सख्खा भाऊ - एक सत्य घटना
सख्खा भाऊ - एक सत्य घटना
रेवती थोडी पटकन राग येणारी आणि तितकंच प्रेम करणी होती.त्यामुळे तिचा स्वभाव काही लोकांना पटत नसे.जे पण काही आहे ते सगळ काही तोंडावर बोलून ती मोकळी होत असायची यामुळेच की काय तिच्या सोबत कोणी काम करायला तयार होत नसे.रेवतीचे लग्न झाले तिला एक मुलगी आणि एक मुलगा आणि तिचा नवरा अस यांचे कुटुंब आहे.घराजवळ असणाऱ्या सरकारी दवाखान्यात यांचा एक छोटंसं दुकान आहे. रोज झेरॉक्स आणि क्वाईन् बॉक्सचा चांगला धंदा बसवला होता.बरेच वर्षे फक्त घर चालले जाईल एवढेच पैसे उरलेले असायचे. आणि यातून तिला दोन मुलांचा खर्च फार जड जात होता.म्हणून ती आपण एखादी रुग्णवाहिका सुरू केली तर चालेल का हे तिच्या डोक्यात शिजत होत बरेच दिवस गेले. काही करावं तर लक्ष लागत नव्हत फक्त डोक्यात एकच सुरू होत रुग्णवाहिका सुरू कशी करावी घरावर कर्ज काढल तर चालेल का नाही तर मग यांना सांगून कुणाकडून तरी व्याजावर पैसे घ्यावे का असे सगळे विचार तिला खात होते प्रत्येक वेळी ती दुर्लक्ष करायची पण सगळ डोळ्यासमोरून काही जात न्हवत.शेवटी न राहून तिने बँकेत जायचं ठरवलं अजूनपर्यंत तिच्या नवऱ्याला काहीच माहीत नव्हत. बँकेत जाऊन आल्यावर ती आता पूर्ण खालावली होती कारण बँकेत एवढी कागदपत्रे ऐकूनच ती तिथेच अर्धी थंड पडली होती आणि चालत चालत घरी आल्यावर तर तिची हलत खराब झाली. अमर घरी आला आणि सगळा प्रकार रेवतीने सांगितला.अमर सुधा या मधे तिची जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत होता.पण रेवती थांबायचं काही नाव घेतच न्हवती सतत काही ना काही करत होती.आणि एक दिवशी तिने रुग्णवाहिका घेतलीच पण आता ड्रायव्हर ठेवणे हे त्यांना परवडणार न्हवते म्हणून अमर स्वतः ती रुग्णवाहिका घेऊन जात असे.पण आता त्यांच्या दुकानात बसणार कोण रेवती तर घरी सांभाळत होती.तिचा लहान मुलगा सचिन रोज सकाळी जाऊन बसायचा आणि दुपारी जेवायला घरी जायचं त्यावेळी रेवती दुकान सांभाळायची अस यांचा दिनक्रम असायचा.एक दिवस अमरला यायला घरी उशीर झाला.तो रात्री दारू पिऊन आला होता रेवती त्याला जेवायला वाढण्यासाठी गेली त्यावेळी तिला कळलं अमर दारू पिऊन आला आहे.पण त्यावेळी ती काही बोली नाही रात्र खूप झाली होती आता आपण काही बोलू तर सगळेच उठणार आता सकाळी बोलुयात यावर अस महणून ती झोपून गेली.सकाळी रेवती उठायच्या आत अमर घरातून निघून गेला होता. रेवतिने दुकानात फोन केला पण अमर तिथे न्हवता त्यामुळे फोन काही उचलला गेला नाही.म्हणून ती थोडी अस्वस्थ झाली काय करावं काही सुचेना पण जाऊदेत म्हणून ती तिच्या कामात मग्न झाली.दुपार पर्यंत सगळ काही ती विसरून गेली होती पण आता तिची दुकानात जायची वेळ झाली होती.रेवती जेवण करून घरातून बाहेर पडली.दुकानात गेल्यावर तिथे अमर न्हवता तिने सचिनला विचारलं तर अमर बाहेर गाडी घेऊन गेला होता.रात्र झाली तरी अजून अमर घरी आला नव्हता रात्री वाजले दार वाजल रेवतीच्या अंगावर काटा आला भीतीने काही सुचेना झालं होत.पण रेवतीला धीर देत सचिनने दार उघडले.आणि समोर अमरला बघून तिच्या जीवात जीव आला सचिनने दार बंद केलं अमरला आत घेतलं त्याच्या दारूचा वास सगळ्या घरभर पसरला रेवतिला काय करावं काही सुचेना ती त्याला किचन मध्ये घेऊन गेली.आता रेवती ला सहन झाले नाही ती त्याच्या सोबत वाद घालू लागली अमर मात्र शांतपणे सगळ काही ऐकून घेत उभा होता त्याला त्या दिवशी जेवण दिले नाही.बरेच दिवस असच सगळं सुरू राहील आता अमर घरी यायचा बंद झाला होता तो त्याच्या दुकानातच झोपत होता रेवती आणि अमर अगदी एकमेकांना अनोळखी झाले होते ते त्या दिवसापासून कधी एकमेका सोबत बोलेच नाहीत.याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होऊ नये यासाठी रेवती ने पूर्णपणे काळजी घेतली.पण ज्या गोष्टीची भीती तिला होती ती झालीच शेवटी.अमर रात्री नशेत रुग्णवाहिका चालवत दुकानाकडे येत होता.आणि चुकून एक डुलकी लागली गाडी सरळ जाऊन ट्रक ल मागच्या बाजूने जाऊन आदळली अमारची सगळी नशा उतरली काय करावं कोणाला सांगावं काही कळेना.अमर च नशीब चांगलं म्हणून तो त्या मधे बचावला.घरी हा सगळं प्रकार कळताच रेवतीचा राग अनावर झाला राग आवरत ती अमर जवळ गेली काही न बोलताच फक्त नझर फिरवली.आता पोलीस केस झाली तर सगळी वाट लागणार या भीतीने तिचे हात पाय थर थर कपात होते.पण तरी सुद्धा अमरला अक्कल आली नाही तो त्या दिवशी सुद्धा दारू पिऊन घरी आला आता मात्र रेवती ला त्याच्यावर हाथ उचलावा लागला पण मेलेल्याला मारून काय फायदा नाही म्हणून ती मागे सरकता च मागून अमरने तिच्या पाठीत एक गुधा मारला तो असा काय होता की तिला हुकच भरली सचिनला कसला तरी आवाज आला म्हणून तो उठून बघत होता तर त्याची आई खाली पडली होती.अगदी निपचित आणि अमर तसाच उभा होता पूर्ण नशेत त्यावेळी सचिनने कसं बस सगळ काही सावरलं.वेळ आली की सगळ काही घेऊन जाते नाही तर काही तरी देऊन जाते पण यांच्यात सगळ काही घेऊन जाण्यासाठी आली होती. अपघात झाल्या नंतर झेरॉक्स दुकान ना मधून पण कमी पैसे येऊ लागले.घरात ताण वाढू लागला अमर रोज रोज घरी येऊन रेवती ला शिवीगाळ आणि मारू लागला बरेच दिवस हे सुरू होते पण नंतर अमरच अती होऊ लागल्या मुळे घरी पैसे पुराईचे नाही अमरला आता जुगरची पण सवय लागली त्यामुळे दुकानातून येणारे सगळे पैसे तो तिकडे घालवत होता.त्यामुळे घरी पैसे पुरत न्हवते आता घरात अगदी खाण्या पिण्याचे वांदे झाले रेवती पूर्णपणे खचली होते काय करावं काही सुचत नव्हत. म्हणून तिने तिच्या सख्ख्या भावाला सगळं काही सांगते काही दिवस ती तिच्या घरी म्हणजे माहेरी जाते काही दिवस ती तिथे राहते.तोपर्यंत तिचा सख्खा भाऊ सगळ्या गोष्टी सांभाळून घेतो.घरातून रेवती गेल्या पासून अमर बैचेन झाला होता रेवती कधी घरी येते आणि मी तिची कधी माफी मागतो अस झाल होत.रेवती चा भाऊ तिला सगळ्या गोष्टींची मदत करतो नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी लागणारे कर्ज,घरामधे काही लागणाऱ्या गोष्टी,या सगळ्या गोष्टी बघून अमर स्वतःच्या नजरेत खाली पडतो.आणि सगळे वाईट काम बंद करून पुन्हा नीट रुग्णवाहिका आणि दुकान हे दोन्ही नीट सांभाळतो.आज साईंच्या रूपाने रेवतीच्या भाऊ पुढे आला आणि तीच उध्वस्त होणारे घर वाचवतो.
