Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Dhiraj Loke

Drama Romance


2.0  

Dhiraj Loke

Drama Romance


स्पर्श

स्पर्श

3 mins 563 3 mins 563

ट्रेनला आज नेहमीपेक्षा तुरळक गर्दी होती. ध्रुव आज नेहमीपेक्षा लेट आल्यामुळे समोर येईल तो डबा पकडून ट्रेनमध्ये चढला.


दरवाजाच्या बाजूला मोकळी जागा असल्याने एका बाजूला निवांत उभं राहू या विचाराने तो तिथेच उभा राहिला. एक दोन स्टेशन गेल्यावर अचानक का कुणास ठाऊक ट्रेनला गर्दी झाली. अजून बरेच स्टेशन जायचे होते त्यामुळे ध्रुव थोडं सावरूनच उभा राहिला. अचानक “ती” तिच्या नातेवाईकांसोबत डब्यात चढली. गर्दी अचानक वाढल्याने त्यांना आतमध्ये जाता आले नाही. थोडी बिचकून आणि पुरुषी नजरा वाचवत ती उभी राहिली. पुढच्या स्टेशनला गर्दी वाढल्याने ती जरा जास्तच अवघडली. तिचं अवघडलेपण एव्हाना ध्रुवच्या लक्षात आलं होतं.


पण गर्दी वाढत असल्याने आहे त्या जागेत ऍडजस्ट करून उभं राहण्यापेक्षा तो जास्त काही करू शकत नव्हता. गर्दीच्या लोंढ्याने ती आणि तिचा नातेवाईक मध्येच अडकले होते. “लेडीज है जगह दो” असा आवाज कुणीतरी एक-दोनदा दिला पण ट्रेन खचाखच भरलेली असल्याने कुणीच जागचं हलत नव्हतं. एव्हाना गर्दीमुळे ढकलत ती ध्रुवच्या अंगावर आली. जोर लावून गर्दीला थोपवायचा अयशस्वी प्रयत्न ती करीत होती. तिची आगतिकता पाहून तिला काहीतरी मदत करावी म्हणून ध्रुव अजून अंग चोरून उभा राहिला. तिला आपला स्पर्श होतोय त्या स्पर्शामुळे स्त्री सुलभ लज्जेने ती अवघडलीय तो अवघडलेपणा दूर करण्यासाठी ध्रुव आटोकाट प्रयत्न करत होता.


काही वेळात गर्दी अजून वाढली काही हावरट पुरुषांनी गर्दीचा फायदा घेऊन तिच्या अंगचटीला यायचा प्रयत्न केला हे तिच्या लक्षात आलं होतं पण त्याच वेळेला “एक पुरुष” तिला आपला स्पर्श होऊन अवघडलेपणा येऊ नये यासाठी अंग चोरून उभा राहत होता हेही तिला जाणवलं होतं. खरं तर एखाद्या व्यक्तीची नजर किंवा स्पर्श अचूक ओळखण्याची देणगी निसर्गाने स्त्रीला दिलीय. काही वेळातच ती थोडं थोडं ध्रुवच्या दिशेने सरकू लागली आणि आता तिचा स्पर्श ध्रुवला स्पष्टपणे जाणवत होता.


इतर पुरुषांच्या नजरा आणि स्पर्शामुळे आलेलं तिचं अवघडलेपण तिला ध्रुवच्या दिशेने सरकायला भाग पाडत होतं. एका क्षणानंतर ती पूर्णपणे ध्रुवच्या छातीवर विसावली. ध्रुव अजूनही तिला कमीत कमी स्पर्श व्हावा यासाठी धडपडत होता. ती मात्र एव्हाना इतर वासनांध पुरुषी नजरा आणि स्पर्श यापासून स्वतःला लपवत स्वेच्छेने ध्रुवच्या मिठीत विसावली होती. पुढची किमान १५-२० मिनिट ती इतर वासनांध पुरुषी नजरांपासून स्वतःला लपवत दुसऱ्या एका अनोळखी पुरुषाच्या मिठीत विसावली होती.


काही मिनिटांचा प्रवास पण इतक्या कमी वेळात जाणवले ते दोन विभिन्न स्पर्श. एक जो वासनेने वखवखलेला होता त्यामुळे जरासा जरी स्पर्श झाला तरी तिला किळस वाटत होता. पण दुसरा स्पर्श ज्यात पूर्णपणे ती एका अनोळखी तरुणाच्या मिठीत विसावली होती तरीही तिला सुरक्षित वाटत होतं. कित्येकदा काही नात्यात स्पर्श होत असतो आईचा मुलांना, भाऊ-बहिणीचा, मित्र-मैत्रिणीचा पण या सगळ्यात वासना नसते त्या स्पर्शाची स्वतःची अशी एक सात्विकता असते. आजकाल खूप चांगले मित्र-मैत्रिणी हात पकडून, खांद्यावर हात टाकून चालतात, मिठी मारतात त्या प्रत्येक स्पर्शात वासना शोधणारे या प्रत्येक नात्याच्या स्पर्शाची सात्विकता कधी समजूच शकत नाहीत. एक चांगली मैत्रिण जेव्हा तिचा मित्र दुःखात असताना त्याचा हात पकडते किंवा जादू की झप्पी देते तो स्पर्श उघड्या डोळ्यांनी जरी शारीरिक वाटला तरी शारीरिक नसतो तो मानसिक असतो. एका मनाने दुसऱ्या मनाशी केलेला मुक्त संवाद असतो. कित्येकदा एखाद्या मैत्रीणीने किंवा मित्राने केलेल्या स्पर्शाचा आजूबाजूचे लोक चुकीचा अर्थ काढतात तसे त्या नात्यातील मित्र-मैत्रीणीही चुकीचा अर्थ काढतात. त्यातून निर्माण होणारे गैरसमज आणि अवास्तव अपेक्षा त्या मैत्रीला संपवून टाकतात. मी तुझा हात पकडला तेव्हा तू विरोध केला नाहीस म्हणजे माझ्या मनातील विचारांशी तू सहमत आहेस किंवा तिने माझा हात पकडला म्हणजे नक्कीच तिच्या मनात काहीतरी आहे हा गैरसमज कित्येकदा मैत्रीच नातं संपवतो.


स्पर्श भावना व्यक्त करायचं एक असं माध्यम जे सात्विकतेने वापरले तर प्रेम आणि राक्षसी मानसिकतेने वापरले तर वासना म्हणून ओळखले जाते. अगदी हक्काच्या प्रेमाच्या व्यक्तीसोबत जोडीदाराला केलेला स्पर्शसुद्धा वासनेतून असला तरी तो जोडीदाराला स्पष्टपणे जाणवतो. एक हलकासा स्पर्श लाखो शब्दांची भावना थोडक्यात व्यक्त करतो. नुकत्याच प्रेमाची जाणीव जाणीव झालेल्या जोडप्याला चालताना नुसता बोटांचा स्पर्शसुद्धा दोघांना प्रेमाची ती जाणीव अधोरेखित करायला पुरेसा असतो. प्रचंड तणावात किंवा दुःखात असताना जवळच्या मित्र मैत्रिणीने खांद्यावर ठेवलेला हात दुःख मोकळं करून हलकं करायला पुरेसा असतो.


खरखरत्या दाढीवर तान्ह्या बाळाने फिरवलेला हात बापाला बापपण जाणवून देणारा असतो. स्पर्श शारीरिक असतोच असं नाही एखाद्या नवविवाहित जोडप्याने घरातल्यासमोर एखाद्या क्षणी नजरा नजरेतून एकमेकांना केलेला स्पर्श जितका सुखद आणि बोलका असतो. तितकाच रस्त्यावर चालताना वासनांध पुरुषाची काही सेकंदासाठीची नजर एखाद्या स्त्रीसाठी किळसवाणी असते. स्पर्श एक असे माध्यम आहे जे जशी भावना असेल तशा स्वरूपात व्यक्त होते.


Rate this content
Log in

More marathi story from Dhiraj Loke

Similar marathi story from Drama