STORYMIRROR

Kedar Kendrekar

Inspirational

2  

Kedar Kendrekar

Inspirational

पर्यावरणाचा ध्यास

पर्यावरणाचा ध्यास

13 mins
147

ही डायरी आहे, एका देशभक्त भारतीय शास्त्रज्ञाची. आपले पर्यावरणावरील प्रेम आणि संशोधन या दुधारी शस्त्राने त्याने जग जिंकले. आपला देश आणि येथील जनतेच्या पर्यावरणविषयक प्रश्नांची दखल घेतली. केकवळ आपल्याच देशाचा नव्हे तर जिथे जिथे अशी पर्यावरणविषयक समस्या उदभवली, त्या साऱ्या देशांचे आपल्या संशोधनादरम्यान अभ्यास दौरे करुन तेथील समस्या आपल्या ज्ञानाचा वापर करुन सोडवण्याचा प्रयत्न केला. तेथील समस्या आपल्या ज्ञानाचा वापर करुन सोडवण्याचा प्रयत्न केला. तेथील सरकारांना यासंबंधी मौल्यवान सूचना केल्या. पर्यावरणीय प्रश्नांबाबत तेथील जनतेत जागृती निर्माण व्हावी म्हणून चित्रपट, स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शनही केले. आपल्या अर्थार्जनाचा एक भाग म्हणून करत असलेल्या मोठया हुदयावरील नोकरीत अनेक वरच्या दर्जाच्या पदावर सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून संशोधनाची आवड सांभाळत करत असलेल्या पीएच.डी. पदवीच्या संशोधनादरम्यान अनेक धोके पत्करत व प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून त्याने मोठया हिंमतीने हे संशोधन पूर्ण केले. त्याच्या जिद्दिचा भाग बनून राहिलेले हे संशोधन अपेक्षित कालावधीपेक्षा थोडे जास्तच काळ म्हणजे जवळ जवळ दहा वर्षे चालले. पण यातून गोळा झालेली तथ्ये आणि एक संशोधक म्हणून त्या भारतीय शास्त्रज्ञाला आलेले अनुभव विचारात घेता संबंधित विद्यापीठाने अगदि उदार मनाने मोठया सन्मानाने त्या शास्त्रज्ञास पदवी प्रदान केली. आपले हे एकुणच संशोधन पूर्ण झाल्यावर आपल्याला आलेले अनुभव व आपली निरिक्षणे नोंदवण्यास त्याने प्रारंभ केला आणि यातूनच साकार झाली त्याची “अभ्यासपूर्ण डायरी ! “


डॉ. आनंद त्यागी हे अमेरिकेतील पर्यावरणविषयक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या केंद्र शासनाव्दारे चालवल्या जाणाऱ्या एका मोठया संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत होते. आपला देश सोडून अमेरिकेत स्थाईक होवून त्यांना जवळ जवळ 25 वर्षांहुन अधिक काळ लोटला होता. त्यांचे सर्व कुटूंबिय तसे काहि काळ मुंबईत वास्तव्यास होते. पण कालांतराने मुले मोठी झाल्यावर त्यांचे उच्च शिक्षण अमेरिकेत व्हावे आणि डॉक्टरांना पत्नीची सोबत लाभावी या हेतूने डॉ. आनंद त्यागींनी आपले सव्र कुटूंबच अमेरिकेत बोलावून घेतले. येथील वॉशिंग्टन या मुख्य शहरात एका टुमदार बंगल्यात त्यागी कुटूंबाचे वास्तव्य होते. दिवसभर ऑफिस सांभाळून सुटीच्या दिवशी आपल्या कुटूंबीयांना वेळ देणे हा त्यांचा आवडता छंद होता. ऑफिसच्या कामानिमित्त त्यांचे परदेश दौरे होत असत. यावेळी पाश्चात्य तसेच पौर्वात्य देशांत देखील त्यांचे फिरणे होत. जगात अनेक देश असले तरी या प्रादेशिक विविधतेत पर्यावरणीय एकतेचा त्यांना भास होत असे. एकुणच ही नोकरी फिरतीची आणि प्रचंड मानसिक ताण देणारी असली तरी त्यांच्यातला “पर्यावरणप्रेमी” अगदी हसतमुखाने हे सर्व परिश्रम सहन करत होता. त्यांना या कामात त्यांची सुविद्य पत्नी सौ. मीना हिची देखील साथ लाभली होती. घरातील जबाबदारी तिने समर्थपणे घेतल्यामुळे डॉ. आनंद आपल्या ऑफिसच्या कामात व स्वत:चे छंद जोपासण्यात स्वत:ला पूर्णपणे झोकुन देऊ शकत होते. त्यांची दोन मुले चि. रोहन आणि कु. स्नेहा आपापले उच्च शिक्षण घेण्यात मग्न होते. चि. रोहन हा वडिलांप्रमाणेच पर्यावरणप्रेमी आणि एम.एस.सी. पर्यावरणशास्त्र या पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तर मुलगी कु. स्नेहा हिला देखील पर्यावरणाची आवड होती, पण सध्या ती फॅशन डिझाईनींग चा अभ्यासक्रम पूर्ण करत होती. त्यागी कुटूंबीयांचा सुटटीचा कार्यक्रमदेखील ठरलेला असायचा. बहुतेक रविवारी ते सर्वजण पर्यावरणविषयक चित्रपट, नाटक बघणे, निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेटी देणे, आपल्या आप्तेष्टांच्या घरी जाऊन त्यांच्या ख्यालीखुशालीची चौकशी करणे व त्यांच्या घरी अंगण उपलब्ध असल्यास आपल्या भेटीची आठवण म्हणून एखादे छोटेसे रोप तिथे लाऊन देणे, पर्यावरणविषयक ग्रंथांची खरेदि करणे, त्यासंबंधिच्या संस्था, विद्यापीठे, संग्रहालयांना भेटी देणे अशा उपक्रमात व्यस्त असत. कधी कधी तर डॉ. त्यागी स्वत: दौऱ्यावर जाताना आपल्या उर्वरित पर्यावरणविषयक कामांची जबाबदारी त्यांच्या कुटूंबियांवर देखील सोपवून जात. मग यात रोपे तयार करणे, बीया गोळा करणे, झाडांना खते टाकणे, बगीचा स्वच्छ ठेवणे अशा छोटया पण महत्वपूर्ण कामांचा समावेश होता.


असेच एकदा डॉ. आनंद त्यागी यांना त्यांच्या संस्थेच्या कामानिमित्त चीन देशाचा दौरा करण्याची संधी प्राप्त झाली. दक्षिण अशियायी देशांच्या पर्यावरणविषयक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी व संभाव्य उपायांवर चर्चा करण्यासाठी एका परिषदेचे आयोजन युनिस्कोतर्फे करण्यात आले होते. साधारणपणे 15 दिवसांपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत उपस्थित राहण्यासाठी डॉ. आनंद त्यागी चीनची राजधानी “बिजींग” येथे जाण्याची तयारी करु लागले. सोबत आवश्यक ते सर्व सामान आणि पैश्यांची जुळवाजुळव झाल्यानंतर त्या दिवशीच्या संध्याकाळी त्यागी कुटूंबीयांनी मोठया आनंदाने त्यांना विमानतळावर निरोप दिला. परिषदेतील यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आणि बघता बघता त्यांच्या अमेरिकन एअर लाईन्सच्या विमानाने बिजींगच्या दिशेने आकाशात झेप घेतली. डॉ. त्यागींच्या चीन दौऱ्याच्या प्रवासास सुरुवात झाली.


इकडे डॉ. त्यांगींना प्रवासासाठी निरोप देऊन संपूर्ण त्यागी कुटूंब घरी परतले. आता दोघा मुलांना व पत्नीला डॉक्टरांच्या आठवणींनी काहि काळ अस्वस्थ केले. मात्र सुरुवातीलचे एक दोन दिवस गेल्यावर त्यांना डॉ. त्यागींच्या अनुपस्थितीची सवय झाली. त्यांचा दिनक्रम नियमित चालूच होता. यातूनच एका सुटीच्या दिवशी घराची स्वच्छता करण्यासाठी सर्वजण कामाला लागले असता घरातील स्टोअर रुममध्ये पडलेली एक जुनी बॅग मुलांच्या हाती लागली. तिच्यावर अर्थातच त्यांच्या लाडक्या डॉ. आनंद त्यागी या पित्याचे नाव लिहिले होते. वरुन पूर्णत: धुळीने माखलेल्या त्या बॅगमध्ये नक्कीच काहि महत्वाची वस्तु असावी. त्यातही वडिलांची बॅग, म्हणजे महत्वाची कागदपत्रे, फाईल, पुस्तके, डायऱ्या अशी कोणतीही वस्तु त्यात असु शकेल. पण वडिलांचे ऑफिसात जाणे तर अद्यापही चालूच आहे. मग ऑफिसमधील ती बॅग घरी काय करत आहे ? यावर दोघा भावंडांचे एकमत होईना. शेवटी हळूच आईची नजर चुकवून त्या दोघांनी ती बॅग स्वत:च्या रुममध्ये आणून ठेवली आणि दुपारच्या निवांत वेळी तिच्यात काय आहे याचा शोध घ्यावा असे ठरवले. सगळी स्वच्छता संपल्यावर ते सर्वजण स्नान वगैरे करुन आपापलया उर्वरित दिनक्रमाला लागले. दुपारी निवांत वेळेत दोघा भावंडांनी ती बॅग खूप उत्सुकतेने उघडली. त्यांनी केलेला अंदाज योगायोगाने खराच ठरला. त्या बॅगेत त्यांच्या आवडत्या बाबांची अभ्यासाची कागदपत्रे , फाईल आणि एक काळया रंगाचे कव्हर असलेली व पाने पिवळी पडलेली “डायरी” होती. त्या दोघांनी या सर्वांचा शोध घेतला. पण त्या डायरीने मात्र त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी कुतूहलाने जेंव्हा ती डायरी उघडली तेंव्हा त्यावर सुरुवातीच्याच पानावर संशोधक आनंद त्यागी, संशोधनाचा विषय, वर्ष, विद्यापीठाचे नाव आदिंच्या तपशीलवार “नोंदी” होत्या. मराठी – इंग्रजी अशा संमिश्र भाषेत लिहिलेली ती डायरी वाचण्याचा मोह दोघा भावंडांना आवरला नाही. अर्थात ती भलीमोठी लांबलचक डायरी काही एकाच दिवसात थोडीच वाचून होणार होती. तेंव्हा रोज दुपारी किंवा कॉलेजमुळे वेळ न मिळाल्यास रात्री तरी काहि वेळ ती डायरी वाचायचीच असे दोघांनी ठरवले. एकावरच वाचनाचा ताण येऊ नये म्हणून दोघांनी काहि ठराविक दिवस देखील वाटून घेतले. त्यांचा तो उत्साह आणि वाचनाची गती बघता ती डायरी पुढील दहा – बारा दिवसांत ते नक्कीच वाचून संपवतील असे वाटत होते. जणू काहि त्यांच्या पित्याच्या अनुपस्थितीत ती डायरीच त्यांच्या लिखाणाच्या रुपाने मुलांसोबतची त्यांची नसण्याची उणीव भरुन काढणार होती !


चि. रोहनने ती डायरी सव्रप्रथम वाचावयास सुरुवात केली. कु. स्नेहा बाहेरचा गोंगाट नको, म्हणून रुमचे दार बंद करुन अगदि एकाग्र चित्ताने ते वाचन ऐकत होती व त्यातील घटनांना अधुन मधून दाद देत होती. ती डायरी म्हणजे केवळ संशोधन सामग्रीची जमा केलेली माहिती नसून त्यात संशोधन कार्यादरम्यानच्या काहि आठवणी देखील आहेत, ही बाब सुरुवातीच्या रोहनच्या भराभरा डायरी चाळण्यातून त्या दोघांच्याही लक्षात आली होती. संशोधन काळातील डायरी असली तरी तिची सुरुवात डॉ. आनंद त्यागींच्या अगदि शालेय जीवनातील आठवणींपासून झाली होती. शाळेत जाणाऱ्या व अभ्यासात हुशार असणाऱ्या “आनंद” नावाच्या चुणचुणीत मुलातच भविष्यातील जगविख्यात संशोधकाची बीजे कशी रुजवली गेली याची साक्षच जणू काहि त्या आठवणी देत होत्या. लहानपणी शालेय स्तरावर “पर्यावरण शिक्षण” हा विषय केवळ गुणांसाठीच नव्हे तर त्याच्या विषयीच्या मुळात असणाऱ्या आवडीपोटी आनंदने मनापासून अभ्यासला. व्युत्पत्ती शास्त्रानुसार “पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती होय.” ही त्याची आवडती व सुटसुटीत व्याख्या होती. “पर्यावरणातील नैसर्गिक व सांस्कृतीक घटकांचा मानवी जीवनावर , जीवनपध्दतींवर होणाऱ्या प्रभवाचा पध्दतशीरपणे व शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र होय.” ही पर्यावरणशास्त्राची व्याख्या तर त्याच्या मनाचा ताबा घेणारी ठरली. त्यातुनच शालेय जीवनात वृक्षदिंडी , वृक्षलागवड , रोपवाटिका निर्मिती , पशुपक्षी प्रेम व त्यांचे जतन या उपक्रमात त्यानं हिरीरीने भाग घेतला.


अगदी दहावीसारख्या शालेय जीवनाच्या अंतिम टप्पयात त्याने आपल्या करिअरची निश्चित दिशा ठरवत बारावीला ‘पर्यावरण विज्ञान’ हा विशेष विषय घेण्याचे ठरवले आणि आपल्या छंदाचेच रुपांतर व्यवसायात करण्याच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. इतकेच काय , तर पुढे महाविद्यालयीन शिक्षणात B.Sc in “Environmental Sciences” ही पदवी त्याने मिळवली. पर्यावरणासारखा एक मोठा ‘अंतरविद्याशाखीय सायन्सेस’ आता त्या विषयातील पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी त्यास खुणावत होता. मग त्याने मुंबई विद्यापिठातून ती पदवी प्राप्त करुन या संधीचे सोने केले. एकूणच या डायरीच्या सुरुवातीच्या काही पानांत आनंदाच्या शालेय जीवनापासून ते मुंबई विद्यापिठातील पदव्युत्तर पदवी शिक्षणापर्यंतच्या निवडक आठवणी होत्या. त्यात विशेषत्वाने पदवी आणि पदवी स्तरावर असताना आनंदाचे विविध शाळांमध्ये जावून आपल्या मित्रांच्या मदतीने पर्यावरणातील विविध परिसंस्थांवर दाखवलेले ‘slide show’ तर खूपच गाजले. त्यानं सांगितलेले “भू परिसंस्था” आणि “जल परिसंस्था” हे परिसंस्थेचे मुख्य दोन प्रकार सर्वांनाच लक्षात राहिले. भू परिसंस्थेचे जल , गवताळ , वाळवंटीय आणि टुंड्रा परिसंस्था हे चार उपप्रकार तर जल परिसंस्थेचे सागर , तळे , खाडी आणि नदी परिसंस्था हे चार उपप्रकार त्याने चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडल्यामुळे प्राथमिक तथा माध्यमिक अशा सर्वच स्तरावरील विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्यावर खूष झाले.


पदव्युत्तर पदवी स्तरावर असताना शोध प्रकल्पाचा एक विषय म्हणून आनंदाने स्वखुशीने आपल्या मित्रांसोबत “मुंबई परिसरातील विविध प्रकारच्या प्रदुषण प्रकारांचा अभ्यास” केला. यात ध्वनी , जल , वायु आणि मृदा या प्रमुख पर्यावरणीय प्रदुषणांच्या अभ्यासाचा समावेश होता. प्रदुषणाची त्याने मांडलेली व्याख्या अत्यंत सोपी आणि मनाला विचार करायला लावणारी होती. “मानवाने पर्यावरणाचे केलेले दुषितीकरण म्हणजे प्रदुषण होय.” याशिवाय हवा , ध्वनी , जल आणि मृदा प्रदुषणाबाबत केलेल्या त्यांच्या व्याख्या मुलभुत संकल्पना समजण्यास मदत करणाऱ्या ठरल्या.

या सर्व संकल्पनांच्या व्याख्या , त्यांची कारणे व दुष्परिणाम यांचा समावेश मुंबई शहराच्या विशेष संदर्भाने आनंद व त्याच्या मित्रांनी आपल्या शोध प्रकल्पात केला होता. म्हणजे एका अर्थाने पर्यावरण या विषयाचा मुलभूत पाया आनंदाने त्याच्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंत चांगलाच पक्का केला होता, हे त्याने त्याच्या डायरीत लिहिलेल्या अनुभवांच्या आठवणींवरुन समजते.


चि. रोहनचे हे डायरी वाचन जवळ जवळ आडीच – तीन तास चालले. त्यात आलेल्या तपशीलावर अधुन मधून त्याचा व कु. स्नेहाचा संवाद देखील रंगला. तितक्यात सौ. मीनाने दोघांना संध्याकाळाच्या चहापाण्यासाठी आवाज दिला. तेव्हा आपण करत असलेला “उद्योग” आईच्या निदर्शनास येवू नये म्हणून दोघा भावंडांनी ती डायरी पलंगाखाली लपवून ठेवली आणि रुमच्या बाहेर गेले. आजच्या या पहिल्या दिवशीच्या वाचनाने त्यांना लग्नाआधीचा त्यांचा हुशार बाबा समजण्यास मदत झाली होती. त्याच्या रसभरीत आठवणींचा तो पुढील भाग वाचण्यास ते अधिकच उत्कटतेने वाट बघत होते.

        

    बघता बघता दुसरा दिवा उजाडला आणि चि. रोहन व कु. स्नेहाने ठरल्याप्रमाणे आपली दिवसभराची कामे आटोपून रात्री बाबांची ती डायरी पुढील भाग वाचण्यासाठी हातात घेतली. येथून खऱ्या संशोधन प्रवासास सुरुवात होणार होती. आनंद अर्थात त्यांच्या बाबांनी पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर मुंबईतील एका स्थानिक पर्यावरण संरक्षणविषय संस्थेत ‘सहाय्यक’ पदावर कार्य करण्यास सुरुवात केली होती. हे करत असतानाच या विषयातील एखाद्या विशेष घटकावर अधिक लक्ष केंद्रित करुन त्यातील संशोधन कार्य पूर्ण करायचे व “पीएच.डी.” ही सर्वोच्च पदवी मिळवायची हे स्वप्न आनंदाने स्वत्:च्या मनाशी बाळगले. कालांतराने तशी संधीदेखील चालून आली. इंटरनेटवर या संदर्भात शोध घेत असताना अमेरिकेतील “Texas” विद्यापीठाच्या या विषयातील संशोधन कार्यासंबंधीच्या शिष्यवृत्तीची आनंदने माहिती मिळवली. आपल्या कॉलेजातील एका जेष्ठ प्राध्यापकाच्या मदतीने त्याने सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करत त्यासाठीची प्रवेश परीक्षादेखील दिली. त्याची या विषयातील समज आणि परिश्रमांचे फळ म्हणून त्याची यासाठी निवड झाली. दरम्यानच्या काळात मुंबईतील सुरु असलेली नोकरी व पुढील शिक्षणासाठीची सुरु असलेली तयारी बघुन त्याच्या वडिलांनी त्याच्या पुढील वाटचालीत कोणचीतरी चांगली साथ लाभावी , या विचाराने कु. मीने नामक मुलीचे आनंदसोबत लग्न लावून दिले. ती देखील चांगल्या कुटुंबातून आलेली आणि विज्ञान विषयातील पदवी प्राप्त केलेली अभ्यासू मुलगी होती. अमेरिकेतील विद्यापीठात संशोधन करण्याच्या आनंदच्या स्वप्नास आता मुर्त स्वरुप मिळाले. सुरुवातीच्या काळात आपल्या राहण्याची-भोजनाची कुठलीही निश्चित सोय नसल्यामुळे व सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या मुंबईतील नोकरीचा संशोधन कार्यासाठी राजीनामा द्यावा लागणार असल्यामुळे आनंदने स्वत:च्या पत्नीची , सौ. मीनाची सोय मुंबईतील आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे केली. पारपत्र , परदेश वास्तव्याचा परवाना, गुणपत्रके , शिष्यवृत्तीची कागदपत्रे आदि कार्यालयीन बाबींची पूर्तता करुन आनंद त्वरीत अमेरिकेला रवाना झाला. आता सौ. मीनाला त्याच्या आठवणींचाचा आधार होता. अर्थात घरातील एकटेपणा घालवण्यासाठी तिनेदेखील जवळच्याच एका शाळेत विज्ञान शिक्षिकेची नोकरी मिळवली. दिवसा शाळा आणि रात्री इंटरनेटवरुन आनंदसोबत संवाद साधणे या आधारे तिच्या या एकाकी जगण्यावर तिने मात केली. काही काळानंतर ती गरोदर राहिली आणि यांच्या संसारात चि. रोहन व कु. स्नेहा या जुळ्या बहिण-भावंडांचा प्रवेश झाला. आता मात्र शाळेची नोकरी आणि मुलांचा सांभाळ या दुहेरी जबाबदारीत सौ. मीन पुरती बुडाली. आता तिला आनंदशी दररोज बोलायलादेखील वेळ मिळत नव्हता.


इकडे अमेरिकेत आनंदने संशोधन सुरु असतानाच Texas विद्यापिठात “Research Fellow” म्हणून मोठया शिष्यवृत्तीच्या आधारे मोठा नावलौकिक मिळवला. विद्यापीठाच्या पर्यावरण विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यदेखील करण्यास सुरुवात केली. आणि थोडे स्थिरस्थावर झाल्यावर त्याने आपली पत्नी सौ. मीना आणि मुले चि. रोहन व कु. स्नेहा यांना अमेरिकेत बोलावून घेतले. आता संशोधन आणि कुटुंबाची जबाबदारी या दोन्ही कार्यांची पूर्तता करत असताना , एक दिवस आपल्या मित्राशी आत्तापर्यंतच्या झालेल्या संशोधन कार्याविषयी चर्चा करत असताना त्यातील अनुभवांचे लेखन एका डायरीत करण्याचा सल्ला मित्राने आनंदला दिला. त्याप्रमाणे आत्तापर्यंतच्या या सर्व प्रमुख घटना आनंदने सदरील डायरीत नोंदवल्या होत्या.


“दक्षिण अशियायी देशांतील पर्यावरणीय समस्यांचे तुलनात्मक अध्ययन : विशेष संदर्भ भारत देश” असे आनंदच्या पर्यावरणविषयक संशोधनाच्या विषयाचे ‘शिर्षक’ होते. त्याचा पसारा मोठा असल्याने त्याने या कामात अनेक स्थानिक संस्था , व्यक्ती , सरकारांच मदत घेतली होती. त्याचे संशोधन हे विद्यापीठाद्वारे ‘शिष्यवृत्ती’ देवून करवून घेतले जात असल्यामुळे त्याची उपयोगिता खासच होती. त्यामुळे जगाच्या एका मोठया भागाच्या पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करणे शक्य होणार होते. त्यांचा एकुण जागतिक पर्यावरणावर काय परिणाम होतो. याचा अंदाज बांधणे शक्य होणार होते. आनंदने आपल्या संशोधनाच्या निमित्ताने जो सखोल अभ्यास केला, त्यामुळे अपरिहार्यपणे त्याच्या संशोधनाचा कालावधी लांबला. पण त्याच्या अनुभव कक्षेत या भागात जाणवणाऱ्या भुकंप, ज्वालामुखी, दुष्काळ, पूर, वाळवंटीकरण, त्सुनामी, वादळे, अन्न समस्या, तापमानवाढ, समुद्र जलपातळीतील वाढ, मृदेची धूप अशा जवळपास सर्वच प्रमुख पर्यावरणीय समस्यांचा समावेश झाला. त्याच्या डायरीतील क्रमावार लेखांवरुन त्याचे संशोधन किती मौल्यवान झाले तेही समजले. यातही भारत देश ही आपली मायभूमी त्याने संशोधनाच्या विशेष संदर्भाने अभ्यासल्यामुळे इतर देशांबरोबरच भारत देशातील पर्यावरणीय समस्यांची नोंदणी त्याच्या संशोधन पूर्ततेनंतर थेट “UNESCO” च्या कार्यालयात झाली. याचा फायदा निश्चितच तेथील संबंधीत जनतेला त्या त्या समस्यांशी लढण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर झाला. कारण आनंदने केवळ समस्यांचा अभ्यासच केला नाही तर जनता व शासन या दोन्ही स्तरांवर अगदि व्यवहारात राबवता येतील अशा उपाययोजनादेखील सुचवल्या होत्या. संशोधनाला सुरुवात होण्यापूर्वीची आनंदची पार्श्वभुमी , संशोधन शिर्षक , त्याला संशोधनदरम्यान आलेल्या विविध समस्या , त्याला या काळात सौ.मीनाची लाभलेली भक्कम साथ आदि सर्व घटनांचे कु. स्नेहा व चि. रोहनने वाचन आत्तापर्यंत केले. रात्रीचे आकरा वाजले. सकाळी लवकर उठुन कॉलेलात जायचे असल्याने दोघांनी आत झोपण्याचा निर्णय घेतला. तितिक्याच त्यांची आई देखील खोलीत आली व त्यांच्या झोपेबाबत तिने चौकशी केली. तिला होकार देत दोघेजण आत्तापर्यंतच्या डायरी वाचनाचा आनंद मनात ठेवून झोपी गेले.


चि. रोहन व कु. स्नेहा यांनी तिसऱ्या दिवशीपासून पुढे जवळ जवळ 10-12 दिवस आनंदाने पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करताना स्वत:ला आलेले अनुभव जे क्रमवार नोंदवले होते ते व्यवस्थित वाचले. यात पाकिस्तानात झालेला भुकंप व आनंदने तेथे केलेला अभ्यास दौरा , आग्नेयेकडील एका बेटावर झालेला ज्वालामुखाचा उद्रेक व त्याचे आनंदने केलेले चित्रिकरण , भारताच्या पश्चिमेकडील भागातील वाळवंटीकरण , पूर्वोत्तर भागातील गंगा नदिला आलेला पूर , दक्षिणेत आलेली त्सूनामी ओरिसातील चक्रि वादळ , गुजरात राज्यातील भुकंप ईशान्य पूर्व भारतातील ब्रहमपूत्रा नदिने पावसाळ्यात धारण केलेले आक्रळविक्राळ रुप , महाराष्ट्रातील वृक्षतोड , शेतीवरील घरांच्या आक्रमणाने निर्माण झालेली अन्नसमस्या, आदिवासी भागातील कुपोषणाची समस्या , महाराष्ट्रातील जंगलांचा दौरा करून वणवा व त्याच्या संभाव्य कारणांचा घेतलेला शोध, मानवाने वनांवर अतिक्रमण केल्याने वन्यजीवांचे मानवी वस्तीत होणारे हल्ले , शहरी व नागरी भागात वाढणारे प्रदुषण , भारताच्या समुद्रालगत असणाऱ्या राज्यांच्या सीमावर्ती भागात होणारी समुद्रजल पातळीतील वाढ , जमीनीची खालावत जाणारी जलपातळी , समुद्री वाहतुकीतुन समुद्रात होणाऱ्या तेल दुर्घटना, कारखान्यांमुळे होणारे मृदा व जल प्रदुषण , या विपरीत पर्यावरणीय बदलांमुळे मानवी आरोग्यावर होणारा विपरित परिणाम अशा कितीतरी घटनांचा समावेश होता. त्यावर आनंदने स्थानिक परिस्थितीचा विचार करून दिलेल्या “उपाययोजना” खरोखरच विचार करायला लावणाऱ्या होत्या. त्यात वृक्ष लागवड , पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण , शेतीत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर , समुद्रात भराव टाकण्यावर बंदि करणे , भुकंप निरोधक बांधकाम , पूर रोकण्यासाठी ‘नद्याजोडणी प्रकल्प’ , वन्यजीव संरक्षणाचे कडक कायदे अशा ठळक उपायांचा समावेश होता. या सर्व क्रमवार प्रकरणांचे वाचन करत असताना दोघा भावंडांना त्याच्या बाबांचा ग्रेटनेस प्रकर्षाने जाणवला. आज एक थोर वैज्ञानिक म्हणून जगात त्यांना असलेला मान आणि एका मोठया हुद्यावर ते करत असलेले कार्य बघुन दोघांची छाती अभिमानाने भरुन आली. आपल्या पित्याविषयी त्यांना सार्थ अभिमान वाटला.


डायरीचे वाचन पूर्ण झाल्यावर न राहावल्याने दोघांनी आनंदाने गडबडीने आईजवळ जावून त्यांच्या मागील दहा-बारा दिवसांच्या डायरी वाचनाच्या उपक्रमाची माहिती सांगितली. त्यांच्या आईला याबाबत काही माहित नव्हते, असे नव्हे. मात्र मुलांच्या आनंदात आपण कशाला लुडबूड करायची ? या विचाराने तिने अजाणतेपणाचा त्यांच्यासमोर आव आणला आणि तितक्याच कुतूहलाने ते सांगत असलेली माहिती ऐकून घेतली.


दोन-तीन दिवसांनी डॉ. आनंदचा चीन दौरा पूर्ण झाला आणि ते अमेरिकेत आपल्या कुटूंबीयांकडे येण्यासाठी निघाले. ही बातमी जेव्हा त्यांच्या कुटूंबीयांना समजली, तेव्हा त्यांची पत्नी सौ. मीना तर पतीची आतुरतेने वाट बघत होतीच, पण मुले देखील केव्हा एकदा त्यांच्या वडिलांविषयीचे त्यांनी अनुभवलेले डायरीचे सिक्रेट त्यांना सांगतो , या विचाराने वेड्यासारखी त्यांच्या वाटेवर डोळे लावून बसली होती.


सायंकाळी डॉ. आनंद त्यागी अमेरिकेत वॉशिंग्टन विमानतळावर उतरले. त्यांचे त्यांच्या कुटूंबीय. मित्र परिवार व इतर नातेवाईकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. बिजींग येथील पर्यावरण परिषद खुप यशस्वीरित्या पार पडली होती. शिवाय डॉ. आनंदच्या संशोधनाचे फलित म्हणून दक्षिण अशियायी देशांत ज्या पर्यावरणपूरक सुधारणा राबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या देशांचा “पर्यावरणपूरक विकास” झाला होता. याबद्दल विविध देशांच्या प्रमुखांनी या महत्वपूर्ण परिषदेत डॉ. आनंदला आपापल्या देशातील विविध विद्यापीठाच्या ‘मानद डॉक्टरेट’ देण्याची शिफारस या परिषदेत केली होती. इतकेच काय तर काही देशांनी स्वत:चा ‘सर्वोच्च नागरी किताब’ डॉ. आनंद यास देण्याचीही तयारीही दर्शवली होती. याचाच परिणाम म्हणून की काय एक दिवस भारत सरकारकडून डॉ. आनंद अमेरिकेत काम करत असलेल्या संस्थेत एक पत्र आले ,ज्यात डॉ. आनंद त्यागी यांना “भारतरत्न” हा भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा करण्यात आली होती.


आपल्या मायभूमीकडून आपले झालेले हे कौतुक बघून डॉ. आनंद त्यागींचे डोळे पाणावले. त्यांनी घेतलेला “पर्यावरणचा ध्यास” व त्यासाठी वेळोवेळी केलेला त्याग या सर्वांचे ते फलित होते. संपूर्ण जगाला विश्वबंधूत्वाचा संदेश देणाऱ्या भारत देशाने आज पर्यावरणविषयक कार्याच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाशी विश्वबंधुत्व प्रस्थापित केलेल्या डॉ. आनंद त्यागी यांचा तो गौरव होता.


त्या रात्री संपूर्ण कुटूंबाने डॉ. आनंद त्यागी अर्थात भावी काळातील ‘भारतरत्न’ डॉ. आनंद त्यागी यांचे अभिनंदन करण्यासाठी एक जंगी पार्टी दिली. यावेळी आनंदचे कुटूंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार या सर्वांनी एकत्रीतपणे “पर्यावरण रक्षणाची शपथ” घेतली आणि शेवटी सर्वजण त्यागी कुटुंबाचा निरोप घेवून आपापल्या घरी परतले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational