Prajakta Waghmare

Horror Thriller

2  

Prajakta Waghmare

Horror Thriller

सवत (भाग 1)

सवत (भाग 1)

4 mins
82


     संध्याकाळचे सहा वाजले होते निषाद आपल्या घरी आपल्या नवीन पत्नीला घेऊन पोहचला ,त्याची आई दरवाजात गृहप्रवेशाची सर्व तयारी करून त्यांची वाट पाहत उभीच होती,निषादआणि निषादची बायको आरती कार मधून उतरतात आणि घराकडे येऊ लागतात,घराच्या आजूबाजूला बरीच शांतता होती,आजूबाजूला छान सुंदर अशी रोपं होती आणि त्यांना सुंदर सुंदर फुले देखील आली होती,आरतीला आजूबाजूचे वतावरण पाहून बराच आनंद झाला,निषाद तिला घेऊन दारात आला,आई आरतीचे ताट घेऊन उभी होती,आरती जशी उंबरठ्यावर आली तसेच पाठीमागची सर्व झाडे झुडपे हलायला लागली,काही फुले आपोआपच गळून पडायला लागली,ती घाबरली तिला घाबरलेले पाहून निषाद तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो

    " अग घाबरतेस काय,वाऱ्याची झुळूक फार जोरात आली आहे ना,म्हणून सर्व हलायला लागले आहे,यात काही नवीन नाही असे रोजच घडते येथे",हो ना ग आई".

   " हो तर,आता आम्हाला तर बाई सवय झाली आहे,म्हणून आम्ही नाही घाबरत,तू नवीन आहेस ना तुला ही होईल सवय हळूहळू ", ये चल आरती करून घेते घरात ये आरती

निषाद ची आई जशी आरती करायला जाते तशी आरती विझून जाते, आरती पुन्हा थोडी घाबरते

     " अग ही आरती तेलाची नि वातीची आहे ती विझनारच ",पण तू नको हा घाबरून विझून जाऊ

    निषादची आई हसत हसत वातावरण थंड करायचा प्रयत्न करते...निषाद आणि आरती घरात येतात,प्रवास करून थकल्याने दोघे ही फ्रेश होऊन आराम करायला जातात,आरती बाथरूम मध्ये जाते तर तिला बाथरूम मध्ये एक आरसा दिसतो,आरसा खूप वेगळा असतो,खूप वेगळ्या पद्धतीने त्याला सजवलेलं असतं,आरती खूप वेळ त्या आरश्यात पाहतच राहते,बराच वेळ आरती बाहेर येत नाही म्हणून निषाद दरवाजा ठोठावतो,त्या आवाजाने आरती भानावर येते आणि आलेच म्हणून फ्रेश होऊ लागते,आरती फ्रेश होते आणि रूम मध्ये येऊन बसते...

       आरती आणि निषाद इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागतात,गप्पा मारता मारता निषाद आरतीचा हात हातात घेतो,तो जसा तिचा हात हातात घेतो,तोच त्याला जोराचा झटका बसावा तसा झटका बसतो आणि तो पाठी ढकलला जातो.

      "काय झालं निषाद,असा झटका लागल्यासारखा का पाठी सरकला",

      "अ काही नाही ", निषाद काही न बोलता तिथून निघून जातो...

       रात्री निषादची आई जेवणाची सर्व तयारी करते आणि जेवणाच्या टेबलवर ते दोघे मिळून आरतीची वाट पाहत असतात,इतक्यात आरती येते,जशी आरती जिन्यावरून खाली उतरत असते,तसे निषाद आणि त्याची आई आरती कडे एकदम आश्चर्याने पाहू लागतात,कारण आरती एकदम वेगळ्या अवतारात आलेली असते,एखाद्या दक्षिणात्य बाई सारखा पोशाख तिने परिधान केला होता...तिच्या चालण्यात ही एक वेगळीच लकब दिसून येत होती,पायात भले मोठे पैंजण घालून ती ते पैंजण वाजवत येऊन टेबलवर बसते...निषाद तिच्याकडे पाहतच राहतो

      " असा का पाहतोयस,पहिल्यांदा पाहतो आहेस का मला", आरती त्याला एकदम प्रेमाने विचारते

 

     "अ अ आरती हे काय आहे तू अश्या अवतारात का आली आहेस,म्हणजे तुला तर हे सर्व आवडत नाही ना", निषाद तिला एकदम खालच्या आवाजात विचारतो

"काय मला आवडत नाही,अर्रे पण मी तर अशीच तर राहते आधीपासून आणि तुला पण म्हणूनच तर नव्हते का आवडले", आरती बोलत असते तर तिचा बोलण्याचा टोन ही बदलेला असतो...

    निषादची आई तिचे ते रूप पाहून निषाद ला बोलते

"अर्रे निशू ही तर अगदी तिच्या सारखी वागतेय",

  "आई तो विषय नको",

त्या दोघांचे बोलणे ऐकून आरती त्यांना विचारते

     

    "तिच्यासारखी म्हणजे कोणासारखी",

"काही नाही घे ना तू जेवायला घे,थकली असशील ना,जाऊन आराम पण करायचा आहे", निषाद तिचे लक्ष दुसऱ्या गोष्टीत वळवतो

    आरती जेवायला घ्यायला जाते,आणि जेवणावरचे ताट उघडते आणि जेवणाचे भांडे रागात फेकून देते...

निषाद आणि त्याच्या आईला काही कळत नाही की आरतीने असे जेवन का फेकून दिले..

     "आरती काय झालं,तू अस जेवण का फेकून दिलेस", निषाद तिला ओरडून विचारतो

   " ये,माझ्यावर अस ओरडायचं नाही हा,मला आवडत नाही, आणि जेवण का फेकलं म्हणजे ,हे असलं घासफूस चे जेवण खात नाही मी, मला नॉनव्हेज पाहिजे ",

     आरतीला नॉनव्हेज मागितलेलं ऐकून निषाद झटकन  जागेवरून उठतो,त्याला धक्काच बसतो,कारण आरती शाकाहारी असते,तिने आजपर्यंत कधी मांसाहार केलेला नसतो,त्याला आणि त्याच्या आईला काहीच कळत नाही की आरती असे का वागत आहे.

    आरती आपण उद्या आणू नॉनव्हेज आज हेच खा, निषाद तिला समजवायला जातो,तर आरती अजूनच जास्त चिडते

   " सांगितलेले कळत नाही का तुला,जा आताच मला नॉनव्हेज हवंय,तुझ्या आईने फ्रिज मध्ये चिकन ठेवलं आहे ते आणून दे मला ",

  " पण तुला कसे कळलं की मी चिकन आणून ठेवलं आहे", निषादची आई तिला प्रश्न विचारते

"मला कळणार नाही,माझ्या फेव्हरेट हॉटेल मधून तू ते चिकन मागवलं आहे,मला वास आला आहे मी ओळखणार नाही का", आरती हे असे काय बडबडत आहे हे काही त्यांना कळायला मागत नसते,निषादची आई जाते आणि तिला ते चिकन आणून देते,आरती ते चिकन कधी न जेवण मिळाल्यासारखे जणू काही किती दिवसांची उपाशी आहे अशी खाऊ लागते...निषाद आणि त्याची आई तिच्याकडे पाहतच राहतात,इतक्यात आरतीला ठसका लागतो,निषाद तिला पाणी देतो आरती पाणी पीते,आणि आपल्या ताटाकडे पाहते आणि एकदम घाबरून उठते आणि ते ताट दूर करते आणि निषाद वर ओरडते

     "निषाद ,हे काय,तुला माहीत आहे ना मी शाकाहारी आहे,आणि तरी देखील तू मला नॉनव्हेज खायला दिले आहे....आणि हे काय

आरती स्वतःकडे पाहते ,ही साडी बांगड्या ,हे सगळं काय आहे",

   

    "अग पण हे सगळं तर तू स्वतःच्या मर्जीने केले आहेस, - निषाद

   "काय माझ्या मर्जीने,पण मी का करेन असे जेव्हा की मला हे सर्व आवडत नाही ",

     दोघांचे एकमेकांना प्रश्नोत्तरे सुरूच असतात,इतक्यात आरती चक्कर येऊन खाली पडते,निषाद आणि त्याची आई घाबरते.

     

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Prajakta Waghmare

Similar marathi story from Horror