"प्रेमच ते....!!!! भाग-२"
"प्रेमच ते....!!!! भाग-२"
निशला काही समजायच्या आतमध्येच हे सर्व घडून गेले. माहीला ही काहीच समजेल नाही. "आपण जे आता निशच्या तोंडून नाव ऐकले ते खरेच होते की आपला भास...?" ती आवक होऊन दोन तीन मिनिटे तिथेच मान खाली घालून बसली.
तिला वाटले निश काहीतरी बोलेल पण तो काहीच बोलला नाही त्यामूळे ती अंगावरील कपडे सावरत ती बाथरूममध्ये निघून गेली.
दुसऱ्या दिवशी निश ऑफिसला निघून गेला. आणि जाता जाता माहीकडे पहिला. पण माहीने काहीच प्रतिसाद दिला नाही.
चार पाच दिवस असेच अबोल अबोल निघून गेले. आणि एके दिवशी निशने माहीला मोबाईल वर संदेश पाठवला. "आज मला दुपारी बारा वाजता कॅफे स्वीडनमध्ये भेट." आणि तो ऑफिसला निघून गेला.
इकडे माहीने सर्व आवरले आणि कॅफेमध्ये निशला भेटायला निघाली. निश आधीच कॅफेमध्ये माहीची वाट पाहत बसला होता. माही येताच तो उठून उभा राहिला आणि माहीला खुर्चीवर बसायला सांगितला.
खुप वेळ असाच निघून गेला. आणि निशने पुढाकार घेतला. आणि तो बोलू लागला. "तू काय घेणार? तुला काय खायचे आहे? काय ऑर्डर करायचे..?" खरेतर त्याने फक्त बोलण्याची सुरूवात कशी करायची म्हणून एकदमच माहीला इतके सारे प्रश्न केले.
माही म्हणाली "मला फक्त कॉपी" मग निशने दोघांसाठी ऑर्डर दिली.
निश खिडकी मधूनबाहेर पाहत माहीला म्हणाला. "आज वातावरण मस्त आहे न..?" आणि माही काय रिप्लाय देते म्हणून तिच्याकडे पाहू लागला.
पण माहीने फक्त मानेनेच होकार दिला. तोपर्यंत त्यांची ऑर्डर आली होती.
निश थोडा सावरून बसत म्हणाला "तुला काहीच बोलायचे नाहीये का माही..? काही विचारायचे नाहीये का..?" तरीही माही माहीने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. ती फक्त कॉफीमध्ये चमचा ढवळत राहिली.
फक्त डोळ्यांनी सांगितले "तू बोल पुढे मी ऐकत आहे." आणि त्याच्याकडे न पाहतच ती त्याचे बोलणे ऐकत आहे असे दाखविले.
मग निशने सुरुवात केली. निश कुठेतरी हरवल्यासारखा बोलू लागला...
__________________भूतकाळ___________________
"दोन वर्षांपूर्वी मी लंडनला गेलो होतो. ऑफिसच्या कामानिमित्त. दुसऱ्या दिवशी ऑफिसचे काम आवरले आणि मी हॉटेलकडे निघालो. हॉटेलवर पोहचलो आणि थोडा लॉनमध्ये फिरत होतो तेव्हाच एक मुलीने माझे लक्ष वेधून घेतले." आणि मी तिच्याकडे सगळे विसरून पाहू लागलो.
'दिसायला सावळी, शॉर्ट तपकिरी केस, गोल्डन कलरचे हायलाइट्स, टोकदार रेखीव नाक, भुरे बोलके डोळे, गुलाबी ओठ सगळे एकदम कसे परफेक्ट.'
मी तिला पाहतच राहिलो. आणि ती माझ्याजवळ आली. आणि स्मित हास्य करत म्हणाली. "कधी मुलगी पहिला नाही का..?" आणि माझ्याकडे खालून वरपर्यंत पाहू लागली.
मी अचंबित झालो. ती डायरेक्ट माझ्याजवळ इतकी बेधडक येऊन बोलेल असे मी विचार ही केला नव्हता.
विचार करता करताच मी तिला म्हणालो. "तू मराठी बोलते...! म्हणजे तू मराठी मुलगी आहे?" आणि तिच्या उत्तराची प्रतीक्षा करू लागलो.
मी खूप आनंदाने बोलताना पाहून तिनेही मला खुश होत उत्तर दिले. "अर्थातच....हो मी रसिका, पण मला इथे सर्वजण रिक्स म्हणतात. मी महाराष्ट्रामधून बिलॉंग करते. पुणे इथून. आणि तुम्ही......?" इतके म्हणून ती निशच्या प्रतिउत्तराची वाट पाहू लागली.
निश म्हणाला. "अरे वा, मी ही पुणे मधूनच आहे. माझे नाव निश. आणि मला सर्वजण निशच म्हणतात." असे म्हणून तो मोठ्यांनी हसला आणि रिक्सकडे पाहू लागला.
त्याला वाटले ती थोडी चिडली आहे पण ती ही हसायला लागली. थोडे औपचारिक बोलणे झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांना बाय केले.
पुन्हा दुसऱ्या दिवशी मला हॉटेलवर रिक्स दिसली. अधीसारखीच बेधडक आणि तितकीच खळखळटाट करणारी. तिला पाहून मी पुन्हा स्वतःला विसरून गेलो.
खरेतर तिच्यासारखी फ्रिली राहणारी मुलगी मी आजपर्यंत पाहिली नव्हती. तिच्याकडे पाहून कुणालाही समजेल ती किती डेरिंगबाज आहे.
मी तिच्याबदल विचार करतच होतो. की ती कालसारखी माझ्याजवळ आली. आणि काहीच न बोलता फक्त हसली.
मग पुन्हा गप्पा सुरु झाल्या. रिक्सच्या बोलण्यामधून जाणवले रिक्स या हॉटेलवर दररोज येते. हाफ डे काम करते आणि दिवसभर बाईक घेऊन मस्त सगळीकडे फिरते. हा तिचा आवडता छंद होता."
कोण आहे ही रिक्स? निशच्या तोंडून वर्तमानकाळामध्ये तिचे नाव का आले असेल? आणि पुढे ही कथा कोणते वळण घेईल? हे सर्व जाणुन घेण्यासाठी तुम्हाला या कथेचा पुढचा भाग वाचावा लागेल.
कथेचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा तुमच्या समिक्षा देऊन. या कथेचा पुढचा भाग मी लवकरच प्रकाशित करेन. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि मला फॉलो नक्की करा.
खुश रहा.. त्याचबरोबर नेहमी वाचत रहा.
धन्यवाद..
