Dhiraj Loke

Romance

3  

Dhiraj Loke

Romance

पहिली नजरा नजर

पहिली नजरा नजर

4 mins
460


वैतागतच आदित्य एस. टि मध्ये .चढला.....आता सुट्टि संपलीय पुन्हा मुंबईच्या त्या गर्दित जायच ह्या विचाराने आदित्यचा हिरमोड झाला होता. बेल वाजली एस. टि. पुढे जावु लागली. एक एक स्टॅाप करत एस.टि पुढे जात होती तस उजाडत होत तसा सुर्यप्रकाश चेह-यावर पडल्याने आदित्य चा चेहरा चमकत होता. एव्हाना आदित्य ने मन रमविण्यासाठी हेडफोन लावुन मोबाइल वर गाणी ऐकायला सुरुवात केली होती. बसायला जागा मिळाल्याने शांतपणे गाणि ऐकायच सुख तो अनुभवत होता. इतक्यात एका स्टॅाप वर “ती” चढली. गेल्या अनेक स्टॅाप वर अनेक लोक चढले पण त्यावेळी आदित्यला फारस वेगळ अस काहि वाटल नव्हत. दरवाजातुन आत चढताच तीच्याकडे आदित्यचे लक्ष गेलं. गौरवर्णीय पण चेह-यावर हलकीशी पावडर लावलेली त्यामुळे चमकणारा चेहरा चटकन आदित्यच्या नजरेत भरला. अगदि कडक इस्त्रीचा फुल शर्ट पण कोपराच्या थोडा खालपर्यंत दुडलेला. काळी पॅंट आणि पायात काळे पॅालिश बुट. हा सर्व पेहराव पाहता, ती हॅाटेल मॅनेजमेंट किंवा बिजनेस मॅनेजमेंट ची स्टुडंट होती एवढ नक्कि. गाडित चढल्यावर तिने इकडे तिकडे पाहिले पण जागा कुठेच नसल्याने ती मागच्या बाजुला जावु लागली. कंडक्टर आदित्य बसलेला त्याच्या आसपास तिकिट काढत होता. ती जसजशी आदित्यच्या दिशेने येवु लागली आदित्यच्या छातीत जोरजोरात धडधडु लागल. तिथे येवुन तिने कंडक्टर ला कोण कुठे उतरणार याची जुजबी माहिती घेतली कदाचित ती नेहमीच त्या गडिने जात असावी. कंडक्टर सोबत बोलताना तिच्या कपड्यांमधल्या बिंदास्तपणापेक्षा माधुर्यच जास्त जाणवत होत. पुढचे काहि प्रवासी लवकर उतरणार होते पण तरीहि ती तिथेच थांबली. “जाऊदे इथेच थांबते” म्हणुन ती आदित्यच्या अगदि समोरच उभी राहिली. आता मात्र आदित्य मनातल्या मनात खुश होता. उठुन उभ राहुन सिट द्यावी तर "स्त्री दाक्षिण्य" वाटतय की "लोचटपणा" या Confusion मध्ये जागेवरच बसुन राहिला.

इतक्यात कंडक्टर ने आदित्य च्या बाजुच्या सिटवर बसलेल्या दोन छोट्या मुलांना सरकायला सांगुन तीला बसायला जागा करुन दिली. आता मात्र आदित्य छातीतली धडधड दुप्पटिने वाढली होती. ती तिस-या सिटवर बसल्याने तिने आधारासाठि बाजुच्या म्हणजे आदित्यच्या सिट ला हात धरला.आता तिचा हात आदित्यच्या खांद्याजवळ होता. इतका जवळ की एस. टि. जरा तरी हलली तरी तीच्या हातांचा नाजुक स्पर्श आदित्यला होईल. तिला हात पकडायला मोकळिक मिळावी म्हणुन आदित्य थोडा सावरुन बसला. तीही थोडि सावरुनच हात पकडत होती. आदित्य च्या उजव्या बाजुला खिड़की असुनही तो डाव्या बाजुच्या खिडकिकडे पाहत होता त्या निमित्तताने त्याला तीचा चेहरा पाहता येत होता. डाव्या बाजुच्या खिडकीतुन बाहेर पाहताना एखाद्या क्षणी आदित्य आणि तिची नजरानजर होत होती. इतका वेळ खिजगणतीत नसलेल्या आदित्यकडे तिही लपुनछपुन पाहत होती. तिच्या डाव्या बाजुच्या खिडकितुन तर ती पाहतच होती पण हलकिच नजर उजव्या बाजुच्या खिडकिकडे टाकत होती आणि तिथेच आदित्य आणि तिची नजरानजर होत होती. काहि वेळात आदित्य च्या शेजारी बसलेल्या व्यक्तिच्या ओळखिच्या व्यक्तिला जागा देण्यासाठि आदित्य मागे जावुन बसला. सुरुवातीला आदित्यचा हिरमोड झाला. मागच्या सिट वर बसल्यावर आदित्यच्या लक्षात आल की मागच्या सिट वरुन तिचा चेहरा अगदि सहजतेने पाहता येत होता. तिला न्याहाळताना कुणी पाहेल का ? ही भीती आता आदित्य ला नव्हती. अगदि गुलाबाचे फूल दुरुन न्याहाळावे इतक्या निर्मळ मनाने आदित्य तिचा चेहरा निरखत होता. ती गाडित चढल्यापासुन पहिल्यांदाच आदित्य तीला इतक निरखुन पाहत होता. एरव्ही तिच्या डोळ्यात असलेला "आत्मविश्वास" आदित्यशी जेव्हा नजरानजर व्हायची तेव्हा "स्त्री सुलभ लज्जेत" बदलायचा. रोखुन पाहणा-या नजरेच्या पापण्या आदित्य कडे पाहिल्यवर फडफडायच्या. निट बसवलेल केस आणि वरच्या बाजुला धरुन बांधलेला आंबाडा त्या कडक इस्त्रीच्या कपड्यांवर शोभुन दिसत होता. कपड्यांप्रमाणे तिचे केसही अगदि टापटीप विंचरलेले दोन छोटे आणि एक मोठा हेअर बॅंड लावुन केस अगदि निट बसविलेले होते. उजव्या कानाजवळच्या निट बसलेल्या केसावरुन उजवा हात अलगद फिरवताना अगदि व्यवस्थित कापलेल्या नखांना लावलेले नेल पॅालिश चमकायचे. डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ गोंदलेली आकृती नेमकी काय असेल ही उत्सुकता आदित्यला होती तर आदित्य सारखा सुंदर मुलगा आपल्याकडे पाहतोय याच मनोमन कौतुक तिला होते. पुढचे काहि तास संपूर्ण प्रवासात आदित्य ने डाव्या खिडकिकडे पहायच्या बहाण्याने आणि तीने उजवीकडच्या खिडिकडे पहायच्या बहाण्याने एकमेकांकडे पहायचा खेळ सुरु ठेवला होता. ब-याच वेळानंतर तिला खिडकिकडे बसायला जागा मिळाली आणि गर्दिही वाढली होती त्यामुळे यांच्या नजरानजरच्या कार्यक्रमात अडथळे येत होते. तरिहि कुणाच्यातरी हाताच्या कोप-यातुन आदित्य तिला न्यहाळातच होता. अन त्या कोप-यातुन आदित्यच न्याहाळण तिने पाहिल होत. आदित्य च्या न्याहाळण्याने तिचही मन शहारुन येत होत. आदित्यच्या न्याहळण्यात कुठेही हावरेपणा नव्हता. नजरेत कोणतीही वासना नसल्याने ती नजर तिला भावली होती.

पुढे गर्दि वाढल्याने यांची नजरानजर थांबली होती. आदित्य खुप प्रयत्न करुनहि तिला पाहु शकत नव्हता. मध्येच कधीतरी आदित्यला झोप लागली जेव्हा जाग आली तेव्हा डाव्या बाजुला वळुन पाहिल तर ती आदित्यकडेच पाहत होती. झोप लागली म्हणुन मनातच आदित्यने तिची माफी मागितली. कदाचित आदित्य बराच वेळ झोपला होता म्हणुन तीही थोडि रागातच होती. कारण तिचा उतरायचा स्टॅाप जवळ आला होता. स्टॅाप जवळ येताच तिने बॅग हातात घेतली आणि एक नकटा राग देत उतरण्यासाठी निघुन गेली. उतरल्यावर तिची नजरानजर व्हावी म्हणुन आदित्य धडपडत होता. पण त्यावेळी जी नजरानजर हुकली ती कायमची पुन्हा कधी या नजरा भिडतील का ? या दोघांच्या मनात जे होत ते प्रत्यक्षात घडेल का ? असे अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण करुन ते दोघ वेगवेगळ्या दिशांना निघुन गेले. ते गेले ते पुन्हा न भेटण्यासाठी....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance