शाळा अन् शाळेतलं पाहिलं प्रेम - भाग १
शाळा अन् शाळेतलं पाहिलं प्रेम - भाग १
सह्याद्रीच्या खुशीत, डोंगरांच्यामध्ये, वळणावळणाच्या रस्त्यांनी एक सुदंर गाव होतं. छोटसं होतं, पण मस्त होतं.आजूबाजूला काही किलोमीटर अंतरावर दुसरी गाव होती. त्यामुळे आजूबाजूच्या गावची माणसे यायची जायची.
गावामध्येच शाळा होती. मी बालवाडी पहिली गावीच केली. गावचे शिक्षक खूप प्रेमळ होते. आता पण कधी भेटले तर आवर्जून विचारपूस करतात. पहिलीनंतर काही कारणास्तव शिकायला बाहेर गावी गेलो. चौथी पर्यंत शिक्षण बाहेरगावीच केलं. नंतर पुन्हा गावीच आलो.पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला नंतर पण शिक्षक चांगले भेटले. थोडे कडक होते पण समजूतदार होते.
पहिली ते सहावी पर्यंत शाळेमध्ये बेंच नव्हते आता काही वर्षांपूर्वी आलेत. पोत घेऊन एकमेकांच्या मध्ये लाईन ने बसायचो. मुलींची लाईन वेगळी असायची.इयत्ता पाचवी सहावी वहीची पान पलटावी अशी निघून गेली.नंतर सातवी मध्ये बेंच होते. बेंचवर बसताना भारी वाटायचं. शाळेमध्ये 11 वाजता परिपाठ चालायचा 2 ला जेवण, 5 ला घरी.
घरी आल्यावर दप्तर टाकून पोहायला जाणे,मासे पकडणे हे छंद कधी कधी गुरे घेऊन बकरी घेऊन जायचं शेताकडे जायचं हे ठरलेलं होतं .
नवीन मित्र-मैत्रिणींची थोडी थोडी ओळख होत होती. नवीन शिक्षक होते त्यामुळे थोडं मनामध्ये भीती होती. हळुहळु गाडी रुळावर आली. पहिल्यापासून एक मित्र खास होताच, त्यात अजून एका मित्राची भर पडली. कुठे जायचे असेल, तिथे तिघे मिळून जायचो. ज्या मुलीबरोबर accident झाले होते तिच्या प्रेमात अजून दोघा-तिघांची भर पडली. प्रेम काय असते तेव्हा मला माहितीही नव्हतं. फक्त ते दोघे-तिघे म्हणायचे ती बघ तुझी वहिनी, ती बघ आपली वहिनी असं वरच्यावर बोलत होते. एकाने तर छातीवर तिचे पहिले नावाचं letter कोरून घ्यायचा ते पण माझ्याकडुन. कोरताना थोडं हात कापरायचा.
मला पण माहित नव्हतं की नकळत कधीतरी मी पण तिच्या प्रेमात पडेन.

