"प्रेमच ते...!!" भाग-३
"प्रेमच ते...!!" भाग-३
मग पुन्हा गप्पा सुरु झाल्या. रिक्सच्या बोलण्यामधून जाणवले रिक्स या हॉटेलवर दररोज येते. हाफ डे काम करते आणि दिवसभर बाईक घेऊन मस्त सगळीकडे फिरते. हा तिचा आवडता छंद होता."
असाच एक आठवडा निघून गेला आणि रिक्सने, मला 'फिरण्यासाठी सोबत येणार का असे विचारले.' खरे तर माझ्यासाठी हे खूप अनअकसेपटेबल होते. पण, तरीही मला मनामधून तिच्यासोबत वेळ स्पेंड करू वाटत होता. म्हणुन मी ही तयार झाला. आणि तिला होकार कळवला.
दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही फिरण्यासाठी गेलो. तिचे रायडिंग पाहून मी बावरून गेलो. एका मुलाला लाजवले इतकी तिची रायडिंग चांगली होती. तिच्यासोबत बरीच ट्रॅकिंग केली. खुप सारे पॉइंट्स मी पाहिले. खुप वेळ तिच्यासोबत स्पेंड केलो.
असाच वेळ जात होता. आणि आम्ही एकमेकांनाकडे आकर्षित होत होतो. माझी भारतामध्ये येण्याची वेळ आली. मी रिक्सला सांगितले तसे, तेव्हा तिचा चेहरा पडला. तिला वाईट वाटत होते. हे मला स्पष्ठ समजत होते. पण मी काही बोललो नाही तिला.
दुसऱ्या दिवशी विमानतळावर ती मला सोडण्यासाठी आली व मी तिला विचारले. "विल यू मारी मी? मला नाही माहीत यापेक्षा वेगळे कोणत्या प्रकारे लग्नाची मागणी घालतात. पहा तू विचार कर आणि मला सांग. मी भारतामध्ये गेल्यानंतर तुझ्या उत्तराची वाट पाहीन"
आणि ती यावर कशी रिॲक्ट करेल याचा विचारही मी केला नव्हता.
ती माझ्या डोळ्यामध्ये एकटक पाहत म्हणाली. "खरे तर मीच तुला विचारणार होते. पण त्याआधी तूच मला विचारला." आणि असे म्हणून तिने मला मिठी मारली आणि कानामध्ये म्हणाली. "डिअर निश मी खरेच तूझ्यासोबत लग्न करायला तयार आहे." आणि ती खूप खुश होऊन माझ्याकडे पाहू लागली.
मी ही प्रचंड खुश झालो आणि तिला "लव यू.. आय रिअली मिस यू.. टेक केअर आणि मी लवकरच तुला भेटण्यासाठी येईन." म्हणत विमानामध्ये बसलो.
तिचे डोळे पाण्यानी भरेलेले होते. माझी अवस्था ही तीच होती. मला ही तिला सोडून इंडियामध्ये यायचे जीवावर आले होते. पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. इंडियामध्ये परत येणे गरजेचे होते.
आता मी माझ्या एका वेगळ्याच दुनियेमध्ये होतो. भारतामध्ये आल्यानंतर ही मी खूप खुश होतो. 'रिक्स...' माझी पहिली प्रियसी..' मी इथे, रिक्स लंडनमध्ये, पण फोन.. संदेश यामुळे आम्ही एकमेकांच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये होतो. आमचे सर्व मस्त सुरू होते.
असेच आनंदामध्ये महिने उलटून गेले. आणि एक दिवस रिक्सने मला सांगितले. ती मला भेटण्यासाठी भारतामध्ये येत आहे. आधी मला वाटले ती मस्करी करत आहे.
पण तिने मला फ्लाईटचे तिकीट व्हॉटसॲप केले आणि मग मला खात्री झाली, की ती खरेच इंडियामध्ये मला भेटण्यासाठी येत आहे. मला खूप आनंद झाला. मग मी तिला माझ्या घरीच यायला सांगितले.
थोड्याच दिवसांनंतर ती ठरलेल्या दिवशी भारतामध्ये आली. तिने जी कपडे परिधान केली होती ती खूप मॉडर्न होती. जी की माझ्या घरी ते चालणार नव्हते.
मी तिला सांगितलो. "चांगली कपडे परिधान कर. पण तिने नकार दिला आणि म्हणाली. "तुझ्या कुटुंबाला मी जशी आहे तशीच भेटुदे. आहे एक आणि दाखवू एक हे मला जमणार नाही." अशी म्हणून ती माझ्यासोबत माझ्या घरी आली.
तिला पाहूनच आईच्या कपाळावर आटी पडली. आईच्या चेहऱ्यावरूनच समजले तिला रिक्स आवडली नाही. कारण ती मोस्टली शॉर्ट्समध्येच असायची.
ती आल्यानंतर आम्ही पुणेमधील बरेच पॉइंट्स पाहिले. ती पुणेची होती खरी. पण पुणेमधील तिला काहीच माहीत नव्हते. मला खरे तर खुप नवल वाटले आणि त्यामुळेच मी तिला विचारल तर तिने तो सब्जेक्ट स्किप केला. सो मी ही जास्त खोलात नाही गेलो.
तीन चार दिवस रिक्स माझ्या घरी होती. पण या तीन चार दिवसांमध्ये तिचे आणि आईचे कधीच पटले नाही. माझी आई इंडियन कल्चरची.. ट्रेडिशनल आणि नेमके याच्या उलटी रिक्स होती. फ्री माईंडेड, बी फ्रँक, मॉडर्न... इन शॉर्ट 'अपडेटेड...'
(क्रमशः)

