STORYMIRROR

Kadambari Parit

Romance Others

3  

Kadambari Parit

Romance Others

प्रेमच ते...

प्रेमच ते...

3 mins
151

घरी एकच लग्नघाई सुरू होती. भिंतीवर लायटिंग माळा सोडल्या होत्या. जिन्यावरून झेंडूच्या फुलांच्या माळा सोडल्या गेल्या होत्या. दारावर सुंदर, सुरेख अशी रांगोळी काढली होती. जागोजागी फुलदाणीमध्ये मस्त सुवासिक फुले होती. देवघरात आरतीचे ताट आधीच तयार करून ठेवले होते.

दारावर नवरा नवरीची चारचाकी येऊन उभी राहिली. घरी एकच गोंधळ उडाला. "नवरा नवरी आले... नवरा नवरी आले..." म्हणून एकच गदालोळ उठला. माही आपली शालू सांभाळत चारचाकी मधून उतरली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते.  सकाळपासून लग्नविधी मध्ये वेळ कशी निघून गेली समजलेच नव्हते. पण खरी परीक्षा आता सुरू होती सासरमध्ये. तिच्या मनावर प्रचंड दडपण आले होते.

निश आणि माही दारात येऊन उभी राहिले. निशची आई, सामी आरतीचे ताट घेऊन आली. दोघांचे औक्षण झाल्यानंतर दोघांना आत घेतले गेले. देवघरामध्ये जाऊन देवांचे दर्शन घेतले गेले. त्याच दिवशी देवाचा गोंधळही झाला. फोटोशूट झाला. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळे झोपण्यासाठी निघून गेले.

लग्नानंतरचे तीन दिवस देवदर्शनामध्येच कसे गेले समजले नाही. चौथ्या दिवशी सकाळी लवकरच सत्यनारायनाची पूजा झाली. आणि माही माहेरी आली. माही खुश होती. तिच्या घरचेही आंनदी होते. येता जाता आई बाबा तिची बहीण निशच्या नावांनी तिला चिडवत होते. निशचा फोन आल्यानंतरही घरी एकमेकांना डोळ्यांनी खुणावत माहीला चिडवत होत्या. माही वरून वरून राग आल्यासारखे दाखवत होती. पण मनोमनी सुखावत होती.

पाच दिवसांनंतर माही सासरी जाणार हे माहीत असल्यामुळे माहीचे आई बाबा तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत होते. पाहता पाहता पाच दिवस कसे भुर्रकन उडून गेले. आणि माहीचा सासरी जायचा दिवस उजाडला. आणि घरी एकच तारांबळ उडाली. सर्वजण माहीच्या सासरचे लोक येणार म्हणून कुठेही कसूर व्हायला नको याची पुरेपूर काळजी घेत होते.

निश आणि त्याचे कुटुंब, माहीच्या माहेरी आले. पाहुण्यांचे यथासांग स्वागत करण्यात आले. सगळी मंडळी बसून बोलू लागली. लग्न एकदाचे व्यवस्थित पार पडले वैगेरे वैगेरे. सर्वजण बोलण्यामध्ये व्यस्त होते पण निश, माहीला शोधत होता. स्वयंपाक घरात वेगळवेगळे जेवणाचे पदार्थ बनवले जात होते. आणि त्याचवेळी माही बाहेर आली. आणि म्हणाली. "जेवण तयार आहे. पाने वाढायला घेऊ का..?" मग सर्वांनी होकार देताच पाने वाढले गेली. आणि जेवण उरकले गेले.

पुन्हा जेवणानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि निशचे कुटुंब परत जाण्यासाठी तयार झाले. इकडे माहीही तयार झाली होती. तिने छान मोरपंखी रंगाचा शालू नेसला होता. त्याला शोभेल अशा सिंपल मेकअप. केसांमध्ये गजरा. एकदम शोभेल अशी नववधू ती दिसत होती. जाताना तिला खूप वाईट वाटत होते. खरे तर तिला खूप रडू येत होते. पण ती रडली तर पुन्हा आई बाबा, बहिणही रडेल म्हणून माहीने डोळ्यांमधून अश्रू काढले नाही. आणि नाटकी हसू चेहऱ्यावर ठेवत ती हसतमुख होऊन सासरी आली. आज निश आणि माहीच्या लग्नानंतरची पहिली रात्र होती. घरी एकच चहलपहल सुरू होती. त्यामुळे सगळ्यांनी आज मुद्दाम जेवणखाण वैगेरे लवकर आवरले. आणि झोपण्यासाठी खोलीमध्ये निघून गेले.

निशची खोली खूप मस्त सजवली गेली होती. संपूर्ण पलंगावर लाल गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या होत्या. सगळीकडे फुगे होते. मस्त सुवासिक वास दरवळत होता.  निश आणि माही स्वतःच्या खोलीमध्ये आले. सजवलेली खोली पाहून दोघेही खुश झाले. आणि दोघेही पलंगावर बसले. आणि दोघांचा मधुचंद्र सुरू झाला. 

दोघेही एकमेकांमध्ये विलीन झाले होते. आणि त्याचवेळी... 'रिक्स..' हे नाव निशच्या तोंडामधून बाहेर पडले. आणि माही एकदम कोसळून पडावी तशी एकदम निशपासून दूर झाली. निशला काही समजायच्या आतमध्येच हे सर्व घडून गेले. माहीला ही काहीच समजेल नाही. "आपण जे आता निशच्या तोंडून नाव ऐकले ते खरेच होते की आपला भास...?" ती आवक होऊन दोन तीन मिनिटे तिथेच मान खाली घालून बसली. तिला वाटले निश काहीतरी बोलेल पण तो काहीच बोलला नाही त्यामूळे ती अंगावरील कपडे सावरत ती बाथरूममध्ये निघून गेली.  निशच्या तोंडामधून कुणाचे नाव आले? कोण असेल ती मुलगी? निशचे आणि तिचे नाते काय? आणि निशने माहीपासून नेमके काय आणि का लपवले. हे सर्व जाणुन घेण्यासाठी तुम्हाला या कथेचा पुढचा भाग वाचावा लागेल.

कथेचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा तुमच्या समिक्षा देऊन. या कथेचा पुढचा भाग मी लवकरच प्रकाशित करेन. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि मला फॉलो नक्की करा.

खुश रहा.. त्याचबरोबर नेहमी वाचत रहा.


धन्यवाद..



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance