प्रेमाचे दुसरे नाव त्याग
प्रेमाचे दुसरे नाव त्याग
राहुल नेहमी खूप खूश असायचा अगदी आनंदात. त्याच्या आनंदाच कारणही तसंच होतं त्याची मैत्रीण श्वेता . श्वेता व राहुलच एकमेकांवर फार प्रेम होतं. प्रेम, जिव्हाळा, काळजी आणि विश्वास हे जणू काही राहुल ला श्वेता आयुष्यात आल्यानंतरच कळलं होतं. कारण राहूल लहानपणापासूनच एकटा होता शाळेत , कॉलेजमध्ये कोणी मित्र नाही. लहानपणीच आई गेली. वडील कामात व्यस्त असल्याने त्याला प्रेम म्हणजे काय हे श्वेता आयुष्यात आल्यानंतरच कळलं होतं. श्वेता व राहुल ची ओळख एका कॉलेजमध्ये कार्यक्रमा दरम्यान झाली होती. त्या दोघांचे विचार अगदी मिळते जुळते होते. श्वेता ही राहुल ला नेहमी समजून घेत असे. त्या दोघांचे आयुष्य अगदी स्वर्गाहुन सुंदर होते. दोघांनीही सोबत भविष्याची स्वप्न पाहिली होती. भविष्याचे स्वप्न बघत रोज दोघं समुद्रकिनारी बसत. राहूलच्या आयुष्यात एकमेकांची सोबत व प्रेम या शिवाय काहीच नव्हते. सगळं अगदी छान व सुरळीत चालं होत.
पण अचानक श्वेताचे राहुल ला भेटणे बंद झाले ,कॉल्स पण बंद झाले. त्यानी फार प्रयत्न केले तिच्या मैत्रिणींना विचारले पण त्यांना देखील काहीच माहीत नव्हते म्हणून तो तिच्या घरी गेला. तेव्हा त्याला समजले की श्वेताचे लग्न ठरले आहे आणि संपूर्ण कुटुंब त्यासाठी गावी गेले आहे. राहुल मनातून निराश झाला. त्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसला नाही म्हणून तो तिच्या गावी गेला तिकडे गेल्यावर त्याला समजले की श्वेता चा खरेच लग्न झाले आहे. त्या क्षणी तो काहीच न बोलता निघून गेला.तो शरीराने जरी जिवंत असला तरी मनाने मेला होता. त्याचा प्रेम या गोष्टीवरून विश्वास उडून गेला होता. त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारे प्रेम आता त्याच्या दुःखाचा कारण होत म्हणून तो ठरवतो आयुष्यात सगळ करेन पण प्रेम कधीच करणार नाही.हळूहळू दिवस निघून जातात. राहुल आता थोडा थोडा सावरत असतो त्याच्या आयुष्याची गाडी पूर्वपदावर येत असते. पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी श्वेता व तिचं प्रेम हे असतंच आणि प्रेम कधीच करायचं नाही ही भावना देखील.पुन्हा ते दुःख वेदना त्रास नको.
एके दिवशी सकाळी राहुल मॉर्निंग वॉकला बागेत जातो आणि योगायोगाने त्याला तेथे श्वेता दिसते.दोन मिनिटांसाठी त्याला त्याचे आयुष्य थांबल्यासारखे वाटते. पण दुसऱ्याच क्षणी त्याला समजते की आता तिचं लग्न झाल आहे. दोघे एकमेकांना बघतात राहूल सरळ निघून जातो पण श्वेता त्याला अडवते. राहुल म्हणतो आता अडवून काय उपयोग आपल्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत आपण न बोललेलंच बरं, मला पुन्हा वेदना नको आहेत. श्वेता म्हणते वेदना तर मी पण सहन केल्या आहेत कारण प्रेम मीही केलं होतं राहूल विचारतो मग का केलस तू असं. श्वेता सांगते काही गोष्टी आपल्या हातात नसतात परिस्थितीत,भाग्य व नियती यानुसार त्या बदलतात.
आपल्याबद्दल घरी समजल्यावर माझ्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मला काय करावे ते सुचेना आम्ही सर्व कुटुंब तणावात होतो. बाबांनी जर बर व्हाव असं तुला वाटत असेल तर तुला आता आम्ही सांगू त्या मुलाशी लग्न करावं लागेल असं मला आईने सांगितलं. मी मुलगी या कर्तव्यापुढे बंदिस्त होती. मनात नसतानाही मला लग्न करावं. मी आपल्या प्रेमाचा त्याग करून माझ मुलगी असण्याच कर्तव्य पार पाडलं. सगळ्यांचा विरोध करून मी तुझ्याकडे आले ही असते पण त्यात फक्त आपण दोघं सुखी राहिलो असतो बाकीच्यांना दुःख देऊन फक्त आपणच सुखी राहणं हे तर नाही ना शिकवत प्रेम. राहुल म्हणाला अगं पण माझं काय. श्वेता म्हणाली राहुल प्रेम तर आपल नेहमीच आहे एकमेकांवर फक्त आता मी तुझी प्रियसी नाही मैत्रीण आहे प्रश्न फक्त दृष्टिकोनाचा आहे. आपण समजतो ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न झालंच पाहिजे. प्रेम ही खूप पवित्र भावना आहे. त्यासाठी लग्नाच्या बंधनात अडकण्याची गरज नाही जसे राधाकृष्णाचे प्रेम होतं मैत्रीपूर्ण ,निर्मळ ,पवित्र तसंच.आपलं प्रेम हेच त्यागाचे प्रतिक आहे.
आपण आपल्या प्रेमाचा त्याग केला पण त्यातून खूप लोकांना आनंदी केले आणि आता तू पण आयुष्यात पुढे जा. प्रेम हे खूप सुंदर आहे. फक्त ते एकदा मिळाला नाही म्हणून प्रेम करणे सोडायचा नाही आणि मी तर आहेच ना तुझ्यासोबत तुझी एक चांगली मैत्रीण म्हणून नेहमी. तुझ्यासाठी एक चांगली मुलगी शोधू आपण. राहुल दोन मिनिट थांबला त्याचे डोळे पाणावले व श्वेताला म्हणाला किती सुंदर समजून सांगितलं तू मला सगळं जसं पहिला सांगायचीस. बरं झालं आज आपली इथे भेट झाली.
माझे सगळे गैरसमज दूर झाले पण माझी एक अट आहे. आता लग्नासाठी जी मुलगी शोधू ती पण अगदी तुझ्यासारखी समजून सांगणारी हवी. श्वेताने लगेच होकार दिला. मग दोघेही पार्कमधून गप्पा मारत आपल्या घरी गेली.पण प्रेम म्हणजे त्याग व निःस्वार्थी पणा ही एक नवीन परिभाषा समजावून गेले.

