STORYMIRROR

Sachin Mule

Drama

3  

Sachin Mule

Drama

प्रेम अस ही

प्रेम अस ही

4 mins
261

ती आज घरीच होती , कारण गेले पंधरा दिवस महाविद्यालयात वार्षिक कार्यक्रम चालू होते. ते आज संपले म्हणुन ती पुढचे काही दिवस घरीच आराम करणार होती. दुपार पर्यंत तिने आराम केला व फ्रेश झाली घरच्यांशी गप्पा मारून ती परत तिच्या खोलीत आली अस्ताव्यस्त खोली तिने किती तरी दिवस झाले साफ केली नव्हती. ती पुर्ण साफ केली आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. तस तीच एकत्रित कुटुंब असल्याने सर्व एकत्र जेवले व सर्व आपल्या खोलीत निघून गेले तस तीही तिच्या खोलीत आली. दिवस भर तिने भरपूर आराम केल्याने तिला झोप काही येत नव्हती म्हणुन तिने मोबाईल वर फेसबुक ओपन केल ती जास्त सोशल मीडिया वापरत नाही पण मित्र मैत्रिणी खातर तिने ते फेसबुक उघडले होत. थोड्या फार नोटिफिकेशन पाहून ती एका अकाऊंट वर येऊन थांबली. तिला अकाऊंट जरा सर्वांन पेक्षा वेगळ वाटल तसा त्यावर कोणाचा फोटो नव्हता पण त्यावर केलेल्या पोस्ट तिला यूनिक्स वाटल्या काही कविता चारोळ्या पण खुप जनानी त्यावर like comment केलेल्या होत्या तिने request पाठवली वाचता वाचता तिला केव्हा झोप लागली कळलेच नाही. 


सकाळी तिला जाग आली तेव्हा request अजून ही स्वीकारली गेली नव्हती तिने फेसबुक बंद करून पुढच्या कामाला लागली. दुपारी सर्व आटपून खोलीत आली तिने पुन्हा मुद्दाम फेसबुक ओपन केल कारण तिला त्या चारोळ्या आणि कविता खुप आवडल्या होत्या तिने पहिल या वेळी त्याने request स्वीकारली होती. तिने त्याला लगेच मेसेज केला thanks तिकडून काहीच उत्तर आले नाही कारण request स्वीकारणारा /स्वीकारणारी व्यक्ती ऑनलाईन नव्हते. त्यांनी काही नवीन कविता पोस्ट केल्या होत्या त्या तिने वाचल्या तिला खुपच आवडल्या तिने like करून प्रतिक्रिया पण दिली असेच एक दोन दिवस निघून गेले मेसेज च उत्तर नाही आल. अशीच ती एका दुपारी ऑनलाइन होती तिला मेसेज आला oh your most welcome तो त्या व्यक्तीचा मेसेज होता. तिथुन त्यांच बोलणे चालू झाले.


ती = तु खुप छान चारोळ्या, कविता पोस्ट करतोस तुझ्याच की..? 


तो = धन्यवाद, हो मीच लिहतो.. 


ती = तुला राग तर नाही आला ना..? 


तो = नाही ग तुला अस वाटणे साहजिक आजकाल कॉपी पेस्ट चा जमाना आहे. हा पण जे मी पोस्ट केल आहे ते मी स्वतः लिहले आहे.


ती = व्वा म्हणजे मी एका लेखक, कविशी बोलत आहे ..?


तो = अगदी तस काही नाही पण विरंगुळा म्हणुन मनातले भाव कागदावर उतरवत असतो..


ती = खुपच ग्रेट आहेस तु छान खुप छान लिहतो. 


(कोणत्याही मुलीकडून त्याची अशी प्रशंसा झालेली पहिली वेळ तो मनोमन खुप आनंदी झाला त्याला तीच बोलणे आवडू लागले आणि तिलाही. असेच दिवस जात होते. आता त्यांची खुपच छान मैत्री झाली होती पण तिने त्याला अजुनही पाहिले नव्हते कारण त्याचा फोटो अजून त्यान प्रोफाईला लावला नव्हता.)


ती = मला तुला पहायचे आहे तुझा फोटो पाठवशील..? 

काही वेळ तो काहीच बोलला नाही थोड्या वेळाने एक मेसेज आला 


तो = हा घे माझा फोटो. 


एक पासपोर्ट साईज फोटो होता दिसायला सादा काळा सावळा मुलगा नाकी डोळी छानचं. त्यावर ती काहीच बोलली नाही असेच काही दिवस गेले तो मेसेज करत होता काही उत्तर नाही त्याच्या मनात तिच्या विषय वेगळीच भावना निर्माण झाली पण तो तो स्वीकारता नव्हता कारण दिसायला ती एकाद्या परी पेक्षाही सुंदर होती तोच काय तर कोणीही तिला बघताच तिच्या प्रेमात पडेल पण दोघांचा स्वभाव विरुद्ध ती फार बोलकी हा अबोल अश्याच विचारात असताना तिचा मेसेज आला 


ती = hi कसा आहेस sorry त्या दिवशी न बोलता मी ऑफलाइन गेले बर आपण भेटायच का. ?

थोडा वेळ शांतता 


तो = हो पण कधी कुठे..? 


ती = उद्या काही कामा निमित्त मी तुमच्या शहरात येत आहे भेटू आपण दुपारी माझ काम संपेल दुपार नंतर आपण भेटू शकतो. 


तो = ठीक आहे मी तुला भेटण्याच्या जागे बद्दल माहिती पाठवतो. 


ती =ठीक आहे चल मंग भेटू आपन उद्या 

त्याने 


तो = हो नक्किच. 


(त्याने तिला भेटण्याची जागा पत्ता पटवला होता भेटण्याच्या जागेवर तो तिच्या अगोदर जाऊन वाट बघत होता काही वेळाने ती आली तिला त्याने बसल्या जागेवरून हात दाखवला व त्याच्या कडे येण्याचा इशारा केला.) 


ती = कसा आहेस आपली ही सामोरा समोर पाहिलीच भेट 


तो = होना मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की तुझ्या सारखी सुंदर मुलगी कधी मला भेटायला बोलवेल..? 


(इकडच्या तिकडच्या खुप गप्पा झाल्या नंतर) 


ती = चल निघते मी ( तिला वाटले तो तिला सोडायला येईल स्टेशन पर्यन्त पण तो जाग्या वरुण उठला सुधा नाही) 


तो = हो खुप छान वाटल तुला भेटून हा दिवस मी कधीच विसरणार नाही. 


(ती थोडी हसली आणि निघून गेली ती आटो ची वाट पाहत असताना तो मागून आला आणि त्याला ती पाहता आचार्यांनी त्याच्याकडे पाहत होतो कारण तो चालत नाही तर एका व्हीलचेयर होता आता तिला लक्षात यायला लागले पासपोर्ट फोटो का पटवला मी आले तेव्हा माझ्या कडे न येता मला बोलावले मी जात असताना मी तुला सोडू का असे विचारले सुद्धा नाही या सर्व घटनांचा तिला खुप राग आला होता पण आता तिचे डोळे त्याला पाहून पाणावले होते तिला पाहता तो जरा बावचळून गेला व चेर वरुण तोल गेला ती त्याला सावरायला पुढे आली आणि त्याला सावरून घेतल. )


मनाने मनाला हेरलं

प्रेम असत अस ही 

माझा तू झालास 

असलास तू कसा ही 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama