प्रतिशोध-एक विज्ञान कथा
प्रतिशोध-एक विज्ञान कथा
रात्रीचे बारा वाजून गेले असतील. झोपच येत नव्हती. मी खिडकीत उभी राहिले. पडदा हलकेच मागे सारला. चंद्र आकाशात झिंगतच होता. चांदण्यांची पखरण सर्वत्र झाली होती. गार वारं अंगाला स्पर्शून गेलं. तसं अंग अंग शहारून गेले. वाऱ्यावर उडणारे भुरभुरते केस मी अलगद बाजूला सारले. विशाल आकाशाकडे पाहत राहिले. अजय नव्हता घरी. तो त्याच्या खास मिटींगसाठी बंगळुरुला गेला होता. पियुषही दोन दिवस स्कूल ट्रीपला गेला होता. मी एकटीच घरात होते. असं एकटं घरी राहिले की घर खायला उठते.
सांडलेलं चांदणं, झोंबणारा गार वारा. अलगद रातराणीचा मंदसा दरवळणारा गंध नि रंगलेली रात्र. कुणाचाही मूड रोमांटिक करायला पुरेसं हे सारं आहे. मूड रोमांटिक झाला असला तरी अजय कुठे होता जवळ? विरहाची सूक्ष्म सुई काळजात टोचतं होती. अजय आता इथं असता तर? अनेक गोड कल्पना मनाच्या पटलावर उमटल्या. तशा अनेक गोड संवेदना ही रक्तात झरू लागल्या. एकमेकांच्या सहवासात रात्री घालायची सवय लागलेली. अशी एखादी रात्र पण एकटं नको वाटत राहायला. अजय जवळ नाही. ही उणीव मनात होती. मन माझे अशाच रंगलेल्या अनेक रात्रींचे प्रणयचित्र आठवत राहिले. ही आठवणींची शृंखला काही क्षणातच तुटली.
माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. तो व्हॉटस्ॲपवर आला होता. रात्रीच्या बारा वाजता कोण तडफडतं ऑनलाईन? मी तो मेसेज पाहिला. अननोन नंबर होता तो. एक व्हिडीओ आला होता. त्यांच्या खाली कॅप्शन पण लिहिलं होतं.
“नेहा, आजचा दिवस खास आहे. तुझ्यासाठी तसाच माझ्यासाठी. बघ, तुला काही आठवतं का? तुझाच आंनद सागर.”
आनंद सागर हे नाव वाचल्यानंतर बरचसं काही आठवत राहिले. त्या आठवणींना असा एक क्रम नव्हता. आपलं मन गोंधळलं की आठवणींचा पण गुंता होतो. हातातली माळ तुटावी नि एक एक मणी ओघळून खाली पडावा. कोणता वेचावं नि कोणता नाही हेच कळत नाही. वेचायचे तर सारेच असतात. तसंच झालं होतं मला. मी पुरती गोंधळून गेले होते. कशाचा व्हिडीओ आहे हे तर पाहावा? तो व्हिडीओ डाऊनलोड करू लागले. तो लवकर डाऊनलोड होत नव्हता. मनाची उलाघाल वाढली होती. नेमका आज काय खास दिवस आहे नि हे काय पाठवलं असेल? कमालीची उत्सुकता लागली होती. मी आता तो व्हिडीओ पाहू लागले.
जे मी पाहात होते त्यावर माझा तर विश्वासच बसत नव्हता. आपण या व्हिडीओमध्ये कशा असूत? अशी कधी त्याच्याशी लगट केली आपण? इतकं? हे असलं सगळे? अगदी त्याच्यासोबत किस्सा पण. छे..! छे…!! शक्यच नाही. आपल्याच देहाची इतकी विटंबना? कसं कोण पाहू शकेल? काही क्षण तर मी डोळेच मिटून घेतले. त्यानं हे नक्की एडिटींग केलेले असणार. असं कसं काय तो करू शकतो? आनंद सोबत आपण अशा? इटस् इम्पॉसिबल. नाही होऊ शकत हे.! "नाही" शब्द मोठ्यानं माझ्या तोंडातून नकळतच बाहेर पडला. राग आणि भय चेहऱ्यावर पांगत गेले.
आनंदचा भंयकर राग आला होता. इतका हुशार नि सायंटिस्ट माणूस इतका विकृत असू शकतो? रात्री असा व्हिडीओ एका स्त्रीला तो कसा पाठवू शकतो? याचा जाब विचारायला हवा. त्याच्या या हरकतीची शिक्षा त्याला व्हायलाच हवी. आपल्या शरीराची इतकी बिभत्सना कोणती स्त्री पाहू शकेल? रागातच मी त्याला कॉल लावला. डोक्यात संतापाच्या ज्वाळा नुसत्या उसळत होत्या.
“हॅलो, नेहा बोलतेय?” मी जाड आवाजात म्हटलं.
“हाय. कशीस तू?” तो शांत स्वरात बोलला. त्याच्या आवाजात हलकीशी हास्याची लकेर होती.
“मी बरी, पण हे काय पाठवलंस तू?” मी आश्चर्यानं आणि तितकंच रागात विचारलं.
“अरे, हो नेहा, मी विचारायचं विसरलो. कसा वाटला व्हिडीओ?” तो हसत होता. ते हास्य खोचक होतं. ते हास्य माझ्या डोक्यातल्या संतापला उकळी फुटायला पुरेसं होतं.
“इतका थर्डक्लास असशील असं नव्हतं वाटलं रे मला?” दात ओठ खात मी बोलले.
“मग कसा वाटत होतो मी? चांगला तर नव्हतोच वाटत ना? आवडत तर बिलकूलच नव्हतो मी.” तो संयमी स्वरात बोलला.
“का करतोस तू हे सारं? माझं लग्न झालंय आता. मी एक विवाहित स्त्री. एका मुलाची आई मी.”
“तुझं लग्न कसं विसरेल मी? नेहा, माझा एक पाय गमावलाय त्या दुर्दैवी दिवशी.”
“मग माहित असूनही तू हे सारं का करतोस?”
“असंच. तू आवडतेस मला. तुला हे तर माहितच आहे ना?”
“मग असं एडिटींग व्हिडीओ करून काय मिळेल तुला? अशी होणार का मी तुझी?”
“हे बावळट. तो व्हिडीओ एडिटींग वगैरे काही नाही. तो खरा व्हिडीओ. ओरिजनल.”
“क्काय? खरा व्हिडीओ. तू पागल झालास का?”
“पागल तर झालो होतो काही वर्षापूर्वी. आता पागल नाही. हा व्हिडीओ एडिटींग नाही. एवढंच सांगू शकतो मी तुला. एवढंच सांगायचं मला आज. जास्त मी काहीच सांगणार नाही तुला.” त्याचा हसण्याचा आवाज आला. तो माझी मज्जा घेत होता. त्याला कसला आनंद झाला होता.
“एडिटींग नाही ना? काय रे अशी तुझ्यासोबत कधी लगट केली मी? छे…!! घृणा वाटते मला माझी.”
“नेहा, तुला का घृणा वाटते? तू नाहीस ती. ती तुझ्यासारखी आहे. सेम टू सेम.”
“मग कोण ती? हुबेहूब माझ्यासारखी दिसणारी?”
“वाटलंच होतं तू अशीच गफलत करणार. तू अजून नीट व्हिडीओ पाहा. तुझं वय किती? तिचं वय किती? थोडंसं काळजीपूर्वक पाहायला शिक. तू समजते तसं काहीही नाही.” तो अजूनही थोडा हसला. दुसऱ्याला मूर्खात काढण्यासाठी इतकं हसणं पुरेसं असतं. माझं तर डोकंच बंद पडलं होतं.
“मी पण दहा-पंधरा वर्षापूर्वी अशीच दिसत होते ना? कपडे पण असेच असतात माझे.”
“खरं तुझं. तारूण्यात एक सोंदर्य असतं. तुझं वय झालं आता. ती तरूणी. तुझ्यासारखीच म्हटल्यावर दोघींच्या चॉईस तर सेमच असणार ना?”
“बरं बरं. मी आता पार म्हातारी झालेय पण कोण ती? तरूण नटखट.”
“असं काय बोलतेस? तुझी कुणीच नाही. ती माझी गर्लफ्रेंड. फक्त माझी. लग्न करतोत आम्ही लवकरच.”
“तू अजून लग्न नाही केलंस?”
“नाही. आता लवकरच करतो लग्न मी. हिच्याबरोबर. कशी वाटली तुला?” फारच खूश होता.त्याला हवी तशी मुलगी भेटल्यामुळेही असेल नि सेम टू सेम माझ्यासारखीच मुलगी मिळवली त्यामुळेही असेल कदाचित. माझ्यासारखी सेम टू सेम पोरगी मिळाल्यामुळे त्यानं हा व्हिडीओ मुद्दामच पाठवला असणार. त्यानं लगेच फोन कटही केला.
“आंनद.. आनंद.” मी नुसत्या हाका मारत राहिले. संपर्क पुन्हा नाही झाला. त्यानं मोबाईल स्वीच ऑफ केला असेल बहुतेक.
आनंद खरं बोलत असेल? त्यानं आजचा दिवस खास असं का लिहिलं? त्यानं हा व्हिडीओ आजच का पाठवला? आठवणीच्या प्रदेशात मन नुसतं भटकत राहिले. आजची तारीख 14.2.2020. चौदा फेब्रुवारी. व्हॅलेन्टाईन डे. सारं सारं तिच्या डोळ्यासमोरून सरकू लागलं. आठवणीच्या हिंदोळयावर मन नुसतं झुलत राहिलं. ते कॉलेजचे मोरपंखी दिवस. एक अनोखी धुंद. उसळते तारूण्य. ओसंडते चैतन्य. ते दिवसच मंतरलेले असतात. अनेकांच्या नजरा होत्या माझ्यावर खिळलेल्या. सोंदर्य नि तारूण्य खेचकच असतं. माझ्या प्रत्येक अदावर अनेक मुलं फिदा असत. माझी नजर मात्र कुणाचा तरी शोधत घेत होती. अनेक स्वप्नांच्या रंगात रंगून गेले होते मी. मला माझ्या स्वप्नातला राजकुमार हवा होता. ते वयच मनाला अशी मलमली पंख चिकटवून हवेत तरंग ठेवत असेल, नाही?
आनंद सागर पण आमच्याच कॉलेजमध्ये होता. खूप हुशार. अतिशय ब्रिलीयंटस्. जिनीयस समजायचे सारे त्याला. तो होताही तसाच. असामान्य बुद्धीमत्तेचं वरदान लाभलेला पण मुलीला आवडावं असं काहीच नवहतं त्याच्याकडं. ना शरीरयष्टी. ना तशी उंची होती. ना फिगर होती, ना जिगर होती. कपाळ भलंमोठं होतं. गाल चपटे. नाकही बसकं. नुरं म्हणतो आपण तसल्या नाकाला. तल्लख मेंदू आहे म्हणून पोरीनी त्याच्या प्रेमात पडायचं का? पौरूषत्व म्हणून काही असतं की नाही? मी अजयला पाहिले नि त्याच्या प्रेमातच पडले. पौरूषत्व कसं पागल करणार असावं लागतं पोरींना, अजयच्या एका एका अदावर मी खूश असे. मीच काय? अनेक पोरीही पागल झाल्या होत्या अजयसाठी. अनेक पोरींनी जाळं टाकलंच होतं त्याला खेचून घेण्यासाठी. तो माझ्या जाळयात अडकला. तो माझा नि मी त्याची झाले. आनंद सागर हे प्रकरण विनाकरणच आयुष्यात आलं माझ्या.
चौदा फ्रेब्रवारी 2000. हा व्हॅलेंन्टाईन दिवस. हसरी प्रसन्न सकाळ होती. ऐन कॉलेजच्या गेटवर आम्ही उभा होतो. अजय सोबतच होते मी. व्हॅलेन्टाईन डेचं वातावरणच भारलेलं असतं. गुलाबी रंगाच्या वस्तू. गुलाबाची फुले. त्यामुळे हे गुलाबीपण मनातही झिरपलेलं असतं. धुंदी तर असतीच. थोड्याच वेळात आनंद आला. त्याच्या हातात फुलांचा गुच्छ होता. एक ग्रिटींग होतं. सारे त्याच्याकडंच पाहत होते. आता हा कुणाला प्रपोज मारणार? तो आला आणि चक्क माझ्यापुढेच बसला. कहरच केला होता त्यानं. चांगलं पोझिशन घेऊन मलाच प्रपोज मारलं त्यानं. काही क्षण सारेच स्तबध झाले. माझ्याकडे सारे पाहत होते. आता मी कशी रिॲक्ट होते ते पाहायचं होतं त्यांना.
“आय लव्ह यू नेहा.” त्याचं हे कृत्य. ते शब्द शॉक होता मला. मी हादरलेच. आपण कुणाला आवडावं हे काही आपल्या हाती थोडंच असतं? मी त्याला हे शांतही सांगू शकले असते. मला राग आला होता. असल्या फडतूस मुलानी मला प्रपोज मारावं? त्याची ही हिम्मत? त्याला कसं वाटू शकते की त्याला मी पसंत करेल? माझ्या सहन करण्याच्या मर्यादेपलीकडचं घडत होतं हे सारं. मी त्याच्याकडं तुच्छ नजरेनं पाहिलं. थुंकले नाही मी त्याच्यावर हे कमी नव्हतं?
“सॉरी यार, आनंद. तुझ्यावर पण मी प्रेम केल असतं पण तुझं थोबाड जरासं चांगलं असायला हवं होतं. तू तुझं हे डुक्करी थोबाड आरशात पाहत नाहीस का रोज?” मला शक्य होती तेवढी अवहेलना मी केली त्याची.
“नेहा, प्लीज. असं नको बोलूस. खरंच माझं तुझ्यावर फार प्रेम.”
“खरं तुझं? पण मी का प्रेम करू तुझ्यावर? तू हुशार आहेस म्हणून प्रेम नाही करू शकत मी. मला समाजात राहायचं. या साऱ्या माझ्या फ्रेंडस मला चिडवतील ना? ही काय पागल डुक्करच बॉयफ्रेंड निवडला हिनं?”
“मी डुक्कर दिसतो तुम्हाला?” त्यानं साऱ्यांकडं आपली नजर फिरवली. सारेच हसले. फक्त खसखस पिकली होती काही क्षण.
“आनंद, शी इज एंगेजड वुईथ मी.” अजय पुढे आला नि हाताचा विळखा माझ्याभोवती टाकत त्यानं मला त्याच्या छातीकडे खेचले. आनंदकडं पाहत त्यानं मला सर्वांसमोर किस केलं. तो नुसता सूक्ष्म नजरेनं आमच्याकडं पाहत राहिला. तो गुलाबाचा फुलांचा गुच्छ नि ग्रेिटींग त्यानं शक्य तेवढी ताकद वापरून फेकून दिले. धूम पळाला. चांगला लांब गेल्यावर मोठ्यानं ओरडला.
“नेहा. आय लव्ह यू. आय लव्ह यू.” नुसता पळत सुटला. आता हा पागल तर होणार नाही. त्याचे डोळे डबडबले होते. तो किती इमोशनल झाला असला तरी मी थोडंच त्याच्यावर प्रेम करणार होते?
तोच दिवस आज. त्यानं मला प्रपोज केलं होतं या दिवशी. वीस वर्षापूर्वी. आज व्हिडीओ पाठवण्याचं त्याचं औचित्य कळलं होतं पण त्या व्हिडीओमध्ये होती ती कोण मुलगी असू शकेल? मेंदूचं पार भरीत झालं होतं माझ्या पण काहीच शक्यता मला बांधता येत नव्हत्या. आपण नाही पण आपल्यासारखीच कुणीतरी त्यानं शोधली हे मात्र नक्की. त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम होतं. हे खरं होतं. अजयही खरंच प्रेम करतो. त्याच्यासोबतही आपण सुखीच आहोत ना? त्याचं असेल आपल्यावर प्रेम पण आपलं कधीच नव्हतं त्याच्यावर प्रेम? अजूनही त्यानं आपला नाद सोडला नसेल का?
त्या नंतर त्यानं कॉलेजात किंवा कुठंच कधी प्रेम व्यक्त केलं नाही. अभ्यासात गढून गेला होता तो. तो होताच मुळी पुस्तकी किडा. अजयच्या नि माझ्या प्रेमाचं रूपांतर आता लग्नात होणार होतं. कॉलेजही संपलं होतं. आनंद सहज असाच भेटला.ंअजय नि मी लग्नाच्या शॉपींगसाठी मार्केटमध्ये आलो होतो. त्याला लग्नाला आमंत्रित करण्यासाठी मी माझी लग्नपत्रिका त्याच्या हातात दिली. अजय जरा लांब होता. त्यानं स्पष्टच सांगितलं मला. इतकं स्पष्ट? असं कुणी सांगतं का? आनंद जरा बावळटासारखाच वागत होता कधी कधी. सायको असल्यावाणी.
“मी नाही लग्नाला येऊ शकत.” त्याच्या अगोदरच आकसलेल्या थोबाडावर अधिक आढ्या पाडल्या त्यानं. तो अजून जास्तच बेसूर दिसला.
“का?” मला त्याची गम्मत करण्याचा मूडच आला होता.
“तुला माझं होता आलं नाही पण मी नाही विसरू शकत तुला. तुझे मेंदी भरलेले हात. ते पिवळं अंग. तो चुडा. तुझं नवरी होणंच नाही पाहू शकत मी या डोळ्यानं माझ्या. आय ॲम सॉरी, नेहा. कदाचित मी तिथं आलो तर मी माझे डोळं फोडून घेऊ शकतो. नाही कंट्रोल करू शकणार मी. नाही येत मी तुझ्या लग्नाला.”
“असं काय बोलतोस? माझ्यापेक्षाही सुंदर मुलगी मिळेल तुला. तुझी आता फेलोशिपसाठी निवड झाली ना रे. तू अमेरीकेत जातोस म्हणे रिसर्चसाठी.”
“मिळेल. जरूर मिळेल पण तू तर नाही मिळणार ना? तू आता दुसऱ्याची होतेस.” मलाही कळलं नाही. आनंदलाही कळलं नाही. तेवढ्यात खटकन त्याच्या थोबाडात पडली. अजयनं मारली होती त्याच्या थोबाडीत.
“नेहा आता माझी बायको. दुसऱ्याच्या बायकोवर प्रेम करायला लाज नाही वाटत का तुला?” अजयच्या संतापाचा पारा वर चढला होता. अजयला राग येणं स्वाभाविक होतं. असं कुणी प्रेम करतं का? लग्न ठरलेल्या मुलीसोबत. मी अजयला दोन्ही हातानं कवटाळलं होतं.
“अजय, मारतोस कशाला? जाऊ दे. त्याचं काय मनावर घेतोस?”
“नेहा, राग नाही आला तुला त्याचा? अजून तुझ्याबरोबर प्रेमाची स्वप्न पाहातो तो डुक्कर. जाऊ दे काय म्हणतेस. असले फार छूपेरूस्तुम असतात. आता एक थप्पड मारली. पुन्हा अशी चूक केलीस तर पाय तोडीन मी तुझे.” अजय त्याच्यावर गुरगुरत होता. आनंद गप गप होता. तो नुसता सूक्ष्म नजरेनं पाहत होता. खरं तर मला त्याची दया आली होती.
अजयनं मला फरफटतच ओढत नेलं. मी काहीच करू शकत नव्हते. मी काही करायलाही नको होते. लग्न होत होतं माझं अजयशी. लग्नाच्या दिवशी तो फार प्याला. एका गाडीनं डॅश दिला. कितीतरी दिवस दवाखान्यात ॲडमीट होता तो. अनेक जण भेटून आले त्याला. बऱ्याच मुलीही गेल्या होत्या. माहित असूनही नाही जाता आलं. टाळलं मी. असं त्यानं एवढं आपल्या प्रेमात का वेडं व्हावं? आपणच त्याला इतकं का आवडावं?
लग्न झालेलं वर्ष होत आलं असेल? असाच एके दिवशी एका मॉलमध्ये भेटला. तसं खरं तर तो मला ओळखूच आला नव्हता. वाढलेली दाढी. लांब लांब वाढलेले केस. अमेरिकेला गेला होता तो रिसर्चसाठी.एवढीच माहिती मला कळली होती. त्यानंच ओळखलं मला.
“नेहा. हाय…!!” उदास हसला. माझ्याकडं आशाळभूत नजरेनं पाहत बोलला. त्याच्या त्या नजरेनं माझ्या आख्ख्या शरीराचे स्कॅनींग चालूच होतं. ते फार विचित्र वाटत होतं. इतकं घाणरेडं अजून तरी कुणी माझ्याकडं पाहिलं नव्हतं. नखशिखान्त निरखत होता तो मला. साडीचा पदर मी अजून लपेटून घेतला. त्याला बोलण्यापेक्षा माझ्याकडं पाहण्यात जास्त इंटरेस्ट होता. तसं तो बराच वेळ असाच पाहत होता. लांबून किती तरी वेळ. चोरून पण पाहत होता. मलाच तो ओळखला नव्हता.
“हाय. तू आनंद आहेस का?” मी हासत त्याला विचारलं.
“छान..! तू माझं नाव अजून विसरली नाहीस तर?” तो मंद हासला. खिन्नतेची एक किनार होती त्या हासण्याला.
“तुझं नाव कसे विसरेल मी? कुठे असतोस सध्या?” मी छानसं हासत विचारलं. बोलतानी जनरली आपण जितकं हासतो तितकंच हासले मी. मला जास्त पघळायचं नव्हतं.
“आहे अजून जिवंत. रिसर्च पूर्ण झालं. आता प्रोजेक्ट करतोय.” वास्तविक त्याचं हे ऐकण्यात मला अजिबात रूची नव्हती. त्याचं लग्न झालं का? तो सेटल झालाय का? अशा प्रश्नांची उत्तर मला हवी होती. आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात कोण आली दुसरी याचीही उत्सुकता होतीच. प्रश्न डायरेक्ट त्याला विचारण्याच धाडस पण नव्हतं माझ्यात. त्याचं लग्न झालेली बातमी मला ऐकायला आवडली असती. तसं तो काहीच बोलत नव्हता.
“अरे सेटल झालास की नाही तू?”
“सेटल? दहा लाख डाॅलर्स देते मला एक अमेरिकन कंपनी. आपलं सरकार पन्नास लक्ष रूपये देते आहे एका वर्षासाठी. अशा दोन राष्ट्राच्या फेलोशिपस् आहेत.” तो त्याचं ऐश्वर्य व विद्वत्ता सांगून मला इम्प्रेस करू पाहत असावा. आपण या सोबत लग्न केलं नाही याचा पश्चात्ताप करावा अशी अपेक्षा करतो की काय?
“हे सारं होणारच होतं. तू अजूनही मोठा होशील. तसा तू हुशार आहेस तितका. वहिनी कधी दाखवतोस?” मनातला प्रश्न मी शेवटी विचारलाच.
“लग्न. नाही केलं अजून मी.” माझ्या डोळ्यात पाहत तो बोलला. खोल खोल पाहत होता. माझं मात्र त्याच्या डोळ्यात पाहण्याचं धाडस नाही झालं.
“का? अजून पसंत नाही का मुलगी?”
“नाही. तू तर नाही झालीस माझी. मला दुसरं कुणी पसंत पडत नाही. माझं लग्नच होईल की नाही?” तो उदास हासला.
“सोड, यार. इतका मोठा सायंटिस्ट आहेस तू. हुशार आहेस.”
“मी हुशार आहे पण सुंदर नाही. सुंदर मुलींनी पसंत करावा असा तर नाही ना?”
“आता चिक्कार पैसा तुझ्याकडे. कसली पण छान बायको मिळेल तुला. तू जर ठरवलं तर एखाद्या छान नटीसारखी सुद्धा.”
“कोणत्या नटीसारखी करू?” जशा काही नट्या याची वाटच पाहत बसल्या. रस्त्यावर पडल्यात नट्या? तो इतका बावळटासारखं बोलेल असं नव्हतं वाटलं मला. आता त्याची फिरकीच घ्यायची ठरवलं होतं मी.
“तुला जी आवडते नटी तिच्यासोबत कर लग्न. कोणती नटी आवडते तुला?”
“मला तर तूच आवडतेस. दुसरं कुणीच नाही आवडत.” त्याच्या या उत्तरानं माझ्या डोक्यात संतपाची सणक उठली. त्याचं चांगल कानशिल सडकून काढावं सॅन्डलंने अशी तीव्र नि भयंकर इच्छा झाली.
“आनंद, तू पागल झालास का? माझं आता लग्न झालंय. मला एक नवरा. मला एक मुलगा. आता मी तुझी कशी होणार? प्लीज असं नको करू. माझा नाद सोड. बघ ना या जगात किती सुंदर मुली आहेत. माझ्यापेक्षा एका चढ एक. करीना. ऐश्वर्या.. दीपीका… कटरीना. पटव एखादीला. कर लग्न.” खरं तर मी हे सारं त्याला उपरोधानं बोलत होते. तो नॉनसेन्स सिरियस झाला होता. मी माझं हसू थोडं दाबून धरलं.
“असं काय बोलतेस? मला मान्य. तू आता माझी होणार नाहीस. तुझी सर जगात कुणातच नाही. माझं मन तरी ते मान्य करित नाही.”
“कसं सांगू तुला? तू नाही सुधरायचा.” मी बरचसं लाबं वैतागून चालत गेले.
“खरं तुझं.”
“काय खरं?”
“मी नाही सुधरणार. तुझं वेडंच लागलं मला.” तो स्तब्ध उभा होता.
“नेहा. मला कळतं. तू आता माझी नाही होऊ शकत. अशक्य गोष्टी असतात या जगात. ज्या फक्त अशक्यच असतात. त्या शक्यच नसतात. तसंच हे तू माझी होणं अशक्यच आहे. या जन्मात तरी. पूनर्जन्मावर माझा विश्वास नाही.” तो इमोशनल झाला होता. त्याचे डोळे डबडबले होते. त्याची ती नजर माझ्या शरीराचा अवयव न अवयव निरखत होती. मी पाठमोरी झाले तरी तो पाहतच होता. कसले घाणरेडे विचार करत असेल हा आपल्या एका अवयवा विषयी. मला आता लवकर त्याच्या त्या नजरेपासून सुटका करायची होती. सहज मागे पाहिलं तर त्यानं थांबण्याचा इशाराच केला. पळतच माझ्याकडे येऊ लागला.
मी थांबले. आता काय बोलणार हा? तो आला असं माझ्या उघड्या दंडावर जोरात इंजेक्शन टोचलं. मला इतकं गच्च पकडलं होतं. मी प्रयत्न करूनही हालचाल करू नाही शकले. मी ओरडले. तशी अनेक माणसं जमा झाली. त्यानं बरचसं रक्त काढून घेतलं होतं. माझ्या दंडावरील त्वचेचा टवका पण. तो हासत हासत पसार झाला. नेमकं काय सांगावं हेच मला कळत नव्हतं. माझं मीच सावरून चालायला लागले. दंडावर त्यानं जिथं जखम केली होती. ते पदरानं लपेटून घेतलं.
“धरा धरा.. पकडा पकडा.” लोक ओरडले पण कुणीच पळालं नाही. त्यानं रक्तात काही सोडलं तरं नाही ना? रक्तात त्यानं काही सोडलं नव्हतं पण त्यानं रक्त मात्र नेलं होतं माझं. त्वचेचा एक इंच भर तुकडाही. त्याला टोचतानी कसं काहीच वाटलं नसेल?
अजयला आनंद भेटला हे सांगणं शक्य नव्हतं. त्यानं ते सहनच केल नसतं. त्यानं आपलं असं रक्त का काढून घेतलं असावं हे अजूनही मला कळलं नाही. आनंद पुरा पागल झाला असावा. ते रक्त तसंच जपून ठेविल आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून. नाहीतर नाव कोरून ठेविल रक्तानं स्वतःचं. असंच काही तरी करील. त्याचं प्रेम खरं असलं तरी आपलं काय चुकलं?आपण कधीच त्याला त्या नजरेनं पाहिलं नाही.
अशीच कुणीतरी आपल्यासारखी दिसणारी त्याला भेटली असेल. त्यामुळेच त्याने हा व्हिडीओ पाठवला असावा. इतकं सेम टू सेम दुसरी मुलगी असू शकते? आज चौदा फेब्रुवारीला त्यानं प्रपोज मारलं असेल तिला. इतकी कोवळी मुलगी याच्या कशी प्रेमात पडली असेल? आनंदचं वय कमी नसेल. तो आता चाळीशीत तरी असेल. सतरा अठरा वयाची ही पोरगी कशी काय त्याच्या प्रेमात पडली असेल. कसलं प्रेम हे? कॉल गर्ल असेल नाहीतर. एखादी वेश्या..पैशासाठी काय पण. ती आपल्यासारखी हुबेहूब कशी दिसते? का आपली डमीच असेल? लग्नानंतर एक वर्षानं भेटला. तो पुन्हा कधीच दिसला नाही. शुभदा सांगत होती. आनंद सागरने अजून पण लग्न केलं नाही. आज त्यानं व्हॅलेन्टाईन डेचं औचित्य साधून हा व्हिडीओ पाठवला. बिच्चारा आनंद…!!
हा व्हिडीओ अजयला माहित होता कामा नये. त्याला विश्वास बसणार नाही. आपण नाहीत म्हणून त्या व्हिडीओमध्ये. अजय लगेच पंधरा वर्षापूर्वीचा अंदाज काढून मोकळा होईल. आपणच आनंद सोबत आहोत. आनंद तर सूड घेतो आहे. तो सूड घ्यायला टपलेलाच आहे. मी तो व्हिडीओ लॅपटॉपमध्ये एका फाईलमध्ये लपून ठेवला. जो की अजय त्याला शोधणार नाही. त्या विचारातच गर्क असतानाच डोळा लागला.
आनंदने व्हिडीओ पाठवला त्यालाही दोन महीने होऊन गेले असतील. अजयला नाही कुणालाच मी हे सांगितलं नव्हतं. मम्मीला पण नाही. अजय बंगळुरुला होता. असंच एका रात्री नऊ वाजता व्हिडीओ कॉल आला. मी सारं आवरूनच बसले होते. आपला नवरा इतका लांब असला तरी आपण कसं फ्रेश दिसावं त्याला. बायको प्रसन्न वाटली की नवऱ्यांचा मूड कसा छान होतो. तो कॉल करणारच होता मला. म्हणून मी सारं आवरून बसले होते. एकदाचा कॉल आला.
“हॅलो कशीस?”
“छान. तू कसा आहेस?जेवण केलेस का?”
“जेवण केलंय पण मोठं आश्चर्य पाहिलंय गं मी आज. तेच सांगायचं तुला.”
“असं काय पाहिलंय माझ्या राजानं.” मी लाडात येत विचारलं.
“सेम टू सेम.तुझ्यासारखी एक मुलगी पाहिली मी आज मार्केटमध्ये.”
“क्काय? असं कसं शक्यं?”
“तुझी कुणी अशी जुळी बहिण तर नाही ना?”
“अजय, वीस वर्ष झालेत आपल्या लग्नाला.अशी कोणती बहिण आहे आणि मी ती लपवून ठेवली तुझ्यापासून.लपवणं शक्य तरी होऊ शकत का?”
“नेहा,मी सिरियसली बोलतोय.मी तर चुकलोच होतो.मला वाटलं तूच आलीस.मला फॉलो करत.”
“माझा विश्वास माझ्या राजावर.मी का फॉलो करू तुला?तू मागं लागला होतास माझ्या मी नाही?” माझा रोंमांटिक मूड होता.
“एका सारखं दुसरं माणूस असू शकत?” अजय.
“हो.आफकोर्स.अशी अनेक माणसं असतातच की.”
“तुझ्यापेक्षा लहान ती.तू कॉलेजला असतानी दिसायचीस अगदी तशीच ती.मला जास्त आश्चर्य याचं वाटतं.तुझा फेव्हरट रंग स्कायब्लयू.तुझ्या सारखेच कपडे पण तिनं घातले होते.तुला वाटेल अजय काय गंमत करतोय.मी पंधरा मिनिटे तिला फॉलो करत होतो.”
“बंगळूरुला जाऊन असली थेरं करतोस तू? दुसऱ्या बायांच्या मागे लागतोस.” मी बळंच हासले.आनंदने जो व्हिडीओ करून पाठवला.नक्की हीच पोरगी असेल ती. अजयला भेटलेली.अजयला कसं सांगणार?
“ती कोण असू शकेल? याचा शोध घ्यायचा होता मला.” अजयला त्या पोरीनी चांगलंच आश्चर्याच्या गर्तेत ढकलं होतं. तो फार दुसरा विचार या घडीला तरी करू शकत नसावा बहुतेक.
“बोलायचंस ना तिला?”
“मी नाही बोलू शकलो.तसा प्रयत्न होता माझा.ती गेली लवकरच.काही फोटो काढण्याचा प्रयत्न केला मी.अर्थात लांबून.जवळ जाऊन फोटो नाही काढू शकलो.तुला आश्चर्य वाटेल.तू हे फोटो तर पाहा.”
“अजय,हे जग खूप मोठं.माणसासारखी माणसं अनेक असतात.माझा आणि त्या सुंदर.तरूणीचा काही संबंध नाही.झोप आता.इकडे कधी येतोस?” मला टेन्शन आलं होतं फार.आनंद जर अजयला भेटला तर?
“आता मी कसं झोपू शकेल?त्या पोरीला पाहून बऱ्याच काही आठवणी जागा झाल्यात.भूतकाळ नाचतो नेहा माझ्या डोळ्यासमोर.”
“तुला आवडली तर नाही ना?” मी माझी जीभ चावत त्याला थोडंसं चिडवून पाहिलं.
“आवडायला काय?तुझ्यासारखीच सेम ती.तू तर मेरी जान है.”
“जान इकडं पुण्यात.कंट्रोल युवर सेल्प.अजय,तिकडले लोक फार मारतात बरं.तू त्यांचे पिक्चर पाहतो ना, राजा? जपून बरं.” मी हासत त्याची मज्जा घेत होते.
“ऐ गप. अशी काय पागल सारखी बोलतेस?ती आपली मुलगी शोभेल इतकी लहान.पण तू?”
“आता काय पण अजून?” अजयनं फोनवर मला किस करण्याची अपेक्षा केली. फोन ओठाला लावत किस केलं मी. च्यूम.. च्यूम.. असा आवाज काढला. तो आवाज ही त्याचं समाधान करायाला पुरेसा झाला. त्यानं फोन कट केला.
अजयने सांगितल्यापासून तर माझं डोकंच हँग झालं होतं. आपल्यासारखी सेम टू सेम एक मुलगी या जगात आहे तर? आनंदने पाठवलेला व्हिडीओ नक्की तिचा असणार.आनंद पण तिकडचं कुठलसा प्रोजेक्ट करतोय.नक्की तिच असणार.याची खात्रीचं झाली होती माझी.
मी अजयने पाठवलेले फोटो डाऊनलोड केले. ते दूरून घेतलेले असले तरी पुरेसे स्पष्ट होते. सेम टू सेम माझ्यासारखीच होती ती. कॉलेजला असतानी अशी दिसायचे मी तिच्या अंगावर घातलेले कपडे?आठवलं…!!असेच कपडे घातले होते मी.त्या व्हॅलेन्टाईन डेला.आनंदने प्रपोज मारलं होते तेव्हा.स्कायब्ल्यू कलरचा ड्रेस नि पींक कलरची ओढणी.इतक्या वर्षापूर्वीची कपडे आताची तरूण पोरगी कशी घालेल?आता कपड्त तर किती चेंसेस आलेत.आनंद मुददाम तिला हे कपडे घालायला लावत असेल का? एवढं सारं आनंदची ती कशी ऐकल?आनंदची गर्लफ्रेंड असेल तर इतकं नाही ऐकू शकत त्याची.आनंदचा कोंबडा करून ठेवला असेल तिनं.त्याची गुलाम थोडीच ती?
मी माझे कॉलेजचे फोटो काढून त्यांचं तौलनिक निरीक्षण सुरू केलं. त्यासाठी मला रात्र ही अपुरी पडली.इतक कसं सारखं सारखं असू शकत?खर तर मला आंनदलाच फोन करून विचारायचं होतं.नेमक काय हे? असं का करतो तो? एवढा मोठा सांयस्टीट आसल्या फालतू गोष्टीत का रमतोय? सडकछाप मुलं सुद्ध विसरून जातात.असलं लव्हं मॅटर.माझं त्याला त्यावेळी कॉल करायचं धाडस झालं नाही.ते पागल पुन्हा म्हणेल.माझं तुझ्यावर प्रेम.आय लव्हं यु.मग काय घ्या?
आपल्या सारखी सेम दिसणारी पोरगी आनंदाला कुठे भेटली असेल? इतकी लहान मुलगी त्याच्या प्रेमात कशी पडली असेल?मुळात आंनद तरूण असतानीच मुलींना खेचून घेईल असा नव्हता.आता तर त्याच वय झालं?त्या मुलीच नाव काय असेल?जात,धर्मं.. गाव प्रांत काय असू शकेल असे प्रश्न मला पडू लागले.अजयनं तिच नाव ही नेहा पाटील ठेवलं नसेल ना?आपण घातलेलेच कपडे आनंद तिला घालायला लावतो आहे हे खरं असेल तर तिचं नाव नक्कीच नेहा ठेवलं असेल त्यानं.नाव तर तो सहज चेंज करू शकतो.
माझ्या मेंदूचं पार दही झालं होतं.प्रश्न ही संपत नव्हते नि त्याचे उत्तर ही सापडत नव्हते.आनंद नि नक्की काही तरी केलं आहे.एखादया मुलीला प्लॅस्टीक सर्जरी करून आपल्या सारख बनवलं असेल का?पुराणातल्या ही काही गोष्टी आठवू लागल्या. असं सेम टू सेम माणसं असतात. तयार करता येतात. पुराणाच्या कथेतून किंवा काल्पनीक कथेतून हे शक्य? वास्तवात कसं शक्य हे?
असं काही आनंदकडे नसेल ना? एकासारखचं दुसरं माणसू बनवायचं? अही रावण व मही रावण.राजा द्रोपद.एकाचे असे अनेक डमी असतं.खरा डमी कसा ओळखायचा?रक्ताच्या थेंबापासून अनेक आही व मही रावण तयार व्हायचे.आजीनी सांगितलेली गोष्ट आठवू लागली.असंच काही तर आनंदने केले नसेल ना?त्यानं आपलं रक्त नेलेले आहे.मनात काही काही येत राहिलं.आंनदला भेटूनच सार विचारायला हव.सारं सांगण का तो?
दुस-या आठवड्यात बंगळूरुवरून अजय आला पण तो जरा उदास वाटला. त्याची उदासी तो लपवण्याचा प्रयत्न करत होता.असं जाणवत होतं मला.तो माझ्या विषयीची अधिक माहिती काढत होता.ती मुलगी भेटल्यापासून तो जरासा साशंक वागत होता.माझे सारे मित्र जाणून घेत होता.आनंदशिवाय कुणी माझ्या प्रेमात पडलं नव्हतं.अजयच्या तर मीच प्रेमात पडले होते.काही दिवसात लग्न ही झालं होतं.कुणीच दुसरा पुरूष आपल्या जीवनात आला नाही पण हे अजयाला कसं सांगणार? त्याला हे कसं पटणार? तो आल्यापासून पियूषकडे वेगळंच पाहत होता. नेमका पियुष कसा दिसतोय? कुणासारख दिसतोय? पियुष तर झेरॉक्स कॉपीचं की अजयची.
“अजय,तुझी तब्येत तर बरी ना?” मी त्याच्या केसात हात फिरवत म्हटलं.तो तितकासा शहारला नाही डोक्यात संशयाची माती कालवली गेली असल्यावर अनेक संवेदनाच माणूस हरवून बसत असेल.त्याची नजर खोलखोल काही तरी शोधत होती.मी त्याच्या डोळयातून मनाच्या तळाचा ठाव घेत होते.
“तब्येत ठीक.काही नाही झालं मला.” मला दूर लोटलं त्याने.
“तसं काही नाही कसं म्हणतोस? तुझा मूडच ठीक नाही.अजय आपण तब्बल आठवडयानंतर भेटतोत. असा थंडा थंडा कूल अजय पाहायची सवय नाही मला.नेहमी कसं आक्रमण असतं यार तुझं माझ्यावर. आज असा एकदम असा ?”
“मला वाटत तू शांत पडू दयावं मला असचं.एकट एकट.”
“असं कसं पडू देईल मी शांत.क्काय?त्या माझ्या सारख्या सेम टू सेम मुलींनी वेडं तर लावलं नाही ना?”
“असं काय बोलतेस? ती आपल्या मुली सारखी आहे.असं अभ्रद बोलू नकोस.”
“अजय,ती आपल्या मुलीसारखी असेल पण आपली मुलगी नाहीये ती.माझी तर नाहीच नाही.” मी माझा आवाज मोठा करून म्हटलं.
“नेहा,हे काय बोलतेस तू?”
“तुझ्या मनात जे खदखदतं त्याचं हे उत्तर.त्या मुलींचा नि माझा काहीही संबंध नाही.कसं सांगू तुला?” मी काकुळतीला येऊन बोलले.
“मी कुठं म्हणतोय.तुझा नि तिचा काही संबध आहे. सेम टू सेम तुझ्यासारखी एवढचं.ती सेम तुझ्यासारखी का आहे? याचा विचार करतोय मी.”
“तू कसाही विचार कर.शपथ.मला पियुषची.ती माझी मुलगी नाही.माझी बहिण पण नाही.”माझे डोळे डबडबले होेते.
“नेहा,तुझ्या डोळ्यात पाणी?”
“माझ्या चारित्र्यावर संशय येतोय तुला.”
“अग् तसं नाही? काय बोलतेस हे तू?”
“मग माझ्या मम्मीवर संशय घेतोस?”
“संशय वगैरे काही नाही ग्.मला कळत नाही.ती तुझ्यासारखी इतकी सेम कशी?मम्मीच्या चारित्र्यावर मी कशाला संशय घेऊ?”
“तुला ती माझ लहान बहिण वाटते ना? अजय असतात एक सारखी माणसं अशी कित्येक.जग खूप मोठं.खूप मोठं.”त्याच्या कुशीत शिरले. त्यानं हाताचा विळखा टाकला माझ्याभोवती.मला हुंदका आवरला नाही.
“असतात ना?असू शकतात.दॅटस् इट.फक्त उत्सुकता वाटते मला.तू हे काय गैरसमज करून घेऊ लागलीस? ठीक तिच्या आपला काही सबंध नाही. मला माझ्या घरात त्यामुळे ताण नको. हसं बरं तू.” मी हासत त्याच्या कुशीत तशी पडून राहिले.अजयला काय वाटल असेल पण त्यानं पुन्हा कधी मला त्या मुली विषयी सांगितलं नाही.कधी पुन्हा मला काही विचारलं नाही.मला अजून त्याला त्रास दयायचा नसवा बहुतेक. नाहीतर एकदमचं विससरून जाणं कसं शक्यं? मी त्या मुलीला भेटायचं हे मात्र मी मनोमन ठरवलं होतं.त्यासाठी मी आनंदचीसुद्धा मदत घ्यायला तयार होते.त्यासाठी मला बंगळूरला पण जाव लागलं तरी जायला मी तयार होते.जावाचं लागणार होतं.
पियुषच्या सुट्ट्या होत्या समरच्या.तो मम्मीकडे गेला होता.हटट करून मी बंगळूरला अजय सोबत आले.अजयने ही ते सहज मान्यं केले.त्यालाच मला बरोबर घ्यायच असाव.अजयचं तसं तिथं ही बिझीच शेडयूल असतं.तो मला फार वेळ देऊ शकत नसे.मी अशीच एकटी भटकत असे.मला खर तर त्या मुलीचा शोध घ्यायचा होता.मला जर ती तशी नाही भेटली तर मी आनंदलाच कॉल करणार होते.
असंच एका सांयकाळी न्यू सीटी मॉलमध्ये फिरत होते.ती दिसली मला.सेम टू सेम मीच.बराच वेळ तिला फॉलो केलं.ती एकटी नव्हती.तिच्या सोबत दोन माणसं होती.ते तिला प्रत्येक गोष्टीत मदत करत होते.मी तिचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला.आवाज पण माझ्यासारखाचं होता.एकदम सेम.असं कसं असू शकते?आता मला पुढचे पाऊल उचलायला हवे होते.मी तिच्या पुढे जाऊन मुददाम उभी राहू लागले.एक दोनदा आमची नजरानजर ही झाली.तिला ही आश्चर्यं वाटलं असावं.मी एक टकच तिच्याकडं पाहत होते ना?तिनं पाहिलं की थोडसं स्मित केलं.ती हासली.ते हासणं छान होतं.माझ्यासारखचं होत.आता माझं कॉन्फीडन्सं वाढला.मी अधिक जवळ गेले.
“हॅलो.आय ॲम नेहा पाटील.” मी तिच्याकडे नुसते पाहात राहिले.खरं तर मला तिला पूर्णं निरखायचं होतं. एवढ्या वेळात ते कसं शक्य होतं?
“हॅलो.माय नेम इज नेहा सागर.”ती नुसती माझ्याकडे पाहत राहिली.तिला ही आश्चर्य वाटलं असाव. एवढंचं ती ड्रेसमध्ये होती नि मी साडीत.आजूबाजूचे लोक आमच्याकडे पाहत होते.आनंदने नाव पण बदलं होतं तिचं.नेहाचं नाव ठेवलं त्यानं तिचं.काय बावळट माणूस आनंद?
“आपण एक सारख्या.आपलं नाव पण सेम.” अश्चर्याच्या अनेक रेषा चेह-यावर पसरवत मी बोलले.
“वॉव..!! वंडर फुल्ल.खरंच आपण इतक्या सेम टू सेम कशा?”ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे बराच वेळ पाहत राहिलोत.
“तू कुठे राहतेस?”
“ड्रिम पार्क.तुम्ही?”मला याचं आश्चर्य वाटत होतं.इतकं छान मराठी ही कशी काय बोलू शकत होती.आश्चर्याचे पण ॲटक येऊ शकत असता तर मी त्या ॲटकने मरू शकले असते.इतकं ते सारं धक्कादायक होतं.
“मी महाराष्ट्रातून आली आहे.” तिच्या डोळयात पाहत मी सांगितल.मी आरश्यात तर पाहत नाही ना? असा प्रश्न मला पडला होता.
“महाराष्ट्रातून..??” तिचा चेहरा प्रश्नांकित झाला.मी तिच्या गळयात पाहत होते.गळ्यात मंगळसूत्र होतं.आनंदने तिच्या सोबत लग्न केलं होतं असावं.आपला शिक्का मारून टाकला होता त्यानं तिच्यावर.हे आता सिद्धा झालं होतं.तेवढ्यात तिच्या बरोबर जे दोन लोक होते त्यानी तिला बोलावलं.खरं तर तिला पण अजून माझ्यासोबत बोलायचं होतं.त्या दोघानी तिला फरफटतच नेलं.एका पॉश गाडीत कोंबलं.ती माझ्याकडं पाहत होती.लोक आमच्याकडं पाहू लागले.मी तर मोठ्यानं ओरडले सुद्धा.
“असं काय करता?जरा बोलू द्यावं तिला.”माझं कोण ऐकणार होतं.दुकानात जेवढे लोक होते ते आमच्याकडे पाहत होते. साधं ती बाय पण नाही करू शकली.
“उसे क्यू खिचके ले गये?क्या आपनी बहन है?”गर्दीतल्या एका काकूनं मला विचारलं.काय उत्तर देणार होते मी? लोकांना असचं वाटणार ना? आम्ही एकतर बहिणी बहिणी असू किंवा माय लेकी.अस काहीच नातं नव्हतं आमच्या दोघीत तरी आम्ही एक सारख्या होतो.मी बाहेर पळाले पण तोपर्यंत तिला घेऊन ते गेले होते.मी एक टक पाहत बसले.आता हे अजयला सांगावा की नाही हा मोठा प्रश्न मला पडला होता.आनंदला फोन करून विचारायाला हवं.आनंदच फक्त सांगू शकत होता.तिचं नि आपलं नात.तिचा नि आपला संबंध.त्याला तर फोन करावचं लागेल.
मी घरी पोहोचले.अजय रात्री नऊ वाजता येईल.घरी काहीच काम करण्याचा मूड नव्हता. रात्रीचं जेवण बाहेरूनच मागवाव लागणार होतं.मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले तर आनंदचा कॉल आला.हा मनकवडा झाला की काय? त्याला फोन लावायचा होता.तेवढ्यात त्याचा कॉल आलाय.
“नेहा.गुड इव्हनिंग.कमाल तुझी.इथ पर्यंत आलीस तू.” तो थोड खोचक हासत होता.
“पहिले हे सांग मला.कोण ती?”
“आता किती वेळ सांगू.इटस् माय लव्हं.”
“ते माहिती रे.माझी कोण ती?काय नातं तिचं नि माझं.”
“ती तुझी कुणीच नाही.असं का वाटतं तुला? ती तुझीच कुणी तरी आहे?”
“का वाटतं म्हणजे.किती सेम टू सेम आहोत आम्ही दोघी.”
“आहेत ना.एवढंच नातं तुमचं दोघीच.सेम टू सेम.बस्सं.फार डोक्याचा किस नकोस काढू.मेंदूच भरीत होईल तुझ्या.” तो मोठ्यानं हासला.त्याचं हासणं क्रूर होतं.एवढं भयानक तो हसू शकतो.पहिल्यांदाच कळलं मला.
“असं का हासतोस? पागल वाटते का मी?” मी रडकुंडी आले होते.
“फारच आश्चर्य वाटल असेल तुला,नाही? हे साहजिकच कुणाला ही वाटेल.नेमकं तुला कसं वाटलं तिला असं पाहिल्यावर.” त्याला प्रचंड आनंद झाला होता.तो चेकाळला होता.तू नाही पण तुझ्यासारखीच बायको केली मी असं काही तरी त्याला मला खिजवायचं असेल.असं वैतागून किती विचारलं तरी तो सांगणार नाही.मी रिलॅक्स झाले.
“कसं वाटलं म्हणजे? मला शॉक होता तो.नुसतं आश्चर्याच्या धक्क्यानं मेले असते मी.”
“तू घाई केलीस.मी सरप्राईज देणारच होतो.माझा प्लॅनच होता.तुझी आणि तिची भेट घडवून आणायची होती.जगात फकत तुझ्याशीचं ओळख करून द्यायची होती तिची.फक्त तुझ्याशीच.”
“असलं कसलं सरप्राईज देणार होतास?जगात मलाच का तिच्याशी भेटवणार होतास?”
“का म्हणजे? ती तुझ्यासारखीच.बाकीच्या जगासाठी ती माझी बायकोच असणार आहे.तिची हीच ओळख असणार आहे. सौ.नेहा सागर.”
“ती पण माणसूच ना?जरा हिंडू दे.फिरू दे.करू दे ना तिला पण तिच्या ओळखी.मला त्या दुकानातली मुलं सांगत होती.असं एकटं नाही फिरू देत तिला.कायम बॉडी गार्ड असतात बरोबर.”
“मग?अतिशय महत्वाची व्यक्ती ती.तिच्या सेक्युरीटीची जबाबदारी माझी.तू फार टेन्शन नको घेऊस.तुझा नि तिचा तसा काहीचं संबंध नाही.हे जग फार मोठं आहे.अशी एक सारखी माणसं असतात कित्येक.काहीच नातंगोतं नसतानी ही.”
“मग?ती माझ्यासारखी कशी दिसतेय.माझ्या सारखाचं आवाज.हासणं बोलणं पण माझ्यासारखचं.”
“हे पण खरं तुझी कुणीच नाही ती.”मोठ्यानं हासत सुटला.
“असं प्लॅस्टीक सर्जरी करून तिला माझ्यासारखं बनवलंस ना?असं माझा चेहरा तिला चिकटवून फक्त आभास तयार करू शकलास.माझ्यासारखी दिसते म्हणून मी थोडीच?” प्लॅस्टीक सर्जरीनं तिचा चेहरा बनवता येऊ शकतो.इतर गोष्टी.अवयव. बांधा.केस.सारचं कसं सेम? आवाज पण कसा बनवता येऊ शकेल.तिचं रहस्य वेगळच काही तरी होतं.मी मुददाम त्याला विचारलं.असं बोलतं करूनच तो कळत नकळत काही सांगून टाकिल.तशी शक्यता तरी होती.
“पागलेस तू.प्लॅस्टीक सर्जरी केलेले कुणी नाहीये ती.तशी ती दुसरं कुणी नाही.एका अर्थानं तुचं आहेस. दोन नेहा.एक माझ्यावर भरभरून प्रेम करणारी.दुसरी माझी नफरत करणारी.”
“एकाच व्यक्तीचं दोन रूप कशी असू शकतात? इम्पॉसिबल.”आनंद असं काही बोलत होता की मला आता काहीच कळत नव्हतं.मला काहीच कळू नाही म्हणूनच तर तो असं बोलत असेल ना?
“तूच आहेस म्हंजे? मी कशी असेल?”
“शक्य तेच करू शकतो माणूस.तुझ्यासाठी,सर्वसामान्यासाठी हे सारं अशक्यच पण माझ्यासाठी नाही.शक्यता व्यक्तीसापेक्ष असतात.अशक्यता ही बदलतात व्यक्तीनुसार.”तो मोठयानं खिदळला.त्याचं आज हसूच झालं होतं.मला तर बोलू पण वाटतं नव्हतं त्याच्याशी.
“भेटायचं तिला अजून?”त्यानं मला विचारलं.
“हो,बोलू नाही दिले मला तिच्याशी तुझ्या माणसांनी.”
“काय बोलणारेस तू?आपण इतक्या सेम टू सेम कशा आहोत? पगली,तिला थोडंच हे माहित आहे ?विचारते कशाला? बघ ना.असं डोळ फाडून.अंग अंग न्याळून घे तिचं.वाटलंस तर कपडे पण हटवून बघ.सेम तुझ्यारखीच ती.”
“आनंद,काय बोलतोस हे?लाज नाही वाटत तुला?कपडे काढून पाहत असतात?स्त्रीची अशी इज्जत करतोस?”
“लाजेच काय? तुला आवश्यकता वाटल्यास करं तसं.तुम्ही दोघी स्त्रीयाच आहात.माझी काय हरकत नाही.तिची पण असणार नाही.तुझंही समधान होईल.हे फक्त जगात तुलाच करायला मुभा असेल. दुस-याला तर मी तिचा केस पण दिसू देणार नाही.”
“तुझी बायको का गुलाम ती? अशी कशी हरकत असणार नाही तिची?”
“ती माझी बायको.ती माझ्या मुठीत.तसंच केलं मी तिला माझं नि फक्त माझं.तुला करायचं कुणाला असं मुठीत.देतो इंजक्शनं माझ्याकडं.आपलं नि फक्त आपलचं बनवायचं एखाद्याला.” तो कुत्सिपणे हासत होता.
“मला इंजेक्शन नकोस देऊ.अजयच मला फक्त माझा नि माझाचं हवा. तो आहेच फक्त माझा.खरं प्रेम आमचं दोघांचं.एक कर आम्हाला दोघीला भेटू तर देशील ना पुन्हा एकदा?”
“अवश्य?पण आज नाही.”
“मग कधी?” फार चिडून जमणारचं नव्हतं.प्रकरण वेगळचं होतं.
“कधीही पण अचानक.नो प्लॅन.कॉल आला की यायचं एकटीनचं.जायचं एकटीनचं.प्रेम तर नाही करू शकलीस पण ही गोष्ट कुणाला सांगू नकोस.बस्सं एवढचं कर.तुम तो मेरी जान है.तुझ्यासाठी काय पण.”
“मी तुझी जान आहे नि ती?”
“ती बायको माझी.तू जान.कसं सांगू तुला? गुडनाईट.”त्यानं कॉल कट केला.वाटतं होतं तेवढं हे सारं सोप नव्हतं.काहीच कळत नव्हतं.जेवढा आपण विचार करू.तेवढं अवघड वाटू लागलं होतं.अजयला हे सारं मॅटर सांगायचं म्हटलं तर आनंद व त्याच्या या रहस्यापर्यतं पोहोचताच येणं शक्य नव्हतं.ही मोहिम सोडून आपल्याला परत पुण्याला जाव लागलं.अजय हे सारं करूच देणार नाही.अजयाला न सांगता. आनंदला मला विश्वासात घेऊन हे सारं करावं लागणार होतं.जिज्ञासा भी माणसाची फार शत्रू असेल.मीच मला कसल्या भंयकर संकटात ढकलत होते.
आवाज सारखा.दिसणं सेम टू सेम.मूर्ख तर म्हणाला कपडे हटवून बघ.कसला विचित्र झालाय आनंद? दोघींची आवड पण सारखीच असेल का?का आपण इकडं खाल्लं की तिकडं.तिचं पोटं भरत असेल?तिनं खाल्लं की आपलं पोट भरत असेल?असं तर काही होत नाही.आपल्याला तर जेवावाच लागतं.कल्पनाच त्या?त्यांना कुठं शेपूट असतं? रात्रभर झोप लागलीच नाही.आनंद नक्कीच दोघीची भेट करेल ना? अजयला हे कळू दिलं नव्हतं.अजय आता पुण्याला परत जाण्याच्या तयारीत होता.त्याला पाच दिवसाचं सेमिनार आलं होतं पुण्यातच.अजून दोन दिवस अवधी होता.लगेच हालाव लागणार होतं पुण्यात.या दोन दिवसात काही तरी करायला हवं होतं.आता त्या न्यू सीटी मॉल मध्ये मी तास तास जाऊन भटकू लागले पण नाही आली ती.आनंद आता तिला असं इकडं येऊ देणार नाही.हे पण खर होतं.मन चैन पडू देत नव्हतं.
सकाळची नऊची वेळ होती.अजय नुकताच गेला होता.मी गॅलरीत निवांत उभी होते.तेवढ्यात आनंदचा कॉल आला.
“तू तयारेस का? तुला शक्य तितक्या लवकर तुझ्या घराच्या बाहेर यायचं.फोन चालू ठेव म्हणजे तुझं लोकेशन कळेल मला.मी आता अवघा दहा मिनीटाच्या अंतरावर तुझ्यापासून.” एका दमात त्यानं सारं सांगून टाकलं.साडी घालू की ड्रेस?तिनं काय घातलं असेल?असे प्रश्न मला का पडू लागले होते? तिच्या कपड्याशी माझा काय सबंध होता?मी पटकन आवरून बाहेर रोडवर आले.थोड्याच वेळात माझ्या अगदी जवळ एक पॉश लांबलचक गाडी येऊन उभी राहिली.आनंदनं आतूनच थोडं स्माईल केल.रिमोटनेच गाडीचं दरवाजे उघडले.मी गाडीत बसले.
गाडी सुरू झाली.खरतर मला फार भिती वाटत होती.आनंद काही करणार तर नाही ना?जीव मुठीत घेऊन बसले होते मी.गाडी कसली ते पळतं घरच होतं.मागच्या बाजूला ती बसली होती.काय आश्चर्य आज तिनं साडीचं घातली होती.स्काय ब्लयू कलरची साडी.तिचा पण आवडता रंग.स्काय ब्लयूच आहे तर? का आनंदने नेसायला लावली असेल?ती हेडफोन कानामध्ये घालून गाणी ऐकत असावी.मी अनेकदा तिच्याकडं पाहून हसण्याचा प्रयत्न केला.तिचं लक्ष नव्हतं.आनंद मला तिच्याकडं पाहण्याची मनाई केली होती.बरचसचं लांब आलो.तब्बल चाळीस किमी दूर आलो होता आम्ही.आंनद बराच भावूक झाला होता.गाडीच्या खाली उतरलोत.उतरताना मात्र ती छान हासली.अर्थात माझचं हसू असल्यासारखं होतं ते.मला ही आवडलं.एका टेकडीवर आलोत.उंच डोंगर होते.उंच झाडे होती. सारं कसं हिरवंगारं होतं.क्षितीजावर डोंगर आभाळाच्या पोटात शिरल्यासारखे होते.त्या टेकडीवरून आम्ही सारं शहर पाहतं होतो.आम्ही दोघेच चालतआलोत.मला तर आता फार भिती वाटू लागली होती. हा पुन्हा मला प्रपोज तर करणार नाही ना? नाहीतर त्याचं नि फकत त्याचं करणार एखाद इंजेक्शन तर देणार नाही ना? जीव मुठीत घेऊन मी चालतं होते.
“आपण तिला बरोबर नाही घेतले?मला तिला भेटायचं.”मी काकळूतीला येऊन बोलतं होते.
“भेटशील ना? तुला जसं तिला भेटायचं तसंच मला तुला बोलायचं.आपलं बोलणं महत्वाचं आहे.ती बरी आहे गाडीतच.”
“आनंद असं काय करतोस?ती एकटीच गाडीत.बोर होईन ना तिला?”मी असं म्हणल्या नंतर तो नुसता हासला.
“तुला भिती नाही वाटत तिची.”
“तिची भिती? ती काय बागूल बुवा?”तो मिश्किल हासला.
“पळून जाईन ना ती?”
“तिला पकडून नाही आणलेलं मी.तू कधी पळून गेलीस का? नाही ना? मग ती पण नाही जाणार.”तो पुढं चालंत होता.तो तिचं नि माझे असे का संबंध जोडतो आहे.तो माझ्याकडं तसाच आसुसल्या नजरेन पाहत होता.
“आपली अशी एकटी बायको ड्राय्व्हर सोबत ठेवतं का कुणी?”
“तो ड्राय्व्हर.. असा आहे त्याला स्त्रीयात बिलकूलचं रस नाहीये.तो असं काहीच करू शकत नाही. त्यापेक्षा मला माझ्या नेहावर विश्वास.अजय कधी तुझ्यावर डाऊट खातो.”
“असा प्रत्येक गोष्टीत तू माझ तिच्याशी का संबंध जोडतो आहेस.”
“का म्हणजे? तुला नाही वाटतं तुझा नि तिचा काही संबंध आहे?”
“काय संबंध आहे तिचा नाही माझा?” मी त्याच्या अधिक जवळ गेले.त्याचा हात हातात घेतला.मला अशी लगटं करून त्याच्याकडून उत्तर हवं होतं.ती असं काही केल्यावर ती कशी रिॲक्टं होते हे पण पाहयचं होतं मला.ती आम्हला गाडीतून पाहू शकत होती.अर्थात तिला पाहयाची अवश्यकता वाटत असली तर.त्यानं माझ्या पासून सुरक्षित अंतर घेतलं.
“सॉरी,माझ्या लक्षात आलं नाही.तुझी बायको पाहत आहे आपल्याला?तू बायकोला घाबरतोस ना?” मी त्याच्या डोळयात पाहत बोलले.
“तुला स्पर्श करायचा मला काय अधिकार?तू माझी नाही होऊ शकलीस.मी आयुष्यंभर नुसता झुरत राहिलो तुझ्यावर.एकदा पण फोन करून विचारलं नाहीस.माझ्या विषयी तुला कधीच काही का वाटलं नाही?"त्याचं डोळं डबडबलं होतं.
“आंनद तू रडतोस? का? काय कमी?मोठा सांयस्टीट आहेस.आता तरूण बायको आहे.मी नसेल तुझ्या आयुष्यात आले पण माझ्यासारखीच ना सेम टू सेम ती. अजून ही मीच कशाला हवी आहे?” तो नुसता उदास हासला.चेहरा पांगलेली हाताशी लपवू शकला नाही.
“सांग,कोण ती? कुठं भेटली तुला?”
“भेटली ना? हे सारं तुला कशाला जाणून घ्यायाचं?अजयचं नि तुझं कसं सूत जुळलं हे मी कधी विचारलं?”
“तू नाही विचारलंस पण मी विचारते ना?”
“का विचारतेस? मी का सांगू तुला?”
“ती सेम माझ्यासारखी का आहे?हे सारं सांगावाच लागेल तुला” तो अजून लांब चालंत गेला.
“तू तुझे प्रश्न असे मला कंम्पलसरी नाही करू शकत.काय सांगायचं तुला नि काय नाही सांगायाचं हे ठरवलं मी.”
“शपथ माझी तुला.आनंद.तुला सांगावा लागेल.” मी त्याला इमोशनल करू पाहत होते.
“अशा शपथा वगैरे घालून तू मला इमोशनल नकोस करू.”
“कुठे आहेत तिचे आई वडील?”
“नेहा,प्लीज असे प्रश्न नकोस विचातरू ज्याची उत्तरच नाहीत.”
“उत्तर नाहीत असे प्रश्न असूचं शकत नाहीत.”
“नेहा,असू शकतात असे प्रश्न.हाच प्रश्न तुझा उत्तर नसलेला आहे.तिला आई वडीलचं नाहीत.”
“काय झालं तिच्या आई वडीलांना.”
“नेहा,तुला पुराणतल्या सीता,द्रोपदी वैगरे स्त्रीया विषयी काही माहिती.योनी वर्गातल्या नाहीत त्या पुराण स्त्रीया.तसाचं जन्म माझ्या नेहाचा.डायरेक्ट.”
“मला नाही कळलं?” कसलं कन्फयूज करत होता तो? खरचं मला काहीच कळत नव्हतं.
“नेहा,ती विना आई बापाची पोरगी.”
“कसं शक्यं?मला मूर्ख समजू नकोस.अस कुणी जन्माला नाही येऊ शकत.”
“सीता.. द्रोपदी? अश्याचं जन्मलेल्या पुराण कथा आहेत.आई नि बापा वाचूनच ना? तसंच माझ्या नेहाचं पण.”
“आंनद काय बोलतोस हे? पुराणतले कसले भी भाकड संदर्भ देऊन तू माझी दिशा भूल करू शकत नाहीस.खरं लपून नाही ठेऊ शकत.”
“नेहा,काहीचं खोटं नाही बोलत मी.”
“आता तू यज्ञ केलेस नि स्व:तासाठी एक सुंदर बायको बनवली हे खरं समजू?”
“तसचं ते.मी बनवली एक सुंदर बायको माझ्यासाठी पण यज्ञातून नाही तर विज्ञानातून.नेहा,ती क्लोन बेबी.”तो अकाशाकडं पाहत बोलत होता.त्याचं शब्द जड झाले होते.माझ्या डोळयात पाहून बोलायची हिम्मत नव्हती होत त्याची.
“क्काय? ती माणूस नाही? का केलस तू हे सारं आनंद?”
“तसं नको बोलूस.नेहा माणूसच आहे.तुझे सारे जनुकीय गुण दोष तिच्यात आहेत.तुझ्या ऊती पासून बनवलं तिला मी.”
“क्काय? बनवलं? काय बोलतोस हे?” मला आता फक्त चक्कर यायची बाकी होतं.सारं जगचं गरगर फिरते आहे असं वाटतं होतं.
“हो,बनवलं मी तिला.”
“असं हे का केलस तू?”
“फक्त तुझं प्रेम.तुझ्या प्रेमासाठी.मी शिकत राहिलो.फार मोठा झालो.मान सन्मान मला मिळाला.तू नाकरलसं.मनात ते शल्यं टोचत राहिलं.तुला प्राप्त करणं शक्यं नव्हतं.मी तुझ्यासारखी स्त्री बनवायचा प्रयत्न केला.नेहाचा जन्म झाला.तुझ्या आवडी निवडी.तुझं हासणं बोलणं.सारं मी उतरवलं माझ्या नेहात.नेहा तुझी झेरॉक्स कॉपीच केली मी.मला हुबेहूब तुझ्यासारखी हवी होती ती.”
“झालं समाधान.हुबेहूबचं केली माझ्यासारखी तयार.घेतला माझ्या सारख्याच या शरीराचा उपभोग. आता तरी झाली का तृप्ती? काय असत रे असं वेगळ प्रत्येक स्त्रीत.स्त्री ही स्त्रीचं असते.कुण्या एखादया प्रेम करणा-या मुलीसोबत लग्न केल असतं तर तुला भरभरून प्रेम तरी भेटलं असतं.हे असं प्रयोग करून तू कसल्या प्रेमाचा शोध घेत बसलास?”
“नेहा,तुझ्यावर असलेल्या प्रेमाचा शोध घ्यायचा होता मला.”
“असले पुतळे बनवून कुठं खरं प्रेम मिळत असते?”मी त्याच्या अंगावर धावून गेले.
“पुतूळा नाही मी.हृदयाचे ठोक पडल्या शिवाय नाही जिवंत राहता येत सजीवाला.तसचं धडधडत माझंपण ह्रदय.तुझ्या नसात जसं रक्त वाहत ना तसचं माझ्या नसात पण रक्त वाहतं.ह्रदयातून पाझरत माझं प्रेम.आई होण्यासाठी गर्भाशय सज्ज झालं माझ.मी आई होते.पुतूळे तरी कुणाचे आई होत नाहीत ना?मी माणूस असण्याचा इतकाचं पूरावा पुरेसा आहे ना तुला?”ती बोलत होती.तिच्या डोळयात पाणी दाटलं होतं.ही रडू पण शकते? मला पडलेला प्रश्न.काहीचं कळलं नाही की नुसते प्रश्न पडत राहतात माणसाला.
“तू बोलतेस हे सगळ?” विश्वासचं बसत नव्हता.कसं शक्यं होत विश्वास बसणं ही?
“मी काही रोबो नाही आनंदनी तयार केलेला.माझी हरेक पेशी आनंद साठी व्याकूळ असते.आनंद,तू असं काही रसायन तर माझ्या शरीरात सोडलं नाहीस, ना? मी नुसत प्रेम करत बसू तुझ्यावर.मला काहीच कळू नये दुसरं.” तिरप्या नजरेन ती आनंद कड पाहत होती.असचं तिरपं मी पण पाहते अजयकडे. तेव्हा अजय आऊट ऑफ कंट्रोल जातो.आनंद नेमका काय करत असेल? पडला मला पुन्हा प्रश्न.
“नेहा,प्रेम असं रक्तात सोडता येत नाही.ते ह्रदयातूनच पाझरते ग.”
“मला सारं सांगितलं आनंदने.तू नाही प्रेम करू शकलीस आनंदवर.माझा जन्मचं झालाय त्याच्या हरवल्या प्रेमासाठी.” ती चालत आनंदकडे गेली.ती माझ्याकडं पाहत होती.ही एकदम माणसासारखी आहे.ही जर माणूस असेल.खरोखर मुलगी असेल तर आनंद सारख्या वयस्कर व विद्रूप माणसावर कसं प्रेम करू शकते? हीच्या रक्तात पण याने काही सोडलं तर नाही ना?वशीकरण करून तर घेतलं नसेल ना?
आनंदने माझ्या समोर तिला मिठीत घेतलं.मी आवाक होत पाहत राहिले.ती अशी त्याला लपेटली होती ही मला तिची प्रंचड दया आली नि आनंदचा भयंकर राग.तो तिच्याशी केसाशी चाळे करत होता.मी भडकावे म्हणून तो तसं करत असावा.माझ्यकडे पाहून हासत होता.ती माझी प्रतिकृती नसून मीच त्याच्या गळयात पडले आहे असं वाटतं होतं मला.हे शक्यं?आपण नक्की एखाद अद़भूत स्वप्न पाहत आहोत असं वाटलं.मी मलाच चिमटा घेऊन पाहिला.मी जागी का झोपेत आहे हे ठरवायचं होतं मला.
नेमकं हेच आनंद पाहिले.तो हासत व टाळया वाजवत जवळ आला.
“तू जागीस आहेस.मी, ही माझी नेहा सारं खरं आहे.इतकच आश्चर्य तुला पुरेस नाही.अजून मी तुला सरप्राईजचे शॉक देतोय.”
“अजून काय केलेस तू?” मी आता घाबरले होते.आनंदचे मी प्रेम नव्हते राहिले.तो माझ्यावर सूड घेत होता.तो प्रतिशोध घेत होता माझा.त्यानं त्याच्या हातामधील मोठा टॅब सुरू केला.तो मला काही लाईव्हं दाखवत होता.
एक मोठं पार्क होते.त्यामध्ये अनेक माणसं कामाला होते.दोन हेलीकॅप्टर उभे होते.त्या काम करणा-या माणसावर त्यानं फोकसं केलं.त्यात अजय होता.राहूल होता.निशू होता.ते काही तरी काम करत होती. सारे तरूण मुले होती.
“आनंद हे कोण आहेत?”
“ओळखले नाहीस.तुझे हे सारं परम मित्र आहेत.साले सारे माझे दुश्मन.” तो खळखळून हासत होता.
“यांना पकडून ठेवलेस? अजय …अजय...”मी हाका मारत बसले.
“कुणाला पकडून ठेवायाला मी इतका क्रूर वाटतो तुला.ते पण असेच क्लोन बॉय.फक्त ते हुशार नाहीत. ते बुध्दू तयार केलेत मी. फार त्रास दिला या हरामखेरांनी.आता ते माझे गुलाम आहेत.गुलाम केलेत मी हरामखोर.मला वाटेलं ती काम करूनं घेतो मी त्यांच्याकडून.”तो क्रूर हसू लागला. नाचू लागला.ते हासण्यानं माझं अंग थरथरू लागलं.मी फारचं घाबरले होते.संताप आला होता.
“आनंद, तू असा सा-यावर सूड उगवतोस.हे सारं खरं नाही. हा आभास तयार केलास तू.अश्या अभासी जगात का जगतोस तू.तू आता असे गुलाम बनवणार.तुला कुणी आवडल्या की स्त्रीया बनवणार.त्यांना वापरणार.असं हे सारं करायला तू तुझी बुध्दीमत्ता वापरतोस.प्रतिशोध घेण्यासाठी तुझं सारं शिक्षण पणाला लावलंस.आनंद चुकतोस तू.” माझ्या डोक्यापुढे अंधार झाला होता.
“आता भाषण बंद कर.तुला हे खोटं वाटतयं? आभास वाटतोय तुला सारा?”त्यानं तिला इशारा केला.ती माझ्या अंगावर धावली.माझ्या जोरात एक गालफडात मारली.
“ही थप्पडं खोटी नाही.हा आभासी जगाचा खराखुरा ठोला आहे.हे तर आता पटलचं असेल ना?”खरचं ती थप्पडं खोटी नव्हती.तिन मला मारलं होतं?माझ्याच ऊतीपासून तयार झालेली ही मला मारते? हिला काहीचं कसं वाटत नाही? मला गच्चं पकडून ठेवल होतं.मी सुटण्याचा प्रयत्न करत होते.मी सुटू शकतं नव्हते.मी घाबरले होते.असं याच्या बरोबर एकटं नको होतं यायला.मी अजयला फोन करायचा ट्राय केला.आनंदने लगेच माझ्या हातातला मोबाईल फोन हिरावून घेतला.
“आनंद,असं काय करतोस?”
“काहीचं करणार नाही.तुला आता माझ्याविषयी इतकी माहिती झाली.जगात कुणालाच ही माहिती नाही.जगाला नाही कळू द्यायचं मला हे सारं.”
“मग?आता काय तू मला मारून टाकणारेस?”माझं अंग भितीनं थरथर कापतं होतं.मला वाचू शकेल असं कोण येणार होतं इथं?
“नाही,तू तो मेरी जानं है.मी तुला मारू नाही शकतं.हे सारं तुला दाखवायचं होतं.सुंदर नसेल मी.मी सुंदरता तयार करू शकतो.तुझं हृदय नाही माझ्यासाठी पाझरलं पण हिचं ह्रदय मला हवं तसं बनवलं आता.ते फक्त माझ्यासठीचं पाझरणार.फक्त माझी ही.आता तुझा मेंदू फ्रेश करतो.ती अपरिहार्यता माझी.तुझी मेमरी क्लेअर करतो.सारं सारं पुसून टाकतो त्यातलं.मला जे हवं ते अप लोड करतो तुझ्या मेंदूंच्या मेमरीत.तू कुणालाच माझ्याविषयी काही सांगू शकणार नाहीस.तुला काही माहितीच असणार
नाही.ऑल मेमरीजं आर क्लेअर नाऊ…”त्यानं त्याच्या पॉकेटमधून एक इंजेक्शन काढलं.
“प्लीज, असं काही करू नकोस.मला माफ कर.”
“सॉरी, नेहा.मला आता हे करावचं लागत.मला माझं हे ड्रीम पार्क वाचवण्यासाठी करावं लागत.तुला काही होणार नाही. फकत आठवणी जातील… अजयला काहीचं आठवत नसलेली बायको असेल.बस्सं एवढचं.”त्यानं माझा दंड पकडला होता.ती खुशाल त्याला मदत करत होती.माझी थोडी पण दया येत नव्हती तिला. ही कृत्रिम स्त्रीपण कसले क्रूर वागत होती.ही क्रूरता हिच्यात आली कुठून?
“अजय..अजय.”असं मी मोठयानं ओरडले.जोरात झटका देऊन पळाले.ते दोघ ही माझ्या मागे लागले होते.मी पळत होते.समोरून अजय नी काही पोलीस पळतच माझ्याकडे आले.मी पळत पळत अजयच्या मिठीत शिरले.
“अजय..बघ ना.तो आनंद.”अजयं मला धीर दे होता.आंनदला पोलीसांनी पकडलं होतं.त्या सेंकड नेहाला पण.
“नेहा,तुम बडा काम किया है.आप के वजह से इस हरामी तक हम पहूच सके.”
“हे माझे मित्र इप्नस्पेक्टर.रेडडी.घाबरू नकोस.”
“अजय,त्यानं तुमचे पण डमी बनवलेत.तुझा,राहूलचं.निशूचा.गुलाम बनवलं तुम्हाला त्यांनी.”
“हो,मला सारं माहित आहे.हा असेचं क्लोन माणसं बनवून अमेरिकन कंपनीला विकतोय.त्यातून पैसं कमवतोय.मी माझा डमी असाचा पाहिला एकदा शहरात नि याच्या शोध घेऊ लागलो.”
“हे सारं माहित होतं तुला?”
“बंगळूरला तुला आणायचा माझाचं प्लॅन.तुझा बंगळूरला येण्याचा प्लॅन.अर्थात पोलिसाला या विषयी काहीच माहिती नव्हती.मीचं सारं सांगितल.आज पण मी सकाळी ऑफीसला नव्हतो गेलो.तुझ्यावर लक्ष ठेऊन होतो.आनंदच तुझ्यावर प्रेम आहे.तुलाच या गोष्टी सांगू शकतो.फक्त तुलाचं.हे मला माहीत होतं.”
“तू मला एकटं येऊ दिलसं?तुला भिती नाही वाटली?”
“नही. हम तुम्हारे साथ ही थे.हमने तुम्हारा मोबाईल ट्रॅकपर रखाता थाI हम असानीसे आप तक पहूचं सके.”आनंदला पकडलं होतं.ती तशीचं उभीच होती.ती घाबरली होती.
मी इनस्पेक्टर कडे पाहिल हिचं काय करणार असा इशारा केला.तिनं माझ्या गालफाडात मारलं.आता जाऊन तडातडा तिच्या गालात माराव्यात असं ही वाटलं मला.
“तिचा काही दोष नाही.सरकार सांभाळेल तिला.”अजय बोलला.तिचं डोळं डबडबून आलं होतं.
आनंद अमेरिकन एका कंपनीसाठी गुलाम बनवत होता.अनेक बुध्दू माणसं निर्माण करायची.ते कामासाठी विकायचे.मानवी क्लोन करून त्यांन असं गुलमाचा धंदा सुरू केला होता.त्याला स्वत:चे विमाने व हेलीकॅप्टरस् होते.त्यानं आपल्या ज्ञानाचा असा दुरपयोग केला होता.असं क्लोनींग करायला बंदी आहे.तो अतंराष्ट्रीय गुन्हेगार ठरला होता.आनंदला जेव्हा पोलीस घेऊन चालले होते.ती फारचं भावूक झाली होती.
“असं नेऊ नका त्यांना.त्याच्या शिवाय कुणीचं नाही माझं या जगात.” डोळं पाणवलं होतं.स्फुंदू स्फंदू रडतं होती.
“शिक्षा संपल्यानतर तुझ्या त्याला हवाली करू.तुझा त्यात काही दोष नाही.”ती भरल्या डोळयानं माझ्याकडं पाहत होती.मी तिच्याकडे.कोण होती ती माझी? हे नव्हत मला कळत.मला ते ठरवता ही येत नव्हतं.मी झेपावले नि तिला कुशीत ओढून घेतलं.शेवटी माझीचं होती ना ती? रक्ताचं नातं. आमचं ऊतीच नातं होतं.माझ्या ऊती पासून बनली होती ना ती? लोक हे सारं पाहत होते.आश्चर्याच्या धक्क्यातून अजून ही कुणी सावरलं नव्हतं.सा-याचं गाडया हालल्या. सारं पोलीसचं पोलीस झालं होतं त्या डोंगरावर.
सारं जग खळबळून गेलं होतं.सा-या वाहिन्यावर ब्रेंकींग न्यूज चालूच होत्या.आनंद त्याचा तो ड्रीम पार्क.तिथले क्लोन बॉय.तिथली माणसं.लॅब.वाहिनच्या लाईव्हं शोसाठी माझ्याकडे रांगा लागल्या होत्या.काय बोलावं? काय सांगावा? हेचं कळत नव्हत.सा-या जगाला मला आणि तिला एकत्रं पाहयचं होतं.
दोन दिवसा नंतर…..
एका वाहीनीच्या लाईव्ह शोसाठी मला ड्रीमपार्कला नेण्यात आले होते.बातमी आली होती.आनंदने आपला गुन्हा कबूल केला.त्याच्या असामान्य बुध्दीमततेचा देशाला व जगाला उपयोग व्हावा.विश्व कल्याणासाठी त्यानं आपलं जीवन जगायचं ठरवलं आहे.त्यानं निर्माण केलेले क्लोन बॉय.हयाचं पालन पोषण सरकार करेल.असं भारत सरकाराच्या गृहमंत्रलयानं जाहिर केले होतं.
“येतोय ना आंनद माझा?”तिनं मला विचारलं.मी नुसती मान हालवली.तिचं डोळं भरभरून आलं होतं.आंनद आश्रू होते ते.टीव्हीच्या कॅम-याच्या गराडयात आम्ही सापडलो होतो.अजय हे सारं लांबून पाहत होता.
तिच्या सुखी संसारासाठी माझं मन मनोमन प्रार्थाना करू लागलं.सारे कॅमेरे आमच्या दोघीवर खिळले होते.आम्ही एकमेकीच्या कुशीत…जग अनेक प्रश्नांच्या गर्तेत बुडाले होते.
(समाप्त.)