सुनसान वाट
सुनसान वाट
सकाळ झाली की आईची आवरा आवर सुरु होती. बाबांचा डबा, मला शाळेत घेऊन जायला डबा, रोजच्या प्रमाणे तीची धावपळ चालू होती. काम आवरून स्वतःची भाकरी शिदोरीत बांधून शेतावर जायला घाई करत होती.आमची पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करत होती. त्या मुळे वेळेवर जाण खूप गरजेचं होत. घरा बाहेर काही स्त्रियांची वळवळ सुरु झाली.आईची वाट पहात उभ्या होत्या, डोईवर दुपारच्या जेवणाची पिशवी आणि काखेत पाण्याचा कळशी. मी घरच्या परसात घुटमळत खोटं खोटं शाळेला जायची तयारी करू लागलो जसं, आईने घराला कुलूप लावला मी खिडकीतून दप्तर आत टाकला आणि ज्या वाटेवरून आई जाणार होती त्याच वाटेवर जाऊन आईच्या आधी आईची वाट पाहू लागलो. सोबत असलेल्या स्त्रियांनी मला पाहून आईकडे नजर फिरवली. आई मनातच हसली कारण, तिला माहित होतं की मी सांगितलं तरी हा शाळेला जाणार नाही. कारण मी तेंव्हा बाबांनाच घाबरत होतो. पण, ते सकाळी सात वाजताच आपल्या कामावर निघून गेले होते. ते तालुक्यात असणाऱ्या खाजगी कारखान्यात कामाला होते, संध्याकाळी सात वाजताच परत यायचे. पण माझी आई कधीच माझ्यावर ओरडली नाही. कारण, मी तिची लाडाची परी होतो ना. मी हे माझ्या "आईची परी" हो आईची परीच होती मी.चार भावंडा नंतर आईला मुलगी पाहिजे म्हणून मला गर्भात वाढवलं पण झालो मीच शेवटी आईने आपला हट्ट मात्र सोडला नाही. माझं नाव शाळेत दाखल करेपर्यंत माझं मुली प्रमाणेच संगोपन केलं म्हणून मी माझ्या आईची परी. असो,आईने माझा हात धरून ओढत चाली होती.मी तो हात कसाबसा सोडून एकटाच चालायला लागलो. चारी बाजूनी हिरवी गार झाडें. किड्यांचा किर किर आवाज तो फक्त मलाच ऐकू येत होता.
ज्या स्त्रिया पुढे होत्या त्या आपापसात बोलत चालल्या होत्या किड्यां पेक्षा त्यांचाच जास्त आवाज येत होता आणि मी एकटाच त्यांच्या मागून चालत होतो. हातात काठी घेऊन झाडांच्या कोवळ्या फांद्या तोडत चालो होतो.मग आम्ही सगळे शेतावर पोहचलो, तेंव्हा ऊस लागवडीचं काम सुरू होत. आई आपल्या कामात व्यस्त झाली. ज्या शेतात आई काम करत होती, त्या मालकानं आईला ओरडून बोला! मुलाला कशाला आणलाय सोबत. शाळेला पाठवून द्यायचं ना? सकाळी घरी झालेला प्रकार त्या स्त्रियांनी त्या मालकाला सांगितला आणि कामाल सुरवात झाली. मी पूर्ण दिवस त्या शेत मालका सोबत उसाला पाणी लावणे, म्हश्या परतून आणणे, ऊस दोडलेले नेऊन त्या स्त्रियांकडे नेऊन देणे असं काम करून दिवस काढला. सांज व्हायला आली. पण, माझ्या आईची रांग अजून बाकी होती. म्हणून आईने बाकीच्या स्त्रियांना तुम्ही जा मी एवढं संपवून येतो. असं म्हणून आई एकटीच काम करत बसली. शेत मालक पण जाताना आईला सांगून गेला.आईने मी सोबत आहे म्हणून त्यांना पण पाठवून दिलं. आईला काम संपवण्याच्या नादात वेळेच भानच राहिलं नाही अंधार व्हायला आला. मला भीती वाटू लागली.आई मला धीर देत काम आटोक्यात आणत होती. जसं जसा सूर्य मावळतीला दिसू लागला तसं तसा माझा चेहरा ही काळपट पडू लागला आणि धोड्याच वेळात आईच हातातले काम संपले आणि आम्ही डबा घेऊन घरी जायला निघालो. आता तर पूर्ण अंधार झाला होता. चांदण्याच्या प्रकाशात आम्ही जंगल चालू लागलो. जंगली प्राण्यांचा आवाज हळू हळू माझ्या कानात घुमू लागला भीतीने अंगाला काटा येऊ लागला. रात किडे किर किर करायला लागले. वाराच्या झोकात झाडांच्या पानाचा आवाज येत होता. ज्या वडाच्या झाडाची गोष्ट ऐकून माहित होतं आणि एकदा आईनेच सांगितलेल होतं. ते वडाच झाड याचं वाटेवर होतं. माझ्या अंगाला धरकांप उठला पण, आईने मला जवळ घेऊन मला धीर देत म्हणाली. बाळा घाबरू नको आणि काहीही झालं तरी माग वळून पाहू नको. देवाचं नाव घेत सरळ चालत रहा.आई माझ्याशी बोलतना आई पण त्या वेळेला घामा घूम झाली होती.आईच्या काळजाचे ढोके वाढत होते जसं जसं ते वडाच झाड जवळ येत होतं. तस तसं आमच्या चालण्याचा वेग वाढत होता.
आईकडे पाहून मला पण भीती वाटत होती पण आईने आधीच ताकीत दिल होत की रडायचं नाही म्हणून आणि त्या वाटेवर आम्हा दोघांन शिवाय जवळ कोणचं नव्हतं. कारण त्या झाडाखाली सात वाजले की भूत खेळायला यायचे असं म्हणतात आणि ते एकाने पाहीलं होत म्हणे. त्याने तर गावभर पसरलं होतं. जसा वड जवळ आला आईने मला खांद्यावर उचलून घेतलं आणि डोळे मिटवायला सांगितले आणि माग अजिबात पाहू नको असं म्हणून तिने आपला पदर माझ्या अंगावर पांघरला मी घट डोळे मिटून शांत तसात झोपलो. वडाच्या काही आधी अंतरावर एक काळ मांजर तिथून पळून गेल. अरे देवा भगवाना असं उद्गार आईच्या तोंडून निघालं. आई मात्र तसंच पुढं चालत राहिली.आई देवाचं नाव घेत चालू लागली. वड जवळ आला आईने मला घट्ट मिठी मारली आणि बाळा रडू नको हां, मी आहे इकडचं. हे काय,आलच आपलं घर मला असं बोलून ती स्वतःलाच धीर देत होती. मी पण आईला घट्ट मिठी मारली आता घरी गेल्यावरच सोडावी या विचाराने तसाच झोपलो. पण सुदैवाने आम्ही सुखरूप घरी पोहचलो आणि घरा बाहेर मी शाळेला गेलो नाही म्हणून बाबाचा पारा वर चढला होता. हातात मला मारण्यासाठी छत्री घेऊन उभं होते. जेंव्हा आईने सांगितलं तेंव्हा त्या वाटेवरून आम्ही सुखरूप घरी आलो याचा आनंद बाबांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बाबानी मला जवळ घेऊन मिठी मारली आणि आईला म्हणाला की, माझं पोर घाबरलं असेल त्याला विळा तापवून गरम पाणी दे. मी रात्र भर आईच्या कुशीत झोपून राहिलो आणि दुसरे दिवशी बाबांनी मला हाताला काळा दोरा बांधला आणि मी शाळेला गेलो.
आईच्या प्रेमात जितकी ताकत असते ना, तितकी ताकत देवाकडे पण नसते.

