माधवी पंकज

Romance Tragedy

4.5  

माधवी पंकज

Romance Tragedy

तिची शेवटची भेट

तिची शेवटची भेट

7 mins
612


बायकोचे दिवस भरत आले .. तिला लेबर पेन सुरू झालं म्हणून तिला डिलिव्हरीसाठी हाॅस्पीटलला घेऊन आलो .. तिला ओ.टी मध्ये घेतलं ..मी बाहेर फेऱ्या मारू लागलो .. खुप टेंशन आलेलं .. सर्व ठीक तर होईल ना .. तसं हे हाॅस्पिटल फार मोठं आहे .. मल्टीस्पेशलिटी हाॅस्पिटल आहे .. ओ.टी बाहेर फेऱ्या मारता मारता बाजूच्या ओ.टी मधून एक पेशंट स्ट्रेचर वर बाहेर आणताना दिसलं .. डोक्याला पूर्ण बॅण्डेज केलेलं आहे .. नक्की काहीतरी मेजर ॲापरेशन झालेलं दिसतंय .. मी मनातच म्हणालो ..


वाॅर्डबाॅय माझ्या जवळून स्ट्रेचर घेऊन जाताना मला पेशंटचा चेहरा ओझरता दिसला .. तीच होती का ही मीच माझ्या मनाला प्रश्न विचारत होतो .. छे छे .. ती नसेल ही .. ती तर लग्न करून अमेरिकेत गेलेली ना ..मग इथे कशी असेल .. माझ्या मनाचं आणि मेंदूचं द्वंद्व सुरू झालं .. मन बोलत होतं ते बुद्धीला पटेना ..बुद्धीचा विचार मनाला पटेना .. मन काही थाऱ्यावर नव्हतं .. जाऊया का बघायला .. पण कसं वाटेल ते .. कोण काय विचार करील ..

श्याssss ... जाऊदे जातोच .. परत एकदा स्वत:च्या डोळ्याने खात्री करतोच .. मोठी हिंमत एकवटून तिच्या रूममध्ये गेलो ..तिचे बाबा बाजूला बसले आहेत.. म्हणजे तीच आहे ही .. मग या अवस्थेत कशी काय .. ती माझ्या सोबत कितीही वाईट वागली तरी हे वेडे मन तिला या अवस्थेत बघू शकत नव्हतं .. काहीही झालं तरी माझं पहिलं प्रेम आहे ती .. जीवापाड प्रेम केलेलं मी तिच्यावर .. इनफॅक्ट अजुनही मनाच्या एका कोपऱ्यात तीचं प्रेम अजुनही जपून ठेवलंय मी .. 

लग्न केल्यावर बायको आल्यानंतर तिच्यावरचं प्रेम मी मनाच्या एका कोपऱ्यात बंदीस्त करून ठेवलेलं .. बायकोवर अन्याय नको व्हायला .. बायकोचाही अधिकार आहे माझं प्रेम मिळवण्याचा .. बस ठरवलं मग , आता तिची आठवणही काढायची नाही .. तिची आठवण येऊ नये म्हणून तर मी ते शहरही सोडलं .. या नवीन शहरात येऊन संसार मांडला .. तरीपण तिला नाही विसरू शकलो .. 


मला आजही आमची ती शेवटची भेट अजुनही लख्ख आठवतेय .. त्याच आमच्या नेहेमीच्या बागेत तिनेच काॅल करून मला भेटायला बोलवलेलं .. मी तिच्या आवडीचं डेअरी मिल्क सिल्क घेऊन तिला भेटायला गेलेलो ..बघतो तर काय , मॅडम माझ्या आधी हजर.. नेहमी उशीरा येणाऱ्या मॅडम आज चक्क लवकर कशा उगवल्या .. भेटीसाठी फारच अधीर झाली वाटतं ..  मी हळूच मागून जाऊन तिला भो केलं .. पण नो रिॲक्शन .. एरवी मी असं घाबरवल्यावर सरळ मिठीत यायची घाबरून .. आणि मग मला लटके लटके रागवायची मी घाबरवलं म्हणून ..

तिचा चेहरा पण उतरलेला दिसला मला .. डोळेही सुजलेले तिचे ..

काय गं काय झालं , तब्येत बरी नाही का तुझी .. मी तिला विचारले ..

नाही मी बिलकुल ठीक आहे .. आता माझी काळजी करायची तुला अजिबात गरज नाही .. ती एकदम रुक्षपणे उत्तरली ..

सोना काय झालं .. माझं काही चुकलं का .. की माझा कसला राग आलाय तुला .. सांग गं राणी .. माझं मन घाबरतंय .. काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटतंय सारखं .. मी बोललो तिला ..

हे बघ अनय , ही आपली शेवटची भेट आहे असं समज .. आणि यापुढे मला भेटायचा ,माझ्याशी बोलायचा अजिबात प्रयत्न करू नकोस तू .. 

उर्वी राणी काय झालंय तुला तु अशी का बोलतेय .. मला काही समजेना .. मला समजेल असं बोल गं ..

अनय , मी लग्न करतेय .. बाबांनी चांगलं अमेरिकेतलं स्थळ आणलंय .. त्यांना मी पसंत आहे .. मी पण माझी पसंती कळवलीये .. पंधरा दिवसात आमचं लग्न होऊन मी अमेरिकेला निघून जाणार आहे कायमची .. तेव्हा आता तू मला विसरून जा .. यातच आपलं भलं आहे ..


माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली हे ऐकून .. कुणीतरी माझा जीव काढून नेतंय असं वाटलं मला .. 

नको गं सोना .. नको अशी थट्टा करूस .. तुला माहिती आहे ना मी कल्पनेतही तुझा विरह सहन नाही करू शकत ..

अनय , मी बोललेला एकून एक शब्द खरा आहे ..आपण एकत्र न येणं हेच आपलं भविष्य आहे .. तु सावर स्वत:ला .. आणि सत्य स्विकार कर ..

अगं असं कसं बोलू शकतेस तू .. तुझ्या बाबांना तर आपलं नातं मान्य होतं ना .. मग अचानक असं काय झालं की त्यांनी दुसरं स्थळ आणलं ..

बी प्रॅक्टिकल अनय .. प्रेम वगैरे सर्व झूट असतं .. पैसा हाच खरा असतो .. बाबांनी पण प्रॅक्टिकल विचार केला .. आणि मलाही तो विचार पटलाय ..तू अजून सेटल नाहीस .. कधी सेटल होशील माहित नाही .. मला अशी भगवान भरोसे लाईफ नाही जगायची .. आणि तुझ्यासोबत राहून माझी स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत .. तेव्हा आपण वेगळं झालेलंच योग्य ठरेल आपल्यासाठी ..

मी किती समजवायचा प्रयत्न केला पण उर्वी बधली नाही .. ती तिच्या निर्णयावर ठाम होती .. शेवटी ती निघून गेली .. मागे वळून एकदाही बघितलं नाही तिने .. एवढ्या वर्षांचं प्रेम कशी काय एका क्षणात विसरून गेलीस उर्वी ..तू ती उर्वी नाहीसच जिच्यावर मी प्रेम केलं होतं..

त्यानंतर देखील मी तुला संपर्क करायचा किती प्रयत्न केला .. पण तु मला सगळीकडे ब्लाॅक केलेलंस .. तुझ्या घरी पण गेलो होतो पण तुमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही अमेरिकेला निघून गेलात ..

किती सहजपणे तु मला विसरलीस गं .. पण मी अजूनही तुला विसरू शकलो नाही ..

उर्वीच्या बाबांची आणि माझी नजरानजर झाली .. अरे अनय , कसा आहेस .. आणि तू इथे कसा काय .. उर्वीच्या बाबांनी मला विचारलं ..

मी सगळ खरं सांगितलं की बायकोला डिलिव्हरीला घेऊन आलोय .. 

अरे वा .. खुप छान वाटलं ऐकून तू आयुष्यात तिथेच न थांबतां पुढे गेलास .. उर्वीचे बाबा म्हणाले ..

उर्वी इथे कशी .. आणि या अवस्थेत कशी काय .. मी विचारले 


तु पुढे गेलायस आयुष्यात .. आता तुला खरं खरं सांगायला काहीच हरकत नाही .. उर्वीचं लग्न झालंच नव्हतं .. तिला तर ब्रेन ट्यूमर झालेला .. तिच्या हातात फार फार तर दोन वर्षे आयुष्य होतं .. आणि तिला तुझं आयुष्य तिच्यामुळे खराब करायचं नव्हतं .. त्यामुळे तिने ते लग्नाचं नाटक केलं .. जेणेकरुन तू तिचा राग करावा .. आयुष्यात तिच्यासाठी न थांबतां पुढे जावं .. ती हे जाणून होती की तुला जर खरं समजलं तर तू काहीही विचार न करता तिची साथ देशील .. तिला तुला खुश बघायचं होतं .. तुझी खुशी तिच्यासोबत राहण्यात नव्हती तर तिच्यापासून दूर जाण्यात होती .. 

कुणी ठरवलं हे की मी तिला सोडून खुश राहीलो असतो .. बाबा , ती तर माझा प्राण होती हो मग कुणी आपल्या प्राणाशिवाय कसा काय जगू शकतो .. खुप वाईट वागली उर्वी माझ्यासोबत .. माझं प्रेम कळत होतं तर माझं मन का नाही कळलं तिला .. 

अनय बाळा कदाचीत नियतीच्या मनात हेच होतं .. म्हणूनच नियतीने आज तिला तुझ्या पुढे अशा अवस्थेत आणून उभं केलंय .. कदाचीत नियतीनेच ही तुमची शेवटची भेट नियोजीत केली आहे .. बेटा , उर्वीच्या हातात वेळ खुप कमी आहे रे .. 

बाबा , उर्वीला शुद्ध येतेय .. मला तिला भेटायचं .. तिला जाब विचारायचाय का असा एकतर्फी निर्णय घेतलास .. मी जातो तिच्याकडे ..

उर्वीने डोळे उघडले .. डोळे निस्तेज झालेत तिचे .. तरीपण मला बघून तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय .. तिला बोलायला देखील किती त्रास होतोय .. 

उर्वी .. नको बोलूस सोना .. त्रास होईस तुला .. मला सांगितलं बाबांनी सर्व .. तु खुप निस्वार्थी प्रेम केलंस गं राणी .. मीच तुला ओळखू शकलो नाही गं.. तु सांगितलं आणि मी लगेच विश्वास ठेवला .. मीच कमी पडलो गं तुला ओळखायला ..माझी उर्वी मला दुखावण्याचा स्वप्नातही विचार करणार नाही .. 

बाबा ,उर्वीला काय होतंय .. डाॅक्टर ला बोलवा .. तिचा श्वास मंदावतोय .. डाॅक्टर डाॅक्टर .. लवकर या .. प्लीज .. बघा नं उर्वी अशी काय करतेय ..

तिला चेक केल्यावर डाॅक्टर बोलले , शी इज नो मोर ...

नाही .. माझी उर्वी अशी मला सोडून जाऊच नाही शकत .. मी बाबांना मिठी मारून रडू लागलो ..

अनय बाळा .. कदाचीत तुला शेवटचं भेटायची तिची ईच्छा होती .. ती पूर्ण झाली .. आणि समाधानाने तिने प्राण सोडलेत ..

तेवढ्यात सिस्टर आत आली ..

मिस्टर अनय .. अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली .. 

बाबा , आपली उर्वी परत आली .. आपली उर्वी खरंच परत आली ..


समाप्त ..


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance