प्रवास परभणी ते पंढरपूर,सांगोला
प्रवास परभणी ते पंढरपूर,सांगोला
तस बघायला गेल तर प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यातील महाकठीण पर्वच म्हणाव लागेल. कारण मी 80% दिव्यांग आहे आणि इतरांच्या मदतीशिवाय इतका लांबचा प्रवास मी कधी विचार ही केला नव्हता. पण मनात इच्छा खुप होती आणि ती इच्छा पांडुरंगानेच पूर्ण केली असे म्हणावे लागेल. झाले असे की
लय भारी साहित्य समूहाचे सर्वेसर्वा कविवर्य अनिल भाऊ केंगार यांनी पंढरपूर सांगोला येथे पहिलेवहिले राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित केले माझ्या परिस्थिती मुळे मला जाणे शक्यच नव्हते. म्हणून मी काही नाव नोंदणी केली नाही पण अनिल भाऊ ने माझे नाव स्वतः यादीत नमूद केलं मला याची काहीही कल्पना नव्हती. आमचे परममित्र कवी रामकिशन डोळस यांनी मला कॉल केला व म्हणले तुम्ही सांगोल्याला येत आहात का मी संभ्रमात पडलो कारण त्यांना माझी परिस्थिती चांगलीच माहिती होती तरीही ते विचारत होते मी नाही म्हणलं मग ते म्हणले की तुमचं नाव तर यादीत आहे मी म्हणलं कोणत्या समूहात त्यांनी मला समूहाची लिंक दिली मी जॉईन झालो खरंच तिथे माझं नाव होतं मी अनिल भाऊला म्हणलं भाऊ माझं काही शक्य नाही त्यामुळे माझं नाव काढून टाकावे अनिल भाऊ म्हणले राहूद्या मीही म्हणलं नाव तर आहे राहू द्या तर राहू द्या.
मंग आमचे परममित्र कवी ,लेखक, गीतकार, गायक अभिनेता, मा विशाल पाटील वेरुळकर यांचा मला कॉल आला आपल्याला सांगोला येथे काव्य संमेलनासाठी जायचं आहे खरं सांगायचं तर माझ्या या परिस्थितीमुळे कोणी कुठे घेऊन जाईल हा विचार कधी केलाच नाही. मला नेहमी सकरात्मक विचार करायची सवय असल्याने मी पण त्यांना हो म्हणल तुम्ही नेत असाल तर मी कुठे पण यायला तयार आहे पण मी माझ्या परिस्थितीची त्यांना पूर्णपणे अधिक खोलवर माहिती दिली ते म्हणले काही काळजी करू नका मी आहे ना हे शब्द जगातील सर्वात शक्तिशाली शब्द आहेत या शब्दाने खुप आधार वाटतो. माझ्या आयुष्यात खूप वेळा अस झालेल आहे. माझे मित्र म्हणा नातेवाईक म्हणा नेहमी म्हणायचे की तुला इकडे नेतो तिकडे नेतो तेव्हा खुप आनंद व्हायचा चला आपल्याला पण फिरायला मिळणार मग हळू हळू कळायला लागल हे केवळ बोलण्यासाठी बोलतात ज्याच्या त्याच्या काही ना काही अडचणी असतात असो. म्हणून आता जर मला कोणी अस म्हणल की मी ठीक आहे म्हणतो पण अपेक्षा ठेवत नाही या वेळी ही मी तेच केल मला काहीच अपेक्षा नव्हती. या गोष्टीवर खुप चर्चा ही झाली आमची तरी ही माझ मन शाश्वत नव्हतं म्हणून मी माझ्या घरी काहीच नाही सांगितल फक्त याची कल्पना माझ्या आईला होती. बाकीच्या सांगितल असत तर त्यांनी मला प्रवासात काय काय अडचणी येतील हे सांगून सांगून बेजार केल असत. त्यामुळे मी कुठे बाहेर जायच असेल तर घरी सांगत नाही. आणि यात मला माझा बालपणीचा मित्र राधाकिसन नेहमी सोबत करतो या ही प्रवासात त्याची मला बरीच मदत झाली. विशाल भाऊंनी मला सांगितले आपल्याला 20/05/2022 रात्री शुक्रवार तारखेला परभणी हून पंढरपूरला जायच आहे व ते त्यानुसार अकोला ते परभणी या गाडीने निघाले पण ती गाडी परभणीत 08:00 वाजता येणार होती व परभणी ते पंढरपूर गाडी 07:00 वाजता निघणार होती या दरम्यान आम्ही कॉल वर सारख बोलत होतो एक प्रकारे माझा खरा प्रवास अकोल्यातून सुरू झाला होता. मी ऑनलाईन गाडीची माहिती घेतच होतो व त्यांना पण सांगताच होतो. आणि हो विशाल भाऊ सोबत अजुन दोन जिवाला जीव देणारे म्हणजे दिलीप भाऊ काळे व नितेश खारोले हे पण मला परभणीला घ्यायला येत होते. गाडी जाणार हे माहिती असूनही मी स्टेशनला माझ्या मित्रासोबत घरून रात्री 06:30 ला ऑटो रिक्षा ने गेलो व व्हायचं ते झालं गाडीही निघून गेली आठ वाजता विशाल भाऊ दिलीप भाऊ नितेश त्यांची पहिली वहिली भेट झाली त्यांना भेटून माझा आनंद गगनात मावत नव्हता कारण ते फक्त माझ्यासाठी इतपर्यंत आले होते. हे मला अजून ही एक स्वप्नच वाटत होते. पण हे खरं होतं. पण गाडी तर निघून गेली होती मग विशाल भाऊ ने बस स्टँड व रेल्वे स्टेशन विचारपूस केली असता माहिती मिळाली की दुसर्या दिवशी म्हणजे 21/05/2022 तारखेला रात्री 07:00 शिवाय कोणतीही गाडी नाही. म्हणून त्यांना केवळ माझ्यासाठी परभणीत मुक्काम करावा लागला याचे मला खुप वाईट वाटले. आमच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना लॉज वर थांबावे लागले आजची रात्र व उद्याचा दिवस त्यांना परभणीत घालवायचा होता व मी त्यांच्या सोबत फक्त कॉल वर बोलण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. पण त्यांनी मला समजून घेतल. सध्या आम्ही जिथे राहतो तिथे मी त्यांना आमंत्रित केले माझा व माझ्या आईचा खुप आग्रह करून त्यांनी जेवण केल नाही कारण ते बाहेरुन जेवून आले होते.
घरी आल्यावर चहा पाणी झाले घरच्यांन सोबत गप्पा झाल्या व आम्ही या वेळी एक तास अगोदर घरून निघालो कारण ही गाडी गेली असती तर आम्हाला सम्मेलनात जाण्याचे स्वप्न, स्वप्नच राहिले असते. मी माझ्या मित्राला म्हणजे राधाकिसनला बरोबर 05:30 वाजता कॉल केला व सांगितल आपल्या स्टेशन जायच आहे त्याला पूर्व कल्पना होती त्यामुळे तो बरोबर वेळेत आला मग आम्ही चार जण म्हणजे मी विशाल भाऊ, दिलीप भाऊ, नितेश घरच्यांचा निरोप घेऊन स्टेशनकडे निघालो. त्यापूर्वी आम्हाला या तिघांच लॉज वरून सामान घ्यायच होतं. ते घेण्यासाठी आम्ही अगोदर ते ज्या लॉज वर थांबले होते तिथेच माझे वडील मॅनेजर आहेत तिथून चेक आउट करून निघालो व आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आम्ही बरोबर साडेसहाला प्लॅटफॉर्म तीन वर पोहोचलो गाडी यायला अजून एक तास बाकी होता साडेसात गाडी येणार होती रोज सातला येणारी गाडी आज अर्धा तास उशिराने येत होती आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो समूहातील बरेच कॉल होते गाडी सापडली का नाही कुठे आहात तुम्ही विचारणार होतं होती. त्यात माझी खूप काळजी करणार्या सुषमा ताईचा कॉल आला व मला म्हणली भेटली का गाडी मी म्हणलं अजून वेळ आहे तिलाही माहिती होत मी असा इतका लांबचा प्रवास प्रथमच करत आहे त्यामुळे काळजी घे अस सांगितल व आमच्यात जे जेष्ठ होते म्हणजे आमचे लाडके खेळकर अन खोडकर स्वभावाचे दिलीप भाऊ यांना कॉल द्यायला सांगितला ताईच व त्यांच बोलण बराच वेळ चालू होत बहुतेक आम्हाला सांभाळून न्या अस काही सांगत असेल तेवढ्यात समोरून गाडी आली कॉल कट करुन मग आम्ही ट्रेन मध्ये चढलो ट्रेन मध्ये बसे पर्यंत माझा मित्र राधाकिसन सोबतच होता. ट्रेन मध्ये बसवून तो निघून गेला काही वेळाने ट्रेन हलते न हलते घरून आईचा कॉल आला गाडी भेटली का जागा आहे का अशी काही प्रश्नांची उत्तरे देऊन मी फोन ठेवला नंतर साहित्यिक समुहातील आणखी एका ताईचा म्हणजे निखिताताई डाखोरे यांचा त्यांनी ही खुप आपुलकीने विचारपूस केली मला या साहित्य क्षेत्रात माझ्यावर खुप व मनापासून प्रेम करणारी माणसं दिली आहेत ही अशीच माझ्यावर नितांत प्रेम करत राहो हीच इच्छा देवा पांडुरंगा या सर्वांना नेहमी सुखी ठेव या तुझ्या भाबड्या भक्ताची ही एकच इच्छा आहे.
रात्रीचा प्रवास गाडीच बरीच गर्दी ह्या हे तिघे जण सोडले तर सर्वच अनोळखी चेहरे होते. तस ही प्रत्येक प्रवासाची सुरुवातीला काही जण अनोळखी असतात मग हळू हळू ओळख होते तसच याही प्रवासात झाल प्रवास सुरू झाला होता कॉल्स ही येण बंद झाले. अनिल भाऊ चे कॉल्स विशाल भाऊ ला येतच होते व आम्हा सर्वांची ते विचारपूस करत होते ह्या सेव गडबडीत 10 वाजून गेले असतिल पोट काही तरी खायला मागत होत मी माझा डब्बा आणला होता आई यांच्यासाठी पण देणार होती पण हे तिघे म्हणले त्रास करून घेऊ नका आम्ही जेवण करून आलो आहोत त्यामुळे सचिन भाऊचा डब्बा सोबत द्या. मला भूक लागली होती म्हणून मी नीतेश ला डब्बा काढायला सांगितला त्याने माझ्या समोर डब्बा ठेवला मी माझ्या हाताने खाणारच होतो की विशाल भाऊ ने डब्बा घेतला व म्हणले बघू काय दिल आईने डब्यात व त्यांनी घास मोडून मला भरवला मला इतक भरून आलं ते मी शब्दांत व्यक्त नाही करू शकत पुढे मला त्यांनी एक ही खास माझ्या हाताने खाऊ दिला नाही मी म्हणलं तुम्ही माझी सवय मोडत आहात. ते हसले जेवण झाल्यावर थोडा चिवडा चुरमुरे सोबत होते ते आम्ही सर्वांना व आजुबाजुला काही जण होते मिळून मिसळून खाल्ले. आणि मध्ये मध्ये विशाल भाऊ चाय वाले... जे म्हणत होते त्याने तरी हसू येत होतं पोट दुखायची वेळ आली होती. पूर्ण प्रवासात आम्हाला झोप लागलीच नाही सकाळी तीन ला थोडी डुलकी लागली पण चारला जाग परत आली कारण साडे चार गाडी पोहोचणार आहे पण एक तास गाडी लेट चालत असल्यामुळे गाडी साडेपाच वाजता पंढरपूर रेल्वे स्टेशनवर पोचली तिथेच पोहोचल्यानंतर आम्ही स्टेशनवर ब्रश करून फ्रेश झालो व सांगोल्याला जाण्यासाठी बसस्थानकाकडे निघालो तिथं आम्हाला लगेच सांगोला बस लागली एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही सांगोला येथे पोहोचलो तिथे पोहोचल्यावर विशाल भाऊ ने अनिल भाऊला कॉल केला आम्ही गुळाचा चहा भेटतो त्या हॉटेलवर आहोत असे सांगितले अनिल भाऊ येईपर्यंत आम्ही दोन दोन कप चहा घेतला थोडे बिस्किट खाल्ले अनिल भाऊ सोबत कवी प्रमोद सूर्यवंशी आले होते त्यांना मी म्हणलं काय प्रमोद सर ओळखलं की नाही ते जरा संभ्रमात पडले ओळखलं नाही ओळखलं विशाल भाऊ आणि मी कॉल करून कोणाचे ना कोणाचे फिरकी घेत असतो त्यामुळे प्रमोद सरांची ही एकदा व फिरकी घेतली होती त्यांना ती आठवण करून दिली. या तेंव्हा ते जरासे हसले अनिल भाऊ ने व प्रमोद सरांनी व त्यांच्या सोबत आम्हाला न्यायला एक कार आली होती त्या कारच्या चालकांनी आमच्या सोबत एक एक चहा घेतली व आम्ही अंघोळ व बाकीचे सोपस्कार करण्यासाठी जिथे अनिल भाऊ ने आमची सोय केली होती तिथे निघालो तिथे गेल्यावर कळले की जिथे आम्हाला थांबायच आहे ती रूम तिसर्या मजल्यावर आहे आणि मला उचलून घेऊन जाण म्हणजे खुपच अवघड काम आहे. तरी ही विशाल भाऊ ने मला पाकोळीवर बसवून वर पर्यंत नेले. धन्य आहात विशाल भाऊ तुम्ही. वर गेल्यावर आणखी भरपूर कवी तिथे फ्रेश होत होते जवळजवळ त्या सर्वांची तयारी झाली होती तिथे गेल्यावर कवी रामकिशन डोळस यांची प्रत्यक्षात भेट झाली. एकमेकांना भेटून खूप आनंद झाला व काही सामान घेऊन त्यांना पुढे जायचं होतं म्हणून ते निघून गेले मला हाताने अंघोळ करता येत नसल्यामुळे नितीश ने मला अंघोळ घातली परत विशाल भाऊ ने मला खाली आणण्यासाठी पाटकुळी उचलून घेतलं love you vishal bhau बाकी सर्व आवरून आम्ही सर्व संमेलन सभागृहाकडे निघालो परत त्याच कार ने तिथे पोहोचल्यावर चहा नाश्ता झाला चहा नाष्टा ची उत्तम सोय केलेली होती मग आम्ही जिथे कविता सादरीकरण होणार होतं तिथे जाऊन बसलो तिथे गेल्या गेल्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आऊसाहेब म्हणजे रंजनाताई मांगले आम्ही सर्व त्यांना आऊसाहेब म्हणतो कारण आमच्या सर्वांवर आईप्रमाणेच प्रेम करतात माझ्या मागून येऊन त्या मला म्हणाल्या काय सचिन ओळखलं की नाही.
जरी आमची प्रत्येक पहिली भेट असली तरीही मी त्यांना ओळखलं थोडासा बोलून झाल्यावर त्या म्हणल्या आपण नंतर भेटू संमेलन संपल्यावर मी पण हो म्हणलो. थोड्याच वेळात जरा लांब बसलेल्या विशाल भाऊ चा मला कॉल आला आणि त्यांच्या नंबर वरून हसत खेळत व्यक्तिमत्व सुनीताताई कपाळे त्यांचा आवाज ऐकू आला आजूबाजूला गर्दी असल्याने आवाज बरोबर येत नव्हता तुमचं बोलणं झाल्यावर कॉल ठेवून दिला त्याच दरम्यान आईचा कॉल ही येऊन गेला. परत एकदा सुषमाताई चा कॉल आला पोचलात का व्यवस्थित नाश्ता झाला का ताईला खूपच काळजी भावाची मी म्हणलं काही काळजी करू नको तिथे आहे काळजी घेण्याचा पण ताई ती ताईच असते ऐकते का. याच दरम्यान अनिल भाऊंनी काही कवींची व माझी ओळख करून दिली त्यातील एक कवी मा. डॉ लक्ष्मन शंकर हेबाडे, मंगळवेढा सरांनी मी नको नको म्हणत असतानाही पाचशे रुपयाची नोट माझ्या हाती दिली व म्हणले हे तुम्हाला बक्षीस आहे त्याच्या आदरास मान देऊन मी ते मान्य केले. पण ते पैसे मी तसेच जपून ठेवणार आहे कधीच खर्च नाही करणार असो मी जिथे बसलो होतो तिथे मला जरा अवघडल्यासारखं वाटत त्यामुळे मी नितेश ला म्हणलं जरा दुसरीकडे बसुया माझी व्हीलचेअर सोबत असल्यामुळे इकडे तिकडे जाण्यास जरा मदत होत होती आणि दुसरी कडे जात असताना अनिल भाऊ आम्हाला भेटले व म्हणाले कुठे राहात आहात मी त्यांना सांगितलं मला जरा तिकडे अवघडल्यासारखं वाटत आहे म्हणून दुसरीकडे बसत आहोत म्हणून त्यांनी सुचवलं कविता सादरीकरण करण्यासाठी तुम्हाला व्यासपीठावर यावच लागेल त्यामुळे तुम्ही आत्ताच तिथे जाऊन बसा मला जरा वेगळंच वाटलं कारण तिथे इतके मान्यवर असताना माझं तिथे असण योग्य वाटेल का अनिल भाऊ म्हणजे बाजूला मी म्हटलं ठीक आहे पण त्यांनी विशाल भाऊनी आणखी दोन असे चार जणांनी मिळून मला व्यासपीठावर मान्यवरांच्या सोबत बसवलं. तिथे ही मला खुप अवघडल्यासारखं होत होत कारण इतके दिग्गज व्यक्ती तिथे होते आणि त्यात माझी एका सोबत पण ओळख नव्हती. थोड्या वेळाने विशाल भाऊ पण व्यासपीठावर विराजमान झाले तेंव्हा थोड बर वाटल. कार्यक्रम सुरू होण्यास जरा उशीरच झाला होता. पण अस होतच असत एक एकाचे सत्कार होत होते त्यातच अचानकपणे माझ नाव घेतलं.
माझ्यासाठी हा अनपेक्षितपणे आश्चर्याचा आनंददायी धक्का होता कारण मी अजून इतका मोठा कवि, लेखक झालो नाही. मी तिथे एकदम स्तब्ध झालो मला काही कळतच नव्हतं मी काय बोलू सत्कार होत असताना माझ्यासाठी सर्व सभागृहात टाळ्यांचा कडकडाट व सगळे जण उभे राहिले होते त्यांच प्रेम आदर पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी खुपच भारावून गेलो होतो हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आहे. हे सर्व विशाल भाऊ ,अनिल भाऊ लय भारी साहित्यिक समूहाला ज्यांनी आणि मला या योग्य समजलं. आणि मला याची काहीच पूर्व कल्पना नव्हती मला नंतर कळल की अनिल भाऊ व विशाल भाऊ यांनी आधीच ठरवले होते. आणि मला याची जरा ही कल्पना नव्हती. मला या साहित्यक्षेत्रात जीवाला जीव लावणारी माणसं भेटली मी त्या देवाचा खुप खुप आभारी आहे त्याच्या चरणी एकच प्रार्थना माझ्या सर्व माणसांना सुखी ठेव. सुनिता ताईच्या बहारदार सुमधुर आवाजात स्वागत गीताने संमेलनाची सुरुवात झाली सर्वांनी उत्तम उत्तम कविता सादर केल्या प्रत्येक कवितेत मार्मिक संदेश होताच तसंच राष्ट्रा प्रति देशाप्रती काहीतरी करून दाखवण्याची इच्छा मनी बाळगत होते काहींनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची ध्येय कविता सादर केल्या तर काहीजण आई वडील बहिण भाऊ यांच्यावर हि कविता सादर केली त्यातले त्यात आमचे स्नेही कवि माणिक लबडे यांनी मुकी बायको ही हास्य कविता सादर केली सुनिताताई कपाळे यांनी पण सुंदर कविता सादर केली सर्वांच्या कविता ऐकून मन भारावून गेले माझी वेळ आली या संमेलनासाठी विशेष कविता तयार केली होती कवितेचे शीर्षक होतं "कवितेने तुला काय दिले" ती कविता मी खाली देत आहे.
शीर्षक :- कवितेने तुला काय दिलं
बरेच जण विचारतात मला
या कवितेने तुला काय दिलं
कस सांगू या कवितेने माझ
आयुष्य पुन्हा नव्याने घडवलं
कवितेने मला दिला जीवन
जगण्याचा एक नवा मार्ग
अनुभवतोय धरतीवरचा
एकमेव आनंददायी स्वर्ग.
याही परिस्थितीत तिने
जगा समोर उभ केलं
हा टाळ्यांचा कडकडाट
अन किती कौतुक झालं
कवितेने मला नेहमी दिले
सकारात्मक असे विचार
किती संकटे, अडथळे आली
तरी सारी स्वप्न होणार साकार
जिवलग असा कित्येक
नात्याचा मिळाला गोतावळा
साहित्य क्षेत्रातील उत्तरोत्तर
फुलतच आहे प्रेमाचा मळा
याच कवितेने मला दिलेत
विशाल हृदयाचे खास मित्र
प्रेमळ अन आपुलकीचे गोत्र
न संपणारे आनंदाचे हे सत्र
माझ्या कविते नंतर एक दोन कविता झाल्या व पहिले सत्र संपले व ते खुप उत्तम प्रकारे पार पडले. सर्वांनी फक्त अल्प आहार केला असल्याने सर्वांना भुका लागल्या होत्या त्यामुळे जेवणाच्या हॉल कडे सर्वजण गेले विशाल भाऊ आणि नितेशने मला एका रूम मध्ये घेऊन गेले तिथे जेवण घेऊन आले सोबतच आऊ पण आल्या आऊ म्हणजे रंजनाताई मांगले मी माझ्या हाताने जेवतो म्हणत असताना ही त्यांनी मला पूर्ण जेवण आईच्या मायेने खाऊ घातले त्यांच्या हातून जेवण करू मी धन्य झालो.
माझ जेवण आटपून आम्ही सर्व परत दुसर्या सत्रासाठी सभागृहात गेलो दुसर्या सत्राचे सूत्रसंचालन मला ज्यांनी साहित्यिक क्षेत्रात आणल माझे साहित्यिक गुरू मा. ऍड शंकर कदम सर व त्यांच्या मिसेस म्हणजे उज्ज्वलाताई करत होत्या दुसर्या सत्रात ही दर्जेदार कवितांचा आस्वाद घ्यायला मिळाला. दिलीप भाऊंनी वावर या बद्दल माहिती देणारी कविता सादर केली व विशाल भाऊ ने होतो मरणाचा त्रास नीतेश ने कविता रडत होती अश्या हृदयस्पर्शी कवितेचे सादरीकरण केले. तसेच मा शंकर कदम सर मॅडम कवि ज्ञानेश्वर नखाते, कमलाकर डुबे, आमचे आदरणीय लटपटे सर या सर्वांच्या दर्जेदार कवितांचा आस्वाद घ्यायला मिळाला. काही मान्यवरांची नावे मला आठवत नाहीत पण त्यांच्या ही कविता हृदयस्पर्शी होत्या. कुणाचे नाव चुकून राहिले असेल क्षमा असावी. विशेष म्हणजे इतके दिवस फक्त व्हाट्सअप वर ओळख असलेल्या उत्कृष्ट कवयित्री मा. वीणाताई व्होरा या स्वतःहून माझ्याशी बोलायला आल्या प्रथम मी त्यांना ओळखल नाही. ताईचा स्वभाव खूप मनमिळावू आहे. नंतर कवि अविनाश शिंदे, कवि राजेंद्र नागुलवार यांची ही भेट झाली. एक अविस्मरणीय असे काव्यसम्मेलन आनंदाने पार पडले.
आम्हाला निघायला उशीर झाल्या मुळे आजचा मुक्काम ही निश्चित होता त्यामुळे अनिल भाऊ ने आम्हाला तिथे सकाळी राहायला रुम दिली होती त्याच रूम वर आम्ही मुक्काम करणार होतो आमच्याबरोबर सुनीताताई कपाळे व आऊ या पण आमच्या सोबत मुक्कामाला थांबणार होत्या अनिल भाऊजी काही काम बाकी होते म्हणून ते नंतर येणार होते त्यामुळे आम्ही पुढे जाऊन फ्रेश हो झालो थोडे पोटात कावळे ओरडत होते म्हणून सोबत आणलेला फराळ करत बसलो आऊंना मी आणलेला मुरमुर्याचा चिवडा खूप आवडला त्या म्हणाल्या मी आता हे घरी घेऊन जाणार आहे मी म्हणलं घेऊन जा. त्यानंतर थकल्यामुळे मला थोडी गुंगी आली पण सुनिताताई आऊ कवितांची मैफिल करत होत्या तो चान्स मी मिस केला काही वेळानंतर जेवणासाठी अनिल भाऊ विशाल भाऊंनी पार्सलमध्ये भाजी आणली होती व सगळ्यांनी मिळून हसत खेळत जेवण केले नंतर गप्पा गोष्टी करत करत कधी झोप लागली ते कळलेच नाही.
दुसर्या दिवशी म्हणजे 23 तारीख सकाळचे सर्व काम आटपून पुढचे नियोजन काय असे चालत असताना अनिल भाऊ म्हणले आज तुम्हा सर्वांना आमच्या घरी जेवायला यायचे आहे. व पुढची व्यवस्था करण्यासाठी ते निघून गेले तेव्हड्यात सुषमाताईचा कॉल आला त्यांना ही सांगितले सर्व जण अनिल भाऊकडे जेवणासाठी जाणार आहोत काही वेळा नंतर आम्ही सर्व ऑटो रिक्षा ने अनिल भाऊ कडे जेवणासाठी निघणार होतो तितक्यात तिथे आमच्या भेटीसाठी मा. सौ धनश्री ताई वलेकर व त्यांचे वडील आले होते थोड्या फार गप्पा मारून त्यांचा निरोप घेऊन निघालो अनिल भाऊच्या घरी पोहोचलो तेंव्हा घरच्यांशी भेटून बोलून असे वाटलेच नाही की आपण अनोळखी घरात आलो हि सगळी आपलीच माणसं आहे इतका प्रेम जिव्हाळा अनिल भाऊच्या घरी भेटला ही गोष्ट सांगावीशी वाटते अनिल भाऊ खूपच नशीबवान आहे कारण वहिनीच्या हाताला खरोखरच खूप चव आहे. अनिल भाऊ रोज इतके लज्जतदार जेवण करतात आम्ही सर्व जण त्यांच्या हातचे जेवण करून तृप्त झालो. जेवण झाल्यावर निघण्यासाठी पाय निघत नव्हता जड अंतःकरणाने निरोप घेऊन पुढच्या प्रवासासाठी आम्ही पंढरपूर कडे निघालो खुप आग्रह केल्याने अनिल भाऊ पण आमच्या सोबत आले पंढरपूरला पोहचलो तेंव्हा दुपारचे तीन वाजले होते. मग दुपारच्या तीन वाजल्यापासून तिथल्या शेगाव निवासस्थान येते एक खोलीसाठी बारी लावली तीन तासानी आम्हाला एक खोली मिळाली. त्यात आम्ही आमच समान ठेवून थोड फ्रेश होऊन. चंद्रभागेच्या दर्शनासाठी गेलो पायर्या खूप असल्या कारणाने मी वरच थांबण्याचा निर्णय घेतला सोबतीला प्रमोद सर पण थांबले होते. काही वेळानी सर्व आले व सोबत चंद्रभागेच पाणी घेऊन आले. अनपेक्षितपणे त्या पाण्यानी सर्वानी माझे ओले केले मी नको नको म्हणत होती तर म्हणले की ही प्रथा आहे इथे आल्यावर पाय ओले करावेच लागतात खरच यांच्याशी गेल्या जन्माचे ऋणानुबंध नक्कीच आहेत इतक प्रेम करणारी माणसं कुठे भेटतात. त्याच रात्री आऊला मुंबईला जाणे गरजेच होत म्हणुन त्या जायला निघाल्या सर्वांचे डोळे पाणावले, दोन दिवसात आमच्या सर्वांचे कधी न तुटणारे घट्ट बंध जुळले. अनिल भाऊकडे जेवण केल्या मुळे व आऊला निरोप दिल्याने काही खाण्याची इच्छा उरली नाही. मग काही गप्पा मारत तसेच झोपी गेलो.
दिनांक 24/05/2022 मंगळवार सकाळी सगळे आवरून आम्ही सर्व नास्ता करण्यासाठी निवासस्थानी नाश्त्याची व जेवणाची सोय उत्तम सोय केली होती तिथे गेलो तिथे सुनिता ताई ने आईच्या मायेने घास भरवले नास्ता करून आल्यावर सर्व पांडुरंग दर्शनासाठी गेलो तिथे मला व्हीआयपी पास मिळाली त्यामुळे मी अनिल भाऊ, व नीतेश एका वेगळ्या दरवाज्याने दर्शनासाठी गेली अनिल भाऊ व नीतेश तुमच्या दोघांन मुळे अशक्य वाटणारे पांडुरंगाचे दर्शन मला घडले मी तुमचा अजन्म ऋणी आहे तुमच्या व विशाल भाऊ, दिलीप भाऊ, सुनिता ताई हे पंढरपूर दर्शनाच्या बरी मध्ये लागले आमचे दर्शक अर्ध्या तासात झाले पण यांना तीन, साडेतीन तास लागले. त्यांना बराच वेळ लागणार असल्यामुळे मी अनिल भाऊ, नितेश रूम वर आलो त्यानंतर विशाल भाऊ, दिलीप भाऊ, सुनिता ताई पंढरपूर येथे वीणाताई व्होरा यांच्या भेटीसाठी गेले. काही वेळा नंतर अनिल भाऊला कामावर जायच होत त्यामुळे निघून गेले पण जाताना त्यांचा ही कंठ दाटून आला होता. थोड्या वेळाने विशाल भाऊ, दिलीप भाऊ, सुनिता ताई व सोबत वीणाताई पण रूम वर आल्या मस्त त्यांच्या सोबत गप्पा मारत चहा झाला. ताईचा स्वभाव खुप छान ताई हे इथे नमूद करावसं वाटतं. त्याही त्यांच्या घरी निघून गेल्या. सुनिता ताईला आता घरी जायची घाई लागली कारण भावजी घरी एकटेच होते. ताई पण रात्रीच्या गाडीने निघून गेल्या त्यांना पण अश्रू अनावर झाले होते. सर्वांशी न तुटणारे ऋणानुबंध जुळले आहेत.
दिनांक 25/05/2022 बुधवारी उठल्यावर सगळ आवरून नाश्ता करून रूम मध्ये आलो मग दिलीप भाऊ व विशाल भाऊ गाडीची चौकशी करून आल्यावर कळले की परत जाण्यासाठी एसटी बस तर आहे पण त्याचे तिकीट जास्त आहे व इतका लांबचा प्रवास एसटी बस ने करणे माझ्यासाठी सोपे नाही त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी 05:30 ला रेल्वे होती त्यामुळे आम्ही आज मुक्काम करायचा ठरवलं. दुपारच जेवण झाल्या नंतर आराम करून आम्ही फिरायला बाहेर पडलो. सर्व प्रथम आम्ही पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरानंतर सर्वात श्रद्धेय म्हणून कैकाडी मठाचा उल्लेख केला जातो. अतिशय कमी जागेत कैकाडी मठात हजारो वर्षांपूर्वीचे प्रसंग मूर्त्यांच्या रूपाने साकारण्यात आले आहेत. स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून कैकाडी महाराजांचा मठ बघायला जातो. त्या मठात गेलो तिथे गेल्या नंतर माझ्या मुळे विशाल भाऊ ची खुप बेजारी झाली. त्यांना मला काही जाग्यावर पाटीवर उचलून घ्यावे लागले क्षमा भाऊ तिथून बाहेर पडत असताना सुषमाताईचा कॉल आला थोड बोलून ताईने कॉल ठेवून दिला. आम्ही रुक्मिणी दर्शनासाठी गेलो दर्शन झाल्यानंतर परत निवासस्थानी आलो जेवायला जाणारच होतो की तितक्यात विशाल भाऊला वीणा ताईचा कॉल आला जेवले नसाल तर मी डब्बा घेऊन येत आहे. मी दिलीप भाऊला म्हणलं कशाला ताईला उगाचच त्रास जेवलो असतो आपण इथे. दिलीप भाऊ म्हणले ताई ऐकलाच तयार नाहीत ताईने आमच्यासाठी खुप स्वादिष्ट जेवण बनवुन आणले होते खरच ताई तुमच्या हाताला खुप चव आहे तो स्वाद ही कथा लिहताना जसाच्या तसा आठवतो. ताईच्या हातचे जेवण करून तृप्त होऊन आम्ही झोपलो ते 26/05/2022 तारखेला सकाळी 04:00 उठून सोपस्कार आवरून रेल्वे स्टेशनचा रस्ता पकडला तिथे गेल्यावर थोडा वेळ होता गाडी येण्यासाठी म्हणून चहा घेतला तितक्यात गाडी आली आम्हाला येताना मस्त जागा भेटली. परतीचा प्रवास खुपच कंटाळवाणा वाटत होता कारण घरी जाण्याची इच्छा कुणाची नव्हती इतका जिव्हाळा आमच्यात निर्माण झाला होता. सकाळी वडापाव घेतला असल्याने दुपारी पुरी भाजी वर ताव मारला परभणी स्टेशनवर मला घेण्यासाठी माझा मित्र राधाकिसन आला होता मी विशाल भाऊ, दिलीप भाऊ, नितेश यांना मी घरी येण्याचा खुप आग्रह केला पण त्यांना पुढे जायच असल्याने ते स्टेशन वरूनच पुढे गेले खुप सार्या आठवणी घेऊन मी घरी परत आलो.
ही कथा लिहीत असताना काही घटना, व्यक्ती, स्थळ मला आठवले नसतील तर व त्यांची नावे राहिली असतील कृपया क्षमा करावी
