Prshuram Sondge

Others

1.5  

Prshuram Sondge

Others

गुंतता ह्रदय हे

गुंतता ह्रदय हे

1 min
1.4K


मानवी मनात गुंफत गेलेली नाती, भावबंध व काही मानवी जीवनातील अपरिहार्यता प्रकट करणाऱ्या या कथा आहेत. प्रेम आणि वासना या मानवी भावप्रदेशात जीव घुटमळत राहतात. वय, जात, धर्म, प्रांत, रूढी अशी कृत्रिम भेद झुगारून खऱ्या प्रेमाचा शोध घेणारी माणसं या कथामधून अपणासं भेटतात.वेदनेचे हे करूण रूदन नव्हे. दाहक वास्तावाच्या विस्तवात स्वप्नांची फुलं वेचणारी पात्र परशुराम सोंडगे यांनी उभी केली आहेत.

आपल्या खास चिंतनप्रवृत भाषाशैलीतून जगण्याचा नवा दृष्टीकोण या कथा देतात. ना.सी.फडके, वि.स.खांडेकर यांनी जशी तरुणाईला काही दशक भूरळ घालणारी एक भाषा दिली अगदी त्याच ताकदीची भाषा परशुराम सोंडगे यांची ही आहे याची प्रचिती अपणांस या कथामधून येते.आपलं भावविश्व व्यापून टाकणाऱ्या अटळ संघर्षाच्या या कथा मराठी साहित्यासाठी कमालीच्या आश्वासक आहेत.


गुंतता ह्रदय हे…!!!

( ब-याचं गोष्टी फक्त आपल्या नि आपल्याच होऊ शकत नाहीत. हे माहीत असून ही एकमेकांत गुंतत गेल्या ह्रदयाची ही गोष्टं. असं होऊ शकत. नाही. असचं असत. हेच खरं असतं अशी मानवी जीवानतील वास्तवाचा वेध घेणारी ही कांदबरी. )

संध्याकाळचं अकरा वाजलं होतं.कॉलनीसारी सामसूम झाली होती.रस्यावरले बल्बं ढणाढणा जळत होतं.निलेशनं गाडी उभी केली. झटक्यात गेट उघडलं. बाईक आत मध्ये घेतली. बाईक पार्क केली. पाय आपटत आपटत चालत पाय-या चढून वर गेला.असं वर जाण्यासाठी तो लिप्टं वापरू शकला असता. तो नेहमी वापर करायचा लिप्टंचा पण आज तसं काहीचं केलं नाही.तृप्ती नुसती उभी राहीली. सारं त्याचं पहात होती.भीतीनं तिचं अंग थरथर होतं.त्याच्या मागं चालत जावं की लिप्टं वापरावी? तिला हा प्रश्न पडला. काही क्षणच. ती पाय-याच चढू लागली.अजून ही निलेश रागा रागनचं पहात होता. तिची काय चूक होती? एखादं आपल्या कडं पहात असेल तर स्त्री काय करू शकते? लग्नासारख्या समारंभात तर अश्या गोष्टी घडतचं हसतात. आता ते बावळटं सारखचं तिच्याकडं पहात होतं.त्याला ती काय करू शकत होती? असे पागल तर जळीस्थळी काष्ठी पाषाणी भेटतचं असतात.मुलीसाठी हे नक्कीचं नवीन नव्हतं.निलेशला एवढं एक्साईड होण्यासारख कुठं काय झालं होतं? तो बावळटं  पहात असताना त्याच्याकडं तिचं लक्ष गेल होतं.सारखं सारखंच लक्ष गेलं.एवढचं. नुसतचं कुणी आपल्याकडं कुणी रोखून पहात असल्यावर संकोचल्या सारख होणारचं. लक्षं तिकडं जाणारचं ना? ते बावळटंतिच्याकडं पहात आहे हे निलेशच्या लक्षात आलं.तृप्तीला कळत नव्हत की आपण नेमकं काय करायाला पाहीजे होतं?

तो काही एकटाचं पुरूष नव्हता तिच्याकडं तसा पाहणारा… अनेकजण होते. निलेशचं काका पण पहातचं असतात तिच्याकडे. अगदी तसचं. ते तर तृप्तीला फारच किळसवाणं वाटतं होतं.पुरूषांची तसली नजरलगेच स्त्रीयांना कळते. आता काय त्याच्या काकाच्या नावानं शंख करायचा. त्याला ते पटणारं का? आपल्या काकावर केलेले अरोप तो सहन तरी करू शकेल का?पाय-या चढताना तिचा धमछाक झाला होता.घाम पण आला होता. नेमक निलेश घरात गेल्यावर…कसा वागतेय याचं ही जॅम टेन्शन होत तिला.आज तिची सासू सासरे पण घरी नाहीत. ते ही औंरगाबादला लग्नाला गेलेत.पुरूषांचा राग भंयकर आसतो.संशय तर माणसाला राक्षस बनवतो.

              कशी बशी ती घरात पोहचली होती.निलेशचा अजून ही राग गेला नव्हता.तिनं त्याच्याकड हासून पाहण्याचा प्रयत्न केला.तो हासला नाही.उलटं त्यानं डोळं वटारलं.त्याचा राग अजून ही वाढतोच आहे असं तिला वाटल. तिनं दारं लावलं.ड्रेसींग रूममध्ये गेली.साडी फेडली.टॉवेल घेतला.अश्या अवस्थेत त्यानं जर तिला पाहीलं तर तिची काही खैर नसायची.अक्षरश: निलेश तुटून पडायचा तिच्यावर… त्याच्यातलं पशुत्वं ऊसळून यायचं.आज तो शांत होता.तिनं चोरून लपून ही पाहील त्याच्याकडं.अर्थात नखरा होता तिचा तो. असले नखरे पुरूषाचं देळभान हरवून टाकायाला पुरेसे असतात. निलेश आज मात्रं शांत होता.अजून ही तो रागानं फणफणतचं होता.

                      ती‍ बाथरूमध्ये गेली.थोंडं फ्रेश झाली. गाऊन घालून समोर आली.पाण्यामुळं तिच्या चेहरा अधिकचं टवटवीत झाला होता.राग तर तिला ही आला होता.आपल्या रागाचं रुपांतर तिनं लटक्या रागात केलं.त्याच्या कडं रोखून पाहीलं. ते पहाणं निलेशला दिलेलं आव्हानं होतं.नाही तरी निलेशचा राग वितळून टाकण्यासाठी ती दुसरं काय करू शकत होती? तो मात्रं गुम्या सारखा गप गप होता.रागाच्या धगीत माणसाचं पुरूषत्वं तर वितळून जात नाही ना? निलेश नाही तर इतका शांत कसा राहू शकत होता.निलेशला ती एक वर्षं झालं अनुभवत होती.

“निलेश,फ्रेश हो.तुला चहा ठेऊ?” बायकोनं नव-याला असं विचारायचं असतं म्हणून तिनं तसचं नि तेवढचं विचारलं. तो नवरा नि ती बायको आहे हे जाणीव तिनं हया प्रश्नांन केली होती.

“ऐ बंद कर बकवास.मला अगोदर हे सांग.कोण तो आयघाल्या?”

“निलेश मला नाही माहीत. शपथ या अगोदर मी त्याला कधीचं पाहीलं पण नाही.” काकूळतीला येऊन तृप्ती सांगत होती. ती त्याच्या अधिक जवळ आली.

“ हे नाटक बंद करायचे.खरं खरं सांगायचं. कोण तो भोसडीचा.” निलेश प्रत्येक वाक्यात शिवी देत होता. असलं घाणेरडं चुकून सुध्दा कधी बोलत नव्हता तो.

“खरचं नाही माहीत मला.कसं सांगू तुला?”

“काय सांगू नकोस.आवडला ना तुला तो.तुला जायचं का त्याच्या बरूबर…”

“निलेश काय बकतोस तू?असं काय केलं मी?”

“ऐ, चूप.. जास्तं बोल्लीस..तर थोबाड फोडील तुझं.. मला काय बुळगं समजतीस काय?”

“निलेश, काय हे?तो पहात होता माझ्याकडं मी काय करू शकत होते?”

“गप.जास्त शहाणपणा हेपलू नकोस.मी सारे नखरे पाहीलेत तुझे.”

“काय पाहीलसं तू? कसले नखरे केलेत मी.” तृप्तीचा भी थोडा आवाज वाढाला होता. एवढा आवाज तर वाढणं साहजिकचं होतं.

“तो पहात होता तुझ्याकडं नि तू? काय काहीचं करत नव्हतीस ना? डोळं बंद होते तुझे.तू इतकी साव… “ निलेश पुढचं अधिक स्पष्टं बोलू शकला नाही.

“बस् झालं निलेश… आता मी जास्त ऐकू शकत नाही.”

“काय करणारेस तू? मला सोडून जाणारेस का? जा. खुशाल जा. आयघाले. तुझं माझ्या कडून भागत नसेल तर…छिनाल रांड कुठली?”निलेशच्या जीभेला हाड नव्हतं.वाटेल ते तो बोलत होता.कसलं घाण घाण बोलत होता तो. तोंड की गटारयं त्याचं.

“निलेश तू माझ्यावर संशय घेतोस? तशी वाटते मी तुला.”

“फार सावपणाचा आव आणू नकोस.दिवसभर बघतोय मी तुझी थेरं. उलटं मलाच काय विचारतेस?थांब तुझ्या बापाला नि आईलाच सांगतो त्याच्या हया लेकीचे असलेचाळे.” त्यानं मोबाईल काढला. तो कॉल लावू लागला.तृप्तीचं हातपाय गळून गेलं होतं.आता हे पप्पाला नि मम्मीला पण सांगणार. आपल्या वरील असले घाणरेडे अरोप ते सहन करू शकतील? ती त्याच्या अंगावर धावली.त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला.तश्या तडातडा त्यानं तिचं गाल फाडं सडकून काढलं. भिंतीवर ही ढकलून दिलं. तृप्ती खाली पडली.ती मोठयानं रडली नाही. रडून काय करणार होती? एवढया रात्री कोण येणार होत तिच्या मदतीला. ती रस्त्यावर नव्हती. ती तिच्याच घरात होती.रस्यावर कुणी येऊ शकत मदतीला. घरात ते शक्यं नसतं. आपली घरचं किती असुरक्षीत असतात आपल्याचं बायासठी?

“प्लीज. निलेश तू पप्पांना फोन करू नकोस.नाही सहन करणार ते.” त्याच्या पाया पाशी ती पडली होती.ती विनवणी करत होती. निलेश अजून ही रागानं पहातच होता. जोरात एक लाथ तिच्या पेकाटात घातली नि फुसफुसतं तो बराच वेळ खिडकीत उभा राहीला. तृप्ती फरशीवर पडलेलीचं होती. हुंदके बाहेर पडू ने देता. ती आसवं ओघ्‍ळत होती.

दहा-पंधरा मिनीटानंतर…

तो आत आला.फ्रीजमधलं पाणी घेतलं.ढसाढसा पाणी प्याला.बेडवर आडवा झाला.तिच्याकडं नुसता एक टक पहात राहीला. त्या नजरेत एक मागणी होती. त्यानं पप्पाला नि मम्मीला फोन केला नाही.हे काही कमी नव्हतं? सारं सारं विसरून तृप्ती त्याच्या हवाली झाली.निलेशचं आजचं रूप भंयकर वाटलं तिला.संस्कृतीची किती ही आवरण घालून माणसं आपलं पशुत्व लपवत असले तरी अश्या वेळी ते ऊफाळून बाहेर येतेच.त्याचं ते रानटीपण तृप्ती काही तास सहन करत राहीली.तिच्या शरीरात त्राण नव्हता राहीला. आपण पुरूष म्हणून काहीच कमी पडू नयेत याची तो पुरेपुर दखलं घेत होता.

“खरचं,मी तुला आवडतो ना?” तृप्तीला अधिक बिलगून घेत निलेश बोलला.त्याच्या त्या स्वरात एक प्रकारची भीती होती.एक न्यूनगंडाची किनार होती.

“कसं सांगू तुला? फक्त तू आणि तूच आवडतोस रे मला.” देहात उरला सुरला त्राण आणून आपल्या ओठांनी त्याच्या वर प्रेमाचा वर्षाव केला तिनं.अर्थात तिनं सारचं त्याच्या हवाली केल आसलं तरी संश्याची सुई त्याचं मन टोकरतचं राहीली.

बराच वेळा नंतर निलेश झोपी गेला. तृप्तीला झोप नव्हती.जे आज झालं त्यात तिची काय चूक होती? ती उगचं गेल्या दिवसाचं हळकुंड उगळीत बसली.

                         निलेशच्या एका मित्राचं लग्न होतं.लग्नाला ते दोघ आज गेले होते.लग्नाला जाताना कोणती साडी तिनं नेसावी हे पण दोघानीं मिळवून ठरवलं होतं.सारं नटून थटून  झाल्यावर तू फार छान दिसतेस म्हणत आऊट ऑफ कंट्रोल पण झाला होता निलेश.दोघ बाईकवरच लगनात गेले. त्यांनी लगन ही फार इंन्जॉय केलं. निलेशच मित्र ही भेटले.आपली बायको सुंदर आहे. याचा किंचितसा गर्वं ही त्याच्या चेह-यावर पांगला होता. बायको हुशार असण्यापेक्षा सुंदर हवी असते पुरूषांना.त्याचा तो गर्व खोटा ही नव्हता. तृप्ती मुळातचं दिसायाला सुंदर होती. आज तर फारचं छान दिसत होती.

                 अश्या बाया लग्नात एक आकर्षण ठरत असतात. तसचं झालं.त्या लग्नात तृप्ती फारचं आकर्षक दिसतं होती.अर्थात अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.तृप्तीला हे काही नवीन नव्हतं. अश्या अनेक लगनात तिच्यासाठी पागल झालेली मुल तिनं पाहीली होती.अनुभवली होती. तसचं आज होत. निलेशच मात्र सारं लक्ष तिच्याकडचं होतं.त्यांच लग्न झालेलं वर्ष तर ही झालं होतं.

एक मुलगा सारखतिच्यकडं पहात होता. तृप्तीची ही नजर अनेकदा त्याच्या वर खिळली होती.अनेकदा प्रयत्न करून ही त्याला चोरू पाहण्याचा मोह आवरता आला नव्हता. चोरटं पहाणचं घातक ठरलं. तसं ते मुळात घातकचं आसतं. तो मुलगा तिच्यात जास्तचं गुंतत गेला.  आईसक्रीमच्या गाडयावर ती निलेश सोबतच होती.आईसक्रीम तिची मजबुरी. निलेश सोबत ती आईसक्रीम खात असताना तो मुलगा एकटक तिच्याकडं पहात होता. आता तिच्या हे लक्षात ही आलं पण कुणी आपल्याकडं पहात आहे म्हणून थोडचं खायचा बंद करता येत. लगेच कुणाला सांगता येतं. निलेशनं हे लक्षात आलं. तो दोघाकडं ही लक्ष ठेउनच होता.त्याच्याकडं लक्ष होतं. त्यात आईसक्रीम हातून पडली.

“तृप्ती लक्षं कुठं तुझं?” निलेश तृप्तीला दटावत.त्याच्याकडं डोळं वटारून म्हणाला. तृप्ती ही सावध झाली. ते आईसक्रीम तिच्याच साडीवर सांडलं होतं.लगेच तिनं ते झटकलं. आता असं झालं हे समोरच्यनं पाहीलं तर नाही ना? म्हणून तिनं आपली नजर पुन्हा त्याच्याकडं पाठवली. तो छासा हासला. ही वरमली. हे सारचं निलेश पाहू शकला. खर तर त्याला तेव्हाचं फार राग आला होता. ते तिथून हालले पण… निलेश आपल्याला ओढतचं नेत आहे हे तिच्या पण लक्षात आलं.

तृप्ती नाही म्हणलं तरी त्याच्याकडं खेचली गेली होती. अनेकदा तिला प्रयत्न करून ही ते लपवता नाही आलं. जेव्हा त्या हॉलमधून हे बाहेर पडत होते. तेव्हा ते बावळट. पुढं हजरच होता ऐन रोडवर.त्याला पाहीलं की…निलेशला राग आला.राग येणारच ना? एकटक तिच्याकडं रोखूनचं पहात होता. बाईक चालू केली. तृप्ती बाईकवर बसणार तेवढयात….एक गाडी आली त्याच्यावर आदळली.तृप्ती मोठयानं ओरडली. ते ओरडणं नव्हतं. ते किंचाळणं होतं. ते बावळटं पोरंग खाली पडलं होतं. तृप्तीला राहवलं नाही. ती उतरली नि जोरात त्याच्याकडे पळाली.तो पर्यत गर्दी जमा झाली होती. निलेश बाईकवरच बसून होता. तृप्तीकडं रागरागानं पहात होता.

“निलेश तो….” मागे पळत वळत तृप्ती त्याला म्हणाली. तृप्तीच् अपेक्षा होती. निलेशनं त्याला मदत करावी. काही तरी करावं.

“चल,आयघाले.बराय भोसडीचा…” निलेशनं वचा वचा शिव्य दिल्या.तृप्ती जाग्यावरचं उभी होती.पुढं जावं की माग? निलेश गाडीचा मोठयानं हॉर्नं वाजवू लागला. तृप्ती मुकाटयानं परत आली. बाईकवर बसली.

“एवढं पळत जायला कोण होता तुझा तो?”

“तसं नाही रे पण त्याला लागल आसलं…” तृप्ती अजून त्याच्याकडचं पहात होती.

“मरू दे.भोसडीचा.असले मरायालाचं हवेत.” शिवी हासडली नि त्यानं जोरात बाईक पळवली. बाईकचा स्पीड एवढा होता की तृप्तीला गच्चं धरून बसावं लागतं होतं. निलेशच्या कंबरेला मीठी मारण्याचा प्रयतन केला तिनं. त्यानं हात हिंजाडले.खंदयावर ही हात नाही ठेऊ दिला. नाही पकडावं तर आपण खाली पडू अशी भीती वाटतं होती तिला.तिनं ओरडून ही पाहिलं. निलेश रागात होता.तिनं गाडीच्या सीटला गच्चं पकडलं. बस्सं एवढचं झालं होतं.

             अपघात आपल्या डोळया समोर होता नि आपण शांत कसं राहयचं? तसं त्या मुलांच नि आपलं काहीचं नात नव्हतं. माणसाला संवेदानाशिलता असते ना? त्या संवेदनशिलतेनं आपण धावलो. आपल्या बायकोकडं नुसतं पाहीलं म्हणून त्याच्य मरणाची वाट पाहयची का? निलेश इतका क्रूर कसा वागू शकतो? तृप्ती झोपू शकली नाही.

शेजारी गाढ झोपलेल्या निलेशकडं ती पहात होती. त्याच्या शरीराकडं ती पहात होती.त्याच्या एका एका अवयवाकडं पहात राहीली. निलेशचं तरी काय चुकलं? असं काय होतं त्या मुलाकडं त्याचयाकडं आपण आकृष्टं झालोत? पुरूषाचं वेगळेपण नेमक कशात असते? निलेश मगा जे वागला ते योग्या नसेल? नवरा म्हणून त्यानं काय करायाला हवं होत? त्याच्या चेह-याकडं ती पहात राहीली.आपलं ओठं त्या देहावर टेकवत अधिकच त्याला बिलगली.

पडल्या जाग्यावरून खिडकीतून डोकावणारा चंद्रं ही ती पाहू शकली.चंद्राच्या चांदण्यातून काही रसायनं माणसाच्य नसात पांगत जात असेल काय? तप्तीचा जरा रोमांटीक मूड होता होता. निलेश तर गाढ झोपेत होता. तो कोण असेल? त्याला लागलं असेल का? तो कोणत्या हॉस्पीटलं मध्ये असेल? तो पुन्हा भेटलं का? निलेशच्या छातीवर गुलाबी ओरखडे काढत होती.त्या मुलायम नशेली स्पर्शान निलेशला जाग आली. त्यानं पुन्हा तिला आपल्या मीठीत घेतलं.तृप्तीला प्रश्न पडला.आपण या इथं अश्या? पण नक्की तो जगला तरी असेल ना?

क्रंमश:

(पुढील भाग लवकरचं…..)

तृप्ती जरी निलेशच्या मिठीत आसली तरी तिच्या मनात मात्रं त्याचेचं विचार येत होते.खरतरं ती त्याला बोलली पण नव्हती.कोण होता तो?कुठं राहतो तो? त्याचं नाव काय? तिला काहीचं माहित नव्हतं. माहित असण्याचं कारण ही नव्हतं. ती त्याला पहील्यांदाचं पहात होती. त्याचं नाव काय असू शकेल? याचा अंदाज ती बांधू लागली. खरतर तसा अंदाज काढणं शक्य नसतं पण त्याचं काय नाव असावं अशी कल्पनाच ती करू लागली.अश्या आकर्षंक मुलांची काय नाव असतात? तिला अनेक नाव आठवू लागली.अर्थात अश्या आकर्षंक पोरांचीच.तिला इंम्प्रेस केलेल्या पोरांची. ती तिची आवडती नावं त्याला चिकटवून पाहू लागली.

                 तो तिच्याकडं आकर्षीत झालाय.हे तिच्या ही लक्षात आलं होतं.ती पण त्याच्याकडं खेचली जात होती. हे सारं नकळतच होतं होतं. आपलं मन सारं बंधन तोडून त्याच्या कडं ओढलं जातं हे तिला ही कळतं होतं.तिचं वागणं ही सादास प्रतिसाद देणं असचं होतं. शाळेत असतानी अश्या प्रकाराला मुलं मुली लाईन मारणे म्हणायचे.तो लाईन मारत होता नि ती त्याला लाईन देत होती.लाईन क्लेअर झाल्यावर तो बेफीकर वागणं साहजिकचं होतं.त्याचं धाडसं वाढलं होतं नि हिचं काळीज थरथरतं होतं.निलेश तिच्य सोबतचं होता. नुसतं रोखून पाहणं ही किती रोंमाटीक असतं,नाही?

                 त्याचं लग्न झालं असेल का? आपल्याला जसा नवरा आहे तशी त्याला बायको असेल का? जर बायको असेल तर ती कशी असेल? तिचं मन त्याच्या बायकोची कल्पना चित्रं गोळा करू लागलं.कल्पनेत उमटलेली चित्रं नि स्वत:ची तुलना तिचं मन करू लागलं. त्याची बायको नेमकी कशी असेल? चैत्राली सारखी. प्रणाली सारखी..?अनेक सुंदर सुंदर मुलींची नावं तिला आठवू लागली. कदाचित आपल्या सारखी तर नसेल ना?मन अकाशासारख असतं.आकाशात नाही का? ढगांचे आकार कशाचे ही नि कसे ही होतात. तसचं झालं हे. आपण त्याची बायको आसतो तर हा प्रश्नं मनात उमटला. तशी ती दचकली.

                असं मनात काही बाही नको यायाला. असला अभद्रं विचार आपण कसा काय करू शकतो? हा पण एक प्रकारचा व्याभिचारच आहे ना? कायीक व्याभिचार.. वाचीक व्याभिचार.. मानसिक व्याभिचार… व्याभिचाराचे असे काही प्रकार असतील का? असतील का नाही तिला माहीत नव्हतं पण तिनं तसे प्रकार केले होते.पुराणातल्या अश्या व्याभिचाराच्या कथा तिला आठवू लागल्या.कर्णं आणि द्रौपदी…शाप, उ:शाप… कसले भंयकर शाप असत पूर्वी. निलेशनं असा काही शाप दिला तर? तो देऊ शकेल शाप…? पश्चातापचा तवंग मनाच्या पृष्ठभागावर पसरत गेला.तिनं निलेशच्या डोळयात पाहीलं. निलेश तिच्याच डोळयात पहातचं होता.भरकटलेलं मन डोळं नाही लपवू शकत.

“तृप्ती लक्षं कुठं तुझं?” तिच्या चेह-याला अलगद स्पर्श करत निलेश बोलला.

“माझं लक्षं? तुझ्या डोळयात.पण तुझं कुठं?” ती भानावर आली. मनातलं भलतं सलतं दाटलेलं तिनं झटकून दिलं.मनाचा तळ अगदीचं निथळं केला.ती स्वच्छं हासली.इतकं पुरेस नवहतं म्हणून की काय तिनं ओठानीं ही वापरलं केल.त्याच्या छातीवर ओठ ठेकवत त्याच्या डोळयात पहात राहीली. डोळयातून थोडचं मनात काय चाललं हे दिसू शकत? त्यासाठी शब्द तिनं मदतीला घेतले.घ्यावाच लागले.

“तुझ्याकडंचं.”तिचं केस विस्कटतं तो तिच्या नजरेत नजर घुसवत राहीला.काही क्षंणच.

“असं काय पहातोस? असं काय नवीन आहे माझ्यात?”

“सॉरी.ते नाही सांगता येणार मला.सारे रोजचेचं तरी नाव्याचा भास हा.”त्यानं मनातलं नि ओठातलं आलेलं बरचसं चोरलं. काही शब्द पण दुदैवीच असतात.ते असेचं विरून जातात.

“खोटं.. सारं खोटं.”तिनं लटक्या रागाचं रंग चेह-यावर पांगवला.

“खोटं नाही बोलू शकत मी,माहितीयं ना तुला?”

“मग असं का वागलास माझ्या बरूबर.संशय तुझा माझ्यावर?” त्याच्या डोळयात आरपार पहात ती बोलली.

“तसं नाही ग.तुझं वागणं सहजच होतं पण त्यानं कसा अर्थ काढला.वेडपट असतात पुरूष.”

“तू पण एक पुरूषचं आहेस ना?”

“आहे ना? पण मी थोडा तसा.”

“कसा?”

“त्या बावळटासारखा… कसलं पागलं होता तो. सारखं तुझकडचं पहात होता.”

“ मग मी काय करू? अश्या बावळट माणसांची कमी नाही या जगात.”

“अश्या ठिकाणी आपण होऊनचं काही मर्यादा घालवायाला हव्यात.काही पथ्यं पाळायला हवेत.लोक फार विचित्रं असतात.”

“कसली पथ्यं?मला थोडाच डायबेस्टीक.?” तिनं उगीचं फालतू कोटी केली.थोडसं हासून त्याला रिलॅक्सं करायचं असावं तिला.

“डायबेस्टीक नाही ग पण?”

“पण काय?”

“कदाचित तुला लव्हेरीया झाला असेल?”

“असचं बोलणारेस का तू? कसला घाणरेडा अरोप करतोस माझ्यावर.शपथ. कसं सांगू तुला या अगोदर नाही पाहीलं मी कधीचं. तो पहात होता माझ्याकडं मी नाही?आपल्याकडं कुणी पहात असल्यावर.. आपण काय करू शकतो?कसलं प्रायचित्त घेऊ मी?”

“कसलं चिडतेस ग? मी कुठं काय म्हणालो आहे.”

“मला लव्हेरीया झाला का? निलेश तू असं काही भी बोलू शकत नाहीस बंर.”

“इटस्‍ नॅचरल. जसा तुझा दोष नाही. तसाचं त्याचा तरी काय दोष? तो तरी काय करणार बिचारा… आहेसचं तशी तू.”

“कशी मी?”

“तू सुंदर नि व्हॉटं.सेक्सी.आज तर कमाल केली होतीस.एकदम जबरदस्तं दिसत होती. त्या बावळटाचं काय घेउन बसलीस. सारेच तुझ्याकडं पहात होते.कुणी तुझ्याकडं तसं पाहीलं की नाही सहन होत मला.”

“का?”

“का म्हणजे बायको तू माझी.”

“हो,मी तर विसरलेच होते.मी तुझी बायको आहे नि तु माझा नवरा.नव-यानं बायकोला मारायचचं असतं. शिव्या घालायच्या असतात. वेडीचं मी. बायको म्हणजे फक्त बायको असते. ती थोडीचं प्रेयशी, गर्लफ्रेंड होऊ शकते. ती असते एक गुलाम. नवरा असतो तिचा मालक.मालक गुलामचं नातं असतं. मी वेडी प्रेम,मैत्री,प्यारं.. इश्कं असं काही नसतचं मुळी नवरा बायकोमध्ये.”

“असं का बोलतेस?^

“खरं तेच बोलतेय. लग्न झालयं आपलं. हे मगंळ सूत्रं घातलं माझ्या गळयात. तुझ्या नावाचंहे लायन्सं आहे ना? तू मला हवं तसं वापरू शकतो.वाटेलं ते बोलू शकतो.माणसाचं शरीर असतं बायकांना. त्यांना मन थोडचं असतं. उपभोग्य वस्तूना मन असून तरी काय उपयोग?”

“तृप्ती काय लावलं हे?”

“सॉरी. पुन्हा नाही बोलणार मी.आता कळलं मला.फक्त बायको मी?” त्याच्या छातीवर एक करकचून चिमटा घेत व राग चेह-यावर पांगवत ती बोलली.

“सॉरी…!! फक्त बायको नाही. तू तर जान है माझी… माय लव्हं.. पिसेंस ऑफ माय हर्टं..” असले शब्द माणूस कृती शिवाय थोडचं उच्चारू शकतो? श्वासात श्वास मिसळत गेले.

“तू फक्त माझी आणि माझीच आहेस. दुस-याची नाही होऊ शकत.”

“मी तुझीच आहे रे पण तू?”

“तू संशय घेतोस माझ्यावर.”

“मी नाही. तू ?” त्याचे उचकटलेलं ओठ हातानचं बंद केले.खोल डोळयात पहात ती बोलली.

“संशय नव-यानं बायकोवर घ्यायाच असतो.मी थोडीचं तुझा नवरा आहे?” ती गंभीर होती. त्यानं आपली मिठी अधिकचं घटं केली.

“माय लव्हं. ..माय हर्टं…” तृप्तीला पुढचं त्यानं बोलूच दिलं नाही.त्यानं ओठांनी तिचं ओठं बंद केलं होतं. पहाटेची चांदणी नुकतीचं उगवून आली होती. पारिजातक सांडत होता. गंध दरवळत होता.


कोवळं उन्हं आत आलं.निलेश अजून ही शांत झोपलेला होता.तृप्ती उठली होती. तिची अंघोळ पण झाली होती. त्याला उठावं का? त्याला उठावं तर लागेलचं. ऑफीसाला जायला उशीर होईल त्याला. उशीर झाला की पुन्हा चिडंचिड होईल.सांशयाचं विषाणू माणसाच्य मेंदूत शिरले की माणूस हैवान बनतो.रात्री त्यांन मारलं. निलेश इतकं क्रूरं वागू शकतो? आता त्याचा राग सारा निवळला. हे तिनं अनुभवलचं होतं.पण संशयाचं काय?

                   आता तिला विचार करत बसायाला वेळ नव्हता. सारं आवरायचं होतं. निलेशला उठवलं. ती अधिक प्रेमानं वागतं होती. त्याचं सारं आवरलं. त्याला ऑफीसला ही पाठवलं. ते पण हासत हासतं.खर तर ते हसू नव्हतचं.तो हासण्याचा रंग फासून घेतला होता चेह-यावर. रात्री त्यानं मारलेलं तिला विसरता आलं नव्हतं. आज ऑफीसाला जाताना ही त्यानं एकांताचा पुरे पूर फायदा घेतला होता. अंघोळ करून ती खिडकीत उभी राहीली. ओले केसं… टॉवेलानं सुकवत उभी होती. ती रस्ता पाहू शकत होती. रस्ते वाहत होते. वाहनं धावत होती. शाळाकरी मुलं मुली हासतं हुंदडत जात होती.माणसं आपण होउनच गतीची सक्ती करून घेतात. हे सारं पहात असातना तिला तो आठवला. खरचं तो जगू शकला असेल?

तर्कंविर्तंकच्या चरख्यात तिचं मनं बराचं वेळं पिंळवटून निघालं होतं. तेवढयात तिचा फोन वाजला.

श्रोया होती. श्रोयानं इतक्या सकाळी का फोन केला असेल? फोन रीसीव्हं केला. श्रोया लगेच सुरू झाली.

“गुड मॉनिंग.. तृप्ती.”

“गुड मॉर्नींग सेम टू. इतक्या सकाळी फोन?”

“आवरलं तुझं सारं?”

“आवरलं. तूझं? आज ऑफीसाला नाही जात का?”

“नाही. आज रजा माझी. मी ॲपेक्स हॉस्पीटल मधून बोलतेय.”

“ हॉस्पीटल मधून? काय झाल तुला?”

“ मला काय धाडं भरलीय. अग तुला माहीत का? काल लग्नात एक ॲक्सीडेंट झाला होता.”

“हो आम्ही घरी निघालो होतो तेव्हाचं झाला होता.आमच्या समोरचं झाला होता.”

“ज्याला धडक बसली तो माझा आते भाऊ. फारं सीरीअसं.”

“का? विवेकच्या जवळाचा का कुणी?”

“जवळचा म्हणून काय विचारतेस. माझ्या आत्याचा मुलगा तो.सख्खा आतेभाऊ तो.”

“ मला नव्हत माहीत तो तुझा आतेभाऊ म्हणन.”

“ तू ओळखतेस त्याला.?”

“नाही ग. ओळखत नाही मी पण तो अपघात झाला तेंव्हा आम्हीतिथेच होतो.”

“येतेस हॉस्पीटला?”

“हॉस्पीटला?”

“तुझा ब्ल्डं ग्रुप AB आहे ना?”

“तुला कसं माहीत?”

“अग ब्लडं बँकेत तुझं नाव. वाचलं मी. बल्डं बँकेत AB रक्तगटाचं रक्त शिल्ल्क नाही. येतेस?”

“अग एकटीचं मी घरी. निलेश ऑफीसला गेलाय.”

“विवेकला पाठवू का?”

“नको नको. त्याला कशाला पाठवतेस?”

“मग कशी येतेस?” श्रेयानं तृप्तीला गृहीत धरलं होतं. श्रेयाचं काही चूक ही नव्हती. अश्या कामाज तृप्ती पुढेच असे.

“पेंशट शुध्दीवर आहे ना?” तृप्तीनं काळजीच्या स्वरात विचारलं.

“नाही ना? ब्लडीगं झालं. इर्मजन्सी ऑपरेशन करायचं. त्यच्य शरीरात पुरेसं रक्त नाही. ब्लडं बँकेत पण ते उपलब्ध नाही. प्लीज तू येना.तुला काही प्रॉब्लेम का?”

“मला कशाचा प्रॉब्लेम?”

“मग येना?

“निलेश घरी नाही. त्याला विचारावा लागेल.”

“मग विचार ना? का त्याला विचारयाला काय मुहूर्त पहातेस काय?” श्रेया घाबरली होती. तृप्तीचा रक्तगट हा AB+ तिला माहीत होतं. तृप्तीला ती आग्रह करण साहजिकचं होतं. त्या कॉलेजला एकत्रंच शिकत होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेत ही त्या सहभागी असतं. रक्तदान शिबीरातून त्या रक्तदान ही करत असतं. तृप्ती सामाजिक कार्यात कायम सहभागी असे. तत्परतेन ती मदत ही करत असते.

“दुसरं कुणीचं नाही का?

“दुसरे असतील ही पण तू नाही येऊ शकणार का? हे हॉस्पीटलं तुझ्या घरापासून जवळचं आहे ना?”

“जवळचं आहे पण? “ तृप्ती खरं तर श्रोयाला सांगू शकत नव्हती. कसं सांगणारं होती. आपण असं रक्त दान केलं हे जर निलेशला कळलं तर? तो टोकाचा निणर्यं घेऊ शकतो.

“आता कशाला पण निबिणं… म्हणतेस. तृप्ती तो माझा सख्खा भाऊ. निलेशला काय एवढं घाबरतेस? तो थोडाचं अश्या कामाला नाही म्हणार आहे.”

“तसं नाही ग.त्याला मी रक्तदान केलेलं आवडत नाही.”

“असं कसं? त्याला आवडत नाही?”

“का म्हणजे बायको त्याची मी. आजरी पडले बिडले तर?”

“तृप्ती तू असं वेडयासारख काय बोलतेस? रक्तदान केल्यावर थोडचं असं काही होतं असत? तुझा दुसरा काही प्रॉब्लेम का?”

“खरचं निलेशला आवडत नाही. तुला माहीत तो कसा रागीटं. त्याच्या मनाविरूध एखादी गोष्टं झाली तर नाही सहन होत त्याला.”श्रोयाला हे कळत नव्हतं. तृप्ती असं का बोलतेय.बायकोनं रक्तदानं केलं जर त्याला गर्व वाटावं असं कसं आवडत नाही. तृप्तीच्य मनात प्रंचड मोठ वादळ उठलं होतं.तो मृत्यूशी झुजतो आहे. आपण कदाचित रक्त दिलं तर तो जगू शकतो. कुणाचं मरण टाळण्या पेक्षा दुसरी गोष्टं कोणती असू शकते?

“तृप्ती,आदित्यं मृत्यूशी झुंजतो आहे. त्याला जींवत राहण्यासाठी तू मदत करू शकतेस.मी त्याची बहीण असून ही करू शकत नाहीं. बघ निलेशला विचारून.”

“सॉरी, श्रेया… निलेशला नाही आवडणारं ते. त्याला तर नाहीचं प्लीज तू दुसरं कुणी तरी शोध. मला माफ कर.” तृप्ती ठाम होती.

“त्याचा दुश्मन का तो?निलेशची नि त्याची ओळाख का?”

”अर्थात तसं काही नाही पण त्याला ते नाही आवडणारं हे नक्की.”

“ जशी तुझी मर्जी.. “ श्रेयानं रागा रागानचं फोन ठेवला.

              तृप्ती तशीच भींतींला उभी राहीली काय करावं हेचं कळतं नव्हतं. रक्तदान केलं तर तो जगेल. दुसरं कुणाचं रक्त ही मिळेल पण आपण त्याला जीवंत राहण्यासाठी मदत करू शकत नाही. लग्नाची बंधनं स्वांतंत्रं हीरावून घेतात. असली सारीबंधनचं आपण तोडून टाकावीत का? आपल्याकडचं लक्ष होतं त्याचं म्हणूनचं तो पडलाय. त्याचं प्रेम खरं असेलं खोटं असेल. तो आपला कुणी नसला तरी माणूस म्हणून त्याला मदत करायाला हवी.निलेशला जर हे कळलं तर? तो घरात नाही ठेवणारं. आपला संसार मोडणारं हे ही नक्की होतं.दहा मीनीटानंतर ती उठली.श्रोयाला कॉल लावला.

“श्रेया,मी हॉस्पीटल येतेयं.”

“निलेशनं परवानगी दिली तुला?” श्रेयाचा आंनद शब्दांत मावत नव्हता.

“नाही. त्याला हे कळायाला ही नको.प्लीज हे कुणाला सांगू पण नकोस.मी निघाले.” तृप्तीनं फोन ठेवला. श्रेया नुसती फोन कडचं पहात राहीली.

(पुढील भाग लवकरचं)Rate this content
Log in