Prashant Shinde

Comedy Others

4  

Prashant Shinde

Comedy Others

रेश्मा..

रेश्मा..

1 min
321


माझे आवडते चित्रपट पात्र..नायिका...

रेश्मा...


चित्रपटातल्या अनेक नायिकांनी मनावर कायमचे अधिराज्य केले मग ती शोले चित्रपटातील बसंती असो किंव्हा धर्मात्मा मधील रेश्मा असो अशा कित्येक मनावर कायमचा ठसा उमटवुन

आपल्या छाप सोडून गेल्या .तो काळच नायिका प्रधान आणि नायक प्रधान चित्रपटांचा होता.आणि त्यांच्या व्यक्तिरेखेवर चित्रपट चालायचा.सामाजिक बांधिलकी ही जपली जायची.मला तरी शोलेतली जशी बसंती आवडायची तशी धर्मात्मा मधील रेश्मा ही आवडायची. रेश्मा जरा जास्त आवडायची कारण त्यावेळी आम्हाला तारुण्याचे पंख नुकतेच फुटलेले होते.

रेश्मा अवखळ,प्रेमळ तारुण्याच्या सौन्दर्याने मुसमुसलेली होती. तिच्या हस्याची छाप आतवर रुतून बसायची.निखळ अतूट प्रेम छान पैकी अधोरेखित करणारी नायिका मनात घर करुन गेली.तेंव्हा त्या पात्राने जोडीदाराचे मापदंड वेगळेच निर्माण केले इतके नक्की....तुलना मनातल्या मनात व्हायची आणि चाळण लागायची. रेश्मा रेश्माच यान शंका उरत नव्हती...


प्रेमळ अवखळ नितळ रेश्मा

सौन्दर्याची सोनेरी खाण

मन म्हणायचे प्रेमासाठी थोडी

जोडीदाराची परिक्षा ताण...

चुकून हसरा चेहरा दिसला तर

उत्साहाची उणीव भासायची

एक एक करून कात्री

आपोआप एकेकीला लागायची...

काळ सरला भराभरा

आवड ही बदलली थोडी जरा

म्हंटले मनाने आता थोडी त्वरा करा

मनास स्वतःच्या जरा आवरा..

रेश्मा मनातच घर जरून राहिली

पदरी पडले पवित्र झाले म्हणाली

आहे त्यातच समाधान मानू लागली

दुधावरची तहान ताकावर भागली...

जे होते ते बऱ्याचसाठी

कळले मनासी गाठता साठी

रेश्मा होती मनोरंजनासाठी

हीच गृहलक्ष्मी नशिबी होती

जन्मोजन्मी माझ्या साठी....


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy