Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

संवाद मुका झाला

संवाद मुका झाला

3 mins
1.6K


मला नाही वाटत "संवाद मुका झाला" उलट तो वाढतो आहे.अनेक क्षितिजे पार करतो आहे.कोणताच विषय,कोणतेच नातं, कोणतेच स्थळ आता नविन वाटत नाही.सर्वांशीच दिलखुलास संवाद वाढला आहे. सनातन काळात बघितल तर फक्त घरच्या लोकांसोबतच बाईमानुस बोलत असे किंवा एक दोन शेजारच्या घरा पर्यंत संवाद असायचा किंवा व्यवहारापुरत नोकर,चाकर व नातेवाईक यांच्याशी संवाद होता.पण आता या विसाव्या शतकात मणुष्य कुठल्या कुठे पोहचला आहे. आणि हे सर्व या महा संवादामुळे घडते आहे.

अंतराळापासून तर पाताळापंर्यंत संवाद पोहोचतो आहे,हल्ली वाऱ्यात ही संवाद होतात , पाण्यात ही संवाद होतात ,बर्फातही संवाद होतो देश विदेशात हा संवाद विखुरला आहे. संवादा शिवाय जगण्याचा विचार देखिल मनात येत नाही.या संवादाला क्षणाभराचा ही विसावा नाही. दिवसभर रात्रभर सतत संवाद चालू असतोय, व्यापाराचा दृष्टिकोण असो ,क्रिडा क्षेत्र असो वा कला क्षेत्र असो वा असो राजकीय वा मैत्रीसंबंध असो, तस्संम ईहलोक परलोक या संवादात गुरफटलेला आहे.या संवादा शिवाय जीवनात कहीच महत्त्वपूर्ण नाही असे मला वाटते.

हे विश्व विज्ञानदृष्या इतके प्रगत झालेले आहे त्याचे कारण संवादच आहे .या संवादामुळे मोठमोठ्या क्रांत्या घडत आहे. मोठमोठ्या उलाढाली होते आहे. या ब्रम्हांडातल्या असंख्य घडामोडीवर सतत लक्ष केंद्रित करून कुठे काय होते आहे त्याची अचूक माहिती संवादामार्फत केली जाते, या ब्रम्हांडातल्या ग्रहावर जावून ही आपण पोहोचलो आहोत. किंवा प्रयत्न करतो आहोत.हे सर्व संवादा मुळेच घडत आहे..संवाद जर वाढला नसता तर आंतरिक व बाह्य प्रगती झालीच नसती आणि आपण जिथल्या तिथेच राह्यलो असतो.दूरसंचार,दूरध्वनी,संगणक,मोबाईलवर

रात्रदिन सेवेत तैनात असतात.ते कश्यासाठी तर संवाद साधण्याकरीताच असतात.कुठे भूकंप तर कूठे वादळ कूठे पाऊस या सर्वांची माहिती संवादामुळेच आपल्यापर्यंत पोहोचवली जात असते.कुठे लढाई कुठे शांतीवार्ता. पंतप्रधानाच्या मनातील "मनकी बात " संवादामार्फतच पोहचवली जात असते.

आजच्या घडिला जीव जंतू ,प्राणी यांच्याशी ही संवाद साधला जातो.त्यांचेही सु:ख दु:ख या संवादा मार्फत जाणु शकतोय .सृष्टी अन् पृथ्वीचे मिलन या संवादामुळेच घडते आहे.निसर्गातही संवाद चालु असतोय.परिणाम दुष्परिणामाची जाणिव आपणास संवादामार्फतच होतेय.संवादाचे प्रकार अनेक आहेत. जवळचा संवाद ,दुरचा संवाद,गोड संवाद,कटू संवाद, सुखमय संवाद, दुखद, उदास करणारा संवाद तर कधी खुशीचा,आनंद देणारा मधुर संवाद..प्रेममय किंवा कठोर संवाद,या संवादाचा चोफेर कुठे सुगंध दरवळतोय कुठे प्रदूषण पेरतोय, कधी घडवतोय तर कधी जीवनातुन उठवतोय . कधी रक्षक तर कधी घातक असतोय , कधी निर्भिड स्पष्ट तर कधी कुजलेला ,दबलेला असतोय.या संवादाच्या अनेक जाती विखुरलेल्या असतात.

संवादाला आता अनेक दिशा मिळाल्या आहेत. एकाच प्रकारचे अन्न खाल्याने आपण विटतोय तसेच एकाच प्रकारच्या संवादाने ही मन बेजार होत असते. संवादाला नविन वाचा मिळायला पाहिजे. प्रगतिशील होण्याकरीता नवनविन परीसंवाद ऐकणे त्यावर चर्चा करणे, संवादात भाग घेवून जिज्ञासा जाहिर करणे, ही गोष्ट अती आवश्यक झालेली आहे.

संवादा शिवाय सर्व व्यर्थ आहे. संवाद हा आयुष्यातला महत्वपुर्ण भाग आहे.

एक छोटे उदाहरण आहे,एक आंधळा रस्त्याच्या कडेला उभा राहून भीक मागत होता. बऱ्याच वेळा पासून एक वाटसरू त्याचेवर नजर ठेवून होता.जरा वेळाने तो वाटसरू त्या आंधळ्याकडे जाऊन म्हणाला,"तुला दिसत नाही, तुझा हात पण तुटलेला आहे.आणि मी बघतोय बऱ्याच वेळा पासून तुला कोणी भीकही घातलेली नाही.तरीपण तू आनंदी दिसत आहेस?. आणि तुझ्या चेहऱ्यावर कंटाळा नाही दिसत?. भीकारी म्हणाला, साहेब आपन फार दयाळू आहात. मी आंधळा आहे,हे खरे आहे.परतू आपला संवाद ऐकून आपल्या बोलण्यातील आपूलकी, दयाळूपणा माझ्या ह्रदयापर्यंत पोहचू शकली.कारण मी ऐकू शकतो.माझे दोन्ही पाय साबूत आहेत. तो ईश्वर किती दयाळू आहे.ज्याने तुमच्यासारख्या महान व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी मला वाचा दिली आहे.तुमच्या भावना समजण्यासाठी कोमल ह्रदय व विश्लेषणात्मक बुद्धी दिली आहे. भिकाऱ्याशी झालेल्या संवादाने वाटसरू दंग राहिला.

अर्थात एका मधुर संवादाने कुणाच मन गहिवरू शकते.अश्या गोड संवादाने कुणाचे दु:ख आपण थोड्या प्रमाणात का होईना नामोहरण करू शकतो.या संवादाने महाचेतना मनाचे द्वार खुलत असते.संवाद क्षमता वाढली पाहिजे. संवाद चौफेर

गाजला पाहिजे, संवादाने पूर्ण विश्व जवळ भासत असते. आता कुणीही दुरच राहिले नाही.एका फोन कॉलवर खूप दुरी गाठता येते.फेसबुक,व्हाट्सअॅपवर दिवस रात्र संवाद साधू शकतोय. सारे विश्वच संवादाने व्यापल आहे. जशी आपल्या दैनंदिन गरजा हवा,पाणी,अन्न,वस्त्र असते. त्याचप्रमाणे संवाद ही आविभाज्य घटक आहे.प्रत्येकाला वाचा मिळाली आहे. आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की आपण संवाद करू शकतो.आपल सु:ख दु:ख सांगू शकतो.या संवादाने कोणाचे कार्य करू शकतो, समाजासाठी चांगल काही करू शकतो. किंवा कमितकमी आपल्या घरच्या लोकांना सुसंवाद करून सुखी करू शकतोय..!!


Rate this content
Log in