Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी

4 mins
3.4K


आपण आजही जुन्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत. 'जुनंं ते सोनंं' म्हणवणारे आपण प्लॅस्टिकच्या जगात कसे काय माघार घेऊ शकतो. हातात कापडी पिशवी का बाळगू शकत नाही? आपण जर प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या नाहीत तर आपोआपच प्लॅस्टिक कंपनी बंद होईल. सुरुवात आपल्यालाच करायची आहे, असं मला वाटतंय.

या प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते आहे. जिकडे पहावे तिकडे प्लॅस्टिकचा भस्मासुर थैमान घालतो आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या उडताना दिसतात. या प्लॅस्टिकच्या वस्तू सडत नाहीत, तर कित्येक वर्ष जशाच्या तशा राहतात. त्या कितीही खोल खड्ड्यात टाका, त्याचा निचरा होत नाही. जमिनीत फुलझाड लावले व त्या झाडाखाली प्लॅस्टिकची पिशवी अथवा प्लॅस्टिक तुकडे असतील तर ती झाडं काही दिवसाने वाळतात.

पर्यावरण वाचवण्यासाठी सध्या केलेली प्लॅस्टिक बंदी हा शासनाचा निर्णय अगदी योग्य आहे.

त्याचा विरोध न करता तो आनंदाने स्वीकारला पाहिजे.

प्लॅस्टिक हा नवयुगातला संचार आहे. पूर्वी ते आपल्या आयुष्यात नव्हता. ते आल्यावर त्याची आपल्याला सवय जडली आणि स्टील, जर्मन, पितळ, काच, चिनीमाती किंवा तांब्याची, लोखंडाची भांडी कालबाह्य झाली. सध्या प्लॅस्टिक उपकरणांनी याची जागा घेतलेली आहे. या प्लॅस्टिकला पर्याय म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिक बॉटल्स न वापरता स्टीलचे भांडे अथवा तांब्याचे भांडे वापरूया. प्रवासादरम्यान स्टीलचे थर्मास किंवा बाटल्या वापरूया. या सर्व वस्तू बाजारात आजही सहज उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्टीला पर्यायी साधनं असतात हे विसरून चालणार नाही. विचार मनावर घेतला तर स्वास्थ्यही चांगले राहील आणि या प्लॅस्टिकपासून सुटका मिळेल.

फुलझाडांकरीता मातीची कुंडी योग्य पाणी धरून ठेवणारी असते. यात झाडं टवटवित दिसतात. प्लॅस्टिक कुंड्यामधे झाडे लवकर सुकतात.

सध्या बाजारात बहुतांशी वस्तू ह्या पाॅकिटबंद पिशवीतूनच येतात. अगदी छोटी छोटी मुलं त्यात हात घालून खात असतात. काही खाद्यान्नाला तर प्लॅस्टिकचा वास येत असतो. किती महिने,दिवस ते पाकीट बंद असतं. धुळीने माखलेली असतात. या गोष्टी लहान मुलांना समजत नाही पण मोठ्यानांही समजत नाह. किंबहुना ते स्वत: खातातच आणि वर मुलांनाही खाऊ देतात.

गौरी, गणपती विर्सजन असो वा नवदुर्गा विर्सजन, नदीवर सर्वत्र घाण करून ठेवतात. निर्माल्याची पोतीच्या पोती त्यासोबत प्लॅस्टिकच्या पिशव्यामधे भरून काही वस्तू, पैसे टाकतात. गरीबांची मुलं जीवाशी खेळ करून ते सर्व पाण्यातून काढतात. कित्येकदा त्यांना इजा झाल्याने त्यांना जीव गमवावा लागतो. या अंधश्रद्धेला काय म्हणावे? तेच सर्व प्लॅस्टिकसहित खाऊन मोकाट जनावरेही मृत्यूमुखी पडतात .

त्यातुन पर्यायी गोष्टीचा सकारात्मक विचार व्हायला पाहीजे. समाजात केव्हाही चांगल्या विचारांचंं स्वागत व्हायला पाहीजे. या पोषक वातावरणासाठी जे करता येईल ते करायला पाहीजे. कोणत्याही सत्कार्यात कोणीही अडथळे आणू नये.

आपल्या नंतर काय होईल ? आपल्या पुढच्या पिढ्यांच काय होईल ? हा महाजनसमुदाय वाढतच आहे. पर्यावरणाचा विनाश म्हणजे संपूर्ण सृष्टीचा विनाश हा होणारच आहे. त्याकरीता मुळापासून प्लॅस्टिक निर्मूलन झाले पाहिजे. सहज वाटणाऱ्या वस्तू महा भंयकर रूप घेऊन विनाशाला कारणीभूत ठरतात. असेच या प्लॅस्टिक वस्तूंनी संपूर्ण जग व्यापलेलंं आहे आणि आपण त्या प्लॅस्टिक बंदीला उपहासात्मक पद्धतीने हाताळत आहोत. एक दिवस असा येईल हा पर्यावरणात होत चाललेला बदल म्हणजे, मानव काय पशुपक्षी कोणीच जिवंत दिसणार नाही.

प्लॅस्टिक बंदीमुळे जमिन सुपीक होऊन नद्या,नाले, तलाव, सरोवर स्वच्छ राहील व पिण्याचे पाणी पिण्यायोग्य राहील. या निसर्गाने आपणास जगायला काय दिलं नाहीये? ते सर्व मोफत उपलब्ध होतंं. या मिळालेल्या अनमोल संजीवनीची कदर केली नाही. आता सर्वच बाबतीत पैसे मोजावे लागतात आणि म्हणूनच आज आपली दयनीय अवस्था झालेली आहे. प्लॅस्टिकच फक्त स्वस्त वाटत होतंं. आता महागड्या वस्तू घ्याव्या लागतील. ते सर्व आपल्या चुकीमुळेच घडत आहे. मेडिकल असो वा जनरल स्टोअर वा कापड केंद्र कुठेही खरेदीला गेलो की आपण प्लास्टिकची पिशवी मागतो. आपण का बरंं मागणी करायची? त्यांनी नाही म्हटलं तरी जबरदस्तीने एक तरी पिशवी द्या, अशी विनवणी करीत असतो.

मानव स्वभाव लोभात गुरफटलेला असतो. आपले आयुष्य निव्वळ पैसा कसा वाचवायचा त्याकडे केंद्रीत असते आणि आळशीवृत्ती ठासून भरलेली आहे. एक प्लेट साफ करावी लागेल म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत खाद्यपदार्थ आणतात व त्यातंंच खातात. माणूस हा प्रगत होत आहे, परंतु तसा तो पर्यावरणाचे नुकसान ही करतो आहे. शहर वसले, मोठमोठ्या बिल्डींग, मॉल, हॉल उभे झालेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. पर्यावरणाला मोठा फटका बसला. पण तिकडे लक्ष गेलंंच नाही. 'अती तिथे माती' होणार हे सर्वांना माहित असूनसुद्धा आपण दुर्लक्ष करीत असतो. प्लॅस्टिक बंदी हा शासनाचा निर्णय योग्यच आहे. प्लॅस्टिक कंपनीवर बंदी घालणे म्हणजे अनेक मजूरांवर उपासमारीला वेळ आणण्यासारखे आहे. यावर तोडगा म्हणून आपणच प्लॅस्टिक पिशव्या वापरणे बंद करूया म्हणजेच कारखाने ही हळूहळू बंद होतील.

नविन उपाययोजना राबवून, कागदी पिशव्या, लहान मोठे कागदी लिफाफे बाजारात आणले पाहीजे. गरजू महिलांना काम मिळेल. प्लॅस्टिक निर्मूलन होणे व प्रदूषण थांबविणे ही आजची महत्वपुर्ण गरज आहे. या प्लॅस्टीक बंदीची अमंलबजावणी होणे जीवनासाठी आवश्यक आहे. या निर्णयाची खिल्ली न उडवता सर्व मिळून एकजुटीने कामाला लागले पाहीजे...

याबद्दल चार ओळी मांडते...

"निसर्गाची निगा ही राखूनी

करू बलशाली रमणीय दायिनी

वृक्षारोपण करूनी सजवू धरेला

पर्यावरणाचा करूया आपण मान रे..

रस्ते,नद्या,नाले अस्वच्छ बाप रे..

करू नये प्लॅस्टिकचा वापर कुणी रे.."

मीनाक्षी किलावत


Rate this content
Log in