दोघे एकमेकांना, पण रोजचा प्रवास मात्र सोबत असायचा दोघांचा.... म्हणजे एकाच स्टेशनवर चढायचे ते दोघे ट्रेनमध्ये, मग पंधरा मिनिट झाल्यावर तिचं स्टेशन यायच (नाईलाजाने तिला तिथे उतरावच लागायचं....☹️☹️😔😔) तिची तर इच्छाच नसायची, तिथे उतरण्याची कारण त्या पंधरा मिनिटांच्या रोजच्या प्रवासात एक अनामिक नातंच जणू निर्माण झालं होतं त्या दोघांत....
ओढ वाटायची दोघांनाही एकमेकांबद्दल, पण फक्त एकमेकांना पहात असायचे ते, ती ट्रेनच्या जाळीची भिंत कायम असायची त्या दोघांमध्ये. त्याच्या पेहरावावरून तो मुस्लिम आहे हे समजलं होतं तीला.... आधी खूप राग आला होता तीला स्वतः चाच...(आपण हिंदू धर्माचे असून एका मुस्लिम तरुणाच्या प्रेमात कसे पडू शकतो...🤔🤔🙄🙄😔😔😒😒😧) पण त्याच्या चेहऱ्यात, त्याच्या हसण्यात, त्याच्या तिच्याकडे एकटक बघण्यात अशी काही जादू होती कि तो दिसल्यावर ती सर्व काही विसरून जात असे, म्हणतात ना प्रेम आंधळ असतं, ती स्वतः त्याचा अनुभव घेत होती.... रोजच
दिल है के मानता नही.....(असं रोजच व्हायचं तिचं आणि त्याचेही...., तोही रोज तिच्या येण्याची वाट पाहत उभा असायचा प्लॅटफॉर्म वर, ती आल्याशिवाय कधीच ट्रेन पकडायचा नाही. तिच्याकडे बघताना त्याचं भान हरपून जायचं, प्रेमगीत आपोआप ओठी यायची त्याच्या, तिलाही आवडायचं ते , तिच्या लाजण्याने तर वेडा होऊन जायचं तो, त्यांचे मित्र,मैत्रिणी चिडवायचे त्यांना ह्यावरून, पण त्यांना चिंता नसायची कोणत्याच गोष्टीची.
ते दोघे सोबत असल्यावर जणू विसर पडायचा, त्यांना सर्व जगाचा....
पण इतकं असूनही, अजून पर्यंत कोणीच कोणाला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या नव्हत्या. सर्व नजरेचा खेळ होता. एकमेकांना आपलं सर्वस्व मानल होतं दोघांनी, पण समाजाचे कटू नियम मात करत होते त्यांच्या अव्यक्त प्रेमावर. पण आज मात्र त्याने ठरवलं होतं, की काहीही करून आज आपल्या मनातल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करायच्या....
पण नियतीला हे मान्यच नसावे जणू....
आज तो जरा वेळ अगोदरच आला होता प्लॅटफॉर्मवर, त्याला व्यक्त करायच्या होत्या ना त्याच्या भावना.....!! तिच्यासमोर,....
पण नेमकं आजच तिला उशीर झाला यायला, आणि त्याला मात्र वेळेत ऑफिस गाठायचं असल्याने जावं लागल, तिच्याशिवाय.... खूप उदास झालं त्याचं मन,......🙄🙄😔😔😒😒😕😕, पण काय करणार, पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरी करणं, पैसा कमावणे सगळ्यांसाठीच महत्त्वाच असत ना....!!
जड अंतकरणाने गेला तो ऑफिसला, तिलाही खूप वाईट वाटल आज, त्याला न बघितल्याने, खूप बेचैन झाली ती, पण काय करणार, वेळ निघून गेली होती आता.....
गाण्यात मन रमत नसल्याने तिने, प्रतीलीपी ॲप उघडून तिची वाचत असताना अर्धवट राहिलेली गोष्ट पुन्हा वाचण्यास सुरुवात केली, ती ती गोष्ट वाचण्यात मग्न असताना जोरात टाळी वाजण्याचा आवाज आला, तशी ती दचकली, आणि तिने समोर पाहिलं....
दिदी तेरी खुशी से कुछ दे दे, भगवान भला करेगा तुम्हारा, बाल- बच्चा सलामत रहेगा ,बरकत मिलेगी तुमको....
अशी काहीशी दुवा देत एक तृतीयपंथी तिच्याकडे पाहूनच पैसे मागत होता.... तिने पर्समध्ये हात घालून दहा रुपयांची नोट काढली आणि तृतीयपंथीयाला सुपूर्द केली...
तसं त्याने समाधानाने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला पुन्हा दुवा दिली....
तेरे दिल के सब अर्मान पुरे हो जाये, तुझे हर खुशी मिल जाए....
त्या तृतीयपंथीयाला पाहून कुणी तिरस्कार करत होतं, कोणी नाक मुरडत होतं, तर कोणी माणुसकीच्या नात्याला निभावून त्यांना पैसे देत होत. हे सुद्धा त्यातलीच एक, माणुसकी जपणारी.....
तिच्या मनात विचार आला, लोक असा तिरस्कार का करत असतील ह्या तृतीयपंथी लोकांचा, देवानेच तर घडवलय त्यांना, त्यात त्या लोकांचा काय दोष?? का फक्त अपमान, अवहेलना सहन करावी लागते त्या लोकांना?? तीही तर देवाचीच लेकरं सर्वांसारखीच, तरीही का असं?? का फक्त भिकाऱ्या सारखं जगणं येतं तृतीयपंथी लोकांच्या वाट्याला? का हिरावला जातो त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क??
प्रश्न बरेच पडले होते तिला, पण उत्तर काही मिळत नव्हतं....
मग तिला पुन्हा त्या तृतीयपंथीयाने दिलेली दुवा आठवली आणि खूश झाली ती, का कोण जाणे??...... आपण तृतीयपंथी लोकांबरोबर चांगले वागतो याचं समाधान होतं की पुन्हा त्याची आठवण आली असावी तिला, देवच जाणे.....????🤔🤔🙂🙂😃😃😇😇
तोही आज असाच बेचैन होता ऑफिसला जाताना, आज त्याला त्याच्या प्रेमभावना सांगायच्याच होत्या तिला कारण आज " व्हॅलेंटाईन डे " होता. त्याने आज त्याच्या मनाशी पक्का निश्चय केला होता की, आज काही झालं तरी तिला बोलायचंच "माझं तुझ्यावर प्रेम आहे, देशील माझी साथ आयुष्यभर, करशील माझ्याशी लग्न, होशील का तू माझी राणी ??
तो ह्या विचारात असतानाच त्याचं स्टेशन आलं आणि गर्दी बरोबर धक्के खात तोही उतरला त्याच्या स्टेशनवर..... (लोकल ट्रेन आणि गर्दीत बसणारे धक्के ह्याबद्दल न बोललेलं बरं.....😂😂🤣🤣🤣🤣)
काहीशा नाराजीनेच तो ऑफिसमध्ये गेला आणि त्याच्या रोजच्या कामांमध्ये गुंतला.
तिकडे तीही त्या तृतीयपंथीयाने दिलेल्या दुवेने खुश होवून, पुन्हा तिची राहिलेली आवडती कथा वाचण्यात मग्न झाली..... काही पान वाचली असतीलच, इतक्यात.......
आई आई आई ग.... असं म्हणत त्या गर्दीत एक गर्भवती महिला आत आली, आणि येऊन तिच्या समोरच उभी राहिली, त्या गर्भवती महिलेची अवस्था पाहून तिने तिला बसायला आपली जागा दिली.
त्या महिलेने धन्यवाद म्हणत तिला सांगितले की, तिचा प्रसूतीचा दिवस जवळ आला आहे ,पण अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने चेकअप साठी ती डॉक्टर कडे चालली होती....
बाजूच्या जेन्ट्स डब्यात तिचे पती होते.
लगेच तिने त्यांना हातही दाखवला, तिच्या पतीनींही इशारा करून त्यांच्या गर्भवती बायकोची काळजी घ्यायची तिला विनंती केली. तिनेही डोळे मिटून त्याला सहमती दर्शवली. मी आहे काळजी करू नका असे त्यांना सांगितले. त्या गर्भवती महिलेचे पतीही निश्चिंत झाले, हे पाहून की आजही माणुसकी आहे जिवंत, समाधानाचं हसू आलं त्यांच्या चेहऱ्यावर, ते हसू पाहून हीलाही बरं वाटलं ....
इतक्यातच...
अचानक प्रसूतिवेदना चालू झाल्या त्या गर्भवती महिलेला....
तिच्या पतींसह सगळ्यांनाच काळजी वाटू लागली, आणि आता पुढे काय करायचं?....असा प्रश्नही पडला......
अशा परिस्थितीतही तिने मात्र आपले डोकं चालवलं, तिने ट्रेनची साखळी ओढली, सर्व महिलांनी तिच्या बाजूला उभ राहुन जणू एक, संरक्षक भिंतच उभी केली......
त्यातील जुन्या-जाणत्या एक आजी होत्या त्यांनी त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून त्या गर्भवती, प्रसव पीडा झेलणाऱ्या महिलेची प्रसूती सुखरूपपणे पार पाडली, हो अर्थातच, त्यांना आपल्या कथेच्या नायीकेने व इतर महिलांनी खूप मदत केली....
आणि अशा रीतीने त्या चिमुकल्या गोंडस परीने धावत्या लोकल ट्रेन मध्ये जन्म घेतला आणि तिच्या आई-वडिलांना कन्यादानाचे भाग्य प्राप्त करून दिलं, त्यांना आई-वडील होण्याचा सन्मान दिला.
सर्व डबा तिच्या त्या पहिल्या रडण्याच्या आवाजाने दुमदुमून गेला. सर्वांनाच हायसं वाटलं. तिच्या पतींनी लेडीज डब्यात येऊन सर्वांचे आभार मानले...
तिला तर ते म्हणाले, "बाळाचं नाव तुम्हीच ठेवायचं मावशी जी....",
तिलाही एकदम गहिवरून आले हे ऐकून,
तिच्या येण्याने आनंद झाला सगळीकडे, म्हणून "आनंदी "नाव ठेवा.. असं सुचवलं तिने...
डब्यातील सर्वच महिलांना व तिच्या आई-वडिलांना हे नाव खूपच आवडलं. अतिशय समाधानाने ते पती-पत्नी त्यांच्या नवजात बालिके बरोबर पुढील उपचारासाठी स्टेशनवरील रेल्वेच्या दवाखान्यात गेले, सोबत त्या अनुभवी आजी व आपली नायीका होतीच. आजींची त्यांना खूपच मदत झाली कारण आई-बाबा होण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे बाळाला कुशीत कस पकडाव हेही माहीत नव्हतं दोघांना, आणि आपल्या नायीकेला माहित असण्याचा प्रश्नच नव्हता....☺️☺️
( ते पती-पत्नी, आजी, आपली नायीका ट्रेन मधून उतरल्यावर ट्रेन सुरु झाली होती...... ).
"आनंदी "साठी तिने आपला रोजचा दिनक्रम बाजूला ठेवला होता. ऑफिसमध्ये सर्व घटनेची माहिती देऊन ती आज" हाफ डे "ऑफिसला येणार असल्याचं तिने कळवलं होतं. मग आनंदी व तीच्या आई-वडिलांचा हसत मुखाने निरोप, तसेच त्या प्रेमळ आजींना धन्यवाद म्हणून व त्यांचा आशीर्वाद घेऊन ती तिथून निघाली.
मग सरळ ती वेळ न दवडता ऑफिसला गेली, बरीच काम पेंडिंग होती कालची आणि आज सकाळचीही. तिचा दिवस कामात कसा निघुन गेला तिलाच नाही कळाल.....!
मग पुन्हा संध्याकाळी ऑफिसचे सर्व काम संपवून, थोडासा ओवर टाइम पण करून ती घरी जाण्यास निघाली.(तिच्यामुळे कामाचं नुकसान झालेलं कस चालणार होतं तिला? म्हणून आईचे दोन शब्द ऐकावे लागले तरी चालतील परंतु, आपल्याला दिलेले आजच काम आज झालचं पाहिजे, ते उद्यावर ढकलायला नको, असा विचार करून तिने ओव्हर टाईम केला होता, काम पूर्ण करण्यासाठी....)
नेहमीप्रमाणे मग ती स्टेशनला आली, का कुणास ठाऊक तिची नजर शोधत होती त्यालाच......
हो तोच तो, तिच अव्यक्त प्रेम........
देव जाणे पण ,तिला काहीतरी विचित्र जाणवत होतआज........,
 
; कसल्यातरी अनामिक भीतीने दडपण आल होतं तिला, जणू काहीतरी वाईट घडणार होत आज......पण नेमकं काय..??
तिला असं वाटत होतं कि तो... तिथेच कुठेतरी आहे, जाणवत होतं तिला त्याचं अस्तित्व, जणू तो तिलाच पाहत आहे लपून छपून, तिने मागे वळून पाहिलेही, पण नव्हताच तो तिथे.....!!
मग स्वतःच्या वेडेपणा वर हसू आले तिला
😃😃😃😃, आणी तेवढ्यात ट्रेनही आली.....
ती ट्रेनमध्ये जाऊन उभी राहिली, आता मात्र खूप गर्दी होती ट्रेनला, संध्याकाळची वेळ होती ना....😂😂
ती दरवाजाजवळ उभी राहिली, इतक्यातच एक फेरीवाला लहान मुलगा ट्रेनमध्ये चढला.
त्याच्याकडे रंगीबेरंगी क्लिप्स, नेल पेंट, कानातले, माळा, पर्स, तसंच महिलांचे इतर साहित्य आणि गृहोपयोगी वस्तू होत्या विकण्यास......
तीही नादावली त्या वस्तू पाहण्यात, तिला आवडल्या त्या वस्तू विकत घेतल्या तिने, आणि तिच्याकडे असलेल एक गोष्टीचे पुस्तक त्याला देऊ केलं भेट म्हणून, तसं तो मुलगा केविलवाणं हसून म्हणाला,
"दिदी आप बहुत बडे दिल के हो, लेकिन मैं ऐ किताब लेके क्या करुंगा??😂😂 काला अक्षर भैस बराबर है, मेरे लिये तो"😂😂😂😂😂
असं म्हणून तो हसतच त्याच्या वस्तू विकण्यासाठी निघून गेला, हिला मात्र निरुत्तर केलं त्याने त्याच्या प्रश्नाने... नेहमी हसतमुख असणारी, बडबड करणारी आपली नायिका मात्र शांत झाली त्याच्या प्रश्नाने, विचारात पडली... पुन्हा..
का अशी वेळ येते ह्या लहान मुलांवर, खेळण सोडून, अभ्यास सोडून, बालपणीचा आनंद लुटण सोडून, अशी वाईट वेळ का येते त्यांच्यावर?? का करावी लागते त्यांना खेळण्या -बागडण्याच्या वयात बाल मजुरी??? का काही लहान मुलं शाळा सोडून रेल्वे प्लॅटफॉर्मवर , मंदिराबाहेर, इतर ठिकाणी भीक मागताना दिसून येतात??? परीक्षा घेत असतो का देव त्यांची???? कधी संपणार बाल मजुरी??? कधी मिळणार लहान मुलांना अनुभवायला त्यांचं कष्ट विरहित, आनंदी, निरागस, हसर, खोडकर बालपण.......???
ती ह्या विचारात असतानाच, अचानक हास्याची कळी उमलली तिच्या चेहऱ्यावर....☺️☺️
हो, दिसला तिला पुन्हा तोच, ज्याच्यासाठी वेडावला होता तिचा जीव, तोच तो.....
पण आता मात्र त्याची नजर, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले होते, जणू तिच्याकडे एकटक पाहणारा, तिच्यावर प्रेम करणारा तो....
तो नव्हताच जणू....,
दुसराच कोणी होता जसा, त्याचा मुखवटा लावलेला.....
तिलाही जाणवलं ते, पण.....
सकाळी उशीर झाल्याने रागावला असेल तो, अशी समजूत करून घेतली तिने आपल्या मनाची....
दोघांची जेव्हा नजरानजर झाली तेव्हा हलकसं, हसू आलं त्याच्या चेहऱ्यावर. ते पाहून सुखावली ती...
पुन्हा चालू झाले त्यांचे नयनबाण, आणि इशारे....
पण फक्त काही क्षण......
नंतर अचानक काहीतरी आठवल्यासारखं झालं त्याला, आणि त्याने तोंड फिरवलं .
टाळू लागला तिच्याकडे बघण, तिची प्रेमळ नजर, जणू टोचत होती त्याला....,
खेचत होती आपल्याकडे, ते खरं तर हवं हवस वाटत होतं त्याला..... पण आत्ता ह्या क्षणाला तेच नकोस झालं होतं त्याला....!!!!
तिला कळत नव्हतं तो अचानक असा का वागतोय, ती नजरेनेच अनेक प्रश्न विचारत होती त्याला, पण तिच्या कोणत्याच प्रश्नाच उत्तर आत्ता नव्हतं त्याच्याकडे, म्हणूनच टाळत होता तो तिच्या नजरेला......,
संघर्ष चालला होता जणू त्याचा स्वतःशीच....,
हे सर्व तिला जाणवत तर होतं, पण कळत मात्र नव्हतं हे काय चालू आहे......
आता तर तिच्या नजरेला नजर मिळवण्याची हिम्मतच होत नव्हती त्याची.......
तिलाही चिंता वाटत होती त्याची.....
शेवटी तिच स्टेशन आल, म्हणून तिला उतरण भागच पडल, पण तो मात्र उतरलाच नाही आज......
का बरं असं केलं असेल त्याने??, या विचारांनी तिने एकदा त्याच्या डब्यात डोकावून पाहिलं त्याच्याकडे, तो केविलवाणा हसत होता.........
जणू निरोप घेत होता तिचा...........,
एक टक पाहत होता तिच्याकडे, जणू तिचं रूप, तिचा निरागस चेहरा, तिच ते सुंदर हसणं, तिचं वागणं, बोलण, चालण साठवून ठेवत होता मनात......
तिलाही राहवल गेलं नाही त्याची अशी अवस्था बघून, म्हणून तीही थबकली जागेवर , आणि कसलातरी विचार करून तिची पावलं आपोआप निघाली....... त्याच्याकडे (ट्रेन कडे ).......
ईतक्यातच.....
ढम्म, धडाम.....
खूप मोठा आवाज होऊन बॉम्ब ब्लास्ट झाला ट्रेनमध्ये........!!😰😰😨😨😱😱
कोणालाच काही समजलं नाही....... सगळीकडे हाहा : कार माजला, धावपळ चालू झाली सगळ्यांची बॉम्ब बॉम्ब असं म्हणून........☹️☹️😱😰😰😥😥😢😢
आपली कथेची नायिका तर सुन्नच झाली एकदम, तिला तर काहीच कळत नव्हतं काय झालं आहे , चालू आहे आपल्यासमोर, आगीचे लोळ उठले होते ट्रेनमधून.....
रेल्वेच्या आपात्कालीन पथकाने त्यांचं कार्य करण्यास सुरुवात केली होती, जळणारे डबे बाजूला करण्यात यश मिळालं होतं त्यांना, पण तोपर्यंत अनेक निष्पाप, निरपराध जीव बळी ठरले होते ह्या अमाणूष कृत्याचा, घातपाताचा......
तिच्या हातातील फोनच्या आवाजाने ती भानावर आली, तिची आई अतिशय काळजीने तिला विचारत होती...
"कुठे आहेस तू बाळा? ओव्हरटाईम करणार होतीस पण तरी इतका उशीर? आहेस कुठे तू आता? लवकर ये घरी, खूप काळजी वाटत आहे तुझी, खूप भयंकर घटना घडली आहे आज, ट्रेनच्या डब्यात बॉम्ब ब्लास्ट झाला आहे , मला खूप भीती वाटत आहे, तू लवकर घरी ये बाळा"
जास्त काही बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने ती फक्त इतकंच म्हणाली.......
" हो आई मी लवकर येईल घरी, काळजी करू नकोस तू, ठीक आहे मी".......
इतकं बोलून, तिने फोन ठेवला ....मात्र तिचं विचार चक्र पुन्हा चालू झालं........
का करत असतील असे घातपात??असे हल्ले, दंगली, जाळपोळ, दहशतवादी कारवाया????
कोणाचं भलं होत असेल असं केल्याने?? असं कोणतं समाधान मिळत असेल हे सर्व करून??
जो बॉम्ब हल्ला झाला त्यात सर्वच जाती-धर्माचे लोक मृत्युमुखी पडले.....!!!! हे तर समस्त मानव जातीतच नुकसान आहे हे का नाही लक्षात येत अशा लोकांच्या??
कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचा बाप, कोणाची आई, बहिण ,मुलगी ,पत्नी गमावली त्यांनी या हल्ल्यात, निर्माण झाली त्यांच्या आयुष्यात कधीच न भरून येणारी पोकळी, कोण आहे जबाबदार ह्या सर्वाला?? काय दोष असतो त्या निरपराध लोकांचा???
तीची अवस्था खूपच बेकार झाली होती, आपल्या डोळ्यासमोर तिने पाहिलं होतं मृत्यूमुखी पडताना निरपराध लोकांना, निष्पाप जीवांना, ज्यात तरुण, वृद्ध, स्त्री-पुरुष, लहान मुलं सर्वजण होते.... त्या बाॅम्बने कोणताच भेदभाव केला नव्हता, त्याच्या आवाक्यातल्या सर्वांनाच यमसदनी धाडण्याच काम त्याने चोखपणे पार पाडलं होतं, तेही तिच्या डोळ्यांसमोर......आणी.....
त्यानेच घडवून आणलं होतं हे भयानक क्रूर हत्या- कांड......
तोच तो, तिचं अव्यक्त प्रेम, त्यानेच केलं होतं हे सारं, घडवून आणला होता हा घातपात...... तिला विश्वास बसत नव्हता स्वतःवर कि तीने अशा व्यक्तीवर प्रेम केलं.....
हो पण तो खरं प्रेम करत असावा तिच्यावर, म्हणूनच ती ट्रेन मधून सुखरूप उतरल्यावर मगच केलं त्याने हे......
तिला कळत नव्हतं त्याचं खरं प्रेम बघून खुश व्हावं, की हा भयंकर घातपात पाहून दुःखी व्हाव.....
आईचे फोन चालू होते सारखेच, त्यामुळे तिला कसंतरी मनावर दगड ठेवून घरी जाणं भाग होतं....
त्याही परिस्थितीत तिने कसबसं सावरलं स्वतःला आणि मदत करू लागली त्या लोकांची, आपद्ग्रस्तांची, रेल्वेच्या आपत्कालीन पथकाची...... तिच्यावर संस्कारच होते तसे......
पुन्हा आईचा फोन आल्यावर मात्र तिला नाईलाजाने निघावं लागलं तिथून, त्यात विमनस्क अवस्थेत घरी पोहोचली ती......
दुसऱ्या दिवशी बातम्यांमध्ये सर्व टी.व्ही. चैनल वर तिच कौतुक करण्यात येत होतं......
"आनंदीजिंनी केलं खूप धाडस, केली आपाद ग्रस्तांना मदत"
तिच्या आईच्या चेहऱ्यावर कौतुक, आनंद ,काळजी, दुःख, वेदना, चिंता, खुशी आणि समाधान असे समिंश्रित भाव उमटले होते .
"आनंदी "
( आपल्या कथेची नायीका, हो तिचच
नाव दिल होत तिने त्या सकाळच्या परीला.....कारण, तिचाही जन्म झाला होता असाच, धावत्या ट्रेनमध्ये....😂😂 )
आणि तीन महिन्यानंतर......
ती आली होती पुन्हा तीन महिन्यांनी तिच्या आवडत्या लोकल ट्रेनमध्ये, तीन महिने लागले होते तिला या धक्क्यातून सावरण्यासाठी.....
इतक्या मोठ्या धक्क्यानंतरही अतूट होतं नात हे...