Raj Mohite

Comedy Romance

3  

Raj Mohite

Comedy Romance

Romantic Lockdown -Comedy Part

Romantic Lockdown -Comedy Part

6 mins
331


म्हणे ३६ गुण जमतात. अशी कुंडली कधी जुळली नाही. लग्न होवून आज ९ महिने पण झाले नसतील. रोजची भांडणे रोजची कटकट आमच्या भांडणात बाजूचे वाघमारे काका वारले वयाच्या ९९ व्यां वर्षी heart attack ने.

किती?? आणि कशे??

दिवस काढतील आजाराचे??.

नेहमी जर बाजूला भांडणाचा आवाज भांड्याचा आवाज आणि नको नको त्या शिव्या.

लग्न करून मीच माझी फजिती करून घेतली होती. तिच्या डोक्यात फक्त संशय आणि राग.

एकदा काय मनीषा सोबतची चॅटिंग पहिली तिथं पासून फक्त घरात कल्लोळ.

काय ??? कसे समजावू ???

माझी मैत्रीण आहे बऱ्याचदा सांगितले.

मानायला तयार नाही उलट नेहमी

रेणुका पण मैत्रिणीच होती ना????

माझ्या पाठी मागे किती वेळा घरी आणलीस ????

काय काय चाळे केलेस ?????

आता नवीन ???? मनीषा

भेदू दे एकदा तुझ्या मनीषा कोईराला ला तिला मीच कोरायला घेते.

" तुझ्या वर माझा आजिबात भरवसा नाही आहे.

झाले तितके पुरे आता मला तुझ्या सोबत राहायचे नाही आहे."

म्हणत तिने आपली बॅग भरायला घेतली.

मीही तिच्या भांडणाने हैराण झालेलो. पलंगा खालून माझी व्हिस्की ची बॉटल काढून कार्यक्रम सुरू केला.

" काही बोला फरक पडणार नाही.

कुणाला आणायचे आहे आता तिला आण घरी मी चालले कायम ची माझ्या माहेरी."

तिची बडबड माझ्या पहिल्या पेग पासून सुरूच होती.

" गेले चार महिने नुसती धमकी देतेस माहेरी जाते. कधी गेली आहेस का????

माझ्या डोक्यात जशी नशा गेली विचारले.

ह्या वेळेला पहा सकाळी ९ ची ट्रेन पकडून सरळ नाशिक गाठते.

" तू सकाळी जा नाही तर आता पण माझी सुटका कर

वैतागलो तुला??

तू मला वैतागला????? तू?????

" तुला मी वैतागली आहे ??? तुझ्या वागण्याला तुझ्या बोलण्याला ??? बायको सोडून इतरांशी कसा गोड बोलतोस??? पोपटा सारखा ????

माझ्या जवळ फक्त बोलायचे म्हटले की कावळा होतोस?? जसं जशी दारू चढत गेली तिचे फक्त ऐकत गेलो. मधी मधी दारूच्या नशेत तिच्या आईला स्मरण करत राहीलो.

बघ दारू पिऊन उगाच आई वरून शिव्या देवू नकोस

थोड्या वेळाने शेजारची निशा दारातच उभी राहून,

" वहिनी समाचार पहा आज काही सांगणार आहेत PM"

माझ्या घरात महाभारत सुरू असताना ही कसला समाचार घेवून बसली आहे???

तरीही तिने समाचार साठी टीव्ही चालू केला. आणि आमचे PM ह्यांनी आमच्या संसाराच्या आगीत आजुन तेल ओतले.

काय गरज होती लॉक डाउन ची???

बायको नको नको ती शिवी देत होती. इतक्या शिव्या श्राप तिने मला कधी दिल्या नसतील.

एक दिवस नंतर नाही करता आला का लॉक डाउन ???

मी ही दारूच्या नशेत

" एका दिवसाने कुठे वाटोळे होणार होते??? माझी पंनोती तर गेली असती.

नशा कसली दारूची २१ दिवसाचा लॉक डाउन ऐकुन नशा उतरली.

त्यात काय तर सर्व बंद??? ना सिगारेट ना दारू

घरा बाहेर ही नाही पडायचे.

लॉक डाउन २१ दिवसाचे म्हणून खचलो नव्हतो. २१ दिवस दुश्मन सोबत काढायचे होते. बायको ही तोच विचार करत होती.

कपड्यांची बॅग तशीच ठेवून ती त्या रात्री झोपी गेली. आणि मी ही पेग मारत त्या खुर्चीवर झोपलो.

सकाळी जाग आली. बायको लवकर उठून नाष्टा करण्यात दंग. तसाच उठलो गप्प आंघोळीला गेलो. अंघोळ करून देवा पुढे पाहतो तर बायकोने आधीच अगरबत्ती केलेली.

आगदी लाडाने जवळ येवून थाडकन माझ्या समोर नाष्टाचे प्लेट आपटले. त्या प्लेट मधील पोहे आणि शेंगदाणे एक बाजूला झाले.

दिवस भर दोघे घरात होतो पण एक शब्द नव्हतो बोललो दोघे. आणि ह्याच लाडा प्रेमात २१ दिवस काढायचे होते.

दुपारी जेवणाच्या वेळीही ताट त्याच पद्धतीने दिले. आता गप्प जेवण भेटते आहे अश्या परिस्थितीत म्हणून गप्प मांजरी सारखे डोळे बंद करून खात होतो.

दोनतीन दिवस असेच गेल्या नंतर एक दिवस मी घरातील पंखा साफ करत होतो तशी ही गर्मी वाढलेली आणि त्याची हवा कमी अचानक माझा पाय स्टूल वरून सरकला आणि मी जोरात जमिनीवर आपटलो.

माझ्या डोक्याचा मार माझ्या पायाचा मार खूप गंभीर होता. ती धावत शेजारी गेली माझ्या शेजाऱ्यांनी डॉक्टर बोलावून आणला. डोक्याला पट्टी, पायाला १५ दिवसा साठी प्लास्टर. हात पाय प्लास्टर मधे डॉक्टरांनी पायाच्या हाताच्या मारला खूप जपण्यास सांगितले. 

मी खरेच मोठ्या संकटात सापडलो होतो. माझ्या जागेवरून मला लघवीला ही जाता येत नव्हते. धडपडत उठलो तर बायको मदतीला धावून येत होती.

पण एकही शब्द बोलत नव्हती माझ्या सोबत

जी रोज नाष्टा जेवणाचे ताट आपटून देत होती आज तिच्या वरच मला जेवण भरवण्याची वेळ आली होती.

आमच्यात आजुन एकही शब्दाचा संवाद झाला नव्हता.

एक दिवस मी स्वतःहून पाण्याचे ग्लास किचन मध्ये ठेवण्यास निघालो. लंगडत जात असताना मी परत एकदा पडलो.

ती धावत आली. मला उठवत काय गरज होती???

मी करते आहे ना काम घरातले??

परत काही झाले मग????

मी इमोशनल होवून

खरेच इतकी काळजी करतेस माझी??????

माझ्या वर येईल तुला काय झाले तर???

कुणी सेवा केलेली नाही बघणार.???

मी गेली की फास लावून घे मला नाही फरक पडणार.

हात पाय गळ्यात आला आहे पण किडा काही कमी नाही आहे.

आयला ही गप्प होती तेच बरे होते.

आता कुठे गेल्या तुमच्या मैत्रिणी ????

मनीषा, निशा रेणुका ????

काय Mr शहाणे???? आहे उत्तर????

तू गप्प बसतेस का????

आधीच डोक्याला मार आहे तुझ्या बोलल्याने दुखू लागले आहे.

तु टोमणे थांबवशिल का??

खरे बोलले की नक्की दुखणार.

डोळे बंद कर मोठी कामगिरी केलीय ना???

कशाला ????? डोळे बंद करू????

घाबरु नको गळा नाही कापत तुझा???

थोडा बाम लावते डोक्याला

माझ्या डोक्याला कमी ताप दिला आहेस ना?? तुझी सेवा केली पाहिजे


गप्प पडून राहिलो हळू हळू तिने डोक्याला बाम लावला. हात पाय दाबले. प्रत्येक शब्दात टोमणा मारत तिने दोन दिवस चांगली सेवा केली. कान माझे मात्र खराब केले. नुसती बडबड यार ह्या बायका इतके बोलतात कसे??? तोंड नाही का दुखत???

एक रात्री मी लघवीला उठलो आणि ती झोपलेली आता उठवणार कसे म्हणून पाण्याचा रिकामी ग्लास मी जमिनी वर टाकला. त्या स्टीलच्या गलासच्या आवाजाने उठली.

मला आवाज दिला असता चालले असते ग्लास कशाला आपटायचे??? आधीच घरातील सर्व भांड्यांना पोक आली आहेत.

म्हणजे ती जागी होती. तिच्या खांद्यावर मी हात ठेवून जावून आलो. झोप लागत नव्हती परत मी ग्लास उचलला जमिनीवर आपटणार इतक्यात

मी आहे जागी काय हवे आता???

काय ??? तत्व आहेत बघा??? हात गळ्यात पाय गळ्यात पण बायकोला आवाज नाही मारायचा ???

आता काय झाले ??? तुला मजा येत आहे की ??? तुझा मूड होतोय??

मी जी मदत करतेय???? हाडं आहेत का शाबित??

" तू ऐकुन घेशील???

पाणी पाहिजे तहान लागली आहे. "

ती जाऊन पाणी घेवून आली.

आता मला झोपू देणार आहेस ???

pls सकाळी लॉक डाउन खुलणार आहे

मला सकाळी नाशिकला पोहचायचे आहे.

तू जातेस उद्या????

काय करू इथे ??? तुझी सेवा ??

त्या बदल्यात काय तर शिव्या खावू

कधी लाडाने प्रेमाने बोललास???? इगो. बोलायचे नाही कमी पना येतो ना??? ग्लास आपटून इशारा करायचा??

बाकीच्या मुलींशी कसे बोलता येते???

जसे चॅटिंग वर कॉल वर बोलतोस????

तू प्रत्येक वेळी त्या मैत्रिणीला मधी का आणते??

तुझ्या कडे बायको साठी वेळ आहे????

तू कधी जवळ आली आहेस का ?? बायको म्हणून ?

तुला माहित आहे आज आपल्या सोबत लग्न झालेल्या हेमंतच्या बायकोला दिवस गेले आहेत????

त्याच्या बायकोला दिवस गेले. ती दिवस भर माझ्या सोबत असते मला नाही माहित तुला कसे माहित आधी ते सांग?????

बघितलास नुसता संशय...

त्याने सांगितले मला.

तुझ्या मार्गात मला अडथळा आणायचे नाही आहे

तू ठरविले आहेस तु जा सकाळी मी माझे पाहून घेईन

बस थोडे डोळ्यातले पाणी नजरेतील भाव तिने पहिला .

जरासा पाझर आला तिला ही

माझ्या हृदयाशी लागली. बरेच दिवस नंतर आमच्यात हसू निर्माण झाले. त्या रात्री मी माझ्या मोडक्या शरीराने मोडक्यां स्वरुपात बायको सोबत रोमान्स केला.

दुसऱ्या दिवशी PM साहेबांनी लॉक डाउन आजुन एक्सटेन केला २० दिवस आता मात्र ती काही शिव्या देत नव्हती.


प्रत्येक एक दिवस रोमँटिक आणि मजेशीर जातो आहे. थोड तीच संशयाचं भूत उतरले आहे माझे थोडे चॅटिंग चे खुळ.. ह्या लॉक डाउन ला सर्व वैतागले आहेत पण मी आणि बायको हे लॉक डाउन चे दिवस खूप मजेशीर जगत आहोत.

तिच्या डोक्यातून जसा संशय पसार झाला तसा कोरोना ह्या जगातून पसार होवू दे....


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy