प्रवास
प्रवास
वय झालं असल तरी आवड काय गेली नव्हती. लाल रंगाची बजाज घेऊन हे दोघे कर्नाटक म्हणून नका पुणे म्हणू नका सगळी कडे त्यांच्या गाडीवरून जात होते .हे दोघे म्हणजे रवी आणि शांता.या दोघांनी संसाराचा गाडा पुढे ओढण्यासाठी घरगुती खानावळ सुरू केली.या दोघांचा स्वभाव पण खूप छान होता कधी कोणी भांडत नव्हते खानावळ सुरू केली खरी पण आता याच मार्केटिंग कोण करणर असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता पण योगाने तोसुद्धा सुटला त्यांच्या घरा पासून जवळच एक सरकारी दवाखाना आहे तिथे येणारे काही शिकवून डॉक्टर यांच्या खानावळी मधे जेवायला येत असत.याच्या मुळे मुलांचं शिक्षण थांबल नाही आणि घरात हव्या त्या वस्तू येऊ लागल्या घर अगदी भरल्या सारखं असे.पण हे सगळं करत असताना त्यांना त्यांच्या अवडिकडे थोड दुर्लक्ष करावे लागत होते त्यांना या सगळ्या व्यापातून कुठे बाहेर फिरायला जाणे होतच न्हवत फक्त खानावळी साठी लागणारे साहित्य यासाठी जेवढे बाहेर पडतील तेवढंच !
यामुळे त्यांच्या मधे कधी कधी ताण निर्माण होत होता पण हा ताण काढण्यासाठी त्यांची मोठी मुलगी निशा ही कायम त्यांच्या सोबत असायची. मुले आता मोठी झालीत तश्या गरजा पण वाढत होत्या खानावळी मधून येणारे पैसे आता कमी पडत होते. निशा ने थोडा पुढाकार घेऊन मी काम करते अस सांगितल त्यावेळी रवी थोडा नाखूष होता पण शांता मात्र एका झटक्यात तयार झाली. निशा घराजवळ असणाऱ्या एका हॉस्पिटल मधे रिसेप्शनचे काम करत होती.तिचा पण हात भार घरी लागत होता. त्यामुळे घरचं संतुलन टिकून राहिलं निशा आता वयात आली तिच्या लग्नासाठी यांनी थोडी जमवलेली रक्कम मोजली तर आताच्या काळात फक्त ती वीस हजार रुपये एवढीच होती. शांता आणि रवी थोडे घाबले होते या एवढ्या पैश्यात आपण तीच लग्न कसं पार पडणार या विचारानेच त्यांना भीती वाटू लागली.पण आपल्या आई वडलीना अस्वस्थ पाहून त्यांचा मुलगा यशवंत याने सुधा मी पण काम करतो म्हणून हा सुधा आता कामाला जायच्या तयारीत होता. तो एक दिवस एमआयडीसी मधे एका कारखान्यात जातो तिथे त्याला काम मिळत तो या कमा मधे नवीन असल्या मुळे त्याला महिना तीन हजार रुपये एवढाच पगार मिळणार असे सांगितले त्याने पण जास्त विचार न करता मी उद्या पासून कामाला येतो असे सांगून तो तिथून सरळ घरी येतो आणि शांता ला सगळ्या गोष्टी सांगतो. शांता सुद्धा त्यावेळी आपल्याला काही तरी मदत होईल या आशेने त्याला कर काम असे सांगते.
यशवंत दुसऱ्या दिवसा पासून कामासाठी जातो. महिना संपतो पहिला पगार येतो यशवंत खूप खुश होतो. निशा च लग्न ठरत जावई सुधा नशिबाने त्यांना फार चांगले भेटतात ते यांच्या कडून फक्त तुम्ही मुलगी द्या बाकी काहीच नको असे सांगतात निशा च लग्न होत.आता मात्र शांता थोडी थकली आहे.तिला आधी सारखं काम लवकर लवकर करता येत नाही म्हणून रवी सगळ जेवण करत होता. शांता फक्त ताट तयार करायची आणि रवीला देत होती.तिला थोड्या अरा गरज होती पण स्वतचं पोट चालावं या साठी तिने कधीच हर मानली नाही.पण दुःख त्यांच्या पाचवीलाच पुजले होते.डॉक्टर सगळे हळू हळू जेवायला यायचे कमी झाले तसे यांच्या घरात ताण वाढत होता आता मात्र हा ताण कमी होत नव्हता. यशवंत चा पगार सुद्धा या महिन्न्यात झाला न्हवता त्यामुळे जे काही होत त्यावरच यांना हा महिना काढावा लागला. यशवंत आता बरेच दिवस तिथे काम केल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी माहीत पडल्या त्याने घरात येऊन त्याच्या वडिलांना आपणच कारखाना उभा केला तर चालेल का असे विचारले. रवी तुझा विचार चांगला आहे पण आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत अस म्हणून रवी विषय टाळत असे. एक दिवस निशा आणि तिचा नवरा हे दोघे पण घरी येतात.यशवंत घरीच असतो यशवंत सगळ्या गोष्टी तिच्या नवऱ्याला समजावून सांगतो निशाचा नवरा सुद्धा त्याला नाही म्हणत नाही. आता पूर्णपणे खानावळ बंद झाली.रवी आणि शांता आता या दोघांना सुद्धा आराम करण्यासाठी थोडा टाईम भेटला.आणि पुन्हा सुरू झाला यांचं प्रवास. पण काळाने घाला घालावा आणि यशवंत चा कारखाना डब घाईस यावा अस झालं याने केलिल्या कामाचे पैसे काही यशवंत ल मिळाले नव्हते. असे बरेच दिवस गेले शांता आणि रवी दोघे सुद्धा पुन्हा खानावळ सुरू करावी का या विचारत होते. साईना नमस्कार केला.आणि यशवंत घरी आला खूप विचारत पडला होता काय करावं काही सुचत नव्हते तेवढ्यात शांता बोलली सगळ काही ठीक होईल यशवंत साई ना नमस्कार कर त्यांचं लक्ष आहे आपल्यावर.रवी आणि शांता नेहमी सारखे आज कर्नाटकात जायचं होतं शंताच्या बहिणीकडे म्हणून हे सकाळी लवकर घरातून बाहेर पडले यशवंत पण यांच्या बरोबर बाहेर पडला होता.संध्याकाळी चारच्या सुमारास यशवंत ला पोलिसांचा फोन येतो. सिटी हॉस्पिटल मध्ये या तुमच्या आई वडिलांचा अपघात झाला आहे पण आता दोघेही सुरक्षित आहेत काळजी करण्या सारखं काही कारण नाही आहे.हे ऐकताच त्याच्या पाया खालची जमीन सरकली आणि तो लगेच हॉस्पिटल का पोहचला तर तिथे त्याला शांता नीट आणि जास्त काही लागलं न्हवते म्हणून थोडा धीर आला पण रवी कुठे दिसत नाही आहे.यामुळे तो आणखी बैचेन झाला.रवीला आता आत सिटी स्कॅन साठी घेऊन गेले आहेत तोपर्यंत तुम्ही सगळी पूर्तता करा अस सांगत एक नर्स तिथून त्याला काउंटर वरती घेऊन जाते.सगळी पूर्तता होते रवीला बाहेर घेऊन येतात आणि त्याच हॉस्पिटल मध्ये काही दिवस ठेवावं लागणार आहे अस सांगतात. त्यावेळी यशवंत निशाला सगळं काही सांगतो आणि निशा येते.त्यावेळी यशवंत वरती पैश्याचा डोंगर कोसळला आहे. डिस्चार्ज मिळाल्यावर एवढे पैसे कुठून घेऊन येणार आता पुन्हा निशा कडून पैसे घेणे त्याला योग्य वाटत नव्हते म्हणून तो निशा ला पैश्याचा गोष्टी काही सांगत नाही. साईना नमस्कार करतो आणि सगळ्या मित्रांना आणि माहिती असणाऱ्या लोकांना फोन करून पैशांची काही जोडणी होते का या कामात तो लागतो.पण नशिबाने खेळ मांडला होता त्याच्या एका ही हाकेला कोणीच उभा राहिला नाही.रवी आणि शांता आता पूर्णपणे बरे झाले. उद्या डिस्चार्ज देणार हे कळताच यशवंत खूप खुश पण होता आणि थोडा अस्वस्थ पण होता.साईचे नामस्मरण करत होता.रात्री दहाच्या दरम्यान त्याला फोन आला तो म्हणजे तीन महिन्याचे राहिलेलं पेमेंट देण्यासाठी.सकाळची वेळ यशवंत ने त्याच काम केलं होत पण त्याच्या कडून पैसे आले नव्हते पण आज अगदी सगळ काही गळ्यापर्यंत आला असताना अचानक पैसे त्याच्या समोर आले त्यावेळी त्याचा विश्वास आणखी घट्ट झाला साई रुपी त्या माणसाने यशवंत ला सगळे पैसे दिले.यशवंत आणि त्याचे आई वडील घरी आले.
