Vilas Yadavrao kaklij

Horror Fantasy Thriller

2.2  

Vilas Yadavrao kaklij

Horror Fantasy Thriller

स्वप्न

स्वप्न

4 mins
179


सॅटॅलाइट नंबर टू ? फोर टू ;फोर टू फोर सॅटॅलाइट लँडिंग !

मेसेज ओहर . ओके . सॅटॅलाइट नंबर टू कॉन्टॅक्ट सॅटॅलाइट नंबर थ्री प्लीज !मेसेज ओहर ! अॅड कंट्रोल ऑल टाइप्स ऑफ डी सॅटॅलाइट . याप्रमाणे मी मून नंबर टू वर आहे . तेथे असलेल्या ऑफिसमधून मी कमांड दिल्या . आणि सारे माझ्या अंडर करून मेसेज दिला . की जवळी ज मूनवर विशिष्ट प्राण्यांचा वावर व ताबा आढळून आल्यामुळे मला विशिष्ट पद्धतीने सॅटलाईट लॉन्च करून तेथे ताबा मिळवायचा होता . त्यामुळे मी क्षेपणास्त्र असलेली सॅटॅलाइट तेथे असलेल्या विशिष्ट प्राण्यांची प्रजाती नष्ट करून मला ताबा घ्यायचा होता . तेथे हालचाल दिसल्यानंतर सॅटॅलाइट लँडिंग करण्यात येणारे अडथळे आणि रडारवर येणारी संकेत यावरून असे दिसून आले की आपल्या पेक्षा मून नंबर सिक्स वर असलेली जमात अतिशय पावरफूल असून त्यांच्या कक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचं सॅटॅलाइट किंवा मेसेज तेथे पोहचत नाही . मी आज सर्व रोबो सिस्टीम एकत्र केली आणि काही तासाच्या आत त्या वर ताबा घेण्यासाठी मी 24 तासाची मुदत दिली . आणि त्याप्रमाणे कारवाया सुरू होत्या . पण .काही क्षणात एक विशिष्ट प्रकारची आकृती आमच्या रडारवर दिसली आणि काही सेकंदात ती आमच्या मून नबंर थ्री या वरिल निर्जनस्थळी उतरली . तीस / पस्तीस मिनिटात आमची यंत्रणा त्याभोवती गस्त घालत त्यावर नियंत्रण मिळवले . मात्र त्यांनी पाठवलेले संदेश आमच्या रडारवर त्या प्रकारची भाषा उपलब्ध नसल्या कारणाने ते काय संदेश देत होते ते आम्हाला कळत नव्हते . व आम्ही  दिले जाणारे संदेश त्यांना कळत नव्हते . इतर यंत्रणा मार्फत परग्रहावर असणाऱ्या प्राण्यांची भाषा व आमची भाषा किंवा संकेत एकमेकांना कळू शकत नसल्याने कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण होत नव्हती .व रोबोट यंत्रना कोणत्याही प्रकारचे संकेत लावू शकत नव्हती . तेंव्हा मात्र आमच्याकडील रोबोटने त्या उतरलेल्या सॅटॅलाइट मधील एका प्राण्याला आमच्या सत्र यंत्रणेमध्ये टाकले . त्या प्राण्यांच्या व त्यांच्या आवाजाद्वारे बाहेर पडणाऱ्या वेव्ह नुसार एक सांकेतिक भाषा तयार केली . व त्याचे रूपांतर करून आमच्यापर्यंत संदेश पोहोचला . थोडं आश्चर्य वाटलं की त्यांच्या बाजूला असणारे दोन ग्रहांवर विशिष्ट प्रकारचे प्राण्यांचा प्रादुर्भाव त्यांना त्रास देत होता . व ते आमच्याकडे मदत मागण्यासाठी आली होती . आमच्याकडे अण्ण' पाणी आणि खाद्यपदार्थ ज्या पद्धतीने आमचं जीवन चरित्र किंवा पोषण चालू होते . त्या पद्धतीने त्या प्राण्यांचे नव्हते .ते फक्त वातावरणात हवेमध्ये असणारा प्राणवायू घेऊन त्यापासून शरीरामध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया घडून येत होती .त्यामुळे ते काही तासापेक्षा जास्त वेळ येथे राहू शकत नव्हते . व आम्ही इतर ग्रहांवर जास्त वेळ राहू शकत नव्हतो . मात्र आमच्या यंत्रणेने आमच्या ग्रहावर विशिष्ट प्रकारची यंत्रणा निर्माण करण्याचे ठरवले .त्या यंत्रणेतून मी असा विशिष्ट प्रकारचा रोबोट तयार केला . कि हे रोबोट यंत्र नाव आजूबाजूच्या सॉलिड , लिक्विड , गॅसेस या तीनही घटकांवर प्रक्रिया करून एनर्जी तयार करतात व ती जगतात .मी त्यांना सांगितलेलं कार्य ते पूर्ण करत होती . त्याप्रमाणे आज अचानक मी माझ्या मून नंबर 3 वर फेरफटका मारत असताना मी आमच्या 'मों ' वर साधारणता वन हंड्रेड पार्ट केले होते . व प्रत्येक पार्ट एक यंत्रणेला जोडलेला होता . त्या पार्ट मध्ये असणारे सगळे प्राणी एका पार्ट मध्ये घेऊन जाऊ शकत नव्हते . मात्र विशिष्ट देवाण-घेवाण चालू असत .अशाच एका पार्ट मध्ये आम्ही तयार केलेल्या रोबोट यंत्रणेत मात्र यंत्रणेने दिलेल्या आज्ञा स्वीकारणे व कार्य करणे . याविरुद्ध प्रोटेक्शन तयार केले व ती स्वतःच्या आज्ञा देऊ लागले आणि प्रत्येक पदार्थ हा स्वतंत्र कार्य करू लागला . तेंव्हा मात्र मी तयार केलेली यंत्रणाच माझ्याविरुद्ध वागते . उद्या यंत्रणेमध्ये असणारे विशिष्ट प्रकारचे प्रोटेक्शन मोलेक्युल्स मी डिस्ट्रॉय करण्याचे ठरवले .त्या सिस्टीम मधून विशिष्ट प्रकारचे व्हायरस तयार झाले .व सर्व यंत्रणा बंद पाडू लागल्या . याचा परिणाम असा झाला की साधारणता वीस-बावीस तासामध्ये सारी रोबोट यंत्रणा पडली . सर्व प्रकारे ही स्थिती निर्माण झाल्यामुळे व अशा प्रकारचे गॅसेस आणि व्हायरस हे आमच्या सगळ्या प्रकारची घटक व यत्रंणा नष्ट होण्यास सुरुवात झाली . तेंव्हा मात्र मी माझे सॅटॅलाइट पूर्वीच लँड केले बरे .मी माझे काही सहकारी यांचेसह सॅटॅलाइट लॉन्च केले साधारणता सहा महिन्याच्या कालावधीनंतर आम्हाला एक विशिष्ट प्रकारचा ग्रह दिसला . त्यावर आमच्या सारखे प्राणी व विशिष्ट प्रकारच्या जागी पाणी ;हिरवळ , काही प्रकारचे प्राणी : आमच्या रडार यंत्रणेतून सॅटॅलाइट मध्ये नजरेस पडली .व पाण्याच्या मध्ये असणाऱ्या विशाल महाकाय सपाट पृष्ठभागावर आमचं सॅटॅलाइट स्थिरावला . तेथून आम्हाला पाण्यावर तरंगताना एक प्रकारचे जहाज दिसून आले . त्यापैकी एक छोटीशी आकृती आमच्याकडे येताना दिसली तेंव्हा ती एक प्रचंड भूभाग हा पाण्यावर तरंगत आमच्याकडे येताना दिसला . तेव्हा आमच्या रडार यंत्रणेने विशिष्ट संकेत देऊन माहिती प्राप्त केली . व त्यावर असंख्य प्रकारची प्राणी आहेत जेंव्हा मी उतरलो आणि समोर बघितलं आणि त्या प्राण्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला . तेंव्हा अचानक एक स्फोट झाल्याचा आवाज आला आणि मी अचानक सॅटेलाईट मधून खाली पडल्याचा आवाज आला . डोळे उघडले तेंव्हा मी एका माध्या घरा मध्ये कॉट वरून खाली पडलो होतो . जाग आली तेंव्हा वाटले . की मला एक स्वप्न पडले होते .व मी ते सारे स्वप्न बघत होतो .आणि स्वप्नातून जागा झालो होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror