STORYMIRROR

Vijay Mule

Horror

3  

Vijay Mule

Horror

ती आणि वाडा..... भाग १

ती आणि वाडा..... भाग १

3 mins
215

सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं झरेवडी हे गाव. एकेकाळी दृष्ट लागावी असं हे गाव आता ओस पडत चांगलं होत, त्याला कारण म्हणजे ती, तिची सुटका झाली होती मंत्रांच्या कैदेतून, आता फक्त तिच एकच लक्ष्य होत ते म्हणजे बदला ....


गावात एकामागे एक लोकं जिवानिशी जाऊ लागली, तिनं त्यांना मरणही इतक्या क्रूर रित्या दिलं होत की त्या लोकांच्या शवाकडे बघून खंबीर मनाच्या पोलिसांना पण उलटी आल्यासारखं व्हायचं , पण तिला असा हालहाल करुन मारायला जणू तृप्ती भेटत होती....

झरेवडीत नवीनच ट्रान्स्फर झालेले इन्स्पेक्टर .अनिल सातपुतेपण हैराण झाले होते , त्यांचावर पण वरून प्रेशर येतं होत , दररोज साहेबांच्या कार्यालयात फेऱ्या होत होत्या . लोकांच्या म्हणण्यावर अनिल साहेबांना विश्वास नव्हता , खून्याचा तपास जोरात करूनही हाताला काहीच लागत नव्हते . अनिल साहेब त्यांच्या कार्यालयात एकडून तिकडे येरझऱ्या मारत होते तेवढ्यात हवालदार शिंदे कार्यालयात आले ,

शिंदे: साहेब परत एक खून झालंय ...

अनिल साहेब: काय सांगताय शिंदे कुठे आणि कधी झाला ? ताबतोब निघायला हवं आपल्याला चला लवकर ....

शिंदे : मी अगोदरच आपली एक टीम पंचनाम्यासाठी रवाना केलीय साहेब ,....

अनिल सा: हे मात्र बरं केलं शिंदे तूम्ही आपल्यालाही निघायला हवं आता चला..

( घटनास्थळी) अनिल सा: शिंदे कोणाचा खून झालाय? आणि ती गर्दी बाजूला करा बरं पहिले ...

शिंदे (गर्दीला बाजूला करत): सर ज्यांचा खून झालाय ते रिटायर्ड हवालदार पंडित आहेत सर ...

तुमचं इकडे ट्रान्स्फर होण्या अगोदरच दोन महिन्ांपूर्वी ते रिटायर्ड झाले होते सर ...

(खुनाची जागाही दरवेळी सारखीच होती आणि खूनही पूर्वीसारखाच झाला होता फक्तं यावेळेस मृताची सर्व हाताची बोटे गायब होती)

अनिल साहेब: शिंदे मृतदेह अगोदर शवविच्छदनासाठी पाठवा आणि तुम्ही माझ्या केबिनमध्ये या मला काहीतरी माहिती हवी आहे...

शिंदे: ओके सर ..

( अनिल साहेब त्यांच्या केबिनमध्ये जुन्या फाईल चाळत बसलेले असतात . तेवढ्यात शिंदे येतात )

अनिल साहेब: या शिंदे बसा , बरं मला सांगा शिंदे तूम्ही या गावात किती दिवसापासून आहात ?

शिंदे: चार वर्ष झालीत साहेब..

अनिल साहेब: बरं मला सांगा की गावपाटील कोण आहेत इकडचे..? तूम्ही ओळखता का त्यांना..?

शिंदे: हो सर ओळखतो ना , साहेबराव देशमुख नाव आहे त्यांचं .. पण का साहेब ?

अनिल साहेब: शिंदे आपण सर्व बाजूंनी विचार करून पाहिला पण एक गोष्ट आपल्या डोळ्ांसमोर. होती ती आपण मिस करत होतो ..ती म्हणजे खून झालेली जागा ...

शिंदे: मला समजल नाही सर?

अनिल साहेब: हे बघा आपण पंचनामा कुठला करतो ? खून झालेल्या जागेचा.. थोडफार आजू- बाजूचा पण.. खून झालेल्या जागेपासून सर्वात जवळ कोणती वास्तू असेल तर तो म्हणजे तो वाडा ... पाटलांचा बंद असलेला वाडा, ...

शिंदे : पण सर लोकांच्या म्हणण्ानुसार. वाड्यावर भुताटकी झालेली आहे ....

अनिल साहेब : लोकं काय हो जी गोष्ट समजतं नाही तिला भुताटकी म्हणतात ओ..

शिंदे: पण सर सर्व खून हे रात्री दहाच्या आसपास झालेत आणि एवढ्या रात्री कोणी कशासाठी ओसाड वाड्यापशी जाईल ....

अनिल साहेब: आणि जर त्यांना जबरदस्तीने तिथे आणल गेलं असेल तर..?

शिंदे: तसं होऊ शकत साहेब ..

अनिल साहेब: आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावपाटील..बघाना गावातील मोठं प्रस्त असतानाही ते कोणत्याही खुनाच्या संदर्भात आपल्याला भेटायला आले नाहीत एव्हाना ते गर्दीतही उपस्थित नव्हते ..

शिंदे : हो सर मी पण हे नोटीस केलंय सर पण आपल्याच पोलिसांतील कोणी त्यांचा शुभचिंतक असला तर नको अंगावर "बला" म्हणून गप्प बसलो ....

अनिल साहेब: म्हणूनतर मी कोणाजवळ ना बोलता तुमच्याजवळ बोललो .....

शिंदे: मी आजच कामाला लागतो सर त्या वाड्याचा आणि पाटलांचा तपास सुरू करून टाकतो ...

अनिल साहेब : आणि हो ही गोष्ट आपल्यामधीच राहू द्या उगाच कोणाला कळली तर तपासात विघ्न नको..... ठीके लागा कामाला .....

शिंदे : ओके सर ...(.म्हणत बाहेर जातात)

( अनिल साहेबही जुन्या फाईल्स बाहेर काढून पाटलांची कोणती जुनी केस भेटती का ते पाहू लागले )

दुसऱ्या दिवशी सकाळी हवालदार शिंदे अनिल साहेबांच्या केबिनमध्ये येतात ....

अनिल साहेब: या या शिंदे बसा ....

शिंदे: कालच्या मृतदेहाचा शववि्छेदनानंतरचा रिपोर्ट आलाय साहेब ....

अनिल साहेब: (रिपोर्ट वाचत) बरं तुम्हाला काही हाती लागलं का पाटलांबदल ...?

शिंदे : हो साहेब लोकांच्या म्हण्याप्रमाने वाड्यात पाटलांची सून भटकत आहे ... तिचंच भूत आहे ..त्या प्रमाणे मी थोडफार तपास केला ...म्हणजे ती कोण होती? तिचं नावं काय ? गाव कुठलं ई. माहिती काढली...

अनिल साहेब : मग काय मिळाली का माहिती ?

शिंदे: हो साहेब शेजारच्याच तालुक्यातील होती ती ... कुटेंच्या घरण्यातली . ... तिचं नाव चंद्रा ...... पाटलांच्या मोठ्या मुलाची बायको होती ती .....


टीप:. ( सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्त्विकमतेशी काहीही संबंध नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी) .


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror