प्रतिभाशाली आई
प्रतिभाशाली आई


आदर्श प्रतिभा लाभलेली माझी आई,स्वतंत्र विचाराची होती. मी तिला सतत बघत होते तिचे सर्व गुण माझ्यात असावेत असा माझा मानस होता.पंरतु काहीच गोष्टीत साम्य होत. कधी विषय निघाला तर आई सांगत असे आपल्या आयुष्यातल्या घटना आई म्हणायची तुम्हा संर्वाना सर्व गोष्टी मुबलक मिळालेल्या आहेत.त्याचा कधी गैरफायदा घेवू नका .आम्ही लहान असतांना छोट्या छोट्या वस्तूंसाठी तरसलेलो होतो. खायला भरपूर मिळे पण कपडे वर्षातून दोन जोडी बाकी काही गरज नाही. आई सात वर्षाची असतानाच तिचे बाबा स्वर्गवासी झाले होते.. आई एकुलती एक भावू पण लहानपणीच गेला होता आजोबाकडे मोठ कुंटूब होत.आजोबा गेल्यानंतर चार मामा होते..कसे काढले असेतिल त्या दोघीं मायलेकींनी पारतंत्र्यातले ते असहनिय जीवन..
म्हणायला मामाच्या घरी टाक्यात रई लागायची गावची जमिदारी होती.त्याकाळी पुरूषांच वर्चस्व होत. आणि त्याच रक्ताची मुलगी परकी होती. वरून विधवेचं जीवन त्यावेळी खुप कठीण असायच. तिला कोणत्याच शुभकार्यात भाग घेणे अशुभ लक्षण मानल्या जायचे. तश्यातच माझी आई तरून वयाची म्हणजे तेरा वर्षाची झाली होती,कोणाला काय चिंता फक्त आजी आईच्या सुंदर मुखाकडे पाहुन रडायची, "कस होईल माझ्या या सुंदर पोरीच कोणास ठावूक" सारखा ईश्वराचा धावा करायची. दिनरात कष्ट करायची .व चोरून लपून आपल्या मुलिला काही खायला द्यायची.. माझ्या आईने व आजीने खुप कठीन दिवस काढले.ते ऐकून आमच्या डोळ्याला अश्रृच्या धारा लागायच्या,ह्रदय गलबलून यायच.
एक दिवस उजाडला मामासोबत एक तरुन मुलगा आला होता .माझी आई वऱ्याड्यांत झाडलोट करित होती. त्या पाहूण्याने आई कडे एक कटाक्ष टाकला व मामासोबत बैठकीत गेले. मामाच्या मुलिला बघायला आले होते .पडदा पद्धत असल्या कारणाने स्त्रीया बाहेर निघायच्या नाही.मुलिंना लांबलचक परकर पोलके होते.चहापाणी झाला पाव्हणे निघून गेले. दोन दिवसाने बातमी कळवणार होते ,मामाने सांगितले मुलगा सरकारी नौकरीत आहे.खाणदाणी आहेत.भरपूर जमिन आहे .दोन दिवसांनी बातमी आली.त्यांना माझी आई पसंत आली होती. आईला या गोष्टिंशी काही घेणेदेणे नव्हते.तशी तिला वयानुसार समज नव्हती. बातमी ऐकून घरात सामसुम पसरली सर्व विचार करू लागले.पण मामाने मोठ मन करून आदेश दिला.चला लग्नाची जय्यत तयारी करा. मामा म्हणे एकुनतीएक आमची भाची आहे. चला करूया धुमधडाक्यात लग्न ..आईच्या मामांनी सर्वस्वी मनापासून खर्च केला होता.आईच्या लग्नात पुरणपोळीचा स्वयंपाक होता.रात्रभर पंगती उठल्या.बाहेर शुद्ध तूप पत्रावळीतून वाहुन जमिनीवर थीजलेले दिसत होते.. सकाळी निरोप( बिदाई) दिली. एकदाच लग्न झाल.आई आपल्या सासरी आली..!!
तेराव्या वर्षात तिला काय समजणार होत. पण अनेकांची लग्न पाहिली होती. लग्नात बँड वाजतो. मांडव सजतो, नविन जरीचे कपडे घालायला मिळते.गोडधोड पदार्थ खायला मिळतात . असले काही स्वप्न उराशी बाळगून सासरी आली.आईला वाटले स्वागत होईल कुणी आपली आरती करेल. असच काही मनात होत.. पाहूने कुठेच कोणी दिसले नाही ,संध्याकाळ असल्यामुळे गडद आंधार होता .दूचाकी रिक्ष्यातून नवरदेवाने हात धरून उतरवले. मोठ्यांनी सांगितल्या प्रमाणे चेहरा पुर्ण झाकलेला होता.वरून ओढनी होती त्यावर शॉल पण होती .सांभाळता वाट पुरे, उन्हाळ्याचे दिवस होते.आईला वाटल घर प्रशस्त असेल. गेल्यानंतर सावकाश कपडे बदलवून साधी साडी नेसायची . पण घराला ताटव्याचा दरवाजा होता. आत जाताच दोन मांजरी खडबडून बाहेर पळाल्या होत्या. आई जाम घाबरली म्हणे, आणि नवरदेवाला जावून बिलगली होती... नवरदेवाने काहिच न बोलता आईला खाटेवर बसवले. नवरदेव गंभिर स्वभावाचा समजून मनात आईला भिती भरली.
१४ बाय १५ चा एकच रूम तेही पाल्या पाचोळ्याने आच्छादलेला होता. कधी न सारवलेल खड्डे मातीने विखुरलेली जमिन होती.दोन खाटले पडून
होते .दुसऱ्या खाटल्यावर नवरदेव पहूडले अन घोरायला लागले. बिचारी माझी आई ती पण आपल्या खाटल्यावर थकलेली असल्यामुळे पटकन झोपी गेली. दिवस उगताच पहाटे उठून कामाला लागली. त्या कोवळ्या सुकोमल निरागस वयात संसाराचा भार येवून पडला.तो आईने ओळखला .म्हणे यातून सुटका नाही.येतांना तिच्या आईने काही बोल तिच्या ओटित घातले होते. "ब्राम्हनाला दिली गाय,अन् तिची आशा काय" ते बोल आठवून डोऴ्यातले अश्रृ सारखे वहात होते.
आजूबाजूच्या आया बाया आल्या सारखी विचारपुस करत होत्या ,आमच्या समाजात मुंह दिखाईचा कार्यक्रम असतो,पण तिथे कोणताच सोपस्कार करायला कोणीच दिसत नव्हत.त्या बाया
स्वभावाच्या बऱ्या वाटल्या तशी माझ्या आईचे बोल खुलले.आई,आजी करून ओळख झाली.त्यांनीच आईला काही माहिती सांगितली.आजीने सांगितले बाई लई मोठ घर होत तुमच ,बोर नदिले पुर आला अन् सप्पा गाव खरवडून नेल. आमच पुर गाव कस भकास करून सोडल..
"बाई लई मोठ घर होत तुमच ,बोर नदिले पुर आला अन् सप्पा गाव खरवडून नेल. आमच पुर गाव कस भकास करून सोडल.भांडे कुंडे पण रांधाले काहीबी ठिवल नाही. या पुरान साऱ्याईले लाचार करून सोडल माय",पर तू भाग्यवान हाय ,तुले साजरा पती भेटला नौकरीवाला ,बाकी गावात ,गरिबीन कस थैमान मांडल हाय. सुखी राह्य पोरी ,बेगीबेगी सर्व होवून जाईन . आईला मनोमन धीर आला, मनातून वाईट विचार काढून कामाला लागली.!संध्याकाळी नवरदेव जेंव्हा घरी आले,तेंव्हा त्या झोपडीला पाहून आश्चर्य चकीत झाले व चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली. बोलता बोलता कष्टांतिक जीवनातही आनंदाने प्रवेश केला.
व आईबाबाचा संसार वेलीसारखा बहरत गेला..
रडता पडता माझ्या आईने कित्येक तप केले कोणास ठावूक .तीन वर्षानंतर पहिल्या मुलिचा जन्म झाला.दुसरी पण मुलगी, माझी आई म्हणायची बस दोन लक्ष्मी सरस्वती आल्या माझ्या घरात ,आईबाबा दोघेही अगदी आनंदात ससांर करत होते.बाबा खुप मायाळु होते.पण वरून कठोर दिसत होते. तिसर बाळ नको असतानांही आले. त्याकाळी विशेष काही उपाय नव्हते ,लागोपाठ ५ मुल मी एक शेवटची एकुन ८अपत्य आईला झाले. आईने अपार कष्ट मेहनत करून आपले सर्व बाळांचे पालण पोषण व्यवस्थित केले.सर्वच अपत्य निरोगी ठनठनित होते. बाबाला फक्त १७/रूपये पगार होता.आई त्या १७/ रूपयातून दरमहा १०/रूपये बचत करायची.७/रूपयात पुर्ण घरखर्च करायची. साऱ्या मुलांना सारखे कपडे,सारखे जोडे,चप्पल ,शाळेच्या बँगापासून व्यवस्थित शाळेत पाठवायची.अभ्यास करायला लावायची.प्रत्येक गोष्ट पद्धतशिर निटनेटके व्हायला पाहिजे,अशी अमुल्य शिस्त लावली.
क्षणाभऱ्याचा ही विसावा कधी आईने घेतला नाही.थोडथोड करून सुंदर घर बनवले. मजूराला मजूरी द्यायला पैशे कमी पडायचे,तेंव्हा स्व:ताच पहाटे उठून विहिरीचे पाणी काढून बांधकामावर टाकायची आईने घरात जिकडेतिकडे नक्षी कोरून छान भिंतिला खिडकिला आलमारीला शोभिवंत केले होते.सुंदर बाग लावली त्यात अनेक प्रकारची फुलझाडे.फळांचे वृक्ष,भाजीपाला पण घरचाच पुरायचा. गाईम्हशीचे ही कामे करायची,दुध,दही,तुप घरूनच विकल्या जायच. आईचे काम कधी संपायचेच नाही..!!
आईला एकही वर्ग शिक्षण नव्हते.पण तिने आपल्या लहान लहान मुलांकडून धडे गिरवले. बाराखडी,पाढे जोऱ्यानी म्हणायला लावायची.काम करता करता ती पण सारखी वेड्यागत घोळवायची,ती निटनेटकी इंग्रजी पण बोलायला व लिहायला लागली होती.फक्त तिच्याजवळ प्रमाणपत्र नव्हते. सुरेख भरतकाम क्रोशिया,स्वेटर विणायची,तिळसंक्रातिचा हलवा खुप सुंदर काटेरी चांदण्यासारखा पांढरा,जश्या आकाशातिल चांदण्याच आल्या खर अस आंम्हा वाटायच. स्वयंपाकात अगदी तरबेज होती.रेखिव जाळीदार अनारसे पाहूनच द्रिष्ट लागेल की काय ही भावना आमच्या साऱ्या भावंडांच्या मनात येई. तिला वाचनाची ही गोडी होती.आमचे सारे पुस्तक ती वाचायची झाले.कांदंबरी, उपन्यास खुप आवडीने वाचायची. आईला सर्वगुन संंपन्नचा खिताब मिळाला.कौतुकाची थाप मिळाली.बोलने मधुर आवाजही मधुर गाणे, भजण ,पुराण पुर्णपणे आत्मसात करायची . अतिशय हळवी दया, माया,वात्सल्य तिच्यात भरभरून होते.
जबाबदार अन् कर्तव्यनिष्ठ असल्यामुळे खोट चालू द्यायची नाही ,गरीबांची पण होते तेवढी मदत करायची .लेकरांना ताप जर आला तर जीवाच रान करायची .वेळेवर औषध देणे,वैद्याकरवी नाही झाल तर सिविल सर्जन डॉक्टर कडे न्यायची शहरात न्यायची.पण कधी आईने धागे दोरे गंडे ताईत आपल्या मुलांना बांधले नाही.भविष्य कधी पाहले नाही. किंवा अंधश्रद्धेला भिक घातली नाही.भूत प्रेतावरही विश्वास केला नाही व आम्हाला करू दिला नाही .भिती दाखविली नाही .आम्ही सर्व भांवडे कधीही अंधश्रद्धेत वाहवलो नाही निर्धास्त ,निडर पण संस्कारी आहोत, परिवर खुप मोठा झाला..सर्वच चांगल्या संगतित प्रगतिशिल आहेत. पण हे सर्व खंबिर आईमुळे त्या आईचा आम्हा सार्थ अभिमान आहे.न डळमळता तिने संसारात साऱ्यांची सेवा करून मने जिंकली..अशी सर्वगुन संपन्न प्रतिभाशाली आई.म्हणजे सुखाचा भरलेला सागरच जणू आम्हाला गवसला.जीवनात आईने यशोमय शिखर गाठले होते.
तिचा प्रवास सतत आमच्या पाठीशी होता.
माझी आई ८५ वर्षाची होवून स्वर्गवासी झाली. ९ वर्ष तिला झाले जावून. ती आजही आमच्या ह्रदयात ठाम आहे तिचे कर्तृत्व,प्रेरणा आमच पाठबळ आहे..