Shubhangi Pathak - Joshi

Inspirational

2  

Shubhangi Pathak - Joshi

Inspirational

संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाई

2 mins
97


महिला दिन म्हटला म्हणजे डोळ्यासमोर अगदी दिग्गज महिला व त्यांचे कार्य उभे राहते. रमाबाई रानडे, डॉ. आनंदी बाई जोशी, सावित्री बाई फुले.... अश्या एक नाही तर अनेक महिला होऊन गेल्या आहेत ज्या इतिहासात अजरामर आहेत.

त्यात मुख्यत्वे नाव घ्यावेसे वाटते ते म्हणजे *संत मुक्ताबाई* ....

*हो... संत मुक्ता बाई....*

आजही नाव घेताना अभिमान वाटतो, बहिणीचे प्रेम काय असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच संत मुक्ताबाई.... 

विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृ-पितृत्व धन्य करणारी ! पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करणारी माऊली म्हणजेच आपली मुक्ताई


मुक्ताबाईच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले पाहिजे या करिता 1400 वर्ष ज्ञानाचा अहंकार बाळगणाऱ्या चांगदेवाला पासष्टीचा अर्थ उलगडून सांगतांना ईश्वरी गुरू नसल्याने ज्ञानाला धार नसते हे दाखवून आपल्यातील ईश्वरीआत्म स्वरूप उलगडून ज्ञानाच्या अहंकारातून मुक्ती देणारी ही माऊली मुक्ताई


अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी पाण्यासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्निला विझवायचे. आपल्यातील सामर्थ ओळखायला शिकवणारी मुक्ताई आदिनाथांपासून गहीणीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती, ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण ज्ञानदेवाला करून दिली. 


आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेल्या ज्ञानदेवाला ताटी उघडावी म्हणून विनवणी म्हणून ताटी चे 42 श्लोकाची रचना करणारी ही ती मुक्ताई 

ज्ञान च बंद झाले तर मग विश्वाचे कल्याण कसे होणार, उध्दार कसा व्हायचा.

मुक्ताईची तळमळ यासाठी होती की ईश्वर अंश , विष्णुस्वरूपी माझा ज्ञानदादा लोकांच्या कटू बोलण्याकडे लक्ष देत आपले कार्य करण्यापासून विन्मुख होत आहे हे बघून मुक्ताई तळमळत होती, तळमळ ज्ञानदेवांच्या जग उध्दार कार्य लोकांकडे लक्ष देत रहात आहे ही खंत लागून होती म्हणून शेवटी ती व्याकुळतेने ताटी च्या बाहेर म्हंटले,


*लडिवाळ मुक्ताबाई | जीव मुद्द्ल ठायीचे ठायी*

*तुम्ही तरुण विश्व तारा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।*


आपले कार्य, आपले ध्येय साध्य करण्यासाठी मुक्ताबाई विचारांनी अतिशय परखड होत्या.


आपल्या व आपल्या बंधूंच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या विसोबा पंतांना खेचराची उपमा देत त्यांना दंड ठोठावून विसोबांचे वागणे खरंच खेचरा सारखे होते हे उभ्या जगाने मान्य केले व त्यादिवसापासून त्यांना विसोबा खेचर हीच उपाधी जगविख्यात झाली


वडील बंधू व गुरू श्री निवृत्ती नाथ महाराज यांचे सुचनेनुसार भगवत गीतेवर भाष्य करण्यास सांगितले परंतु हे जग उध्दार कार्य घडण्यात मुक्ताईने ज्ञानदान पूर्ण होण्यासाठी मुक्ताई ने टीकाकारांच्या टिकेने व्यतीत हाणून बंदिस्त झालेल्या ज्ञानदेवांसाठी ताटीचे अभंगातून प्रबोधन करून , नैराश्याच्या ताटीतून बाहेर काढले व अवतरली ती ज्ञानेश्वरी ! तोपर्यंत ज्ञानेश्वर अवघे १५ वर्षांचे होते. मराठी साहित्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणल्या जाणार्‍या ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय "ओवी" नावाच्या एका मीटरमध्ये रचले गेले आहेत. ज्ञानेश्वरांनी ते ज्ञान प्राकृत (मराठी) मध्ये आणण्यासाठी संस्कृत भाषेत बंद केलेले "दैवी ज्ञान" मुक्त केले आणि ते सामान्य माणसाला उपलब्ध करून दिले. 

अशी ही मुक्ताई.... 

ज्यांचे नाव आजही त्याच आदराने घेतले जाते.... अशी स्त्री पुन्हा होणे नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational